या लेखात वाचा, चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार, “Face Yoga”

या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्याला काय लावायचं? हे सांगणार नाही, तर आम्ही सांगणार आहे, चेहऱ्याचे योग प्रकार!!

“तुमचं वय इतकं वाटत नाही हं!” अशी कॉम्प्लिमेंट कोणाला आवडणार नाही?

तरुण दिसायला सगळ्यांनाच आवडतं. वय काहीही असुदे पण नितळ आणि टवटवीत त्वचा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते.

याचसाठी बाजारात अनेक क्रीम्स, फेशिअल किट्स सुद्धा मिळतात.

आपली त्वचा छान राहावी, आपण नेहमी छान, नीटनेटके, टापटीप दिसावं असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि असं वाटावंच कारण आपला चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत असतो.

आपल्यापैकी सगळ्यांनीच या साठी जमतील तितके प्रयत्न केले पाहिजेत. आणि तशे सगळे ते प्रयत्न करतात सुद्धा.

बाजारात मिळणारी अशी क्रीम्स आपण सगळे आणत असतो आणि त्याचा कमी जास्त प्रमाणात आपल्याला फायदा सुद्धा होत असतो पण हे झाले बाह्यउपचार.

आपल्या शरीराच्या आत काय चालतं त्याचे परिणामच आपल्या चेहऱ्यावर दिसत असतात.

त्यामुळे या बाह्यउपचारांबरोबरच यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे?

कसं? तुम्हाला माहीतच आहे.. पौष्टिक आणि सकस आहार, स्ट्रेस न घेणं, नियमित व्यायाम पण या व्यतिरिक्त सुद्धा फक्त तुमचा चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी, आज आम्ही तुमच्यासाठी ही वेगळीच माहिती घेऊन आलोय…

फेस योगा‘, म्हणजे चेहऱ्याचे योग प्रकार! आहे ना इंटरेस्टिंग?

तुम्हाला माहीत आहे का की फक्त आपल्या चेहऱ्याला 41 मसल्स असतात!

या 41 मसल्सची योग्य हालचाल, व्यायाम केला तर आपली त्वचा टवटवीत म्हणजेच हेल्दी होते.

आणि यामुळे सुरकुत्या, मरगळ वगैरे गोष्टी चेहऱ्यापासून लांब राहतात.

फेस योगामुळे आपल्या सगळ्या चेहऱ्याच्या मसल्सना पुरेपूर व्यायाम मिळतो

आणि त्यामुळे चेहऱ्याचा रक्त पुरवठा सुद्धा सुधारतो.
हे फेस योगा काय आहे?

कधी करायचा? कसा करायचा याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख पुढे वाचा!

दिवसातून 8-9 तास ऑफिस, बाकी वेळेला घरची कामं, नेहमीचा व्यायाम..

इतके सगळे व्याप असताना अजून एक कशाला वाढवा.. वेळ मिळणार नाही..

वरचं वाचून अशा अनेक गोष्टी तुम्हाला वाटल्या असतील, पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की हे व्यायाम करायला दिवसातून खास असा वेळ काढायची गरज नाही.

यातले काही व्यायाम तर काम करताना, बसल्या बसल्या टीव्ही बघताना किंवा पुस्तक वाचताना सुद्धा करता येतात.

आणि काही व्यायाम आपल्या रोजच्या व्यायामाच्या आधी किंवा नंतर करता येतात..

फार तर फार पाच ते दहा मिनिटं फक्त जास्तीची लागतील आणि आपल्या चेहऱ्याचं, त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी तेवढा वेळ आपण नक्कीच देऊ शकतो.. हो ना?

या फेस योगामुळे काय काय होऊ शकते तर म्हातारपणी येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात, वयानुसार डोळे लहान होतात ते टाळता येतं.

गाल, आपली हनुवटी, भुवया, आणि पापण्या सुद्धा..

सगळ्याला या योगामुळे फायदाच आहे.. कसा ते आपण बघूया..

आता फेस योगा म्हणजे काय, कधी करायचं या सगळ्याबद्दल आपण बोललो.

मग हे फेस योगा नक्की करायचं कसं, त्याचे प्रकार कोणते ते वाचा

१) सुरुवात दीर्घ श्वास घेऊन करावी.

दोन ते तीन वेळा मोठा श्वास घेऊन मान उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घ्यावी.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

२) तुमच्या कपाळावर आणि भुवयांवर हात ठेऊन ते दोन ते तीन वेळा वरखाली ओढा.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

३) ओठ पसरून, दात न दाखवता हसा आणि मग ओठांचा पाऊट करा.

असं पाच वेळा केल्यास गालाचे आणि ओठांभोवतीचे मसल्स घट्ट होतात आणि गाल ओघळत नाही.

ओठांचा पाऊट केल्यामुळे ओठांचा शेप नीट राहतो आणि ते भरलेले दिसतात.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

४) अंगठा आणि तर्जनीमध्ये डोळे धरून ते उघडून धरा.

नंतर दोन्ही हाताने डोळ्यांच्या बाजूची त्वचा बाहेरच्या बाजूला ओढा आणि त्यानंतर तर्जनी आणि मधल्या बोटाच्या मदतीने दोन्ही डोळे खाली ओढून उघडायचा प्रयत्न करा.

याला आय ओपनर स्ट्रेच असं म्हणतात आणि यामुळे पापण्यांना व्यायाम मिळतो.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

५) तर्जनी डोळ्यांखाली अलगद ठेऊन, हळूहळू दाब देत डोळ्यांभोवती फिरवायची.

असं चार ते पाच वेळा केलं तर वयानुसार किंवा झोपेच्या अभावामुळे डोळ्यांभोवती आलेली सूज कमी होते.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

६) डोळ्यांभोवती दोन्ही हात नमस्कार केल्यासारखे धरून बाहेरच्या बाजूला ओढून घ्या.

जणू चेहऱ्यातून तुम्ही जास्तीचं काहीतरी बाहेर टाकून देत आहात. यामुळे डोळ्यांभोवतीची सूज कमी होईल आणि चेहरा टवटवीत दिसायला मदत होईल.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

७) तुमच्या सगळ्या चेहऱ्यावरून टेन्शन दूर करायला, चेहऱ्याच्या सगळ्या मसल्सना व्यायाम मिळावा म्हणून हा योगाचा प्रकार आहे.

याचं नाव ‘लायनेस स्ट्रेच’ असं आहे. यामध्ये पाठ सरळ ठेऊन, ताठ बसायचं आणि डोळे मोठे करून, जीभ हनुवटीला टेकेपर्यंत बाहेर काढून घेऊन नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडताना दहा सेकंद होल्ड करायचं.

असं चार वेळा केलं तर सगळ्या चेहऱ्याला छान व्यायाम मिळतो आणि चेहरा टवटवीत दिसतो.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

८) डोळे ओघळू नयेत किंवा ओघळलेले डोळे नीट व्हावेत, भुवईचा आकार सुधारावा यासाठी हा ‘स्नेक फेस’ नावाचा व्यायाम आहे.

या मध्ये डाव्या हाताच्या अनामिकेने उजव्या बाजूची भुवई वर ओढून धरायची आणि इतर बोटांनी कपाळाचा मधला आणि बाजूचा भाग ताणून धरायचा.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

यानंतर डाव्या बाजूला (दुसऱ्या दिशेला) खाली बघून जीभ बाहेर काढायची आणि श्वास जोरात बाहेर सोडायचा. असं तीन ते चार वेळा दोन्ही बाजूने करायचं.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

९) दोन्ही ओठ एकमेकांवर दाबून तीन ते चार सेकंद होल्ड करून नंतर दोन्ही गाल फुगवून पुन्हा होल्ड करून सोडून द्यायचे.

असं चार वेळा केलं तर नेझोलेबिअल फोल्ड्स, म्हणजेच नाक आणि ओठाच्या कडेने ज्या सुरकुत्या वयोमानानुसार पडतात त्या कमी व्हायला मदत होते.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

१०) तरुणपणीचे ‘शार्प फीचर्स’ म्हातारपणी राहत नाहीत.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, त्वचा ओघळते..

तसं होऊ नये म्हणूनच हा व्यायामप्रकार तीन ते चार वेळा केला तर नक्कीच फायदा होतो- ‘फेस फिचर करेक्टर’.

हा व्यायाम करण्याआधी दीर्घ श्वास घेऊन तुमच्या दातांच्या मध्ये पेन्सिल ठेवा आणि डोळ्यांभोवतीचा भाग हाताने उघडून धरून श्वास बाहेर सोडा.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

११) ‘स्माईल करेक्टर’ या फेस योगाच्या प्रकाराने तुमच्या ओठांचा शेप नीट राहील आणि ओठांभोवतीच्या ‘फाईन लाईन्स’ कमी व्हायला मदत होईल.

यामध्ये दोन्ही हातांच्या तर्जनी ओठांच्या आतल्या बाजूने घालून ओठ फाकवून धरायचे. असं दोन तीन वेळा केल्याने तुमच्या हसण्यामध्ये फरक नक्की पडेल.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

१२) म्हातारपणामुळे चेहरा सैल होऊन ओघळू नये यासाठी दोन्ही अंगठे गालावर आणि उरलेली बोटं कपाळावर धरून चेहरा वरच्या बाजूला ताणून धरायचा.

आणि मग दोन्ही हाताने गालाला खालपासून वरपर्यंत मसाज करायला सुरुवात करायची म्हणजे गाल खाली ओघळले असतील तर ते नीट व्हायला मदत होते. हा व्यायाम दहा वेळा करावा.

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

आता या उपायांचा फरक कसा होईल आणि तो नेमका कधी दिसायला लागेल?

आज व्यायाम सुरु केला आणि उद्या वजन कमी झालं असं होत नाही, त्यामुळे साहजिकच फेस योगाचे परिणाम पण काही एकदोन दिवसात दिसणार नाहीत.

पण रोज नेटाने जर हे व्यायाम करत राहिलात तर सहा महिन्यातच तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळायला नक्की सुरुवात होईल!

Image Credit: cosmopolitan

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय