बाजारात जाल तेव्हा या गोष्टी घ्यायला विसरू नका

लहानपणापासून आपण ऐकत आलोय की रोज भाजीपोळी खावी, सगळ्या भाज्या खाव्यात..

हे फक्त चांगल्या सवयी लागण्यापुरतं मर्यादित आहे का तर नाही.

काही भाज्यांमध्ये, फळांमध्ये असे काही घटक असतात ज्यांच्यामुळे एकतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते किंवा ज्यामुळे एखाद्या विशिट्य आजार पसरवणाऱ्या बॅक्टरीयाची वाढ खुंटते आणि तो आजार बळकट होत नाही.

म्हणूनच सगळ्या भाज्यांचे आणि फळांचे रस पोटात जावेत असं आपल्याकडे फार पूर्वीपासून म्हणत आलेत.

डेंग्यू झाला की प्लेटलेट्स कमी होऊ नयेत म्हणून पपईची पानं फायदेशीर असतात, त्याचप्रमाणे चिकनगुनिया झाला तर किवी फळ खावं असं आपण आजकाल ऐकतो आणि तसं करतो सुद्धा.

मित्रांनो, खरंतर आठवड्याची भाजी घ्यायला जेव्हा आपण जातो तेव्हा त्यातच अनेक औषधं लपलेली असतात.

आणि बऱ्याचदा आपल्या नकळत आपण या भाज्या खात सुद्धा असतो पण कधीकधी होतं असं की आपल्याला एकतर अनेक भाज्यांच्या गुणांबद्दल माहितीच नसते.

किंवा आपल्या आवडीनिवडी अशा असतात की आपण बऱ्याच भाज्या आणतच नाही.

म्हणूनच आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा समावेश रोजच्या आहारात केला तर फायदा होतो.

खाली दिलेल्या पदार्थांचं आहारात समावेश करणं जितकं गरजेचं आहे तितकाच योग्य आणि समतोल आहार देखील गरजेचा आहे.

१. बेरीज

स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी, तुत्ती ही सगळी फळे या बेरी प्रकारात मोडतात.

बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट प्रचंड प्रमाणात आढळतात. अँटीऑक्सिडंट हे आपल्या शरीरातील फ्री राडीकल्सला कमी करायला मदत करतात ज्यामुळे आपण कॅन्सर किंवा ह्रदयविकारासारखे गंभीर आजारांपासून दूर राहतो.

आपल्याकडे स्ट्रॉबेरी, तुत्ती हे सिझनल मिळत असले तरी त्या त्या सिझनमध्ये त्या थोड्या प्रमाणात का होईना पण खाल्ल्या पाहिजेतच.

२. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दुधातून कॅल्शिअम जास्त प्रमाणात मिळतं हे आपल्याला माहीत आहेच पण दुधात प्रोटिन्स सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात.

दुधातील कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीमुळे हाडांचे आरोग्य सुधारायला मदत होते म्हणूनच वाढत्या वयात आणि म्हातारपणी रोज एक ग्लास तरी दूध घ्यावंच.

तरीही दूध कोणी घेऊ नये याबद्दल खोलात माहिती घेण्यासाठी जिन्यासुंनी खाली दिलेला लेख वाचवा.

https://www.manachetalks.com/12342/ratri-dudh-pinyache-fayde-nuksan/

इतर दुग्धजन्य पदार्थ जसं की लोणी, तूप, दही आणि पनीर यामध्ये सुद्धा प्रोटीन जास्त प्रमाणात आढळतं.

ताक सुद्धा भूक शवमवायला उपयोगी असतं त्यामुळे डायबेटीसच्या पेशंटना आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांसाठी ते फायदेशीर आहे.

३. मासे

मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी मासे म्हणजे एकदम उत्तम पर्याय आहे.

माशांमध्ये जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आढळतं त्यामुळे रक्तातले फॅट्स कमी व्हायला मदत होते.

त्यामुळे ह्रदयविकारासारखे आजार दूर राहतात. फॅट्सचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे गुड फॅट्स जे आपलं कोलेस्टेरॉल घटवायला मदत करतं आणि दुसरे म्हणजे बॅड फॅट्स ज्यामुळे रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढतं.

माशांच्या सेवनाने हे गुड फॅट जास्त प्रमाणात मिळू शकतं, त्यामुळे मांसाहारी लोकांनी माशांना प्राधान्य देऊन त्यांचा जेवणात आठवड्यातून दोनदा तरी समावेश करण्याचा प्रयत्न करावा.

४. हिरव्या पालेभाज्या

पालेभाज्यांचे फायदे आपल्या सगळ्यांना माहीत आहेतच तरी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या याबद्दल आवडीनिवडी असतात.

पण एखादी हिरवी पालेभाजी बघून नाक मुरडण्याआधी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’, अयर्न आणि अँटीऑक्सिडंन्ट्स हे भरपूर प्रमाणात आढळतात.

पालक, विशेषतः खूप फायदेशीर आहे. नुसत्या पालेभाज्या आवडत नसतील तर पालेभाज्यांचे सूप करून पिणे किंवा सॅलडमध्ये त्यांचा समावेश करणं हा एक चांगला पर्याय आहे.

५. ओट्स

नाश्त्याला ओट्स खावेत असं आजकाल सगळीकडे आपल्याला ऐकू येतं.

बरेचवेळा नवीन काही खाऊन बघायला आपला विरोध असतो, तसंच एखादा नवीन पदार्थ आपल्याला आवडेलच असं नाही पण ओट्सचे हे फायदे ऐकून तुमचा विचार बदलला नाही तरच नवल आहे.

ओट्समुळे रक्तातलं कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते पण फक्त इतकंच नाही तर ओट्समध्ये फॉलीक ऍसिड, ‘बी’ व्हिटॅमिन हे सुद्धा भरपूर प्रमाणात असतात.

यामुळे ह्रदयविकारासारखे आजार दूर राहतात आणि वजन सुद्धा नियंत्रणात ठेवता येतं.

ओट्समध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं ज्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि पचनाच्या तक्रारी सुद्धा दूर होतात.

म्हणूनच रोज नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या भुकेच्या वेळेस ओट्स खाल्ले तर अनेक फायदे आहेत.

यामुळे आपलं इतर अरबटचरबट खाणं सुद्धा आपोआप कमी होतं.

काहींना ओट्सची चव आवडत नाही आणि त्यामुळे ते खावेसे वाटत नाहीत पण ओट्स जास्त ‘टेस्टी’ व्हावेत यासाठी ओट्सचा उपमा किंवा ओट्सचे दोसे सुद्धा करून बघू शकतो.

६. रताळे

सहसा आपण उपवासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी रताळ्याचा वापर करत नाही.

बहुतेकदा उपासचं निमित्त होऊनच आपल्याकडे रताळे आणले जातात.

पण या रताळ्याचे फायदे इतके आहेत की ते फक्त उपासापुरतं मर्यादित न ठेवता नेहमीच्या आहाराचा भाग झाले पाहिजेत..

खरंतर बटाट्यापेक्षा रताळी पौष्टिक आहेत त्यामुळे बटाट्याच्या ऐवजी रताळे जेवणात वापरले तर अनेक फायदे आहेत.

रताळ्यात अँटीऑक्सिडंन्ट्स तर जास्त प्रमाणात असतातच, पण त्याच बरोबर त्यात बिटाकॅरोटीन, व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘इ’, कॅल्शियम, पोटॅशिअम, अयर्न हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात.

निरोगी राहण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवून रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी या सगळ्याचा खूप उपयोग असतो.

७. टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे द्रव्य असते ज्यामुळे टोमॅटोला लाल रंग येतो.

लायकोपिन हे एक अँटीऑक्सिडन्ट आहे ज्यामुळे कॅन्सरसारखे आजार दूर राहतात.

याशिवाय टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन्स सुद्धा भरपूर प्रमाणात असतात, खासकरून व्हिटॅमिन ‘सी’ जे रोग प्रतिकारशक्तीवाढवण्यासाठी चांगले असतात.

टोमॅटोचा आहारात समावेश करणं सोपं आहे, टोमॅटोची भाजी, चटणी, कोशिंबीर सूप किंवा अगदी पोळीभाजी बरोबर कच्चा टोमॅटो सुद्धा खाता येतो.

८. मोड आलेली कडधान्यं

मोड आलेल्या कडधान्यात प्रोटिन्स खूप प्रमाणात असतात.

त्यामुळे शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळावं म्हणून कडधान्य एक उत्तम पर्याय आहे.

वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करून मोड आलेली कडधान्य खाऊन प्रोटीनचं प्रमाण वाढवलं तर खूप उपयोग होतो.

९. ड्रायफ्रुट

ड्रायफ्रुटस मध्ये गुड फॅट्स जास्त प्रमाणात असतात त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करायला मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं.

ड्रायफ्रूटसमध्ये व्हिटॅमिन ‘इ’ आणि ‘ए’ भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.

पण ड्रायफ्रूटस पचनासाठी जड असतात त्यामुळे एकदम जास्त खाल्ल्याने सुद्धा त्रास होऊ शकतो आणि वजन सुद्धा वाढू शकतं म्हणून रोज सकाळी संतुलित प्रमाणात ड्रायफ्रूटस नाश्त्याबरोबर खाल्ले तर फायदा होतो.

१०. अंडी

अंड्यांमध्ये सुद्धा प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतं.

वाढत्या वयातल्या मुलांना आणि गरोदरपणात स्त्रियांना अंडी खाल्ल्याने चांगला फायदा होतो.

ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे किंवा शरीरातले फॅट्स कमी करून प्रोटीन वाढवायचे आहेत अशांसाठी अंडी अतिशय उपयुक्त आहेत.

आपण हे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात खात असतोच पण बऱ्याचदा त्याचे फायदे आपल्याला माहीत नसतात त्यामुळे त्याचं प्रमाण कमीजास्त होत असतं किंवा कधीतरी आपल्या आवडीनिवडीनुसार आपण यातले काही पदार्थ खायचा कंटाळा सुद्धा करतो.

पण हा लेख वाचून तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त आहारात काही बदल करून आपण आपल्या शरीराला आवश्यक ते सगळे घटक पुरवू शकतो, योग्य पदार्थ योग्य प्रमाणात घेऊन, समतोल आहार घेऊन आपण आपली तब्येत सुधारू शकतो.

आणि मग औषधं-गोळ्या घ्यायची वेळ कमी येते आणि तुम्हाला मान्य असेलच की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, व्हिटॅमिन मिळण्यासाठी आणि रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी बाहेरच्या गोळ्या घेण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी पटीने चांगला आहे, हो ना?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय