थोडसं लॉजिक थोडसं मैजिक मानवी नात्यांवर हसत खेळत भाष्य करणारी एक अप्रतीम कलाकृती

थोडसं लॉजिक थोडसं मैजिक
थोडसं लॉजिक थोडसं मैजिक

लेखक राजीव शिंदे यांनी स्वत: दिग्दर्शनाचा निर्णय घेऊन ही जबाबदारी पेलल्याने परफेक्ट इंटरप्रिटेशनची अनुभूती मिळते. त्याच सोबत कास्टिंग डिरेक्शनचीही दाद द्यावी लागेल. आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चैतन्यच्या भूमिकेसाठी विकास पाटील या कलाकाराची निवड एकदम योग्य झाल्याने त्याने रंगवलेला चिंत्या प्रेक्षकांना भावून जातो.

प्रस्तावना

आजवर कलावैभव या नाट्यसंस्थेने जवळपास ऐंशीच्यावर नाटके यशस्वीपणे सादर केलेली आहेत.त्यापैकी पुरुष, गेला माधव कुणीकडे, वाडा चिरेबंदी, प्रेमासाठी वाट्टेल ते, जास्वंदी, नातीगोती या नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.त्यामुळे अर्थातच या यशस्वी नाटकांच्या निर्मिती सादरीकरणातून विजया मेहता, विक्रम गोखले, नाना पाटेकर, मोहन जोशी, नीना कुलकर्णी रीमा लागू यांच्यासारखे उत्तमोत्तम कलाकार मराठी रंगभूमीला दिलेले आहेत. या नाटकातीलमोहन पेंडसेची मध्यवर्ती भूमिका साकारणारा, मराठी हिंदी चित्रपटातील अत्यंत यशस्वी कलाकारमोहन जोशीयाने आपल्या व्यावसायिक रंगभूमीची सुरुवातकलावैभवया संस्थेच्या माध्यमातून केल्याचे अगदी आवर्जून सांगतो.

थोडसं लॉजिक थोडसं मैजिक

थोडसं लॉजिक थोडसं मैजिक

संकल्पना

आपल्या मनासारखा, सर्वगुणसंपन्न आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणारा जोडीदार मिळण्याची अपेक्षा बाळगतांनाच, आपल्याला नशिबाने मिळालेल्यापार्टनरला त्याच्या गुणदोषांसहित स्विकारून संसाराची वाटचाल यशस्वी करण्याच्या मुळावर आपल्या भारतातलीलग्नसंस्थाही संकल्पना बांधली असून त्यावरच या समाजाची रचना स्वीकारली गेली आहे. परंतु आजची पिढी मात्र पाश्चिमात्यांचे केवळ अनुकरण करण्याच्या नादातलग्नसंस्थाही संकल्पना झुगारूनलिव्ह इन रिलेशनशिपसारखे राग आळवतांना दिसते. अगदी खरं सांगायचं तरपतिपत्नीहे नातं टिकवायचं असेल तर वर नमूद या दोन्हीही प्रकारात एकमेकांवर प्रेम, गाढा विश्वास, निष्ठा, एकमेकांना समजून घेण्याची, समजावून सांगण्याची त्यासाठी तडजोड करण्याची प्रवृत्तीची गरज असते. त्यांच्या अशा या मानसिकतेवर मागील पिढीने योग्य ते संस्कार करण्यात त्यांना समजून घेऊन समजावून सांगण्यात अपयशी ठरतांना आढळते आहे. किंबहुना त्यांचा धिक्कार करीत आपल्या हतबलतेवर पांघरून घालत आहे.आजच्या समाजात हा विषय अतिशय गहन असूनही यावर चर्चासत्र होतांना दिसत नाही, ही खेदाचीच बाब होय. मराठी रंगभूमीवर हा विषय बऱ्यापैकी हाताळला गेला ही जमेची बाब होय. लेखक दिगदर्शक राजीव शिंदे यांनी एका ताकदवर संहितेमधीलमोहन जोशीसारख्या एका कसदार अभिनेत्याला टेलरमेड भूमिका देऊन अतीशय प्रभावी सादरीकरण करतांनाचआजोबा नातूया नात्याला एका वेगळ्याच ढंगात प्रेक्षकांसमोर पेश केलं आहे.

कथासंहिता

आपल्या स्वत:च्या हिंमतीवर एका आयटी कंपनीत उच्चपद्स्त गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवलेलाचैतन्य पेंडसेहा आपल्याच मस्तीत जगत असतो. एका अपघातात त्याच्या आईवडिलांच्या मृत्यू झाल्यानंतर आपल्या वडिलोपार्जित बंगल्यात एकंदरीत सुखात आयुष्य उपभोगत असतांनाच एके दिवशी अचानक अनेक वर्षांपासून वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले त्याचे आजोबा, म्हणजेच वडिलांचे वडील, मोहन पेंडसे (अप्पा) त्यांच्याच या बंगल्यात परततात. आपल्या मुलाशी सुनेशी त्यांचे पटत नसल्यानेच त्यांनी वृद्धाश्रमाचा मार्ग पत्करलेला असतो.

आईच्या मनातली आजोबांवरील रागाची सततची उजळणी आईवडिलांच्या अपघाताला आजोबाच जबाबदार असल्याचं पूर्वग्रह यामुळे चैतन्य उर्फ चिंत्याच्या मनात आजोबांविषयी प्रचंड तिरस्कार असतो. तर ज्यांच्याशी वित्तुष्ट होतं ती दोघंही आज या जगातच नाहीत शिवायआईवडीलांविना पोरही चिंतामोहन पेंडसेउर्फ अप्पांच्या मनात असते म्हणूनच स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला असतो. हे दोघेही रहात असलेला बंगला अप्पांच्या नावावर चिंत्याही वारसदारच अशा या कोंडीत दोघेही एकमेकांना झेलत असतात. त्यांच्यात क्षणोक्षणी वादाच्या ठिणग्या उडत असतात. चिंत्याला आजोबा नजरेसमोर नको असतात पण एकमेकांचा सामना तर रोजचा ठरलेला अटळ असतो. अप्पांना उघडउघड या घराबाहेर हाकलण्याचा सर्वकष प्रयत्न करणाऱ्या चिंत्याच्या प्रत्येक बाउन्सरला अप्पा हसतहसत समर्थपणे सामना करतात, अशी ही लढाई खुसखुशीत खुमासदारपणे रंगमंचावर पहायला मिळते. अप्पांवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करण्याच्या नादात एके दिवशी चिंत्या त्याची मैत्रीण जेनीलालिव्ह इन रिलेशनशिपया संकल्पनेसह या घरात दाखल होतो. त्यामागे हा पाश्चिमात्य नूतन प्रकार अप्पांना मान्य होणार नाही ते आपसूकच आधीप्रमाणे या घरातून निघून जातील हा चिंत्याचा होरा असतो. मात्र फासे उलटेच पडतात. अप्पा आणि जेनीचं सूत उत्तम जुळतं, ती अप्पांना आधी कम्प्युटर शिकवते मग इंटरनेटचीही ओळख करून देते. मग या शिकवणीतून अप्पांनालिव्ह इन रिलेशनशिपया संकल्पनेचं ज्ञान प्राप्त होतं.

याच दरम्यान नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बागेत फिरायला गेले असतांनाच त्यांची गाठशकुशी पडते. या दोघांचं बालपण आणि तारुण्याचा काळ एकाच चाळीत  बहरलेला असतो. एकमेकांविषयीच्या प्रेमभावना मनातल्या मनातच राहून गेल्याने दोघांच्याही अव्यक्त प्रेमाला पालवी फुटते. मध्यंतरीच्या काळात अप्पा विजोड जोडीदाराचे बळी तर शकू परिस्थितीची! ही दोघंही समदु:खी, त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचं एकत्र येणं समर्थनीयच असतं, शिवाय आता तरलिव्ह इन रिलेशनशिपहा सहज सोपा मार्गही गवसलेला असल्याने शकूही या बंगल्यात दाखल होते. हा तर चिंत्याच्या बाउन्सरवर मारलेला अप्पांचा षटकारच ठरतो. मग अप्पा शकूला एकुणात सगळा प्रकार कथन करून चिंत्याला प्रेम देण्याच्या त्याचं प्रेम मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये सहभागी करून घेतात. जेन हा चिंत्याचा विकपाईंट असल्याने हे दोघेही जेनवर वैचारिक संस्कार करतात, तिचं मन जिंकून मतपरिवर्तन करण्यात यश मिळवतात. आता जेनही या दोघांना सामील झाल्याने तिचं प्यादं पुढे सरकवून एका नाटकाच्या माध्यमातून चिंत्याचे सर्व गैरसमज दूर करतात. मग चिंत्याला अप्पांच्या प्रेमाची किंमत कळते, लग्नसंस्था ही संकल्पना अप्पांच्या वैवाहिक आयुष्यातून प्रतीत होते याच नोटवर तो जेनला रीतसर लग्नाची मागणीच घालतो.

सादरीकरण

लेखक राजीव शिंदे यांनी स्वत: दिग्दर्शनाचा निर्णय घेऊन ही जबाबदारी पेलल्याने परफेक्ट इंटरप्रिटेशनची अनुभूती मिळते. त्याच सोबत कास्टिंग डिरेक्शनचीही दाद द्यावी लागेल. आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चैतन्यच्या भूमिकेसाठी विकास पाटील या कलाकाराची निवड एकदम योग्य झाल्याने त्याने रंगवलेला चिंत्या प्रेक्षकांना भावून जातो.

जेन आणि शकू ही दोन्हीही स्त्री पात्रे संहितेच्यासपोर्ट सिस्टीमचा एक भाग आहेत. त्यासाठी डॉक्टर प्रचीती सुरु आणि माधवी गोगटे यांची निवडही सुयोग्य, चपखल आणि दिग्दर्शकाच्या विश्वासास पात्र ठरलेली आहेत कारण या दोघींनी त्यांच्या अभिनयातून आपापल्या भूमिकांना संपूर्ण न्याय दिलेला आहे.

माधवी गोगटे यांनी गायलेलंभरजरी गं पितांबर दिला फाडूनहे गाणं विशेष करून लक्षात रहातं!

खरंतर हा विषयजनरेशन ग्याप‘, आजोबा आणि नातू यांच्यातील गैरसमजातून निर्माण झालेला गुंता सोडवण्याचा, लग्नसंस्था लिव्ह इन रिलेशनशिप या चार स्तंभांवर बांधलेला समाजातील अत्यंत महत्वाच्या नाजूक संबंधांवर दृष्यस्वरूपाचा वादविवाद होय. लेखक दिग्दर्शक राजीव शिंदे यांनी हा विषयासंबंधी त्यांचे विचार कल प्रेक्षकांच्या माथी मारता तसेच तीन पिढ्यांच्या भावभावना अजिबात दुखवता अतिशय तरल स्वरुपात संयतपणे मांडला आहे. तरीसुध्दा या नाटकाच्या संहितेबरहुकुम लेखकाचे संवाद प्रखर, चपखल प्रत्ययकरी ठरतात.ताकदवर संहिता, संवादलेखन, सुयोग्य उत्तम कलाकारांची निवड दिग्दर्शन यामुळेकाळप्रेक्षकांच्या समोर उभा रहातो. रंगमंचावरील नाट्य घडत असतांना अनेकवेळा संवाद दाद मिळवून जातात आणि कलाकाराच्या अभिनयाकडे थोडं दुर्लक्ष्यचं होतं, परंतु संवाद संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरूच असतो, प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी आणि हात टाळ्यांमध्ये गुंतलेले असा एक विरळाच संगम संपूर्ण नाट्यगृहात बघायला मिळतो कारण कलाकाराच्या अभिनयाला राहिलेली दाद नंतरहून लक्षात आल्यानेच हा प्रकार घडतो.

. एकाकीपण म्हणजे काय असतं, हे वृद्धाश्रमात राहिलेल्या माणसांशिवाय कोण सांगणार

. हृदयात ..लॉजिक नसतं, माजिक असतंबिकॉज माइंड इज करप्ट

. म्हातारपण आलं की हसणं थांबत नाही, हसणं थांबलं की म्हातारपण येतं.

हृदयाला भिडणारा विषय आणि उत्तमोत्तम संवाद साभिनय सादर होतांनाचा अविष्कार अनुभूती विरळाच! त्याचमुळे प्रेक्षक हा विषय त्यातील पात्रांमध्ये इतके गुंतून जातात की…….सुयोग्य नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा संगीत या सर्वबाबीचं योगदान उत्तम असल्यानेच हे नाट्य प्रेक्षणीय झाल्याने ते बघण्यात, समजण्यात समजून घेण्यात प्रेक्षकांना सहाय्यभूत ठरते.दिग्दर्शकाने बोका, मांजर आणि त्यांची पिल्ले यांना कथानकात महत्वाचं रोल दिला आहे. या प्राण्याच्या काल्पनिक खानदानाच्या माध्यमाने मानवाला शिकवण दिली आहे, हे विशेष!

थोडसं लॉजिक थोडसं मैजिक

नाट्याभिनय

लेखक दिग्दर्शक राजीव शिंदे यांनी नाटकाची संहिता यातीलमोहन पेंडसेहे पात्रमोहन जोशीया अभिनय संपन्न कलाकाराला नजरेसमोर ठेवून रंगवलेलं निश्चितच नाही. परंतु मोहन जोशी साठी मात्र ही भूमिकाटेलरमेडअशीच आहे इतपत ती त्याला शोभली आहे. मोहन जोशी याने या भूमिकेच्या गर्भात जावून या पात्राचा अभ्यास केलेला दिसतो. एकुणात अप्रोच, त्यासाठी घेतलेला पवित्रा, समोर येईल तसं जगलेल्या आयुष्यातून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी, हारजीत, दू: वेदना पचवण्याची ताकद, बालपणाच्या अव्यक्त प्रेम भावनांची मुस्कटदाबी, म्हातारपणात त्याची कबुली, नातवासाठीच प्रेम, कर्तव्य, प्रायश्चित्ताची भावना यासह डीटरमिनेशन खंबीरपणा असे सगळे भावभावनांचे कल्लोळ गिळत हे पात्र अत्यंत सफाईदारपणे, स्वाभाविकपणे या भूमिकेला संपूर्ण न्याय देऊन सादर केलं आहे, केवळ लाजवाब! मोहन जोशी साठी ही भूमिका टेलरमेड होती की तो ही भूमिका जगला, हे ठरवणं खूपच कठीण, व्वा क्या बात है!

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!