गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील.

एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल.

गुडघेदुखीच्या त्रासामुळे ना धड उभं राहता येतं ना चालता येतं, यामुळे आपल्या अगदी रोजच्या जगण्यावर सुद्धा या गोष्टीचा विपरीत परिणाम होतो.

आणि दुखण्याबरोबरच आपल्याला एकप्रकारचा न्यूनगंड सुद्धा येतो कारण कुठे बाहेर गेलं आणि चालायला लागलं तर गुडघे दुखतात.

गुडघेदुखीमुळे कित्येक वेळेला लोकांच्या समोर पार अवघडून जायला सुद्धा होतं.

आपल्याला असे अवघडून टाकणारे प्रसंग म्हणजे एखाद्याच्या घरी गेलं आणि त्यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नसेल तर गुडघेदुखीमुळे जिने चढायला त्रास होतो किंवा गुडघेदुखीमुळे खाली, मांडी घालून बसता येत नाही.

मग जिथे टेबल खुर्चीची सोय नसेल अशा जागी अडचण होते.

आपलं वय जर कमी असेल तर हाच आपला गुडघेदुखीचा विषय सगळ्यांना चघळायला खाद्यच पुरवतो, असं म्हटलं तरी त्यात गैर काही नसेल.

पण या ही पेक्षा महत्वाचं म्हणजे गुडघेदुखीच्या प्रचंड तीव्रतेच्या वेदनांमुळे आपली ‘quality of life’ सुद्धा खालावते.

आणि आपलं वय कमी असो वा जास्त, ‘quality of life’ कोणत्याही दुखण्यामुळे कमी झालेलं चांगलं नाही.

त्यामुळे ते सुधारेल असेच आपले प्रयत्न असले पाहिजेत.

गुडघेदुखीचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक म्हणजे ‘क्रॉनीक म्हणजे जुने दुखणे’, ज्याची बरीच कारणं असतात आणि दुसरं म्हणजे ‘तात्पुरते दुखणे’ जे एखाद्या अपघातामुळे किंवा तात्पुरत्या दुखापतीमुळे उत्भवलेले असते.

हे तात्पुरते दुखणे, बऱ्याचदा काहीच न करता, कधी किरकोळ उपचारांनी आणि व्यायामाने बरे होते पण हे जे क्रॉनीक दुखणे असते ते बरे करायला बरेच औषोधोपचार, क्वचित सर्जरी सुद्धा करावी लागते.

आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण या दुखण्याच्या त्रासातून बाहेर पडू शकतो, फक्त संयम ठेवायला हवा.

डॉक्टरांच्या ट्रीटमेंट बरोबरच असे काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे हे दुखणं कमी होऊ शकतं किंवा तात्पुरता आराम तरी मिळू शकतो.

या लेखात आम्ही तुमच्यासाठी असेच सोपे, घरगुती उपाय घेऊन आलोय ज्यामुळे तुमच्या गुडघेदुखीला ‘अच्छा! बाय-बाय!!’ करणं तुम्हाला सोपं जाईल.

पण त्याआधी आपण गुडघेदुखीचे दोन प्रकार आणि त्यामागची कारणं थोडक्यात जाणून घेऊ.

१. क्रॉनीक दुखणं

खूप वर्षांपासूनच एका किंवा दोन्ही गुडघ्याचं दुखणं म्हणजे क्रॉनीक गुडघेदुखी. प्रत्येक माणसाच्या गुडघेदुखीची कारणं वेगवेगळी असू शकतात.

बहुतेकदा या क्रॉनीक दुखण्यामागे एकापेक्षा जास्त कारणं असतात आणि ही दुखणी कालपरवाची नसून बरीच जुनी, काळाबरोबर अधिकच वाढलेली असतात. क्रॉनिक गुडघेदुखीची काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.

1) अर्थ्रायटिस

2) गाऊट

3) रुमॅटॉइड अर्थ्रायटिस

4) मिनिस्क्स टीअर

5) डीसलोकेशन

6) लिगामेंट टीअर

अशा आधीच्याच दुखण्यात भर म्हणून कधीकधी त्याच गुढघ्याला दुखापत होते आणि त्रास दुप्पट होतो.

वजन खूप जास्त असणं, चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं या आणि अशा अनेक लहान मोठ्या कारणांनी हे दुखणं वाढू शकतं.

वाढत्या वयाबरोबर सुद्धा ही दुखणी वाढतात. हे दुखणं वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कधीकधी अशाप्रकारच्या दुखण्याचं निदानच वेळेत होत नाही.

अशा दुखण्याचं निदान म्हणजे किचकट आणि गुंतागुंतीचं असतं.

X-रे, एमआरआय, बोन स्कॅन, काहीवेळा रक्ताच्या तपासण्या हे सगळं करावं लागतं.

याशिवाय प्रकृती नुसार डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या सुद्धा कराव्या लागतात.

साहजिकच या सगळ्या तपासण्या, त्याचे रिपोर्ट मग नेमक्या आजाराचं निदान आणि मग उपचार यामध्ये बराच वेळ जातो आणि तोवर दुखणं वाढतं.

२. तात्पुरतं दुखणं

एखादा लहानसा अपघात, लचक, सूज, अचानक वाढवलेला व्यायाम यामुळे कधीकधी अचानकच गुडघा दुखायला लागतो पण काही दिवसांनी आपोआप, कसले उपचार न घेता फक्त पेनकिलर घेऊन किंवा चोळून बरं वाटतं.

पण याचा अर्थ हे तात्पुरतं दुखणं किरकोळ असतं असं नाही.

लहानशा अपघातामुळे सुद्धा बऱ्यापैकी मुकामार लागून गुडघा प्रचंड दुखू शकतो, फरक फक्त इतकाच की क्रॉनिक दुखण्यासारखं हे दुखणं आयुष्यभरासाठी नसतं.

हे झाले गुडघेदुखीचे प्रकार आणि त्यामागची थोडक्यात कारणं.

आता यासाठी वैद्यकीय उपचार तर आहेतच, पण त्याच्या जोडीने आपल्याला घरच्या घरी करता येण्यासारखे सुद्धा खूप उपाय आहेत ज्यामुळे बरं वाटू शकतं.

या घरगुती उपायांनी दुखणं पूर्णपणे बंद जरी झालं नाही तरी ते खूप प्रमाणात कमी होऊन आपलं रोजचं आयुष्य सुखकर व्हायला नक्कीच मदत होते.

तर गुडघेदुखीसाठी असे कोणते घरगुती उपाय आहेत ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

१. RICE

गुडघा लचकला किंवा खूप व्यायामामुळे दुखत असेल तर काय करायचं?

R – Rest : म्हणजेच गुडघ्याला पूर्णपणे आराम द्यायचा आणि त्यावर कोणताही भार पडू द्यायचा नाही.

I – ice : दुखऱ्या गुडघ्याला बर्फाचा शेक द्या. शेक देताना बर्फाचा तुकडा थेट त्वचेवर न लावता एका रुमालात गुंडाळून घेऊन शिकावं.

C – compression : दुखऱ्या गुडघ्याला नी कॅप लावून ठेवावी पण नी कॅप जास्त घट्ट असेल तर गुडघ्याचा रक्त पुरवठा खंडीत होऊन अजून काहीतरी त्रास होऊ शकतो त्यामुळे हा उपाय करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

E – elevation : झोपताना किंवा नुसतं बसताना सुद्धा गुडघा जरा उंचीवर ठेवावा. सोपा उपाय म्हणजे गुडघ्याखाली उशी घेऊन झोपावं.

२. व्यायाम

गुडघ्याचं दुखणं लांबलेलं असेल (क्रॉनिक गुडघेदुखी) तर त्याला खूप दिवस अराम देऊन सुद्धा उपयोग नाही. दुखणं कमी व्हावं म्हणून गुडघ्याची हालचालच झाली नाही तर तिथे स्नायू सगळे आखडून जातील आणि त्याचा जास्तच त्रास होईल.

त्यामुळे अगदीच हालचाल केली नाही असं करू नये. गुडघ्यावर अतिरिक्त ताण न येऊ देता योग्य प्रमाणात व्यायाम करावा.

अर्थ्रायटिस सारख्या अवघड दुखण्यात सुद्धा व्यायामाच्या सायकलवर सायकलिंग करणे, पोहणे, योगासनं या व्यायामप्रकारांचा उपयोग होऊ शकतो.

कारण या व्यायाम प्रकारात गुडघ्यावर ताण येत नाही.

पण गुडघा लचकलेला किंवा दुखावलेला असेल (तात्पुरती गुडघेदुखी) तर त्याला पूर्ण आराम देऊन तो बरा झाला की हळूहळू व्यायाम सुरु करणंच श्रेयस्कर आहे.

३. वजनावर ताबा

वजन वाढलेलं असेल तर साहजिकच गुडघ्यांवर भार जास्त येणार.

याच जास्तीच्या भारामुळे गुडघ्यांवर सूज येऊन गुडघेदुखी सुरु होते.

अशा प्रकारच्या दुखण्यात जास्त वेळ उभं राहणं, खाली बसल्यावर उठता न येणं, जिने चढणं या गोष्टी करायला वेदनांमुळे कष्ट पडतात.

त्यामुळे वजन आटोक्यात ठेऊन या दुखण्याला आपल्यापासून शक्य तितकं लांब ठेवलं पाहिजे.

४. गरम आणि गार शेक

गुडघ्याला आराम देऊन त्याला गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं तर दुखणं कमी होतं.

आणि बर्फाने शेकलं तर सूज कमी होते. त्यामुळे एका आड एक असं गरम आणि गार शेक दुखऱ्या गुडघ्याला दिला तर आराम वाटू शकतो.

हे करताना साधारण वीस मिनिटं गरम पाण्याने शेकायचं आणि मग बर्फाने शेक द्यायचा.

हा उपाय बसल्या बसल्या करण्यासारखा आहे पण एकदम खात्रीशीर आहे.

कढत पाण्याच्या अंघोळीने पण सगळे आखडलेले स्नायू मोकळे होऊन बरं वाटतं.

५. लेप

दालचिनी, आलं, डिंक पावडर तिळाच्या तेलात कालवून तो लेप दिवसातून एकदा दुखऱ्या गुढघ्यावर लावला तर बराच फरक पडतो.

६. नैसर्गिक पेनकिलर्स

दुखणं असह्य होत असेल तर आपल्याला डॉक्टर पेन किलर्स देतातच, त्याला कधीकधी पर्याय नसतो.

पण जेव्हा दुखण्याची तीव्रता खूप जास्त नसते तेव्हा आपण आपल्याच स्वयंपाकघरात असणाऱ्या नैसर्गिक पेनकिलर्सचा वापर करू शकतो.

नैसर्गिक पेनकिलर कोणती?

जवस, आक्रोड- कॅल्शिअम जास्त असलेल्या हा पदार्थांच्या नियमित सेवनाने हाडांची दुखणी आटोक्यात राहायला मदत होते.

गुळवेल – गुळवेल सुद्धा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. गुळवेलीचं खोडं चाऊन खाता येते किंवा त्याची पावडर करून ठेऊन रोज एक चमचाभर खाल्ली तरी फरक पडतो.

हळद- हळद तर अनेक रोगांवरचा इलाज आहे, हळद आणि दूध असं एकत्र घेतल्यावर जखमा लवकर भरून येतात आणि त्यामुळे दुखणं सुद्धा कमी होतं.

मेथ्या- काहींचा गुडघेदुखीचा त्रास वातावरण जरा थंड पडलं की डोकं वर काढतो अशा वेळेला मेथ्या रात्रभर पाण्यात भिजून सकाळी चाऊन खाल्ल्या तर आराम मिळतो.

आलं- आल्यामुळे सूज कमी होऊन दुखणं बरं व्हायला मदत होते.

आल्याचं तेल दुखऱ्या गुडघ्यावर चोळणे, सुंठ पावडर खाणे, चहात आल्याचं प्रमाण वाढवणे हे सोपे उपाय करून बघू शकतो.

तुळस- सांधेदुखीवर तुळस हा एक नामी उपाय आहे. तुळशीच्या पानांची पेस्ट करून दुखणाऱ्या हाडांवर, सांध्यांवर लावल्याने बराच फरक पडतो.

हे झाले गुडघेदुखीवर घरगुती उपाय, आता आपण थोडक्यात बघू की आपल्या जीवनशैलीत किंवा राहणीमानात असे कोणते किरकोळ बदल केले तर त्यामुळे आपली गुडघेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकते?

१. तुम्ही चालायला, पळायला वापरताय ते बूट चांगले आहेत का? खूप जुने असतील तर बदलून बघा. गरज पडली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुटांची निवड करा.

२. बायकांनी उंच टाचांच्या चपला खूप वेळ घालू नयेत.

३. एकदमच खूप व्यायामाला अचानक सुरुवात करू नका. व्यायाम करताना आधी थोडा करा आणि मग हळूहळू वाढवत न्या.

४. हालचाल करत राहा, एका जागी बसणं असलं तरी सगळे स्नायू आखडतात आणि त्यामुळे दुखणं वाढतं.

५. आहारात कॅल्शिअम असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.

६. डॉक्टरांचा सल्ला पाळा आणि त्यांनी दिलेली औषधं वेळच्यावेळी घ्या.

एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की या घरगुती उपायांचा काहीही अपाय नाही.

त्यामुळे गुडघेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही या बिनदास्त करून बघू शकता आणि तुमच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा ‘शेयर’ करू शकता..

कदाचित यातल्या उपायांनी कोणाचीतरी गुडघेदुखी कायमची बरी सुद्धा होईल, म्हणून शेयर करायला विसरू नका.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी”

    • मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇खाली दिलेल्या ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप ‘लिव्ह’ करून द्यावा.

      https://chat.whatsapp.com/GjnVeHIZPf1H9Hs62fntlm

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय