मोबाईलमुळे वाढलेल्या स्क्रीनटाइम चे दुष्परिणाम कमी कसे करता येतील?

स्क्रीनटाईम म्हणजे काय? तो चांगला की वाईट याबद्दल शंका वाटते? मग हा लेख वाचा आणि तुमच्या शंका दूर करा!

मार्चपासून, जसा लॉकडाउन सुरु झाला तसा आपल्या सगळ्यांचाच मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला.

सुरुवातीला वेळ जायला, टाईमपास म्हणून मोबाईलवर गेम्स खेळणं, सोशल मीडिया बघणं, YouTube वर रेसिपीचे व्हिडीओ बघणं या सगळ्यासाठी नेहमीपेक्षा फोनचा वापर दुपटीने वाढला.

मग जसजसा लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला तस-तसं आपलं सगळं कामच ऑनलाईन होऊ लागलं.

ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे त्यांना तर सकाळी उठल्यावर ‘लॉग इन’ करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो पण बाकीच्यांना ही ऑनलाईन असण्याची गरज प्रत्येक कामासाठी आहे.

याच काळात आपण ऑनलाईन खरेदीला इतके सरावले आहोत की भाज्यांपासून ते कपड्यांपर्यंत आपण सगळं काही ऑनलाईन मागवतो.

मुलांच्या सुद्धा शाळा, क्लास ऑनलाईन सुरु झालेत.

दिवसभरातून त्यांचाही चार-पाच तास यात सहज जातो त्यानंतर त्यांनाही मित्रमैत्रिणींशी, आजीआजोबांशी, मावशी-काका-आत्या-मामा वगैरे सध्या न भेटू शकणाऱ्या मंडळींशी व्हिडीओ कॉलवर बोलायचं असतं आणि विरंगुळा म्हणून टीव्ही बघणं, गेम्स खेळणं तर आहेच.

ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला तर ‘स्क्रीन टाईम’ वाढला.

स्क्रीनटाईम म्हणजे थोडक्यात आपण फोन/लॅपटॉप/टॅबलेटवर घालवलेला वेळ..

मग ते काम करण्यासाठी असो किंवा इतर काही.

आजकाल सगळीकडे ही नवीन टर्म अस्तित्वात आली आहे.. ‘स्क्रीन टाईम’

“मुलांचा स्क्रीन टाईम शक्य तेवढा कमी ठेवा.”

“स्क्रीन टाईम वाढल्याने डोके दुखी, स्ट्रेस, डोळे दुखी यासारख्या समस्या यायला लागल्या आहेत.”

अशी वाक्य आजकाल एकमेकांशी बोलताना बोलली जातात..

या स्क्रीन टाईमचे वाईट परिणाम आहेत तसे काही चांगले परिणाम सुद्धा आहेत.. आजच्या या लेखात आपण तेच जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी पहिले या स्क्रीनटाईमचे वाईट परिणाम काय आहेत ते बघून घेऊया.. ते ही तितकेच महत्वाचे आहेत.

गेल्या सहा महिन्यांचा विषय सोडला तरीही साधारण मागच्या पाच ते सहा वर्षांपासून स्मार्टफोनच्या वापरात झपाट्याने वाढ झाली.

तरुण पिढी तर सतत या ना त्या कारणाने फोनमध्येच असते. आपल्याला सगळ्यांनाच एव्हाना याचा अनुभव आला असेल की फार वेळ फोनमध्ये घालवला, खास करून सकाळी उठल्या उठल्या तर दिवसभर आपल्याला एक प्रकारची मरगळ असते.

कामात उत्साह वाटत नाही आणि हेच जरका रोज घडू लागलं तर डिप्रेशनसारख्या गंभीर धोक्याची पण शक्यता असते.

याशिवाय ही चार लोकांमध्ये बसून सुद्धा लक्ष सतत फोनमध्ये असेल तर इतर लोकांशी संवाद होत नाही त्यामुळे एकप्रकारचा एकाकीपणा जाणवतो.

स्क्रीनटाईमचे इतके दुष्परिणाम आहेत, आपल्याला सगळ्यांना हे माहीत आहेत किंबहुना आपल्याला कधीतरी याचा अनुभव ही आलेला असू शकतो..

पण आपल्याला याच्या चांगल्या बाजूबद्दल माहीत नसतं आणि कोणी ते सांगत सुद्धा नाही.. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ही दुसरी बाजू दाखवायला हा लेख घेऊन आलोय.

स्क्रीनटाईम चांगला कसा असू शकतो? सोशल मीडियावर घालवलेला वेळ हा काही फक्त वाया जात नाही तो कसा?

बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या घरातल्यांशी किंवा अगदी मित्र-मैत्रीणींशीही काही गोष्टी मोकळेपणाने बोलू शकत नाही.

अशा खूप गोष्टी मग मनातच साचत जातात आणि त्याचं मनावर दडपण यायला लागतं.

अशावेळेस मग हा एरवी बरबाद असलेला सोशल मीडिया मदतीला धावून येतो.

सोशल मीडियावर कितीतरी अनोळखी चेहरे मुक्तपणे वावरत असतात.

अशातच काहींची ओळख होते, पुढे जाऊन मैत्री होते आणि आपलं मनातलं बोलायला एक हक्काची जागा सुद्धा मिळते.

फेसबुकवर देखील अनेक ग्रुप्स असतात जिथे एकसारख्या गोष्टींची आवड असलेली विविध वयोगटातली माणसं एकत्र येतात.

अशा ग्रुप्समधून एकमेकांची दुःख वाटली जातात आणि आनंद द्विगुणित केला जातो. वाचनाची आवड असलेली, स्वयंपाकाची, खाण्याची आवड असलेली खूप लोकं अशी आभासी जगात का होईना एकत्र आली की चांगल्या पुस्तकांची, चांगल्या रेसिपींची देवाणघेवाण होऊन त्यातून नक्की काहीतरी ‘productive’चं होतं.

एरवी अनोळखी असणारी ही मंडळी अशा माध्यमातून एकत्र येतात आणि बऱ्याचदा एकदम जिवाभावाची होऊन जातात.

या लॉकडाउनच्या काळात तर अशा ग्रुप्समधून खूप लोकांचा वेळ चांगला गेला, खासकरून जी लोकं एकेकटी राहतात त्यांचा.

एका शहरात राहून सख्या भावंडांना, आईवडिलांना भेटता येत नाही तेव्हा या स्क्रीन टाइम मुळेच सगळे एकमेकांच्या संपर्कात राहू शकले. मग हा स्क्रीनटाईम चांगला की वाईट?

बऱ्याचदा सोशल मीडियावर शेयर केले जाणारे जोक्स सुद्धा काही काळासाठी आपली करमणूक करतात. एखादवेळेस मूड वाईट असेल आणि असे काही जोक्स, व्हिडीओ बघितले की मूड एकदम हलका होतो.

हे खरं आहे की सोशल मीडियामुळे बऱ्याच अफवा पसरतात, चुकीची माहिती मिळते पण याच माध्यमातून वेगवेगळ्या विषयांची ही उपयुक्त माहिती मिळते.

व्यक्तिमत्व विकास, किरकोळ आजारांवर घरगुती उपाय, एखाद्या व्यक्तिमत्वाची ओळख, पुस्तकांबद्दल माहिती अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी इथून घेण्यासारख्या आहेत.

आता हेच बघा ना.. आत्ता तुमचा स्क्रीनटाईम वाढला खरा पण त्याचा उपयोग तुम्ही मनाचेTalks वर काहीतरी नवीन माहिती जाणून घेण्यासाठी केला.. मग हा स्क्रीनटाईम वाईट कसा म्हणायचा?

पण याची ही दुसरी बाजू अशी की मी चांगले लेख वाचतो/वाचते म्हणून दिवसभर फोन घेऊन बसणं देखील योग्य नाहीच, नाही का?

मग जरी सकारात्मक कामासाठी आपला स्क्रीन टाईम वाढत असेल तरी कुठेतरी कसातरी त्याला आळा घालायलाच हवा.

हे नेमकं कसं करता येईल?

तर दिवसातले काही तास किंवा अमुक एक वेळ ठरवून घेता येईल, उदाहरणार्थ दुपारची जेवणं आटोपल्यावरचा अर्धा तास, संध्याकाळी चहा झाल्यावर अर्धा तास असं.

यामुळे आपोआप स्क्रीनटाईम कमी होईल आणि मग हा लिमिटेड स्क्रीनटाईम असेल तो फक्त चांगल्या कामासाठी वापरला जाईल.

यासाठी काही फोनमध्ये Applications सुद्धा आहेत, जसं की iphoneमध्ये आपला रोजचा स्क्रीन टाइम दिसायची सोय इनबिल्टच आहे.

यात आपण किती वेळ सोशल मीडियावर घालवला, किती वेळ फोनवर बोलण्यात घालवला, किती वेळ इंटरनेटवर सर्फिंग, जीमेल, गेम्स इत्यादीवर घालवला याची फोड करून दिसतं.

काही अँड्रॉइड फोनमध्ये सुद्धा ही सोय सेटिंग्समध्ये मिळते. याव्यतिरिक्त सुद्धा इतर Applications उपलब्ध आहेत..

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात.. आपण कुठली बघायची आणि कुठली सोडून द्यायची हे आपल्यावर असतं नाही का?
आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कशाच्या किती आहारी जायचं हे पण आपल्याच हातात असतं..

तुमचा स्क्रीन टाइम तुम्ही कसा घालावता, सोशल मीडियावर आजपर्यंत कुठल्या सकारात्मक गोष्टीत सहभागी होऊन आपला स्क्रीन टाइम सत्कारणी लावला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा.

धन्यवाद.

https://www.manachetalks.com/11703/how-to-take-care-of-eyes-while-learning-online-marathi/

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय