रु. १५००० पेक्षा कमी उत्पन्न असल्यास, वार्षिक ३६००० पेन्शन देणारी सरकारी योजना

जर तुमचं महिन्याचं उत्पन्न १५००० रुपयांपेक्षा कमी असेल आणि आतापर्यंत तुम्ही रिटरमेंटचं काही प्लॅनिंग केलेलं नसेल तर तुमची थोडीशी चिंता कमी करण्यासाठी हे वाचा.
मनाचेTalks वर आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक नियोजन याबद्दल आम्ही नेहमी तुम्हाला महत्त्वाची अशी माहिती देत असतो. त्यात बरेच जणांचे नेहमी असे म्हणणे असते कि या महागाईत वापरायलाच पैसे पुरत नाही तर पुढचा विचार करून आर्थिक नियोजन हे तर सामान्य माणसासाठी अशक्य असे स्वप्नच असते.
अशा परिस्थितीत भारत सरकारची हि पेन्शन स्कीम तुमची मदत करू शकेल. जर तुमचं महिन्याचं उत्पन्न रुपये १५ हजार पेक्षा कमी असेल आणि वय १८ ते ४० च्या मध्ये असेल तर या योजने मध्ये तुम्ही सामील होऊ शकता.
या योजनेचं नाव आहे ‘प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM)’ यामध्ये वयाच्या ६० व्व्या वर्षानंतर महिना रुपये ३०००/- किंवा वार्षिक रुपये ३६००० अशी पेन्शन मिळेल. या योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखात बघू.
या योजनेत आपल्या वयानुसार ५५ ते २०० जास्तीत जास्त रुपये असे योगदान दर महिन्याला देण्याची सोया केलेली आहे. जर वयाच्या १८ व्व्या वर्षी तुम्ही या योजनेत सामील व्हाल तर महिन्याला कमीत कमी ५५ रुपये पासून गुंवणूक तुम्हाला सुरु करता येईल.
तरच जर वयाच्या ३० व्व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करायला तुम्ही सुरूवात केली तर महिना शंभर आणि वयाच्या ४० व्व्या वर्षी जर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर महिना २०० रुपये असे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता.
म्हणजेच कुठल्याही गुंतवणुकीसारखं इथे पण जेवढं लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तितकं चांगलं.
उदाहरणार्थ, जर १८ वर्षे वय असताना तुम्ही गुंतवणूक सुरु केली तर महिना रुपये ५५ असे, रुपये ६६० हि तुमची वार्षिक गुंतवणूक असेल. असे पुढे ४२ वर्षे म्हणजे ६० वर्षे वय पूर्ण होई पर्यंत एकूण गुंतवणूक हि २७,७२० रुपये इतकी होईल. त्यापुढे दर महिना ३००० रुपये अशी पेन्शन आजीवन सुरु होईल.
यामध्ये खातेधारकाचे जितके योगदान असेल तितकेचक योगदान भारत सरकार कडून असेल अशी तरतूद केलेली आहे.
या योजनेत कोण सहभागी होऊ शकेल…👇
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) योजनेत असंघटीत क्षेत्रातील लोक आणि ज्यांचे उत्पन्न रुपये १५००० पेक्षा कमी आहे असे १८ ते ४० वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुष सामील होऊ शकतात.
योजनेत सहभागी होण्यासाठी काय करायचे…👇
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी CSC सेंटरवर आपले आधार कार्ड आणि रजिस्ट्रक्शनसाठी लागणारी इतर माहिती आणि कागदपत्रे देऊन योजनेत सामील होता येईल.
या योजनेत सामील होण्यासाठी अधिकृत CSC सेंटर आणि खाली दिलेला टोल फ्री नम्बर यावरूनच माहिती घ्यावी. कारण याबद्दल व्हाट्स ऍप वरती काही खोटे मेसेजेस सुद्धा फिरवले जात आहेत.
हे खाते उघडल्या नंतर श्रमयोगी कार्ड दिले जाते. या योजनेची अधिक माहिती १८०० २६७ ६८८८ या टोल फ्री नम्बरवर कॉल करून घेता येईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा