रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचे फायदे

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचे फायदे

मानवी शरीरासाठी सर्वात आरोग्य दायी पेय कुठलं असेल तर ते आहे पाणी…

पाण्याने शरीर हायड्रेटेड राहून आरोग्यासाठी शारीरिक तसेच त्यामुळे होणारे मानसिक सकारात्मक परिणाम सुद्धा होतात.

आपल्या शरीराच्या वजनाच्या 60% भाग हा पाण्याचा असतो. अति वजन वाढण्याचा त्रास असल्यास पाण्याने भूक नियंत्रणात राहून वजन कमी करायला सुद्धा मदत होते.

सकाळी उठून भरपूर पाणी प्यावे हे जसे डॉक्टर किंवा घरातले जुने जाणते लोक सांगतात, तसंच रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत.

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्यायल्याने, रात्रभर शरीर हायड्रेटेड राहण्या बरोबरच शरीरात नको असलेले घटक सहजतेने बाहेर टाकण्यासाठी सुद्धा मदत होऊन ऊर्जा मिळते आणि रक्त शुद्ध होते.

रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी पाणी पिणे हा सवयीचा भाग झाला तर त्याचे आरोग्यासाठी कित्येक फायदे होतात.

पोट दुखण्याचा नेहमी त्रास होत असल्यास रात्री गरम पाणी प्यायल्याने कालांतराने अशी क्रॉनिक पोटदुखी कमी व्हायला मदत होते. ऍसिडिटी, बद्धकोष्ठ, पोटाच्या स्नायूंचे ताठरणे यासारखे सामान्य पण पुढे जाऊन गंभीर आजारात रूपांतरित होणारे त्रास भरपूर पाणी पिण्याच्या सवयीने आपण संपवू शकतो.

युरिन चा रंग गडद पिवळा असणे हे डिहायड्रेशन चे एक लक्षण आहे. किमान आठ ग्लास पाणी हे रोज प्यायले गेलेच पाहिजे. ही पाण्याची गरज सुद्धा आपल्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी काय आहेत यावर अवलंबून असते.

रात्री पाणी पिण्याचे फायदे

१) चांगली झोप येते: रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स चे प्रमाण संतुलित राहते. शरीरात टॉक्सिक पदार्थ शरीराबाहेर टाकायला मदत होते.

ऑक्सिजन चा योग्य पुरवठा होऊन एनर्जी लेव्हल संतुलित ठेवायला सुद्धा मदत होते. आणि झोपेच्या वेळी स्नायू शिथिल होऊन शरीराला आराम मिळतो.

२) तणाव कमी व्हायला मदत मिळते: दिवसभराच्या कामाने आलेला थकवा हे आता सर्वांसाठी सामान्य झालेले आहे. रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने तणाव कमी होऊन झोप चांगली लागते.

३) रक्ताभिसरणात सुधारणा होते: रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने रक्ताभिसरणात सुधारणा होऊन आरोग्य चांगले राखायला मदत होते. तसेच आम्लपित्ताचा म्हणजेच ऍसिडिटी चा त्रास कमी होतो.

४) पोट दुखण्याचा त्रास कमी होतो: भरपूर पाणी प्यायल्याने लाळ ग्रंथीचे कार्य व्यवस्थित होऊन पचन चांगले होते. याशिवाय ऍसिडिटी, बद्धकोष्ठ यासारखे पोटदुखीला आमंत्रण देणारे त्रास कमी व्हायला मदत होते.

प्रत्यक्षात पाणी पिण्या बरोबरच नेहमी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात भाज्यांचे योग्य प्रमाण असणे हे महत्त्वाचे आहे.

किडनी स्टोन ब्लॅडर इन्फेक्शन यांचा धोका टाळण्यासाठी सुद्धा भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे…

एवढंच नाही तर स्मृती आणि मूड चांगले तरतरीत राहण्यासाठी सुद्धा पाण्याची आपल्या शरीराला गरज असते…

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. अगदी बरोबर आहे सर 👍👍👍👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!