पुण्याच्या सुजाता नाफाडे यांनी घरीच द्राक्षे, स्ट्रॉबेरीची लागवड कशी केली

घरीच द्राक्षे स्ट्रॉबेरी सारख्या फळांची लागवड

आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बागेत द्राक्ष, स्ट्रॉबेरी यांचं पीक घेता येऊ शकेल यावर आपला विश्वास बसत नाही… 

पण पुण्याच्या सुजाता नाफाडे यांनी हे शक्य करून दाखवलं. २००८ पासून ७० वेगवेगळ्या फळ, भाज्या त्यांनी आपल्या घरीच पिकवल्या.

आपल्या घराच्या गच्चीवर बाग फुलवणं हा बऱ्याच जणांनी आवडीने जोपासलेला छंद असतो.

यात कोथिंबीर, मिरची, टोमॅटो आणि काही फुलझाडं असं काहीसं पीक घेतलं जातं.

पण घराच्या गच्चीवर द्राक्षांचं पीक घेता येऊ शकेल हा विचारच आपल्याला शिवून गेलेला नसतो.

द्राक्षांची बाग म्हंटली की, मोठ्ठा द्राक्ष बागाईतदारांचा तामझाम असतो त्यामुळे गच्चीवरच्या बागेत इतकंच नाही तर घरासमोरच्या परसबागेत सुध्दा द्राक्षांचं पीक घेण्याचा विचार आपण सहसा करत नाही.

पण पुण्याच्या सुजाता नाफडे यांनी २००८ पासून आपल्या घरात ७० वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाज्या पिकवायला सुरुवात केली. आणि हो यामध्ये द्राक्षे, स्ट्रॉबेरी, डाळिंब यासारख्या बागायती समजल्या जाणाऱ्या फळांचा सुद्धा समावेश आहे.

घरीच द्राक्षे स्ट्राबेरी सारख्या फळांची लागवड

सुजाता नाफाडे या मूळच्या शेतकरी कुटुंबातील असल्याने बाजारात मिळणाऱ्या फळांवर पेस्टीसाईड्सचा झालेला मारा आणि त्यांना लवकर पिकवण्यासाठी केलेला कॅल्शियम कार्बाइड चा उपयोग यामुळे आपल्यापर्यंत येता-येता फळांची गुणवत्ता किती कमी होते हे त्यांना माहीत असल्याने, ऑरगॅनिक शेतीकडे त्यांचा नेहमीच कल असायचा.

आणि याला पर्याय म्हणूनच त्यांनी आपल्या घरात ऑरगॅनिक बाग फुलवण्याला सुरुवात केली.

२००८ ला सुजाता यांच्या एका मैत्रिणीने केरळहुन आणलेलं एक द्राक्षांचं रोप त्यांना भेट म्हणून दिलं.

तिथून सुजाता यांच्या या ऑरगॅनिक बागेची सुरुवात झाली. आणि हेच द्राक्षांचं झाड आता वर्षातून तीन वेळा द्राक्षांचं पीक देतं…

घरीच द्राक्षे स्ट्राबेरी सारख्या फळांची लागवड

घराच्या बागेत किंवा गच्चीवर द्राक्ष आणि स्ट्राबेरी पिकवण्याची सुजाता यांची पद्धत

वापरलेले साहित्य:

१) द्राक्षांसाठी एक खोल १०० लिटरचा ड्रम आणि स्ट्रॉबेरी साठी १ फूट खोल आणि ६ ते ८ इंची चौकोनी किंवा आयताकृती ड्रम किंवा कुंडी.
२) ओलसर काळी माती
३) घरात बनवलेले कम्पोस्ट
४) सुकलेली पाने (बागेत इतर झाडांची पडलेली असल्यास)

कृती:

१) ड्रम मध्ये ओली माती, घरातील कचऱ्यापासून बनवलेले कम्पोस्ट हे द्राक्षांसाठी त्याच प्रमाणे स्ट्रॉबेरी साठी घेऊन,
२) त्यात रोपाची नीट लागवड करून सर्वात वरती सुकलेल्या पानांचा थर त्यावर पाणी टाकून ठेवला तर ओलसर पणा टिकवून ठेवायला मदत होते. याला मल्चिंग असे म्हणतात.
३) लागवड करण्यासाठी रोप हे कुठल्याही चांगल्या नर्सरीमधून तुम्ही मिळवू शकतात.
४) द्राक्षांची वेल चढविण्यासाठी रनर किंवा किंवा एखादा दोर सुद्धा लावू शकता.

द्राक्षे किंवा स्ट्रॉबेरी ची बाग फुलवण्यासाठी लक्षात घेण्याच्या गोष्टी:

१) झाडाला चांगला सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी.
२) लागवडीसाठी मॉन्सून ची वेळ निवडावी
३) फळ आल्या नंतर पक्षांपासून वाचवण्यासाठी सुजाता त्यावर जाळी टाकतात.

घरीच द्राक्षे, स्ट्राबेरी सारख्या फळांची लागवड

सध्या पावसाळा चालू आहे. आपल्या घरात जर अशी ऑरगॅनिक बाग फुलवून छान रसदार द्राक्षे, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे घरीच पिकवायची असतील तर हा प्रयोग नक्की करून बघा. आणि गच्चीवरील ऑरगॅनिक शेती कशी करावी यासाठी ही माहिती आपल्या मित्र परिवारात शेअर करा.

शिवाय गणेशोत्सव सुद्धा आहे, तर त्या निमित्ताने बीजगणेश स्वतःच बनवून झाडाच्या रूपात बाप्पाला आपल्या घरात ठेवण्याची सुद्धा हीच संधी आहे.

Sujata Nafade

आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हीही असे काही वेगळे प्रयोग करत असाल तर आम्हाला सांगा त्यापासून नक्कीच इतरांनाही प्रेरणा मिळेल.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.