भेसळयुक्त सॅनिटायझरचा धोका टाळण्यासाठी घरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा?

सध्या कोरोना व्हायरसमुळे आपण सगळेच वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत जास्तच जागरूक झालोय.

याकाळात जास्त वापर होतोय तो सॅनीटायझरचा. बरेच ठिकाणी वापरली जाणारी सॅनिटायझर्स हि निकृष्ठ दर्जाची असल्याचं कंज्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाला आढळून आलेलं आहे. काही लोक या अनिश्चित काळात निव्वळ नफा कमावण्यासाठी बाजारात उतरल्याचं सुद्धा या सोसायटीला आढळून आलेलं आहे.

तपासणी साठी घेतलेल्या काही नमुन्यांमध्ये हानीकारक मिथेनॉल असल्याचे सुद्धा आढळून आले. टॉक्सिक मिथेनॉलच्या वापराने दृष्टिदोष होण्याचा सुद्धा धोका असतो. या शिवाय ज्या लोकांना ऍलर्जीचा त्रास असेल त्यांनी सुगंधी सॅनिटायझर्स चा वापर टाळावा.

अशा वेळी, सॅनीटायझर विकत घेण्यापेक्षा तो घरीच बनवता आला तर?

चला तर मग घरीच सॅनीटायझर कसा बनवायचा ते जाणून घेवूयात आजच्या लेखात.

या आजार मुळे सगळ्या जगाला त्याचे महत्व पटलेच. त्यामुळे हा जेव्हा आला तेंव्हा साबण आणि सॅनीटायझर वापरण्याचे सल्ले डॉक्टर देवू लागले. वास्तविक पाहता सॅनीटायझर हा डॉक्टर लोकच जास्त वापरत.

कोणत्याही मोठ्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही पहिले असेल की तिथल्या नर्स आणि डॉक्टर सेनीटाइजर वापरतात. आपण सामान्य माणसे याचा कधीच वापरत नव्हतो. पण या कोरोंनामुळे आता तो घराघरात पोचलाच. कोरोंना विषाणू आला तेंव्हा सेनीटाइजर, मास्क, हँडवॉश, साबण यांना खूप मागणी वाढली.

मात्र त्यात अधिक मागणी आहे ती सॅनीटायझरला. त्यामुळे अनेक कंपन्यांनी सॅनीटायझर बनवण्याचा सपाटा लावला आहे. त्यात नकली सॅनिटायझर बनवून ते अव्वाच्या सव्वा किमतीत विकणेही चालू झाले. पण अशा मध्ये आपली स्वच्छता महत्त्वाची म्हणून वाटेल ती किंमत मोजून सॅनिटायझर आपल्या जवळ ठेवणे हे ओघाने आलेच.

केवळ हॉस्पिटल साठी लागणारा सॅनीटायझर बनवणार्‍या कंपन्यांनी घरगुती सॅनीटायझर बनवण्यास सुरुवात करून दुपटीने पैसे कमावले. घर, कंपन्या, व्यवसाय याठिकाणी याचा वापर खूप वाढल्याने त्याला मागणीही तशी मिळाली.

पण या केमिकल युक्त सॅनीटायझरमध्ये अनेक घटक द्रव्ये अशी आहेत जी आपल्या शरीरास घातक आहेत.

त्यामुळे याचा वापर जास्त आणि सतत झाल्यास अपाय होऊ शकतो.

लहान मुलांना यापासून जास्त त्रास होऊ शकतो. कारण त्यांची त्वचा खूप नाजुक असते. सतत त्यावर सॅनीटायारचा मारा झाल्यास त्यांच्या हाताची साले निघण्याचा संभव आहे.

त्यामुळे त्याच्या वापरावर काही मर्यादा आहेत. केमिकलयुक्त सॅनीटायझरमध्ये अल्कोहोल खूप अधिक असते.

आपण घरातच चांगला सॅनीटायझर बनवू शकतो. तो कसा ते आता पाहुयात.

घरीच सॅनीटायझर बनवण्यासाठी तुम्हाला काही सामग्री लागेल. ती खालीलप्रमाणे.

1) रबिंग अल्कोहोल- हे अल्कोहोल तुम्ही हॉस्पिटल मध्ये पहिले असेल. तसेच तुम्ही जेंव्हा आजारी असता आणि डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतात तेंव्हा ते देण्याआधी कापसावर घेवून काय लावतात? ते असते रबिंग अल्कोहोल.

हे निळ्या रंगाचे असून याला स्पीरिटसारखा उग्र वास असतो. तुम्हाला घरी सॅनीटायझर बनवण्यासाठी या मुख्य सामग्रीची गरज आहे.

कोणत्याही मेडिकल दुकानात तुम्हाला ते खरेदी करता येईल.

मात्र ते खरे असावे कारण बाजारात सध्या नकली रबिंग अल्कोहोलची चलती आहे.

नकली निळा रंग आणि थोडे अल्कोहोल मिसळून ते विकले जात आहेत.

त्यामुळे तुम्ही रबिंग अल्कोहोलची खरेदी करताना त्यात 99% अल्कोहोल असावे. सॅनीटायझर बनवण्यासाठी याचे प्रमाण तिप्पट असावे लागेल. कारण त्वचेवर बसलेले विषाणू मारण्यासाठी ही प्रभावी सामग्री आहे.

2) कोरफड जेल (एलोवेरा जेल)- हे तर तुम्हाला माहीतच आहे. एलोवेरा जेल तुम्हाला सॅनीटायझर बनवण्यासाठी उपयुक्त आहे.

त्याच्यात आद्रता असल्याने त्वचेला हानी पोचत नाही. तसेच अल्कोहोल खूप वेळ आपल्या त्वचेवर चिकटून राहते, टिकून राहते.

तुम्ही घरच्या घरी सुद्धा कोरफडीचा जेल बनवू शकता. तसेच बाजारात उपलब्ध असणार्‍या रेडीमेड जेलचाही वापर करू शकता.

सॅनीटायझर बनवण्यासाठी ¼ कप एवढे याचे प्रमाण लागेल.

3) लिंबू रस किंवा एखादे सुगंधी तेल- सॅनीटायझर तयार करण्यासाठी आणि त्याचा वासही उग्र वाटू नये यासाठी तुम्ही त्यात लवेंडर तेल, लिंबाचा रस किंवा इतर कोणत्याही तुम्हाला आवडेल त्या सुगंधी तेलाचा वापर करू शकता.

याच्या वापराने अल्कोहोलचा उग्र वास येणार नाही. यासाठी अश्या सुगंधी तेलाचे साधारण 7 ते 10 थेंब सॅनीटायझर साठी घ्या.

हि झाली आपली घरच्या घरी सॅनिटायझर बनवण्याची सामग्री. कोरफडचा जेल आणि अल्कोहोल यांचे प्रमाण 2:1 असे असावे, हे लक्षात असू द्या.

सॅनीटायझर साठी अल्कोहोल अत्यंत महत्वाची सामग्री आहे. याचे प्रमाण हे अधिक असायला हवे. इतर वस्तूंच्या तुलनेत अल्कोहोलचे प्रमाण जरा जास्त असावे.

कोरोना सारख्या भयंकर विषाणूला मारण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. या सर्व साहित्याचे प्रमाण लक्षात घ्या. आता पाहुयात याची कृती.

कोरफडचा जेल आणि अल्कोहोल यांचे प्रमाण 2:1 असे असावे, हे लक्षात असू द्या.

1) एक काचेचे भांडे घ्या. त्यामध्ये 2 कप रबिंग अल्कोहोल, 1 कप एलोवेरा जेल आणि 7 ते 10 थेंब लिंबाचा रस किंवा सुगंधी तेल टाका.

2) आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवत रहा. सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे.

3) त्यानंतर एका स्वच्छ बाटलीत हे मिश्रण भरून ठेवा.

तुम्ही कधीही, कुठेही हात लावलात, घराबाहेरुन आलात किंवा कुठेही जाणार असाल तेंव्हा हा घरचा सॅनीटायझर वापरा. यामुळे तुम्ही एक छान अनुभवही घेवू शकता आणि महागड्या सॅनीटायझर पेक्षा हा तुमच्या घरातील सॅनीटायझर तुम्हाला स्वस्तही होईल. अशा प्रकारे घरीच सॅनीटायझर बनवून तुम्ही हा उपाय आणि कृती इतरांनाही सांगू शकता.

मित्रांनो आणि मैत्रीणिंनो, सध्या आपण कोविड-19 या महामारीतून मार्गक्रमण करतोय. सर्वांनीच आपल्यासहित आपल्या कुटुंबियांची, शेजारी, मित्र, नातेवाईक यांची काळजी घेतली पाहिजे.

त्यासाठी भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने काही नियम घालून दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी सर्वांनीच करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याशी, जीवाशी निगडीत या गोष्टी आहेत. ते नियम कोणते आहेत ते पहा.

  • आपले हात वरचेवर साबण, हँडवॉशने कमीत कमी 20 सेकंद धुवा.
  • हातावर सेनीटाइजर लावा.
  • कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छं धुवा.
  • बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा.
  • जर तुम्ही आजारी असाल तर स्वतःला इतरांपासून लांब ठेवा. आजारी व्यक्तिपासूनही लांब रहा.
  • तुम्हाला सर्दी, ताप अशी लक्षणे असल्यास कोविडची वैद्यकीय तपासणी करून घ्या.

सध्या कोविडमुळे आपण घरीच आहोत. मुलांचे होमस्कूलिंग सुरू आहे. तेंव्हा या सर्व वैयक्तिक स्वच्छतेसोबतच मानसिक आणि शारीरिक आरोग्य अबाधित ठेवणेही आवश्यक आहे. यासाठी योग्य आहार, व्यायाम, योगासने याचाही समावेश करा. दिनचर्या निरोगी ठेवा.

मनाचे श्लोक

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय