सुधा मूर्तींच्या व्हायरल होणाऱ्या फोटो मागचं सत्य!

सुधा मूर्तींच्या व्हायरल होणाऱ्या फोटो मगचं सत्य!

हल्ली हे सोशल मीडियाचं कोलीत सगळ्यांच्याच हाती आल्या पासून, झालंय असं कि एखादा फोटो कुठून तरी येतो त्यावर बोलायला काहीतरी सुरुवात होते आणि मग फिरत फिरत ते वाक्य काहीतरी नवीनच होऊन बाहेर निघतं.

तसाच सुधा मूर्तिंजींचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय ज्यावर असं म्हंटल जातंय कि, ‘सुधाजी वर्षातून एक दिवस भाजी विकतात.’ त्यामागचं सत्य काय आणि साधी राहणी उच्च विचारसरणी असलेल्या सुधाजींची ओळख करून घेऊ या लेखात.

सुधा मूर्ती, म्हणजेच इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेयरपर्सन आणि इन्फोसिस कंपनीच्या को-फाऊंडर नारायण मूर्ती यांची पत्नी, यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे.

पण त्यांची फक्त इतकीच ओळख आहे का? तर नाही.

फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगात सुधा मूर्तींच्या हुशारीइतकंच त्यांच्या हळव्या, साध्या स्वभावाचं कौतुक केलं जातं.

श्रीमंती, यश, प्रगती यातल्या कशाचीही हवा डोक्यात जाऊ न देता जमिनीवर पाय असलेल्या सुधाजी सगळ्यांच्याच आदर्श आहेत.

सुधाजींच्या साधेपणाचा पाया त्यांच्या बालपणात आहे हे त्यांनी आपल्या पुस्तकांतून वेळोवेळी सांगितलेलं आहे.

माहेरच्या कुलकर्णी असलेल्या सुधाजींच्या घरचे संस्कारच असे होते की यश डोक्यात जाऊ द्यायचं नाही.

खरंतर सुधाजी म्हणजे ज्याला आपण ‘करिअर ओरिएंटेड’ म्हणू अशा होत्या, म्हणूनच तर त्यांच्या अख्ख्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये त्या एकट्या विद्यार्थिनी म्हणजे ‘मुलगी’ होत्या.

त्यांची पहिल्या नोकरीची कहाणी तर फारच रंजक आहे. ‘Female candidates need not apply’ हे interview च्या जाहिरातीतलं वाक्य त्यांना खटकलं आणि त्या फक्त मुद्दाम त्या interview ला गेल्या नाहीत तर ती नोकरी मिळवून परत आल्या.

पुढे मग नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनी स्थापन करायची ठरवली तेव्हा त्यांनी नवऱ्याला मदत म्हणून नोकरी सोडली.

इन्फोसिसच्या यशामागे त्यांचे खूप कष्ट आहेत हे सगळ्यांना माहीत आहेच. आज इतक्या वर्षांनी यशाची आणि श्रीमंतीची अनेक शिखरे गाठल्यावर सुद्धा सुधाजींचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत.

इन्फोसिस फाऊंडेशन द्वारा चालणाऱ्या त्यांच्या समाजसेवेबद्दल लिहावं तितकं कमीच आहे.

आजकाल जरा आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यावर लगेच लोकांना दाखवायला म्हणून काही गोष्टी केल्या जातात मग ते ब्रँडेड कपडे असोत किंवा भरमसाठ दागिने.

सुधाजींच्या साध्या राहणीमानामुळे त्यांच्याबाबतीत असाच एक गैरसमज झाला होता.

साधा सलवार कमीज, केसांचा आंबाडा, जास्त दागिने नाहीत की मेकअप नाही अशी बाई विमानाच्या ‘बिझिनेस क्लास’च्या लाईनमध्ये थांबते ते त्या लाईनमधल्या दोन ‘हाय क्लास’ बायकांना पटण्यासारखं नव्हतं.

त्यांनी चक्क सुधाजींना बोर्डिंग पास दाखवायला सांगितला होता आणि सुधाजींनी तो दाखवायला नकार दिल्यावर त्यांना त्यावेळेस त्या बायकांनी ‘cattle class’ म्हणून हटकलं होतं.

सुधाजींनी हा साधेपणा केवळ आपल्यापुरताच जपला नाही तर तो त्यांच्या मुलांना देखील दिला.

एकदा त्यांच्या मुलाला, रोहनला, आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या मित्रांना मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला न्यायचं होतं. सुधाजींना हे सहज परवडण्यासारखं होतं पण पटण्यासारखं मात्र नव्हतं.

रोहन यांना त्या वयात ते समजण्यासारखं नव्हतंच तरीही सुधाजींनी त्यांना समजावलं.

आपल्या एका पार्टीच्या पैशात आपल्या ड्रॉयव्हरच्या कुटुंबाचा १-२ महिन्यांचा खर्च निघू शकतो, तेव्हा वाढदिवस साजरा करण्याची दुसरी काही आनंददायी पद्धत आपण निवडू शकत नाही का?

त्यांची खर्च करायला ना नव्हतीच पण अवाढव्य खर्च आपण कमी शकतो हीच त्यांची नेहमीची शिकवण होती.

अशाप्रकारे आपला साधेपणा केवळ आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता सुधाजींनी तो पुढच्या पिढीकडे ही सोपवला आहे.

आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल वाचू तितकं कमी आहेच आणि त्यांनी विविध पुस्तकातून लिहिलेल्या त्यांच्या अनुभवांबद्दल वाचू तितकं ही कमीच आहे.

शिक्षणाची जिद्द, करिअरबद्दलचं प्रेम, नवऱ्याला दिलेली अखंड साथ, यशाचा गैरवापर न करता त्यातून केलेली समाजसेवा, साधेपणा..

एका व्यक्तीकडून शिकण्यासारखं किती काय आणि आहे, असा विचार करत असताना नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

या फोटोमध्ये त्या भाजीच्या मोठ्या ढिगासमोर बसल्या आहेत.

अनेकांनी हा फोटो शेयर करून लिहिलं आहे की सुधाजी वर्षातून एक दिवस भाजी विकतात..

पण ते खरं आहे का? तर नाही..

मग त्या फोटोत नक्की काय करत आहेत?

खरंतर श्रीमंतीचा अहंकार होऊ नये, आपले पाय जमिनीवर आहेत तसेच घट्ट राहावेत यासाठी सुधाजी सेवा करतात.

म्हणजे काय? तर त्या वर्षातून तीन दिवस जयनगर येथील राघवेंद्र स्वामी मठात सेवा करायला जातात.

सकाळी चार वाजता उठून त्या मठात जातात आणि मठातल्या स्वयंपाकघरात प्रसाद करण्यासाठी पडेल ते काम करतात मग ते भाज्या निवडून चिरणं असुदे, फुळकुटावरची धूळ काढणं असुदे की खरकटी भांडी घासणं असुदे.

या सगळ्यामध्ये त्यांना फक्त एक मदतनीस असतो, जो त्यांना जड पोती उचलायला मदत करतो. बाकी सगळं काम त्या स्वतः करतात.. कारण काय?

तर अहंकार (जर आला असेलच तर) गळून जावा.

त्यांच्याबद्दल समजलेल्या या नवीन माहितीमुळे त्यांच्याबद्दलचा आपल्या मनातला आदर वाढला नाही तरंच नवल आहे..

मनाचे श्लोक

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Saiprasad Prabhakar Panhalkar says:

    Hats Off 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!