या आठ मार्गांनी वाढवा आपल्यातली सकारात्मक ऊर्जा

परिवर्तन हा जगाचा नियम आहे, तसाच आयुष्याचाही…. पण बदल स्वीकारण्यासाठी तुमच्यात सकारात्मक मानसिक ऊर्जा, स्फुरण आहे का?

जर नसेल तर, आजच्या लेखात वाचा तुमच्यातील ‘सकारात्मक ऊर्जा’ वाढवण्याचे आठ मार्ग.

आपण पाहतो की, काही माणसे खूप ‘एनर्जेटिक’ असतात. त्यांना पाहून नेहमी विचार येतो की, या व्यक्ति असे काय खातात? की ज्यामुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा ठासून भरलेली असते.

कोणतीही परिस्थिति असो, त्यांच्यातील ऊर्जा कधीच कमी होत नाही.

आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोण कायम सकारात्मक असतो. कोणताही बदल असो, मग तो नातेसंबंध, करियर, आरोग्य कशा मशीलही असो, त्यांच्यातील एनर्जी कायम असते.

तुम्ही जे बोलता, जशा भावना व्यक्त करता, विचार करता त्याचा थेट प्रभाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक उर्जेवर होत असतो.

म्हणजे पहा की, तुम्हाला एखादे नवीन काम मिळाले किंवा तुम्हाला हवी तशी नोकरी मिळाली. तर, अशा वेळी तुमच्यातील ऊर्जा खूप सळसळते.

तुम्ही जोशीले होता. तुम्हाला ‘स्फुरण’ चढते. तुम्ही नव्या दमात काम करता, मग ते काम कितीही अवघड असो किंवा जास्त प्रमाणात असो. तुमचा उत्साह कायम टिकून राहतो.

तुमच्या मानसिक ऊर्जेचा ‘मीटर’ वाढत राहतो. त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही कायम काम करण्यासाठी ‘फ्रेश’ राहता.

तुम्हाला जे काही आयुष्यात मिळवायचे आहे, जे ध्येय गाठायचे आहे त्यासाठी तुमच्यातील उत्साह कसा टिकवून ठेवायचा?

त्याची गुरुकिल्ली नेमकी काय? हे जाणून घेऊया.

खरे तर, आपण नेहमी वास्तवात येणार्‍या चांगल्या- वाईट अनुभवातून शिकत असतो.

त्यातूनच आपल्याला नवीन ऊर्जा मिळत असते. नव्या दमाने पुढची वाटचाल करण्यासाठी मानसिक शक्ति मिळते.

त्यातून तुमच्या आयुष्याला आकार मिळतो. प्रत्येक घटना तुमची पुढील कृती, वर्तन याची दिशा ठरवते. यामध्ये तुमचा उत्साह कायम राहत नाही.

त्यामध्ये कमी-जास्तपणा होत असतो. पण तरीही, हा सकारात्मक उत्साह कायम ठेवण्याची मानसिक शक्ति तुमच्यामध्ये आणायची असेल तर त्यासाठी पुढील आठ पद्धतींचा अवलंब जरूर करा.

तुमच्यातील दमदारपणा वाढवा आणि जिथे जाल तिथेही इतरांच्यात ऊर्जा निर्माण करा.

१) कृतज्ञता भाव बाळगा- प्रत्येक लहान गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ रहा. भलेही ती सजीव असो की निर्जीव, तुम्हाला ती वस्तु उपयोगी झाली असेल तर नक्कीच तिच्या बद्दल तुम्ही कृतज्ञ भाव व्यक्त करा. कोणत्याही गोष्टीविषयी नितांत श्रद्धा बाळगा. आनंद, प्रेम, ज्ञान, शांतता स्वभावात आणा.

जे काही आयुष्यात घडले त्यातून तुम्ही काही ना काही चांगले-वाईटअनुभव घेता. त्यातूनच तुम्ही शहाणे होता. तुमच्या आयुष्यात येणार्‍या अशा बर्‍या–वाईट अंनुभवांबद्दल कृतज्ञ रहा.

सुरक्षित राहण्याच्या प्रयत्नात आपला मेंदू अनेकदा मनामध्ये नकारात्मक विचार आणतो.

मग त्यांची साखळी तयार होते आणि त्यातून तुमची कृतीही तशीच घडत जाते. म्हणून, रोज स्वतःला तुम्ही उत्साही, निरोगी, आनंदी, शांत असण्याची आठवण करून द्या.

त्यासाठी ध्यान करा. तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी नेहमी तुम्हाला मदत करणार्‍या व्यक्ति-वस्तु यांच्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवा.

दररोज रात्री झोपताना तुम्हाला ऑक्सीजन पुरवणार्‍या निसर्गाचे, अन्न देणार्‍या शेतकर्‍याचे, परमेश्वराचे आभार माना. तुमचे विचार ही गाडी आहे आणि त्यात जर चांगल्या भावनांचे इंधन असेल तर तुमची गाडी सुसाट धावणारच. सकारात्मक ऊर्जा मिळणारच.

२) आत्मसंवाद– तुमच्या मनावर तुमचे नियंत्रण हवे. त्यासाठी काही वेळ मौन साधना करावी. आत्म संवाद खूप महत्वाचा आहे.

आपण बाहेरील लोकांशी तर सतत बोलतोच पण, स्वतःशी बोलणेही खूप आवश्यक आहे.

त्यासाठी प्राणायाम, योग, ध्यान या गोष्टी करा. काहीवेळा एकांतात बसा, स्वतःच्या केलेल्या कामाचे निरीक्षण आणि परीक्षण करा.

त्यामुळे नवी दिशा मिळेल, वैयक्तिक वर्तनात बदल होईल. अशा गोष्टी करण्याने एक भक्कम आध्यात्मिक पाया तयार होतो.

ज्यावर उभे राहून तुम्ही मानासिकरीत्या समर्थ बनाल. स्वतःचे ‘कनेक्शन’ स्वतःशी साधा. त्यासाठी महिन्यातून एकदा 10 मिनिटे तरी असा प्रयोग जरूर करा. त्यात सातत्य राखा.

३) नवीन प्रयोगासाठी प्रयत्नशील रहा– कोणतेही काम जर तुम्ही परांपरिकरीत्या न करता त्यात जर नवीन प्रयोग केला तर खूप चांगला परिणाम होतो. आपल्या वर्तमानातील असंख्य अवगुण, त्याविषयी जागरूकता, अनुभव, यांना नव्या प्रयोगाची साथ असेल तर जीवन आणखी फुलपंखी होते.

बर्‍याचदा आपण एकाच प्रकारच्या कामात, त्याच पद्धतीत वर्षानुवर्षे अडकतो. त्यामुळे आपल्याला कंटाळा येतो.

त्यात आपली ऊर्जा ‘जैसे थे’ होते, ती वाढत नाही. त्याऐवजी तुम्ही त्यात नव्याने बदल केला, कामाची पद्धत बदललीत तर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते.

त्यासाठी तुम्ही तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी चांगली पुस्तके वाचा, पॉडकास्ट ऐका, नवीन पदार्थ शिका, वैयक्तिक विकासाकडे लक्ष द्या, नवीन कोशल्ये शिका. त्याचा उपयोग जगण्यात करा.

४) सकारात्मक ऊर्जा वाढवा– तुमच्या भोवती कोणत्या प्रकारच्या लोकांचे वलय आहे त्यावर तुमची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

सतत तक्रारी, नकारात्मक विचार करणार्‍या लोकांचा सहवास तुम्हाला लाभत असेल तर तुम्हीही त्याच प्रकारचा विचार करू लगता.

तुमची मानसिकताही नकारात्मक होते. अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवा.

याउलट जे लोक नेहमी तुम्हाला नवीन कल्पना सांगतात, सकारात्मक ऊर्जा देतात.

ज्यांच्या केवळ सहवासाने तुमचे ज्ञान वाढते अशा लोकांचे वलय तुमच्याभोवती तयार करा. त्यामुळे तुमची स्कारात्मक ऊर्जा वाढेल.

तुम्हाला जर एखाद्यासमोर तुमची कोणतीही गोष्ट सांगण्यास सुरक्षित वाटत नसेल, जे तुम्हाला समजून न घेता तुमच्या विचारांची चेष्टा करतात त्या व्यक्तीशी बोलणे टाळा. सुसंगती ठेवा, कुसंगती नको.

५) निसर्गाला तुमचा मार्गदर्शक बनवा- आपण सगळेच सुंदर निसर्गाशी निगडीत आहोत.

माती, अन्न, पाणी, ऑक्सीजन देणार्‍या निसर्गाशी आपण काहीवेळ का होईना, समरस झाले पाहिजे. आपण केवळ घोड्यासारखे धावतोय.

पण, निसर्गातील अनेक सुंदर अनुभव घेण्यास मुकतो. नवी उमेद देणारा सूर्योदय पहा, लाल-केशरी रंगांची उधळण करताना येणार्‍या दिवसाची योजना आखणारा सूर्यास्त पहा, पर्यटन करा.

पक्ष्यांचा किलबिलाट ऐका, ताजी हवा देणारी नवीन झाडे लावा, माळरानावर डोलणारी रंगीबेरंगी रानफुले पहा.

त्यासाठी वेळ काढा. केवळ शरीरालाच नाही तर मनाला नवी उमेद, उमंग नक्की मिळेल.

निसर्गातच आपल्याला हवी असणारी सकारात्मक ऊर्जा आहे. ती शोधा, सामावून घ्या आणि निसर्गाशी असा ‘मूक संवाद’ साधा. तो तुमचा सच्चा मार्गदर्शक आहे.

६) जबाबदारी स्वीकारा- बर्‍याच वेळा आपण आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटनांसाठी कुठेतरी स्वतःला जबाबदार धरतो, आणि घडणाऱ्या घटनांचे खापर स्वतःवर फोडतो. त्यामुळे आपली मानसिकता, वागणूक बदलते.

गाडीचा चालक जरी कितीही चांगला असला तरी, कधीतरी तो ‘ट्रॅक’ सोडून जातोच ना! पण, त्यावेळी ती गोष्ट जर तो सतत घोकत बसला, पुढच्या प्रवासाकडे लक्ष देण्यात कमी पडला तर त्याला पुढचा पल्ला गाठता येईल का?

जीवनात अडथळे तर येणारच. कोणत्याही प्रसंगाचा जास्त विचार न करता ती गोष्ट तिथेच सोडून द्यायला शिका. जास्त भावनिक होऊन विचार न करता आत्मिक शक्ति वाढवा. येणार्‍या नव्या जबाबदारीची जाणीव ठेवा, ती स्वीकारा. तुमच्या सकारात्मक जीवनाची गुरुकिल्ली तुमच्याच हातात आहे.

७) तुमची कलात्मकता जपा– आपण नेहमीच्या रहाटगाडग्यात इतके मश्गुल झालो आहोत की, आपण लहानपणी काय करायचो? तुमची आवड कोणती होती? हेच विसरून जातो.

आपल्यातील गायक, चित्रकार, फोटोग्राफर आपण कुठेतरी अडगळीत ठेवतो. या सर्व कला तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.

वेळ असेल तेंव्हा चित्र काढा, फोटोग्राफी करा, गाणे म्हणा, छान नृत्य करा, उत्सव साजरे करा, त्यासाठी पुढाकार घ्या. तुम्ही काढलेली चित्रे, गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाका.

त्यामुळे लोकांना ते आवडतील, तुम्हाला प्रेरणा मिळेल, समाधान मिळेल. आनंद वाटण्याने वाढतो.

८) स्वतःशी प्रामाणिक रहा– तुम्ही जे काही करता त्याच्याशी प्रामाणिक रहा. तुमचा कामावर, सकारात्मकतेवर विश्वास असायला हवा.

त्यासाठी लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवा, चांगल्या लोकांशी मैत्री करा, स्वतःला नेहमी कामात सिद्ध करा.

त्यातूनच तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि संकटातून पुन्हा उभे राहण्याचे धैर्यही मिळेल. तुम्ही जसे वागता, जसे राहता, जसे विचार करता यातून तुमची प्रतिमा बनत जाते. स्वतःशी प्रामाणिक राहणाऱ्या लोकांमध्ये ‘सेल्फ एस्टीम’ असतो इतकंच नाही तर इतरांनाही त्यांचा आदर असतो हे कधीही लक्षात घ्या…..

या आठ मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस एक नवी संधी, नवी ऊर्जा घेऊन येत असतो. त्या संधीला स्वीकारा.

आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा मनमुराद आस्वाद घ्या. नवीन यशाची शिखरे गाठा. मनाची बाग सकारात्मक विचारांनी, फुलांनी फुलवा, चांगले काम करा. आयुष्य फुलपंखी करा. ’जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पडेगा’.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “या आठ मार्गांनी वाढवा आपल्यातली सकारात्मक ऊर्जा”

  1. Likhan khup chaan aahe.. Sakaratmak kas rahu shakto te chaan present kela aahe… Mala aankhi lekh vachayla aawdel

    Reply
    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalks/

      मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

      Reply
    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply
    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      मनाचेTalks फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalks/

      मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय