अति बडबड करण्याची सवय बदलायची असेल तर हे करा…

बरेचदा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये किंवा अगदी एखाद्या प्रवासात सुद्धा किणीतरी अनोळखी व्यक्ती तुम्ही पहिली असेल, जीने न थकता बडबड करून हैराण करून सोडले असेल….

कुठल्याही विषयावर न थांबता, अविरत बोलत राहणं आणि समोरच्या माणसाला बोलायची संधी न देणं या गोष्टी ज्याच्याकडून अगदी नकळतपणे होऊन जातात त्याला ही ‘अति प्रमाणात बडबड’ करण्याची सवय लागलेली असते.

खूप बडबड मग ती चांगलो बडबड असो, नाहीतर वाईट विषयावर बडबड असो, ती सवय चांगली नसतेच….

यशस्वी लोकांमध्ये नेहमी दोन सवयी असतात, ते ऐकतात जास्त आणि बोलतात कमी…

कदाचित तुम्हाला सुद्धा ही ‘अति प्रमाणात बडबड’ करण्याची सवय असेल ज्यामुळे लोक तुमच्या पासून चार हात दूर राहणे पसंत करत असतील…

पण या सवयीचे गुलाम झाल्याने ही सवय कशी मोडावी याचा उपाय तुम्हाला सापडत नसेल.

पण जसं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं, अगदी तसंच या ‘अति बडबड’ करण्याच्या सवयीला सुधारणे सुद्धा शक्य आहे.

आधी आपण बघू काही लोक जास्त का बोलतात…

१) कधी अनुभव केलंय का, की तुम्ही जेव्हा स्वतः बद्दल खूप बोलता तेव्हा खूप मस्त वाटतं, स्फुरण चढतं….

एका संशोधनात असं निदर्शनास आलेलं आहे की, खूप बोलणाऱ्या लोकांना बरेचदा स्वतः बद्दल बोलण्याची सवय असते. ज्याला बोली भाषेत आपण ‘फुशारक्या’ सुद्धा म्हणतो.

असं, स्वतः बद्दल बोलताना माणसाचा मेंदू, डोपमाईन हार्मोन्स रिलीज करतो. डोपमाईन हे ‘प्लेजर हार्मोन्स’ असतात. त्यामुळे असं बोलून बोलणाऱ्याला लगेच, मस्त वाटायला लागतं…

२) बरेचदा बडबड ही, आपल्याला खूप कळतं! हे दाखवण्यासाठी केली जाते. पण त्याचा निगेटीव्ह इम्पॅक्ट असा होतो की अशी बडबड करणाऱ्या व्यक्तीची क्रेडीबिलिटी राहत नाही.

३) खूप बडबड करण्याचं कारण हे कधीकधी नर्व्हसनेस किंवा असुरक्षितता सुद्धा असू शकतं. अशा वेळेस केली जाणारी बडबड ही बरेचदा असंबद्ध बडबड असते.

४) कधी कधी जास्त बडबड केली जाते ती एखाद्याचं मतपरिवर्तन करण्यासाठी.

हे सगळं सांगण्याचं कारण असं की, बडबड करणाऱ्या माणसाला जर आपल्या सवयीला आळा घालायचा असेल तर आपल्या बोलण्याचं पॅटर्न समजून घेणं गरजेचं.

आता पुढे आपण बघू, खूप बडबड करण्याची सवय मोडण्यासाठी काय करायचं?

१) सल्ले देणं आणि चौकशा करणं यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा : बरेचदा इतरांना सल्ले देणं, माहिती काढण्याचा प्रयत्न करणं याची माणसाला लत लागून गेलेली असते. पण यामुळे संवाद आणि नातं दोन्हीही मध्ये कडवटपणा येऊ शकतो.

एखाद्या मिटिंग मध्ये आधीच स्वतः ची मतं सांगण्यापेक्षा इतरांचे पर्सपेक्टिव्ह जेव्हा तुम्ही ऐकून घेता, तेव्हा निश्चितच तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होतं.

२) अभिप्राय घेण्याची सवय ठेवा : बरेचदा असं होतं की, तुम्ही खूप काही बोलता, पण तुमच्या बोलण्याच्या इम्पॅक्ट बद्दल तुम्ही अनभिज्ञ असतात.

तुमचं बोलणं ‘बडबड’ म्हणून इतरांच्या कानावरून वाहून सुद्धा गेलेलं असतं पण तुम्हाला त्याचा थांगपत्ताही लागत नाही.

आणि हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा निगेटिव्ह भाग बनून जातो. म्हणून एखाद्या विश्वासू सहकाऱ्याचा किंवा मित्राचा तुमच्या बोलण्याबद्दल फीडबॅक घ्या.

३) बोलण्याच्या आधी विचार करा : आतापर्यंत तुमचं लक्ष जर फक्त बोलण्याकडे जात असेल तर बोलण्या आधी आपण जे बोलणार आहोत त्यावर विचार करण्याची सवय लावून घ्या.

आपण जे बोलणार आहोत ते बोलणं गरजेचं आहे का? हा प्रश्न स्वतः ला विचारा आणि बोलणं जर खरंच गरजेचं असेल तरच बोला.

असं केल्याने अनावश्यक गोष्टींबद्दल बोलणं तुम्ही टाळू शकाल. आणि याने अनावश्यक विषय आणि आवश्यक विषय यातला फरक तुम्हाला ओळखता येईल.

४) विचार करून शब्द निवडा : बडबड करण्याची सवय तोडण्यासाठी कमी बोलण्याचा सराव करण्याची गरज आहे. त्याच बरोबर शब्दांची नीट निवड करणं जमलं पाहिजे.

आपण उगाचच खूप बोलताना समोरच्याला दुखावतो का, याची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं…

५) वाद घालणं टाळा : सामान्यपणे चर्चा चालू असताना कमी बडबड करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी जरी झाला तरी कधी कधी शक्यता अशी असते की, एखाद्या विषयावर असहमती होऊन वाद घातल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.

अशा वेळी संयम ठेऊन, धीराने विषय ऐकून घेऊन, कमी शब्दांत आपले मुद्दे मांडा.

Manachetalks

या काही गोष्टी लक्षात घेतल्या तर थोड्या शब्दांत प्रभावीपणे विषय मांडण्याचा सराव तुम्हाला करता येईल.

कारण शेवटी आपल्याला माहीतच आहे, प्रचंड आवाज करते ती असते चिल्लर, पण आवाज न करता आपली किंमत दाखवून देतात त्या असतात नोटा….

बरं आता, आम्ही जास्त बडबड केली असेल तर तुमच्या सारख्या वाचकांच्या फीडबॅकची आम्हालापण गरज आहे.

म्हणून कमेंट बॉक्स मध्ये तुमचा फीडबॅक द्या, आपल्या मित्र परिवाराला ही माहिती शेअर करा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय