भाजल्यावर करण्याचे प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय

चटक्यांचे प्रकार, तीव्रता आणि त्यानुसार त्यावर करायचे ‘फर्स्ट एड’ म्हणजेच, प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय तसेच भाजल्यावर कुठल्या गोष्टी चुकूनही करू नये, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

स्वयंपाक करताना कधी कधी किरकोळ चटके लागतात, याशिवाय आंघोळीचं पाणी काढताना किंवा इस्त्री करताना… दिवसातून चटका लागायच्या कितीतरी शक्यता असतात आणि बऱ्याचदा अशा वेळी चटके लागतात सुद्धा…

या अशा किरकोळ चटक्यांवर काही उपाय केला नाही तरी ते बरे होतात. कित्येक वेळा तर असे चटके लागलेले आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत पण कधीकधी काही गंभीर अपघात होतात, उकळतं पाणी सांडत, ऍसिड सांडतं आणि भाजतं.

भाजण्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यानुसार भाजण्याची वेगवेगळी तीव्रता असते.

आपल्या त्वचेवर तीन लेयर्स असतात. अर्थात याविषयीच्या वैद्यकीय परिभाषेत न जाता सोप्या पद्धतीने याबद्दल आपण बोलू.

कोणत्या लेयरपर्यंत भाजलं गेलं आहे त्यानुसार भाजलेल्याची तीव्रता ठरत असते.

मुळात त्वचा म्हणजे आपल्या शरीराचं संरक्षण कवचच असतं. त्वचेला तीन लेयर्स असतात

एपिडर्मिस- त्वचेची सगळ्यात वरची लेयर. त्यावर जास्त करून डेड स्किन सेल्स असतात.

डर्मिस- एपिडर्मिसच्या आतली लेयर ज्यामध्ये छोट्या रक्तवाहिन्या आणि नसा असतात.

हायपोडर्मिस- स्किनची सगळ्यात आतली लेयर ज्यामध्ये मोठ्या रक्तवाहिन्या आणि नसा असतात.

भाजलेलं त्वचेच्या कोणत्या लेयरपर्यंत गेलं आहे त्यानुसार तो चटका किती तीव्रतेचा आहे हे समजतं. चटक्याचे, म्हणजेच बर्न्सचे हे खालील प्रकार असतात.

१. फर्स्ट डिग्री बर्न

जेव्हा फक्त वरवरचं भाजलेलं असतं तेव्हा तो फर्स्ट डिग्री बर्न असतो. यामध्ये जिथे भाजलं आहे तो भाग सुजून, लाल होऊन दुखतो, भाजलेल्या भागाला हात लावला की जळजळ होते, दुखतं किंवा किंचित डाग पडतो पण त्या व्यतिरिक्त जास्त खोल जखम नसते.

२. सेकण्ड डिग्री बर्न

हा चटका त्वचेच्या आतल्या थरापर्यंत गेलेला असतो. यामध्ये सुद्धा चटका लागलेला भाग लाल होऊन, किंचित सुजून दुखतो पण हे दुखणं फर्स्ट डिग्री बर्नपेक्षा जास्त असतं आणि यामध्ये भाजलेल्या जागी पाण्याचा फोड सुद्धा येतो.

३. थर्ड डिग्री बर्न

त्वचेच्या अजून आतल्या थरापर्यंत पोहोचलेले चटके म्हणजे थर्ड डिग्री बर्न. यात त्वचेच्या सगळ्या थरांना चटका लागलेला असतो आणि त्यामुळे त्या लेयरमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या आणि नसांना सुद्धा इजा होऊन ती त्वचा ‘डेड’ झालेली असते.

या चटक्यांच्या प्रकारात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की फर्स्ट डिग्री बर्न कालांतराने सेकण्ड डिग्री होऊ शकतो आणि सेकण्ड डिग्री बर्न सुद्धा कालांतराने थर्ड डिग्री होऊ शकतो.

भाजल्यावर काय होतं?

जर त्वचेला भाजून इजा झाली आणि त्यामुळे तिथली काही त्वचाच नाहीशी झाली तर तिथून जिवाणू, विषाणू शरीरात अगदी सहज शिरकाव करून इन्फेक्शन करू शकतात.

स्किनच्या एपिडर्मिस या थराला फक्त नवीन स्किन सेल्स तयार करता येतात, त्यामुळे फर्स्ट डिग्री बर्न असेल तर कायमचा व्रण सुद्धा राहत नाही पण जर चटका आतल्या थरापर्यंत गेला असेल तर मात्र त्वचेचा रंग इतकंच काय आकार सुद्धा कायमचा बदलून कायमचे डाग राहतात.

थर्ड डिग्री बर्नला तर सगळी डेड स्किन तशीच राहते.

तुम्ही कधी ऐकलं असेल, अमुक अपघातात तमुक व्यक्ती ६० टक्के भाजली गेली.. हे टक्के म्हणजे काय?

एखादी व्यक्ती किती भाजली गेली आहे हे मोजण्यासाठी टक्केवारी वापरतात. हा नियम लहान मुलांना आणि बाळांना मात्र लागू होत नाही.

यासाठी आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना टक्के नेमून दिलेले आहेत (रुल ऑफ नाईन्स) उदारहणार्थ, डोकं- ९ टक्के, छाती ९ टक्के.. पोट- ९ टक्के.. अशाप्रकारे, ही पद्धत वापरून जो भाग भाजला गेला आहे त्याचे टक्के बघून व्यक्ती किती भाजला गेला हे डॉक्टर सांगतात.

गरम पाण्याचा, आगीचा, गरम पदार्थाचा.. हे चटके तर असतातच पण याचबरोबर चटक्यांचे दोन भीतीदायक प्रकार म्हणजे इलेक्ट्रिसिटीमुळे लागलेला चटका आणि केमिकलमुळे लागलेला चटका.

भाजल्यावर देण्याचे प्रार्थमिक उपचार (First Aid)

सेकण्ड आणि थर्ड डिग्री बर्न साठी:

१. एखाद्या मोठ्या आगीत कोणी अडकलं असेल तर सगळ्यात आधी त्याला त्यातून बाहेर काढणं सगळ्यात महत्वाचं आहे मात्र हे करताना आपल्याला चटका लागणार नाही, आपला जीव धोक्यात जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेणं गरजेचं आहे.

२. आगीतून बाहेर काढल्यावर जर त्या व्यक्तीच्या अंगावर काही जळत असेल आग असेल तर ती आग विझविण्याचा प्रयत्न न करता सरळ ती जळणारी गोष्ट अंगावरून काढून दूर फेकून देणं हिताचं आहे.

३. ताबडतोब ऍम्ब्युलन्सला बोलावलं गेलं तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळते. जी अत्यंत गरजेची असते त्यामुळे एकदा त्या व्यक्तीला धोक्यापासून लांब काढलं की लगेचच ऍम्ब्युलन्सला बोलावलं पाहिजे.

४. ऍम्ब्युलन्सची वाट बघेपर्यंत भाजलेल्या ठिकाणी एखादं स्वच्छ कापड (जर असेल तर) ठेवावं.

नाहीतर काहीच न करता पेशन्टला धीर देत बसावं. चुकून सुद्धा भाजल्यावर पाणी ओतू नये.

यामुळे शरीराचं तापमान अचानकपणे खाली जाऊन पेशन्टला गंभीर त्रास होऊ शकतो.

फर्स्ट डिग्री बर्न्स साठी- (किरकोळ घरी बसणारे चटके)

१. जिथे भाजलं आहे ती जागा पाण्याने धुवून घ्या. त्यावर घरगुती उपाय, जसं की लोणी लावणे हे करू नये.

२. भाजलेला भाग हाताचा असेल तर अंगठ्या, बांगड्या लगेच काढून ठेवा कारण भाजलेल्या जागी सूज आली तर त्यामुळे त्रास होतो.

३.नेओस्पोरीन’ सारख्या क्रीमने लगेच आराम मिळतो त्यामुळे अशा चटक्यांवर ते अतिशय उपयुक्त आहे. हे औषध ओव्हर द काऊंटर (म्हणजेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिबशनशिवाय) मिळते पण घरच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये एखादी ट्यूब नेहमी ठेवावीच.

४. जर बरं वाटलं नाही, किंवा भाजलेली जागा जास्त दुखायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

५. डॉक्टरांना विचारून टिटॅनसची लस घ्यावी.

विजेमुळे किंवा केमिकलमुळे भाजलं गेलं तर लगेचच वैद्यकीय मदत गरजेची असते.

भाजलेल्या त्वचेसाठी घरगुती उपाय:

१) थंड पाणी: त्वचा थोड्या प्रमाणात भाजली तर सर्वात आधी थंड पाण्या खाली कमीत कमी 20 मिनिट हात ठेवावा.

२) थंड कापडाच्या घड्या: फर्स्ट डिग्री भाजल्यास थंड कापडाच्या घड्या करून ठेवल्यास, भाजलेल्या भागाचे दुखणे कमी होऊन ती जागा सुजत नाही.

भाजल्यावर करण्याचे प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय

३) कोरफड: कोरफडीच्या गराचा उपयोग त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी जसा होतो, तसाच फर्स्ट किंवा सेकंड डिग्री बर्न मध्ये कोरफडीच्या गराचा वापर प्रभावी ठरतो.

कोरफड अँटी इंफ्लेमेट्री असल्याने भाजलेल्या जागी रक्तप्रवाह सुरळीत होऊन, बॅक्टेरिया ची वाढ सुद्धा रोखली जाते.

४) मध: मधामध्ये असलेल्या नैसर्गिक अँटी इंफ्लेमेट्री, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फ़ंगल गुणधर्मांमुळे फर्स्ट आणि सेकंड डिग्री बर्न असल्यास त्वचेची झीज भरून निघायला मदत होते.

काय करू नये:

बरेचदा अशा छोट्या भाजलेल्या ठिकाणी लोणी लावले जाते.

पण भाजलेल्या जागी लोणी कधीही लावू नये.

मायनर बर्न असल्यास काही लोक नारळाचं तेल सुद्धा लावून बघतात. पण तेल लावल्यास भाजलेल्या ठिकाणची उष्णता बाहेर निघायला मज्जाव होतो. आणि उष्णता त्वचेमध्ये तशीच राहते.

आपल्या समोर कोणाला अशी भाजल्यामुळे मोठी इजा झाली तर ताबडतोब ऍम्ब्युलन्सला बोलावले पाहिजे.

बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात कारण मुळात या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, पण एखादी आपत्कालीन परिस्थिती दुर्दैवाने ओढावलीच तर आपली सारासार विचार करण्याची क्षमता शाबूत राहत नाही आणि अशावेळेला हे उपाय आपल्याला सुचत नाहीत किंवा चुकीच्या गोष्टी केल्या जातात.

तुमच्यावर जर कधी अशा प्रसंगाला सामोरं जायची वेळ आलीच तर तुमच्या या गोष्टी लक्षात राहाव्यात, तुम्ही इतरांना मदत करू शकाल म्हणून आजचा हा लेख.

आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचला तर त्या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.. म्हणूनच याचा इतरांनाही फायदा व्हावा म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींना शेयर करा.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय