वजन वाढवण्यासाठी आहारात कशाचा समावेश असावा?

वजन वाढवण्यासाठी आहारात कशाचा समावेश असावा

सहसा विषय चर्चेला घेतला जातो तो वजन कमी करण्याचा!! पण आपल्या भारतात अन्डर वेट असलेल्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे.

प्रमाणापेक्षा खूप कमी वजन असणे, ऍनिमिया असणे, कुपोषण ही फक्त गरीब समजल्या जाणाऱ्या भागातच नाही, तर शहरी भागात सुद्धा मोठी समस्या आहे.

पण वजन वाढवण्यासाठी रासायनिक खाद्य पदार्थांचे सेवन करणे हे, त्यात असलेल्या स्टिरॉइड्स मुळे घातक ठरते.

शरीर यष्टी खूप बारीक असणं, कृश असणं हे बऱ्याच लोकांची समस्या असते. त्यामुळे आपल्याच शरीराची लाज वाटणं, न्यूनगंड निर्माण होणं, किंवा इतरांनी चिडवणं याचा त्रास ही अशा लोकांना होतो.

खरंतर हा बॉडी शेमिंग चा प्रकार स्वतः च्या बरोबर झालेला जसा नको असतो, तसा इतरांबरोबर ही करणं कधीही टाळलं पाहिजे.

वजन वाढवण्यासाठी आहारात काही खाद्य पदार्थांचा समावेश केल्यास वजन वाढवून चांगले आरोग्य आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व मिळवणे शक्य होऊ शकते.

वजन वाढवण्यासाठी खूप खाल्लं पाहिजे असं काही नाही. काही विशिष्ट खाद्य पदार्थ सेवन करून वजन वाढवले जाऊ शकते.

असेच काही वजन वाढवणारे खाद्य पदार्थ कोणते, ते या लेखात वाचा.

१) बदाम आणि शेंगदाणे: फक्त एक छोटी मूठभर बदाम खाल्ल्याने ७ ग्रॅम प्रोटीन आणि १८ ग्रॅम आरोग्य दायी फॅट्स आपण शरीराला पुरवू शकतो.

बदाम आणि शेंगदाणे या दोन्ही मध्ये कॅलरी आणि फॅट्स मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री बदाम आणि शेंगदाणे दुधात भिजवून खाल्ल्यास वजन वाढवण्यासाठी मदत होते.

Peanut Butter चे नियमित सेवन हे वजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

२) रात्री चणे पाण्यात भिजवून खाणे: रात्री पाण्यात चणे भिजवून खाणे हा पाहिलवनांचा आहार असतो हे आपल्याला माहीत असेलच. हा थोडा गमतीचा भाग झाला तरी. अगदी पहिलवान न होता नुसते वजन वाढवायचे असेल तरी चणे रात्रभर भिजवून सकाळी खाणे हे आरोग्यासाठी लाभदायक असते.

३) दुध: जुन्या काळा पासून दूध हे वजन वाढवणारे आणि स्नायूंमध्ये बळकटी देणारे म्हणून मानले जाते.

प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मिनरल्स याचा उत्तम पुरवठा करणारे दूध हे पूर्णान्न मानले जाते.

वेट लिफ्टिंग चे व्यायाम प्रकार आणि नियमितपणे दुधाचे सेवन केल्यास स्नायूंमध्ये वाढ होते, आणि स्नायूंना बळकटी येते.

जेवणानंतर किंवा वर्कआऊट केल्या नंतर एक ग्लास दूध घेणे हे सुदृढ आरोग्यासाठी फायदेशीर ठरते असे एका अभ्यासातून सिद्ध झालेले आहे.

४) तांदूळ: तांदूळ हा वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारा, कमी किमतीत उपलब्ध होऊ शकणार कार्बोहायड्रेट्स चा उत्तम सोअर्स आहे.

१ कप तांदळाच्या भातात १९० कॅलरीज, ४३ ग्राम कार्बोहायड्रेट्स आणि काही प्रमाणात फॅट्स असे घटक असल्याने, पाचन शक्ती जरी चांगली नसेल तरी वजन वाढवण्यासाठी तांदळाचा वापर हितकारक ठरतो.

तरीही तांदळाच्या काही प्रकारांमध्ये आर्सेनिक चे प्रमाण जास्त असते. ब्राऊन राईस मध्ये आर्सेनिक चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ‘ब्राऊन राईस’ तुमच्या आहारात जास्त वापरला जात असेल तर पांढरा तांदूळ वापरण्यावर कधीही भर द्यावा.

याशिवाय केळी, ओट्स यांच्या नियमित सेवनाने सुद्धा वजन वाढवायला मदत होते…

मनाचेTalks वर वजन कमी करण्या बद्दल बरेच लेख आहेत. तेव्हा बरेच वाचकांचे आम्हाला मेसेजेस येतात की वजन वाढवण्यासाठी काही उपाय सांगा. तर हे उपाय नक्की ट्राय करून बघा.

वजन कमी करणे स्त्रियांसाठी इतके अवघड का आहे? त्याची कारणे आणि उपाय

आणि वजन वाढवण्याच्या नेहमी प्रयत्नात असलेल्या आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.