Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?

प्रत्येकाचं उराशी जपलेलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं, स्वतःचं, सुंदर आणि प्रशस्त घर!.. पण दिवसेंदिवस वाढणारी कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही प्रत्येकासाठी डोकेदुखी बनत चालली आहे. अधिक खर्च म्हणजे अधिक मोठं कर्ज. जितकं मोठं कर्ज तितकं मोठं टेंशन, घराचे हप्ते भरण्यातच सामान्य माणसाची उमेदीची वर्ष खर्च होवुन जातात, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला व्यक्ती मनमोकळेपणाने जीवनाचा उपभोग घेऊ शकत नाही आणि जगण्याचा निर्भेळ आनंदापासुन तो दुरावतो.
हा चक्रव्युह भेदण्यासाठी, चांगला उपाय म्हणजे ‘Low Cost Housing’. एक चुकीचा समज असा आहे कीे ‘लो कॉस्ट हाऊझिंग’ हा कंसेप्ट फक्त गरीबांसाठी असतो. ‘वायफळ खर्च करणं म्हणजे श्रींमत असणं’ असाच काहीसा हा तर्क आहे. याउलट श्रीमंत लोकच अधिक चोखंदळ असतात आणि ते आपल्या संपत्तीचा योग्य विनीयोग करतात.
यासंबधी योग्य तांत्रिक माहीती आणि मार्गदर्शन नसल्यामूळे, आणि उदासीनता असल्यामूळे “Low Cost Housing” टेक्निक्सचा वापर आपल्याकडे फार तुरळक दिसतो.
तर बांधकामाची किंमत कमी करण्यासाठी ह्या काही टिप्स –

शक्य आहे तितके फर्निचर जसं की कपाटे, शेल्फ आणि सिटींग, सिव्हील वर्क मध्ये बनवल्यास प्लायवुडमध्ये फर्निचर बनवण्याचा अवाढ्यव्य खर्च वाचतो.
१) बांधकाम सुरु करण्याआधी
• प्लॉट विकत घेताना, रोडपासुन फार खाली खड्ड्यात असलेला किंवा फार उंच असलेला प्लॉट निवडु नये. कटींग/फिलींग करुन जमीन लेव्हल करण्याने बिल्डींग कॉस्ट वाढते. असा प्लॉट असलाच तर आतमध्ये स्टेप्स देवुन नैसर्गिक स्लोपचा वापर करुन घ्यावा.
• प्लान बनवतानाचं, कागदावरचं, प्रत्येक फर्निचरची पक्की मांडणी करुन घ्या. प्रत्यक्ष काम सुरु झाल्यास, कधी ऐनवेळी क्लायंटने केलेल्या बदलामुळे, किंवा कधी आर्किटेक्ट-इंजिनीअरच्या दुर्लक्षामुळे, मोडतोड झालेल्या कामाची किंमत सरळ-सरळ दुप्पट होते.
• शक्य आहे तितके फर्निचर जसं की कपाटे, शेल्फ आणि सिटींग, सिव्हील वर्क मध्ये बनवल्यास प्लायवुडमध्ये फर्निचर बनवण्याचा अवाढ्यव्य खर्च वाचतो.
• लेबर कॉस्ट कमी करण्यासाठी, काम सुरु होण्याआधी, वेळेचं आणि कामाचं, सुक्ष्म नियोजन, केलं पाहीजे. तसंच ते कॉन्ट्रॅक्टरला समजावुन सांगुन, त्या वेळापत्रकाप्रमाणे काम करुन घेतल्यास नक्कीच, दोघांचेही पैसे वाचतात.
२ ) मटेरीअल
• प्रत्येक मटेरीअलची किंमत ट्रान्सपोर्टेशनमुळे वाढते, म्हणुन स्थानिक पातळीवर असलेल्या मटेरिअलचा जास्तीत जास्त वापर करण्यावर ‘लो कॉस्ट हाऊसिंग’चा भर असतो.
उदा. यात दुरवरुन मार्बल, ग्रॅनाईट आणण्याऐवजी, सिंमेंट मध्ये चुन्याची भुकटी मिसळुन सुंदर फ्लोरींग बनवली जाते.
• प्रत्येक मटेरीअल निवडताना, हे घेणं, खरचं इतकं आवश्यक आहे का? ह्या कसोटीवर तपासुन घ्या.
३) वीटकाम –

लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये, वीटकाम केल्यास भिंतीवर दोन्ही बाजुंनी प्लास्टर न करण्याचा आग्रह असतो, कारण त्यात खुप बचत होते. यात पेंट करुन वीटांचं नैसर्गिक सौंदर्य खुलवलं जातं.
• भाजलेल्या मातीच्या लाल वीटा वापरण्याऐवजी सॉलीड कॉक्रीट ब्लॉक वापरल्याने किंमतीत फरक पडत नाही पण ते इको-फ्रेंडली नक्कीच ठरतं.
• आऊटर वॉलचं नऊ इंची वीटकाम करण्याऐवजी सहा इंच वीटकाम केल्याने पैसे वाचतात, आतल्या भिंतीसाठी चार इंची वीट वापरावी. त्याने रुम साईज वाढतो आणि डेड लोड कमी झाल्याने सळईचीही बचत होते.
• नऊ इंच वीटकाम करायचेच झाल्यास, परांपरागत पद्धतीने भिंत बांधण्याऐवजी रॅट ट्रॅप बॉंडची पद्धत वापरावी. ह्या पद्धतीने वीटकाम केल्यास पंचवीस टक्के बचत होते, या भिंतीत कॅव्हीटी (खोबण) तयार होते व त्यात हवा खेळती राहते त्यामुळे साध्या बांधकामापेक्षा ही रुम उन्हाळ्यात अधिक थंड आणि हिवाळ्यात अधिक गरम राहते. (रॅट ट्रॅप बॉंड कसा असतो याची इमेज बाजूला दिलेली आहे.)
४) दरवाजे आणि खिडक्या
यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या आकाराच्या खिडक्या डिझाईन केल्या जातात तसंच एकापेक्षा अधिक खिडक्या सोडुन क्रॉस व्हेंटेलेशनद्वारे खेळती हवा ठेवण्यावर भर असतो ज्यामुळे दिवसा ट्युब किंवा फॅन लावण्याची गरज भासु नये.
• लाकडी दरवाजे किंवा भिंतीऐवजी प्रिकास्ट सिमेंट किंवा स्टील सेक्शनच्या चौकटी वापरल्यास 25% बचत होते.
• दरवाजे खिडक्यांच्या वर जे आरसीसी लिंटेल टाकले जाते त्याऐवजी ब्रिक आर्चेस बनवाव्यात, स्वस्त पडतात आणि त्या दिसायलाही खुप सुंदर दिसतात. (सोबत इमेज जोडली आहे.)

हा स्लॅब आकर्षक, लक्षवेधुन घेणारा असतो आणि यासोबतच प्लास्टर, पिओपी, कलर आणि फॉल्स सिलींग करण्याचा खर्च वाचतो.
५) स्लॅब
• आपण सर्वजण सरसकट ५” जाडीचा कॉन्क्रीट स्लॅब भरतो. खरे तर स्लॅबचा खालचा अर्धा भाग जो टेंशन पोर्शन असतो, त्या भागात, वीटा, टाईल्स किंवा सेल्युलर कॉन्क्रीट ब्लॉक वापरु शकतो. यांचा वापर सुरक्षित आहे, आणि हा स्लॅब आकर्षक, लक्षवेधुन घेणारा असतो आणि यासोबतच प्लास्टर, पिओपी, कलर आणि फॉल्स सिलींग करण्याचा खर्च वाचतो. (सोबत इमेज जोडली आहे.)
ह्या आणि अशाच खुप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स वापरुन बांधकाम कॉस्ट २५% पर्यंत वाचवली जावु शकते.
आर्कीटेक्ट इंजिनीअरची फीज ही बिल्डींग कॉस्टच्या तीन ते पाच टक्के असते, जितकी बांधकाम कॉस्ट जास्त तितकी फीज जास्त, ह्या समीकरणामुळे की काय, कॉस्ट कमी करण्याबाबत फारसा उत्साह दिसत नाही.
आर्किटेक्ट लॉरी बेकरने कित्येक दशकांपुर्वी अशा इमारती बांधल्या, आजच्या आर्किटेक्ट इंजिनीअरनेही त्या दिशेने चालण्याची सुरुवात करायला हवी.
Low Cost Housing मध्ये, काही ठिकाणी मटेरीअलचे पैसे वाचतात पण कॉन्ट्रॅक्टरचे काम वाढते त्यामुळे तेही अशा बदलांना सामोरे जाण्यास नाखुश असतात. पण हे चक्र भेदणं काळाची गरज बनली आहे. यावर उपाय म्हणजे टक्केवारीवर फीज न ठरवता ठराविक रक्कम ठरवली आणि डिझाईन – सुपरव्हिजनचे काम दिले तर नक्कीच आर्कीटेक्ट-इंजिनीअरही उत्साहाने नवनव्या कल्पना लढवतील आणि बांधकाम मालकाची बचत करुन देतील.
तसंचं जर क्लायंटने कॉन्ट्रॅक्टरलाही योग्य तो मोबादला दिला व Low Cost Housing करण्यास प्रवृत्त केले तर नक्कीच त्याचे पैसे वाचतील आणि अधिकाधिक पर्यावरणपुरक बांधकामे तयार होतील.
वाचण्यासारखे आणखी काही…..
जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी – ७/१२ उतारा कसा पाहावा
प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७
गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
Sir Igatpuri bhagat tumchyakadun farm houseche kam krun milel ka?…. Tumche lekh vachun tumchya hatun maze ghar bhanave hi khup echha aahe.
हो , तुमचे काम करण्यात मला आनंद होईल!. 9422965218 नंबरवर फोन करा!.