‘खोटारडे लोक’ ओळखण्याच्या पाच नामी युक्त्या

खोटारड्या लोकांचं खोटं कसं पकडावं 'खोटारडे लोक' ओळखण्याच्या युक्त्या

कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे समजत नाही?

खोटारड्या लोकांकडून फसवणूक होण्याची भीती वाटते?….. मग हा लेख तुमच्यासाठीच आहे!

समोरचा माणूस खोटं बोलतोय, थापा मारतोय ते कसं ओळखायचं वाचा या लेखात.

'खोटारडे लोक' ओळखण्याच्या युक्त्या

आपल्याला कळत नसतं पण आपल्या आजूबाजूला अनेक खोटारडी माणसं असतात.

काही लोकं तर अगदी सहज, विनासायास खोटं बोलतात.

बऱ्याचदा काही लोकांचं खोटं बोलणं म्हणजे केवळ थापा मारणं, त्याने फारसा धोका कोणाला नसतो.

त्यांच्या किरकोळ खोटं बोलण्याने कोणाला नुकसान होणार नसते.

अशा लोकांना उगीच लपवाछपवी करायची किंवा उगाचंच थापा मारायची सवय असते, असं म्हणायला हरकत नाही.

पण काही लोकं मात्र इतकी खोटारडी असतात आणि खोटं बोलण्यात इतकी सरावलेली असतात की त्यांच्या या खोटारडेपणाचा वापर ते दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी सहज करू शकतात, नव्हे करतातच.

आपल्याला पण रोजच्या आयुष्यात अशा लोकांचे अनुभव आलेले असतील किंवा येत ही असतील.

दुसऱ्यावर विश्वास टाकणाऱ्या भाबड्या माणसांचा फायदा घेऊन खूप जणं खोटं बोलून फसवत असतात. फसल्या गेलेल्या माणसाला मात्र वेळ गेल्यावर लक्षात येतं आणि तेव्हा फार काही करण्यासारखं उरलेलं नसतं.

तरी काही माणसांचा इतरांवर विश्वास ठेवण्याकडेच जास्त कल असतो.

समोरचा माणूस फसवतोय हे त्यांच्या ध्यानीमनी ही नसतं, कारण मुळात त्यांचा स्वतःचा स्वभाव साधा सरळ असतो त्यामुळे एखादा दुट्टपी माणूस कसा विचार करेल हे त्यांना समजत नाही.

आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात कधीतरी अशा लोकांचा अनुभव आलेला असेल.

एखाद्यावर विश्वास टाकावा आणि त्याबदल्यात आपली फसवणूक व्हावी किंवा एखाद्याने आपल्याला काहीतरी कबूल करावं पण ऐनवेळी कच खावी.

इतकंच काय काही काही नात्यांवर सुद्धा खोटारडेपणामुळे टांगती तलवार सतत असते.

एकमेकांना फसवून, अनेक जोडपी आपल्याला हवं ते करत असतात मग पुढे कधीतरी सत्य बाहेर येऊन भांडणं होतात किंवा खोटारडेपणा अविरतपणे तसाच सुरु राहतो..

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जगात खोटं बोलणारी माणसं असतात आणि त्यांनी ही कला अगदी अवगत केलेली असते, इतकंच नाही त्यांच्या रक्तात भिनवलेली असते.

त्यांना सहजासहजी पकडणं शक्य नाही पण माणूस म्हटलं की काहीतरी कमी जास्त होणारच.

ही खोटारडी माणसं काहीतरी धागेदोरे मागे ठेवतातच आणि नेमके तेच कसे ओळखायचे हेच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. साध्या संभाषणातून निरीक्षण करणे

खोटं बोलणारी माणसं ओळखायची असतील किंवा कोणाला खोटं बोलताना पकडायचं असेल तर ती व्यक्ती ‘खरं’ बोलताना कशी वागते, कसे हाव-भाव ठेवते, डोळ्यात डोळे घालून बोलते का या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणं गरजेचं आहे.

ते कसं करता येईल? तर या लोकांशी सहज संवाद साधून, साध्या संभाषणातून.

या लोकांना असे काही प्रश्न विचारायचे ज्याबद्दल ते खोटं बोलू शकत नाहीत जसं की आजचं हवामान कसं वाटतंय?

किंवा आज डब्यात जेवायला काय आणलं आहे?

संध्याकाळी घरी कसं जाणार आहे? इत्यादी….

ही उत्तरं देतानाचे त्यांचे हावभाव टिपले तर आपल्याला समजतं की खरं बोलताना ती व्यक्ती कशी वागते जेणेकरून कधी ती व्यक्ती खोटं बोललीच तर बदलेल्या हावभावांवरून आपल्याला शंका येईल.

२. सूक्ष्म निरीक्षण

खोटं बोलण्यात माणूस कितीही सरावलेला असेल तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की खोटं बोलताना त्याला काहीतरी कष्ट पडतातच.

आणि हेच कष्ट त्याच्या बॉडी language म्हणजेच, हालचालीवरून आपण ओळखू शकतो.

काही लोकं नर्व्ह्स होऊन सतत त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत राहतात, काही लोकांचे खांदे किंचित झुकतात.

काहींना हाताची बोटं मोडायची सवय असते तर काहींना पाय एकसारखा हलवायची.

पहिल्या पॉईंटमध्ये सांगितल्याप्रमाणे लोकांचे खरं बोलतानाचे हाव भाव योग्य पद्धतीने टिपले तर हे सूक्ष्म निरीक्षण करताना सोपं जाईल.

कारण या सगळ्या गोष्टी तो माणूस जेव्हा खरं बोलत असतो तेव्हा करत नाही कारण या काही त्याच्या सवयी नसतात.

खोटं बोलतानाची एकप्रकारची भीती असते म्हणून या गोष्टी अनावधानाने घडत असतात.

काही लोकांना मात्र पाय हलवण्याची किंवा चेहऱ्याला सतत स्पर्श करायची एरवी सुद्धा सवय असतेच.. त्यामुळे हा फरक ओळखता आला पाहिजे.

शिवाय खोटं बोलण्यात माणूस कितीही सराईत असला तरी कमालीचं खोटं बोलताना त्याच्या आवाजात कम्प जाणवण्याची सुद्धा शक्यता असते.

३. चेहऱ्याकडे बघा

चेहरा हा मनाचा आरसा असतो असं म्हणतात ते किती खरं आहे.

माणूस खोटं बोलू शकतो पण त्यांचा चेहरा नाही त्यामुळे कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद माणसांशी बोलताना किंवा त्यांच्याबरोबर काही ठरवताना, त्यांच्यावर विश्वास टाकायच्या आधी ते बोलत असताना त्यांच्या चेहऱ्याकडे नीट बघा.

खोटं बोलताना माणसं सहसा डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाहीत तसेच डोळे स्थिर सुद्धा ठेऊ शकत नाहीत.

त्यांचे डोळे सारखे भिरभिरतात. काहींना ओठ चावायची किंवा नाक खाजवायची सवय असते.

४. भाषा, वाक्यरचना याकडे लक्ष द्या

खोटं बोलताना जसे माणसांचे हावभाव बदलतात तशीच भाषा सुद्धा बदलते.

एरवी मातृभाषेत बोलणारा माणूस खोटं बोलताना अचानक इंग्रजीमध्ये बोलायला लागतो.

किंवा मातृभाषेतच काहीशी मोठी, लांबलचक वाक्य जशी तो एरवी वापरणार नाही अशी वापरायला लागतो.

कधीकधी खोटं बोलताना आपल्याला किती आत्मविश्वास आहे हे दाखवायला गरजेपेक्षा जोरात सुद्धा काही माणसं बोलतात.

असे बदल व्यवस्थित लक्षात घेतले पाहिजेत.

५. विषयांतर होतं का ते बघा

खोटं बोलताना किंवा बोलून झाल्यावर त्या विषयावरून ऐकणाऱ्याच लक्ष विचलित व्हावं म्हणून खोटारड्या लोकांना पटकन विषय बदलण्याची सवय असते.

अशी माणसं खरंच खूप धूर्त असतात, आपल्याला अगदी वेडं बनवून ते आपल्याला हवं ते इतक्या हुशारीने साध्य करतात की शेवटी आपण फसवले ते जातोच शिवाय फसवले गेलोय हे सहजासहजी लक्षात सुद्धा येत नाही.

म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला तुम्हाला फसवून काहीतरी विकायचं आहे आणि म्हणून तो त्या वस्तूचे फायदे सांगतोय आणि तुम्ही ती विकत घ्यायला तयार झालात की लगेच तो विषय बदलणार.

आणि शक्यतो हा विषय तुमच्याबद्दल, तुमच्या आवडी निवडीबद्दल असेल जेणेकरून तुमचं त्या वस्तूवरून, तिच्या किमतीवरून लक्ष विचलित होईल आणि सुरु असलेल्या विषयावर तुम्ही भरभरून बोलाल.

मित्रांनो, म्हटलं तर हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं सोपं आहे. कदाचित पहिल्या एकदोन वेळेला नाही जमणार पण सरावाने अशक्य असं काहीच नसतं.

एक मात्र आहे की सगळ्याच खोटं बोलणाऱ्या माणसांमध्ये हे दिसून येईल असं नाही.

त्यामुळे अगदी सारखंच ‘दाल में कुछ काला हैं।’ असं वाटून समोरच्यात हे सगळं शोधायचे प्रयत्न करण्याची सुद्धा गरज नाही.

पण मुखतः या पाच गोष्टी असतात ज्याकडे लक्ष दिलं तर लोकांचं खोटं तुम्ही पकडू शकता, आणि त्यांच्याकडून होणारी फसवणूक टाळू शकता.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

   सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.

   तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

   त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!