मुलांना खरं बोलण्याची सवय लावण्यासाठी पाच टिप्स

मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत? मुलं खोटं बोलतात त्यासाठी काय करावं?

त्यांना शिस्त कशी लावायची असे प्रश्न पडताहेत? मग हा लेख वाचा.

मुलांचा जन्म झाला आणि आपण आईबाबा झालो की आपला एक नवीन प्रवासच सुरू होतो.

या प्रवासात अनेक टप्पेटोणगे खावे लागतात. खरंतर मुलांचा जन्म होतो तेव्हाच आईबाबांचा सुद्धा पालक म्हणून नवीन जन्मच होत असतो.

आणि ही नवीन जबाबदारी निभावून नेताना मिळणारा एकेक अनुभव त्यांना मोठं करत असतो.

आईबाबा झाल्यावर अशीच एक पार पडायची खूप महत्त्वाची जबाबदारी म्हणजे मुलांना चांगलं वळण लावताना, त्यांना खरं बोलण्याचं महत्व पटवून देऊन नेहमी खरं बोलण्याची सवय लावणं.

वयाच्या एका विशिष्ट टप्प्यात मुलांना खोटं बोलायची सवय लागायची शक्यता असते.

काहीवेळेला आपण खरं बोलून अडचणीत येऊ किंवा खरं बोललो तर आपल्याला ओरडा बसेल या भीतीपोटी मुलं खोटं बोलतात.

सुरुवातीला जरी ही खोटी किरकोळ वाटत असली किंवा मुलांच्या या किरकोळ खोटं बोलण्याने कोणाचं फार काही नुकसान होत नसलं तरी खोटं बोलायची सवय मुलांना लागण्याची शक्यता असते.

आणि मोठेपणी याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतात.

एकदा का कोणाचं खोटं पकडलं गेलं तर त्या माणसावर विश्वास ठेवणं अवघड जातं आणि या कारणामुळे खोटारडी माणसं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत.

कधीकधी तर खोटं बोलण्याची सवय अगदी शिगेला सुद्धा शकते आणि त्यातून लूटमार, चोरीमारी, फसवेगिरी सारखे गुन्हे घडू शकतात.

खोटं बोलण्याची शिक्षा मिळाल्यावर आपल्या आईचा कान चावणाऱ्या मुलाची गोष्ट आपल्याला माहीत आहे.

आपलं मूल चांगलं निघावं, सगळ्यांनी त्याच्याबद्दल चांगलंच बोलावं आणि मुख्य म्हणजे आपण एक चांगली व्यक्ती घडवली याचं आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला समाधान मिळावं.

अशी सगळ्यांची इच्छा आहे. चांगली व्यक्ती असण्याचे अनेक पैलू असतात आणि खरं बोलणं हा त्यातल्याच एक..

पालकत्वाच्या प्रवासात अनेक अडचणी येतात, प्रत्येक मूल वेगळं असतं तसे प्रत्येक आईबाबा सुद्धा वेगळे असतात.

पण साधारणतः सगळे आईबाबा वयाच्या एका कोणत्यातरी टप्यात सारख्या अनुभवातून जात असतात, मुलांना खोटं बोलण्याची सवय लागणं हा त्यापैकीच एक..

म्हणूनच तुमचा हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आजचा हा लेख आहे.

शेवटी प्रवास ज्याचा त्याला करायचा आहेच पण मुलांना खरं बोलण्याची सवय लागावी, खोटं बोलणं वाईट असतं हे समजावं, म्हणून या लेखातून आम्ही काही टिप्स देणार आहोत.

ज्यामुळे तुमच्या प्रवासाला फक्त दिशा मिळेल.. पण मार्ग शोधायचं काम मात्र तुमचंच.

मुलांना खोटेपणा करण्याची सवय लागू नये म्हणून या काही टिप्स.

१) अनुकरणातून शिकवण द्या :

पालक हे मुलांचे पहिले गुरू असतात. पालकांना बघूनच मुलं मोठी होत असतात.

आणि आईबाबांनी काही गोष्टी मुद्दाम शिकवल्या नाहीत तरी नकळत त्यांच्याकडूनच अनेक गोष्टी शिकत असतात.

मुलांसाठी आईबाबा म्हणजे सर्वस्व असतात आणि ते वागतात तसंच मुलं वागत असतात.

त्यामुळे मुलांसमोर आईबाबा जर कोणाशी काही खोटं बोलत असतील मग अगदी ते वेळ मारून नेण्यासाठी एखादी थाप जरी असली, तरी मुलं ते बघून शिकतात.

त्यांना वाटतं खोटं बोलणं ‘ओके’ आहे कारण आपले आईबाबा सुद्धा बोलतात.

त्यामुळे मुलांसमोर कोणत्याही प्रकारची वेळ मारून नेण्यासाठी सुद्धा अजिबात खोटं बोलायचं नाही हे आईबाबांनी कटाक्षाने पाळून मुलांना योग्य ती शिकवण द्यायला हवी.

२. मुलांना छान गोष्टी सांगा :

बाळ अगदी जन्माला आल्यापासून आईबाबा त्याच्याशी बोलत असतात. वर्षभर तरी आईबाबा काय बोलताहेत हे त्या बाळाला समजत नसलं तरी आईबाबा आणि बाळ यांच्यात संभाषण चालूच असतं.

गोष्टी हा याच संभाषणातला एक धागा आहे.

मुलांना गोष्टी ऐकायला आवडतं त्यामुळे त्यांना गोष्टी सांगताना जर खरं बोलण्याची सवय चांगली असते ही शिकवण दिली, तर ते त्यांच्या मनात लहानपणापासून बिंबवलेलं राहतं.

आपण त्यांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजेत की खोटं बोलण्याआधी त्यांना खोटं बोलून एखाद्या गोष्टीतलं अडचणीत आलेलं पात्र आठवेल आणि खरं बोलून त्याला मिळालेलं बक्षीस आठवेल.

३. मुलांच्या मनात तुमच्या बद्दल भीती असू देऊ नका :

मुलं खोटं बोलतात कारण जर यदाकदाचित त्यांच्याकडून काही चुकीचं झालं असेल आणि ते तसं सांगितलं तर ओरडा बसेल.

खरं सांगून मोठ्यांचा राग ओढावून घेण्यापेक्षा त्यांना लपवाछपवी करून खोटं बोलणं सोपं वाटतं.

याचसाठी मुलांशी मोकळेपणाने संवाद होणं गरजेचं आहे. आपली चूक जरी झाली तरी आईबाबा समजून घेतील आणि आपल्याला समजावून सांगतील अशी खात्री मुलांना वाटेल.

याबद्दल प्रयत्नशील असलं पाहिजे.

मुलांच्या चुकांवर पांघरूण न घालता त्यांना नीट समजावून सांगण्याची ही कला एकदा का आईबाबांनी जमवली आणि त्याबद्दल मुलांची खात्री पटवून दिली तर मुलांना खोटं बोलायला काही कारणच उरणार नाही, हो ना?

४. खोटं बोलण्यामागची कारणं जाणून घ्या :

लहान मुलांच्या मनाचा थांग लागणं तशी अवघड गोष्ट नाही.

कारण सहसा मुलं खरंच बोलत असतात त्यामुळे जर तुम्हाला तुमचा मुलगा खोटं बोलतोय असं समजलं तर त्यासाठी त्याला ओरडून जाब विचारण्याआधी तो खोटं का बोलला असेल याचा विचार करून त्यामागची कारणं शोधून काढायचा प्रयत्न केला पाहिजे.

एखाद्या मित्राच्या वाईट संगतीचा परिणाम, कोणाबद्दल तरी भीती अशी कारणं तर असूच शकतात शिवाय जर घरात खूप कडक वातावरण असेल, आईबाबा आणि मुलांमध्ये मनमोकळा संवाद नसेल तर आईबाबांकडून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुद्धा मुलं खोट्याचा आधार घेण्याची शक्यता असते.

एखाद्या वेळेस आईबाबा दोघेही नोकरी करत असतील आणि त्यामुळे त्यांना मुलांबरोबर जास्त वेळ घालवणं जमत नसेल तरीही आईबाबांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुलं खोटं बोलतात.

त्यामुळे मुलांचं खोटं पकडलं गेलं तर लगेच त्यांना दमदाटी करून त्याबद्दल जाब न विचारता आपलं काय चुकलं याचा विचार करून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे का? हे तपासले पाहिजे.

किंवा मुलं कोणाच्या दबावाखाली, कोणाच्या वाईट संगतीत नाहीत ना याची माहिती करून घेणंच जास्त योग्य आहे.

५. मुलांना खोटं बोलण्याच्या वाईट परिणामांची जाणीव करून द्या :

खोटं बोलण्याचे परिणाम म्हणजे केवळ आईबाबांचा मार किंवा शाळेतून मिळालेली एखादी शिक्षा नाही याची जाणीव मुलांना झाली पाहिजे.

खोटं बोलण्यामुळे मुलांना भविष्यात खूप नुकसान होणार असतं हे त्यांना वेळीच समजवायची जबाबदारी पालकांची असते.

त्यासाठी त्यांना उदाहरणं देऊन गोष्टी सांगितल्या पाहिजेत.

खोटं बोलण्याऱ्या माणसांवर विश्वास ठेवता येत नाही, त्यांच्याशी कोणी मैत्री करत नाही.

आणि ते एकटे पडतात हे त्यांना समजावून सांगितलं तर त्याचा परिणाम एखाद्या शिक्षेपेक्षा जास्त होईल.

एखाद्या वेळी मुलं खोटं बोललीच तर त्याची शिक्षा त्यांना लक्षात राहील अशी असली, जसं की एखादी बोधकथा लिहून काढणे तर ती शिक्षा त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहील, त्यातून त्यांना योग्य तो धडा मिळेल.

आणि भविष्यात खोटं बोलताना या शिक्षेची आठवण त्यांना नक्की राहील.

वर आपण बघितलं आहेच की शेवटी प्रत्येक मुलगा वेगळा असतो आणि मुलांना वाढवण्याची प्रत्येक आईबाबांची पद्धत सुद्धा वेगळी असते त्यामुळे एक नियम सगळ्यांनाच लागू होईल असं नाही.

पण आपल्या घरातल्या शिस्तीत बसतील, आपल्याला जमतील आणि आपल्या मुलांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या वागणुकीत बदल घडवून आणला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमच्या मुलांना खोटं बोलण्याची सवय लागणार नाही.

या टिप्स वापरून तुम्हाला काय फायदा झाला, याव्यतिरिक्त तुम्ही अजून काही करता का हे आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा.

आणि हा लेख तुमच्या ओळखीच्या आईबाबांबरोबर सुद्धा शेयर करा म्हणजे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मुलांना खरं बोलण्याची सवय लावण्यासाठी पाच टिप्स”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय