व्हॉट्सऍप’ मेसेंजर मध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

व्हॉट्सऍप’ मेसेंजर मधे होणाऱ्या या मोठ्या बदलाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? see once

‘व्हॉट्सऍप’ चॅटमध्ये हा एक मोठा बदल होणार आहे, हा बदल नक्की काय असणार आहे हे या लेखात वाचा आणि त्याचे परिणाम चांगले की वाईट हे कंमेंट्स मध्ये सांगा!

आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ‘व्हॉट्सऍप’.

नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या संपर्कात राहायला, कामासाठी, एखाद्या ट्रीपचं किंवा पार्टीचं नियोजन करायला ‘व्हॉट्सऍप’चा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

जे अगदी सुरुवातीच्या काळापासून ‘व्हॉट्सऍप’ मेसेंजर वापरत आहेत त्यांना त्यात वेळोवेळी होत गेलेले बदल आठवत असतीलच.

दोन टिक म्हणजे समोरच्याला मेसेज गेला हे सांगणारं, सगळ्यांच्या फोनमधलं पहिलं मेसेंजर म्हणजे ‘व्हॉट्सऍप’.

नंतर त्या दोन टिकमार्कचा रंग बदलून निळा झाला म्हणजे समोरच्याने मेसेज वाचला हे फिचर ऍड झालं.

पण यातही ज्यांना आपली प्रायव्हसी जपायची आहे अशांसाठी डबल टिकमार्क निळी न होण्याचा पर्याय होताच.

चॅट एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड, मेसेज डिलीट करायचं फिचर… असे कितीतरी फिचर आणून ‘व्हॉट्सऍप’ बदलत गेलं.

लोकांना सोयीचं व्हावं, त्यांची प्रायव्हसी जपली जावी म्हणून होत गेलेल्या या बदलांचं सगळ्यांनी स्वागतच केलं.

आणि म्हणूनच आज ‘व्हॉट्सऍप’ सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या मेसेंजर अप्लिकेशन पैकी एक आहे.

आत्ता सुद्धा या आपल्या लाडक्या ‘व्हॉट्सऍप’ मेसेंजरमध्ये एक बदल होऊन त्यात एक नवीन फिचर ऍड होणार आहे.

आणि ते म्हणजे आपण दुसऱ्याला पाठवलेले फोटो, व्हिडीओ आणि gif फाईल हे त्याने बघितल्यावर सुद्धा त्याच्या फोनमधून डिलीट करता येणार!

वाचून आश्चर्य वाटलं ना? असं कसं शक्य आहे?

ही बातमी खरी आहे का? नक्की हे फिचर कसं वापरायचं आणि त्याचा नेमका काय उपयोग आहे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतीलच..

म्हणूनच या लेखातून त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.

‘Expiring media’ असं नाव असलेल्या फीचरमुळे आपल्याला आपण एखाद्याला पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ त्याने बघितला की डिलीट करता येणार आहे.

या साठी ‘व्हॉट्सऍप’ मेसेंजरवर एखादा फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना एक नवीन ऑप्शन आपल्याला दिसणार आहे, तो कसा?

तर फोटो पाठवताना ‘view once’ असा पर्याय आपल्याला दिसणार आहे.

हा पर्याय निवडला की ज्या व्यक्तीला फोटो किंवा व्हिडीओ पाठवला तिच्या चॅट विंडोमध्ये ती ऑनलाईन असतानाच तो फोटो दिसणार.

अशा प्रकारे पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ फक्त ऑनलाईन असतानाच आणि ते सुद्धा एकदाच बघता येणार.

चॅट विंडोमधून बाहेर पडल्यावर तो फोटो नाहीसा होणार आणि परत चॅट विंडो उघडली तर ‘view once photo expired’ असं एक नोटिफिकेशन येणार.

‘व्हॉट्सऍप’च्या अँड्रॉइडच्या नवीन, म्हणजेच 2.20.2011 या व्हर्जनमध्ये हे नवीन फिचर येणार आहे.

हे व्हर्जन कधी रिलीज होणार आहे हे मात्र अजून ठरलेलं नाही.

या फीचरमुळे महत्वाचे पण दुसऱ्याच्या फोनमध्ये आपल्याला सेव्ह व्हायला नको आहेत असे फोटो बिनधास्त पाठवता येतील.

काही कारणाने पर्सनल फोटो पाठवायची वेळ आली तरी या फिचरचा उपयोग होईल.

फोटोंचा गैरवापर टळेल. पण कामाच्या एखाद्या फोटोला किंवा जो परत परत बघायला लागू शकतो अशा फोटोला चुकून हा पर्याय निवडला तर मात्र थोडं किचकट काम होऊन बसेल.

सध्या NCB ने बॉलिवूडमधल्या स्टार्सचे व्हाट्स अप चॅट्स उजेडात आणल्याच्या पार्श्वभूमीवर बरेच जणांना हे फिचर खूप उपयोगी वाटेल यात शंकाच नाही.

‘व्हॉट्सऍप’मध्ये झालेले आजपर्यंतचे इतके बदल आपण बघितले आणि ते आपल्या अंगवळणी सुद्धा पडले.

या नवीन बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कॉमेन्टमध्ये कळवा.

बरं आता एक छोटासा मजेदार क्विझ!!

आपल्याला जर आपल्या एखाद्या मित्राने किंवा परिचिताने, एखादा फोटो पाठवला, आणि त्याला तो आपल्याकडे कायमचा राहू नये म्हणून त्याने तो ‘view once’ म्हणून पाठवला…

पण आपल्याला मात्र तो फोटो त्यानंतरही आपल्याकडे हवा असेल तर काय करायचं?

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. quizz answer….take screen shot.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!