ब्लडप्रेशर वाढतंय? मग आहारात हे बदल करून बघा

ब्लड प्रेशर अटोक्यात ठेवण्यासाठी आहारात करायचे हे ७ बदल जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा.

आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा वाढलेल्या टेंशनमुळे म्हणा हल्ली घरटी एकाला तरी हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) त्रास असतो.

पूर्वी वयाच्या साठीनंतर होणार हा आजार आजकाल अगदी तिशीत सुद्धा होतो.

याचमुळे कमी वयाच्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे.

खरंतर उच्च रक्तदाब हा काही कोणता रोग नव्हे, याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणू शकतो.

म्हणजे आपल्या जीवनशैलीमुळे – व्यायामाचा अभाव, कामाचा स्ट्रेस, खाण्यापिण्याकडे झालेलं दुर्लक्ष, जंक फूडचा झालेला भडीमार इत्यादी मुळे झालेला आजार.

हा आजार एकदा पाठीमागे लागला की लागला असंच बऱ्याचदा होतं..

बीपीची गोळी पाठ सोडत नाही असं म्हणतात सुद्धा, पण ही लाइफस्टाइल डिसऑर्डर आपण डॉक्टरांच्या गोळ्यांबरोबरच आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणून सुद्धा नियंत्रणात ठेऊ शकतो.

ब्लड प्रेशर कमी करायला सगळ्यात महत्वाचा जीवनशैलीत करण्याचा बदल म्हणजे सकस आहार आणि पुरेसा व्यायाम.

डॉक्टरांच्या ट्रीटमेंट बरोबरच आपण खाण्यापिण्याच्या सवयी बदलून आपलं वाढलेलं बीपी आटोक्यात आणू शकतो.

म्हणूनच आज या लेखात आम्ही तुम्हाला वाढलेलं बीपी कमी करण्यासाठी हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांच्या डाएटच्या सवयी कशा असाव्यात हे सांगणार आहोत.

या सवयी लावून घेऊन स्वतःमध्ये बदल करून आपण आपलं बीपी नियंत्रणात ठेऊ शकतो.

१. दिवसभर खाल्लेल्या पदार्थांची नोंद करा

आपण दिवसभरात काय काय खातो हे लक्षात ठेवणं अवघड.

त्यात आपला बऱ्याचदा गैरसमज असतो की आपण फार जेवत नाही.

पण आपण जर आपण खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाची व्यवस्थित नोंद केली तर आपला हा भ्रमाचा भोपळा चांगलाच फुटतो.

जेवणाव्यतिरिक्त आपण किती अरबट चरबट खातो हे आपल्या लक्षात येतं.

याचा अजून एक फायदा होतो तो असा की एखादा पदार्थ खाताना आपल्या मनात ‘आपल्याला याची नोंद करायची आहे.’ हे येतं.

आणि आपल्याला जर खरंच भूक नसेल किंवा तो पदार्थ आपल्या तब्येतीसाठी चांगला नसेल तर आपण तो खाणं टाळतो.

यासाठी आपल्या जवळ एक छोटी पॉकेट डायरी बाळगली तर त्यात आपण काय खाल्लं याची नोंद करून ठेऊ शकतो.

आणि दिवसाच्या शेवटी आपण किती पदार्थ विनाकारण किंवा किती आरोग्यासाठी चांगले नसलेले पदार्थ खाल्ले याचा आढावा घेऊ शकतो.

२. जेवणात मिठाचा वापर कमीतकमी करा

मिठात असलेल्या सोडियममुळे ब्लड प्रेशर वाढतं म्हणून जेवणात जास्त मीठ वापरू नये.

मीठ पूर्ण बंद करणं तर शक्य नाही कारण मीठामुळेच जेवणाला चव येते.

पण आपण त्याचा वापर नक्की कमी करू शकतो? कसा?

कणिक भिजवताना कणकेत मीठ न घालता किंवा जेवणात लोणचं किंवा पापड जास्त न खाता आणि कोणत्याही पदार्थात वरून मीठ घालून न घेता..

असे छोटे छोटे बदल करून आपण मिठाचं प्रमाण कमी करून आपलं बीपी नियंत्रणात ठेऊ शकतो.

भाजीत मीठ नाही म्हणून बेचव वाटत असेल तर थोडं लिंबू पिळण्याची सवय लावायला हरकत नाही.

३. जेवणात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण वाढवा

सोडियम जसं बीपी वाढवायला कारणीभूत असतं तसं पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअममुळे बीपी नियंत्रणात राहायला मदत होते.

त्यामुळे आहारातलं सोडियमचं प्रमाण कमी करून पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण वाढवायला हवं.

यासाठी कोणत्या भाज्या आणि फळं खावी हे माहीत हवं.

पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण जास्त असणाऱ्या भाज्या म्हणजे ब्रोकोली, केळी, गाजर, पालक, टोमॅटो, बटाटा, मटार, संत्र, आंबा, सफरचंद, अननस.

याचबरोबर अक्रोड, मनुका, खजूर हे सुद्धा उपयुक्त असतात.

मोड आलेली कडधान्य, लो फॅट दूध, दही यामुळे सुद्धा फायदा होतो.

४. DASH डाएट करा

आहारात बदल करून बीपी, म्हणजेच हायपरटेन्शन नियंत्रणात ठेवणं म्हणजे DASH डायट- ‘Dietary Approach to Stop Hypertension’ हे डायट म्हणजे काय?

याचा एक सोपा नियम आहे, आहारातले गोड, खारट आणि पिष्टमय पदार्थ (किंवा फॅटचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो), रेड मीट म्हणजे मटण, तळलेले पदार्थ कमी करायचे.

आणि कडधान्यं, डाळी, भाज्या, फळं, लो फॅट डेरी प्रॉडक्ट्स, मासे, अंडी वाढवायचे.

यामध्ये पोळी किंवा भात, फळं आणि भाज्या, कडधान्य, लो फॅट दूध दही आणि लीन मीट- म्हणजे चिकन, मासे असं मिळून दिवसभरात फक्त २००० कॅलरीज पोटात जायला हव्यात.

गोड खाणं जरी पूर्णपणे वर्ज नसलं तरी त्याचं प्रमाण खूप कमी हवं.

आठवड्यातून एखाद दुसरा दिवस ते सुद्धा एखादा चमचा साखर.

आपल्या वजना आणि व्यायमानुसार आपल्याला किती कॅलरीजची गरज असते याबद्दल एखाद्या आहारतज्ञाचा सल्ला घेऊन आपण हे डाएट करून बीपी कमी करू शकतो.

५. कॉफी, कोल्डड्रींक्सचं प्रमाण कमी करावं

कॉफी आणि कोल्डड्रींक्समध्ये कॅफिन (caffein) खूप जास्त प्रमाणात असतं.

ज्यामुळे बीपी वाढण्याची शक्यता असते. दिवसाला एखादा कप कॉफीची सवय काही वाईट नाही.

पण कॉफीचं प्रमाणाबाहेर सेवन मात्र धोकादायक ठरू शकतं.

कारण ते ब्लड प्रेशर वाढवायला कारणीभूत असतं कोल्डड्रींक्समध्ये तर साखर सुद्धा खूप प्रमाणात असते.

ज्यामुळे वजन वाढून कोलेस्टेरॉलचा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे कोल्डड्रींक्स घेणं शक्यतो टाळलेलंच बरं.

६.अल्कोहोल बंद करावं

हायपरटेन्शन असलेल्या लोकांना अल्कोहोल वर्ज असतं.

अगदीच शक्य नसेल तर, महिन्यातून एखाद दुसरा दिवस वळगता हाय बीपी असलेल्या लोकांना दारू शक्यतो बंदच केली पाहिजे.

७. बाहेरचं खाणं टाळावं

बाहेरचं जेवण पूर्णपणे बंद करणं आपल्याला शक्य नसतं.

कामासाठी बाहेर पडल्यावर, मीटिंगला गेल्यावर, घरी जेवण करणं शक्य नसताना बाहेरचं खाणं भागच असतं.

पण मित्रांनो या बाहेरच्या खाण्यात तेल खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो.

म्हणूनच हाय बीपी असलेल्या लोकांनी जमेल तितकं बाहेरचं तेलकट खाणं टाळलं पाहिजे.

याचबरोबर जंक फूड म्हणजेच वडापाव, वेफर्स, सामोसा ज्यात तेल खूप प्रमाणात असतं असे पदार्थ सुद्धा शक्यतो टाळले पाहिजेत.

बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्या जेवणात काय काय बदल करायचे हे आपण बघितलं.

खरंतर हे बदल करणं फार अवघड नाही, पण ते तसेच कंटाळा न करता चालू ठेवणं मात्र किचकट आहे.

पण आपल्या तब्येतीसाठी आपण हे काही पदार्थ जरी अगदी बंद केले नाहीत तरी त्यांचं प्रमाण कमी नक्कीच करू शकतो, हो ना?

आपल्या आहारात आणि एकूण जीवनशैलीत बदल करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराबरोबरच इतरही काही काळजी घेतली पाहिजे.

त्यामुळे डॉक्टरांची ट्रीटमेंट, नियमितपणे व्यायाम तसंच मनावरचा ताण कमी करणं, टेंशन किंवा स्ट्रेस कमी करायचा प्रयत्न करणं त्यासाठी प्राणायाम, योगसाधना करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.

आपल्या आयुष्यात हे चांगले बदल घडवून आपण जसं आपलं वाढलेलं बीपी कमी करू शकतो तसं वेळेच्या आधीच हे सकारात्मक बदल करून आपण मुळात बीपी वाढूच नये यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतो.

काय? पटतंय ना? मग आजपासूनच हे बदल करायला हळूहळू सुरुवात मग हा लेख लवकर तुमच्या नातेवाईकांबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर शेयर करा!

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “ब्लडप्रेशर वाढतंय? मग आहारात हे बदल करून बघा”

  1. High BP patients नी कोणती योगासने/प्राणायाम करावीत आणि कोणती टाळावीत. Pls guide.

    माझं वय 50 yrs आहे. मासिक पाळी अजून सुरू आहे आणि Tetan40 टॅब्लेट रोज रात्री एक घेते. उंची 5.4″ वजन 102 kg आहे.

    मला वयाच्या 27 व्या वर्षी पासून lower back spondylosis आहे आणि मागील 3 वर्षांपासून high bp चा त्रास सुरू झालाय.

    Reply
    • यावरील लेख वेबसाईट वरती आहे. नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया खाली👇 दिल्याप्रमाणे सबस्क्राईब करा…

      मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇 व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
      सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.
      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

      त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      फेसबुक पेज👇

      https://www.facebook.com/ManacheTalks

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/J5lLOcEOCLJ5biW8B7uWfh

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय