रात्री दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान वाचा या लेखात

रात्री दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान

कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलं असतो.

पण दूध रात्री प्यावं की सकाळी याबद्दल नेहमीच दुमत असतं….

बरेच आहारतज्ञ रात्री झोपण्यापूर्वी १ तास आधी दूध पिण्याचा सल्ला देतात. दिवसभराच्या थकव्या नंतर, जेवण झाल्यावर झोपण्या आधी दूध प्यायल्याने झोप नीट लागते. आयुर्वेदात पण झोपण्यापूर्वी दूध घेण्या चा सल्ला दिला जातो.

वेगवेगळ्या अभ्यासांनुसार रात्री दूध पिण्याचे फायदे किंवा नुकसान काय आहेत ते या लेखात पाहू.

रात्री दूध पिणं आणि चांगली झोप लागण्याचा काही संबंध आहे का?

दूध आणि दुग्ध जन्य पदार्थांमध्ये ट्रीप्टोफेन ची मात्रा काही प्रमाणात असते, ट्रीप्टोफेन हे एक अमिनो ऍसिड असून ते चांगली झोप लागण्यासाठी उपयुक्त ठरतं.

लवकर झोप न लागण्याचा त्रास जर तुम्हाला असेल तर रात्री गरम दूध पिण्याची सवय नक्कीच फायदेशीर ठरेल.

दुधात असणारे मेलाटोनिन हे हार्मोन्स झोपण्या आणि उठण्याच्या पॅटर्न मध्ये नियमितता ठेवतात, त्यामुळे अवेळी जाग येण्याची समस्या सोडवायला सुद्धा याने मदत मिळते.

पण काळजी फक्त ही घ्यावी की, झोपण्याच्या कमीतकमी १ तास आधी तरी दूध प्यावे. दूध पिऊन लगेच झोपणे तेवढे टाळावे.

रात्री दूध प्यावं, तर ते गरम की थंड आणि तसे का?

रात्री दूध पिण्या बद्दल जे अभ्यास केले गेले आहेत त्यानुसार गरम पेय, पदार्थ हे चिंता कमी करून शरीराला आराम देतात.

रात्री दूध पिण्याचे काही फायदे:

१) रात्री दूध प्यायल्याने वजन वाढण्याची समस्या आटोक्यात आणता येते- बऱ्याच अभ्यासांमध्ये असे आढळून आलेले आहे की, वजन प्रमाणाबाहेर वाढण्याचा आणि रात्री अवेळी जाग येण्याचा संबंध आहे.

रात्री दूध पिऊन झोपल्याने यावेळी भूक लागून जाग येण्याची शक्यता कमी होते. रात्री नीट झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी थकवा येऊन अनहेल्दी खाण्याची टेंडन्सी वाढते, ज्यामुळे वजन आटोक्यात ठेवणं केवळ अशक्य होऊन जातं…

२) रात्री दूध पिणे पचनासाठी (बद्धकोष्ठता) फायदेशीर- रात्री दूध प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी व्हायला मदत होते. हे सहसा आपल्याला माहीत नसते.

ही समस्या असेल तर दुधात मध टाकून प्यावे. दूध आणि मध हे प्रिबायोटिक असल्याने आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया विकसित होतात. त्यामुळे पचन चांगले होते.

दुधामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात, ज्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते.

३) रात्री गरम दूध प्यायल्याने ताण- तणाव कमी व्हायला मदत होते- हल्लीच्या धावपळीच्या दिवसांत बरेच जणांना, तणावामुळे रात्री नीट झोप येत नाही.

दुधामध्ये असणाऱ्या प्रोटीन मुळे मासपेशी रिलॅक्स होऊन ‘कार्टीसोल’ हे स्ट्रेस हार्मोन्स नियमित ठेवायला मदत होते. आणि याच मुळे तणाव आणि अस्वस्थता कमी होऊन चांगली झोप लागते.

४) रात्री दूध प्यायल्याने दुसऱ्या दिवशीसाठी ऊर्जा मिळते- रात्री गरम दूध प्यायल्याने शांत झोप, तणाव कमी होऊन रिलॅक्स वाटणे, पोट नीट साफ होणे या सर्व गोष्टी जुळून आल्याने, दुसऱ्या दिवशी उठतानाच सकारात्मक प्रभाव पडून ऊर्जा वाढायला मदत होते.

रात्री दूध पिण्याचे तोटे:

रात्री दूध पिण्याचे हे सर्व फायदे असले तरीही, काही जणांची शरीर प्रकृती अशी असते की ज्यामुळे ते, दूध पचवू शकत नाहीत.

अशा शरीर प्रकृतीच्या लोकांना दूध पचवणे शक्य नसते. त्यांनी मात्र रात्री दूध पिणे टाळावे.

लॅक्टिज इंटोलरन्स चा त्रास असल्यास पोटात दुखणे, गॅस होणे यासारखे त्रास होतात.

काही लोकांना ग्लुकोज इंटोलरन्स चा त्रास असतो. अशी शरीरप्रकृती असल्यास अचानक एनर्जी लेव्हल कमी होऊन अशक्त पणा जाणवायला लागतो.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!