उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे आणि नुकसान

उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे आणि नुकसान

हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे जसे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात.

एकूणच निसर्गाने आहारातून दिलेले पौष्टिक तत्त्व, जेव्हा आपल्याला आपल्याच हलगर्जीपणामुळे कमी पडू लागतात तेव्हा आजार आपल्या मागे लागतो.

याचसाठी आज या लेखात उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, हे आपण बघू.

भारत, मुख्यतः दक्षिण भारतातील पारंपरिक, सांस्कृतिक व्यंजनांमध्ये उडदाच्या डाळीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

यात आवश्यक खनिजं, प्रोटीन, वेगवेगळे व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटी ऑक्सिडंन्ट्स भरपूर प्रमाणात असतात.

ही उडदाची डाळ बाजारात, पांढरी आणि सालीची उडदाची डाळ या दोन्हीही प्रकारात मिळते.

आणि याचे आपल्या शरीराला आश्चर्यकारक असे फायदे असतात.

उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे:

१) डायबीटीक लोकांना उडदाच्या डाळीचे फायदे:

उडदाच्या डाळीत असलेल्या फायबर्स मुळे, रक्तातील इन्श्युलीन आणि ग्लुकोज संतुलित ठेवायला मदत मिळते.

मधुमेह म्हणजेच डायबिटीस मध्ये इन्श्युलीन आणि ग्लुकोज चे संतुलन राखले गेले तर त्या परिस्थितीत मधुमेहींना सामान्य जीवन जगणे सोपे जाते.

२) वेगवेगळे दुखणे कमी करण्यासाठी:

शरीराच्या एखाद्या भागाला मार लागून सुजणे, दुखणे अशा वेळी उडदाच्या डाळीचे सेवन फायदेशीर ठरते.

सांधे दुखीच्या आजारात सांध्यांना लावण्याच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये उडदाच्या डाळीचा उपयोग केलेला असतो.

सांधे दुखत असल्यास किंवा काही मुक्का मार लागून दुखत असल्यास, सुजल्यास त्यावर उडदाच्या डाळीचा लेप सुद्धा गुणकरी ठरतो.

३) त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी:

टॅन, सन बर्न यांची तीव्रता कमी करण्यासाठी उडदाची डाळ उपयुक्त ठरते.

४) हृदयाच्या आजारात उडदाच्या डाळीचे फायदे:

उडदाच्या डाळीत असणारे फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक हृदयाच्या आजारात अत्यन्त गुणकारी असतात.

यातील फायबर, बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगी असतात.

तर यातील पोटॅशियम रक्तवाहिन्यांमधील अतिरिक्त दाब कमी करून रक्तप्रवाह सुरळीत करायला मदत करतात.

एकूणच यातील मिनरल्स संपूर्ण शरीरातील कर्डीओव्हास्क्युलर सिस्टीमचे कार्य सुरळीत ठेऊन रक्तप्रवाह नियमित ठेवायला मदत करते.

५) हाडांच्या मजबुती साठी उपयुक्त:

कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम यांसारखी खनिज तत्त्व हाडांची घनता वाढवायला उपयोगी असतात.

उडदाच्या डाळीच्या नियमित सेवनाने वय वाढल्यानंतर हाडं कमजोर होणं, सांधे दुखणं यांसारख्या समस्यांपासून दूर राहणं शक्य होऊ शकतं.

उडदाच्या डाळीच्या सेवनाचे संभाव्य नुकसान

प्रत्येक घटकांचं सेवन करताना शरीर प्रकृती विचारात घेणं जसं गरजेचं आहे, तसंच उडदाच्या डाळी बद्दल सुद्धा एक काळजी घेतली गेली पाहिजे.

उडदाच्या डाळीच्या अति सेवनाने शरीरातील युरिक ऍसिड मध्ये वाढ होते.

त्यामुळे किडनी स्टोन, गाऊट यांसारखे आजार असल्यास उडदाच्या डाळीच्या सेवना बद्दल आपले डॉक्टर किंवा आहारतज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

 1. Samita vishwanath patil says:

  Dhanyawad….hyaa chaan mahiti saathi..🙏
  Thank you so much
  God bless you

  • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

   मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

   मनाचेTalks फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalks/

   मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!