वाढत्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी उत्पन्न वाढीचे १० उपाय

जास्तीचे पैसे कमावण्याचे दहा सोपे उपाय

आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून जास्तीचे पैसे कमवण्याचे दहा सोपे मार्ग वाचा या लेखात.

जी मुलं शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात आहेत, लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, धंद्यात नुकसान झाले त्यांना सुद्धा यातल्या खूप टिप्स कामाच्या ठरू शकतात. तेव्हा हा लेख मोठा असला तरी शेवट्पर्यंत नीट वाचा.

पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करणं, विनाकारण खर्च टाळणं ही एक चांगली सवय आहेच पण कधीकधी ती पुरेशी नसते.

पैसे वाचवणं हा एक भाग झाला आणि जास्त पैसे मिळावेत म्हणून मूळ कमाईचा स्रोत शाबूत ठेऊन इथे तिथे हात पाय मारून त्यात यशस्वी होणं हा दुसरा भाग.

पैसे जितके कमावू तितके कमीच आणि कुठे थांबायचं हे कळायला हवं हे जरी खरं असलं तरी आजकाल आपल्या पगाराव्यतिरिक्त पैसे कमावणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे.

जास्त पैसे का हवेत याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात.

असलेला पगार अपूर्ण न पडून सुद्धा काहींना अजून मेहनत घेऊन आपले कमाईचे स्रोत वाढवायचे असू शकतात.

काहींना मुलांच्या भविष्याची सोय करून ठेवायची असते, काहींना जास्त मिळणाऱ्या पैशातून एखादी वस्तू खरेदी करायची असते.

जीवनशैली सुधारायची असते तर काहींना चक्क निवृत्ती नंतरची आपली चिंता मिटवायची असते.

सध्याच्या या वैश्विक महामारीच्या काळात तर अनेकांच्या हातातल्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे, काहींचे व्यवसाय म्हणावे असे चालत नाहीयेत.

अशा अवघड दिवसांमध्ये खर्च कमी होतात का?

तर नाही, ते तर दिवसेंदिवस वाढतच जातात.

यामुळे घरात पैसे येण्याचे नवीन मार्ग शोधणे याला दुसरा पर्याय उरलेला नाही.

कारण काहीही असो, ज्यांना कमाईचे स्रोत वाढवायचे आहेत त्यांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत.

आयुष्यात सोपं काहीच नसतं त्यामुळे यासाठी सुद्धा जास्तीचे कष्ट घ्यावे लागणारच आहेत. पण हे शक्य आहे!

एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी आपल्याला वेळ खर्च करावा लागतोच, मेहनत घ्यावी लागतेच.

म्हणूनच आज या लेखातून आम्ही असे काही सोपे मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे कोणताही जास्तीचा मानसिक ताण न घेता तुम्हाला तुमच्यात असलेल्या कलांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून तुमचे कमाईचे स्रोत वाढवता येतील.

1. ब्लॉग लिहायला सुरुवात करा

अशी कोणती गोष्ट आहे ज्यात तुम्ही अगदी एक्स्पर्ट आहात?

पाककौशल्य असेल, बागकाम, शिवणकाम, विणकाम.. याबद्दल तुम्ही मार्गदर्शनपर लेख लिहून तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरु करू शकता.

रोज रोज त्यावर नवीन नवीन लेख अपलोड करून तुम्ही तुमच्या ब्लॉगची प्रसिद्धी वाढवू शकता.

तुमची लेखनशैली चांगली असेल तर तुमच्या कथा, कविता, प्रवासवर्णनं यांचा सुद्धा ब्लॉग होऊ शकतो.

या कामात खूप चिकाटी लागते. सखोल ज्ञानाची गरज असते.

या विषयीच्या तांत्रिक बाजू समजून घ्याव्या लागतात. कुठलंही काम सोपं नसतं, हाच नियम इथेही लागू होत असला तरी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

मनाचेTalks हिंदी वर ब्लॉगिंग शिकवणारी एक लेखमाला चालू आहे. त्यातील एका लेखाची लिंक खाली दिलेली आहे.

ब्लॉगिंग क्या है और इससे पैसे कैसे कमाएँ? WHAT IS BLOGGING AND ALL ITS BASICS IN HINDI भाग:१

2. ऑनलाईन सर्वे

इंटरनेटवर अशा बऱ्याच वेबसाईट्स आहेत ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी सर्वे घेत असतात.

यातले प्रश्न एखाद्या ब्रँडबद्दल किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल असतात.

कोणत्याही सर्वेच्या आधी आपल्याला आपली प्राथमिक माहिती पुरवावी लागते.

प्रत्येक सर्वेसाठी आपल्याला पॉईंट्स मिळतात आणि या सर्वेजचा एक ठराविक आकडा आपण पार केला की ते पैसे आपल्या अकाऊंटमध्ये जमा होतात.

एका सर्वे साठी लागणारा वेळ सुद्धा जास्तीतजास्त अर्धा तास इतकाच असतो.

डोक्याला अजिबात त्रास न देता, अगदी बसल्या-बसल्या आपल्याला वेळ असेल तेव्हा हे सर्वे घेऊन आपण घरबसल्या पैसे कमावू शकतो.

3. पाळणाघर

गृहिणींसाठी पाळणाघर चालवणं हा घरात जास्तीचे पैसे आणायचा एक चांगला मार्ग आहे.

मुलांची आवड असेल तर काही विचारायलाच नको.

काहीजणी अगदी दिवसभर सुद्धा हे काम आनंदाने करतील.

पण हे. ही खरं आहे की काही गृहिणी दिवसभर कामात असतात त्यात दुसऱ्याच्या मुलाची जबाबदारी कशी स्वीकारायची?

असा प्रश्न पडू शकतो पण पाळणाघराची वेळ तुम्ही ठरवू शकता, हो ना?

दिवसभर जमणार नसेल तर फक्त दुपारच्या वेळी, शाळेतून आल्यावर किंवा फक्त सुट्टीच्या दिवशी अशी तुम्हाला सोयीची वेळ तुम्ही ठरवू शकता.

कधीकधी काही पालकांना पाळणाघरात रोज ठेवायची वेळ येत नाही.

पण कधी अचानक बाहेर जावं लागलं आणि मुलांना नेता येणार नसलं तर त्यांना कुठे ठेवायचं हा प्रश्न पडतो.

त्यासाठी अगदी लागेल तसं पाळणाघर सुद्धा तुम्ही चालवू शकता.

ज्यात आईबाबांना अचानक काम आलं तर ते तास दोन तास सुद्धा तुमच्याकडे ठेऊ शकतात.

4. ट्युशन्स/क्लास

आजकाल मुलांना अगदी पहिलीपासून ट्युशन लावतात.

आईबाबांना अभ्यास घ्यायला वेळ नसतो आणि काही मुलं आईबाबांसोबत अभ्यासाला बसत सुद्धा नाहीत.

तुम्हाला शिकवण्याची आवड आणि कला असेल तर अशा मुलांसाठी तुम्ही ट्युशन्स देऊ शकता.

आजूबाजूला शाळकरी मुलं असतील तर अशा ट्युशन्स घेऊन तुम्ही पैसे कमावू शकता.

याचा अजून एक फायदा असा आहे की तुमच्या ट्युशनची वेळ ठरवणं हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं त्यामुळे तुमची घरातली कामं, इतर बाहेरची कामं, ऑफिसची कामं सगळ्याचं नियोजन करून तुम्ही ट्युशनची वेळ ठरवू शकता.

तुम्हाला अभ्यास घेता येत नसेल किंवा त्यात फारसा रस नसेल तर तुम्ही तुमच्यकडे असणाऱ्या इतर कलांचा वापर करून एखादा क्लास सुरु करू शकता. चित्रकला, नाच, गाणं किंवा अगदी संस्कारवर्ग सुद्धा.

5. संपादन/मुद्रित शोधन

बऱ्याच प्रकाशन संस्थांना चांगले मुद्रित शोधक, म्हणजे प्रूफ रीडर्स हवे असतात.

तुमच्याकडे कला क्षेत्रातली डिग्री असेल आणि तुमचं भाषेवर आणि व्याकरणावर प्रभुत्व असेल तर तुम्हाला हे काम सहज मिळू शकतं.

शब्दसंख्ये प्रमाणे किंवा प्रत्येक पानाला अमुक रक्कम असं पेमेंट यात असतं.

दिवसातले दोन किंवा तीन तास देऊन तुम्ही एक दोन आठवड्यात एखाद्या पुस्तकाचं प्रूफरिडींग करून देऊ शकता.

तुमचा प्रूफरिडींगचा अनुभव चांगला झाला तर त्याची पुढची पायरी म्हणजे संपादनाचं काम सुद्धा तुम्हाला मिळू शकतं.

6. लिखाण

वर म्हटल्याप्रमाणे ब्लॉग सुरु करून त्यावर नियमितपणे लिखाण करणं हा एक पर्याय आहेच.

पण याशिवाय सुद्धा तुमची लेखनशैली चांगली असेल तर तुम्ही एखाद्या वृत्तपत्राला, त्रैमासिकाला, मासिकाला एखादा स्तंभ लिहून द्यायचा प्रस्ताव मांडू शकता.

यात तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या क्षेत्रातले मार्गदर्शनपर लेख लिहू शकता किंवा ललित लेख, कथा सुद्धा लिहू शकता.

7. घरातल्या नको असलेल्या गोष्टी ऑनलाईन विकणं

हा काही पैसे कमवण्यासाठीचा कायमचा स्रोत नाही पण आजकाल लोकांचा ऑनलाईन जुन्या गोष्टी खरेदी करण्याचा कल वाढला आहे.

आपल्या घरात सुद्धा अशा पुष्कळ गोष्टी नुसत्या पडून असतात.

त्याचा कोणाला वापर करता येणार असेल तर चांगलंच आहे ना?

या निमित्ताने आपली घरात आवराआवरी सुद्धा होईल आणि त्याबरोबर चार पैसे सुद्धा मिळतील.

8. ऑनलाईन स्टोर

तुमच्याकडे लोकांशी संवाद साधून त्यांना एखादी वस्तू घेण्यासाठी तयार करायची कला असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे.

फारसा वेळ न घालवता, घरच्याघरी बसून करण्यासारखी ही गोष्ट आहे..

तुम्ही तुमची नोकरी आणि इतर व्यवधानं सांभाळून करू शकता.

यात अजून एक फायदा असा आहे की यासाठी आपल्या वस्तुंचा घरी स्टॉक असावा लागत नाही, तुमच्याकडे ऑर्डर आली की ती पुढे डीलरला देऊन तुम्ही गरजेनुसार स्टॉक मिळवू शकता.

म्हणजेच यात गुंतवणूक करायची गरज नसल्याने नुकसान होण्याचा प्रश्नच नसतो.

आजकाल सोशल मीडियामुळे मार्केटिंग सुद्धा सोपं झालं आहे..

रोज फोटो शेयर करायचे आणि आपलं टार्गेट ठरवायचं.

यामध्ये कपड्यांपासून ते घरातल्या भांड्यांपर्यंत कोणत्याही आणि कितीही वस्तू तुम्ही तुमच्या स्टोरमध्ये ठेऊ शकता.

याबरोबर तुम्ही टपरवेयर, ओरिफ्लेम अशा ब्रॅण्डची एजेन्सी सुद्धा घेऊ शकता.

https://www.manachetalks.com/9966/amazon-seller-bnnyasathi-kay-krave-marathi-vyvsay-margdarshan/

9. तुमच्या छंदाचं व्यवसायात रूपांतर

तुम्हाला चित्रकलेचा छंद आहे? मग तुम्ही तुमची छान पेंटिंग्स ऑनलाईन विकू शकता.

याचबरोबर तुम्हाला शिवणकाम, विणकामाचा, दागिने तयार करायचा किंवा कागदी फुलं, प्लास्टिकची महिरप आणि इतर सजावटीसाठीच्या वस्तू, तयार करायचा छंद असेल तर तुम्ही तयार केलेले ड्रेस किंवा वस्तू तुम्ही विकू शकता.

किंवा ऑर्डरनुसार तयार सुद्धा करून देऊ शकता. याचबरोबर तुम्हाला जर स्वयंपाकाची आवड असेल तर ऑर्डरप्रमाणे तुम्ही लाडू, चकली, चिवडा.. जी तुमची खासियत असेल ती करून विकू शकता.

लक्षात घ्या, दिवाळी आलीय, आता फराळाला मागणी असणार आहे.

तुमचं आवडीचं काम करून पैसे कमवायचा हा एक उत्तम पर्याय आहे.

10. झाडांची रोपे तयार करा

बागकामाची आवड आहे? तुमचा हात हिरवा आहे असं सगळे म्हणतात?

तुम्ही रुजवलेल्या बिया हमखास रुजून येतात आणि तुम्ही लावलेली झाडं हमखास जगतात?

मग या तुमच्या आवडीचं आणि स्किलचं रूपांतर व्यवसायात का नाही करत?

वेगवेगळ्या बिया रुजवून किंवा कलमं करून तुम्ही ती माफक दरात विकू शकता. यासाठी तुम्हाला वेळ जरी घालवावा लागला तरी त्यामधून तुम्हाला आनंदच मिळणार आहे.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आहेत ना हे सोपे पर्याय?

काही अपिहार्य कारणाने नोकरी न करणाऱ्यांसाठी, घरातून बाहेर न पडता येणाऱ्यांसाठी आणि अगदी नोकरी-व्यवसाय सांभाळून सुद्धा यातल्या अनेक गोष्टी सहज करता येण्या सारख्या आहेत.

डोक्याला जास्त स्ट्रेस न देता, तुमच्या आवडीचीच कामं करून त्यातून पैसे मिळवता येत असतील तर और क्या चाहिये?

अशा हटके कामांच्या काही विशेष टिप्स.

 • तुम्हाला फोटोग्राफी चांगली येत असेल तर इंटरनेटवर फोटो विकता येतात. याने तुम्ही डॉलरने पैसे कमावू शकतात.
 • सध्या ऑनलाइन कोर्सेस घेणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. ते विशिष्ट काम तुम्हाला जमत असेल तर त्यांच्याकडे त्याबद्दल विचारणा करू शकतात.
 • फावर, फ्रिलांसर यांसारख्या काही वेबसाईट्स आहेत, त्यावर आपल्यात असलेले स्किल्स सांगणारे प्रोफाइल बनवून घरबसल्या काम मिळवू शकता.
 • आपले रिकामे घर किंवा घरातली एखादी खोली काही विशिष्ट किंमत ठरवून (अगदी कमीत कमी एक दिवस सुद्धा) भाड्याने देऊ शकता. त्यासाठी Airbnb या नावाची एक वेबसाईट आहे.
 • तुमच्यामध्ये काही शिकवण्याचे स्किल असेल, तर आपले कोर्स रजिस्टर करून त्यातून कमाई करून घेता येईल. अशा काही वेबसाईट्स इंटरनेट वर आहेत त्यांचा वापर करू शकता.

यात दिलेल्या माहिती बद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट्स मध्ये विचारा. आणि आपल्या मित्रांना लेख जास्तीत जास्त शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

7 Responses

 1. Santaji Walke says:

  How to earn money to sale photography ?
  Pls details ….

  • Getty Images, Shutterstock, iStock यांसारख्या काही वेबसाईट्स आहेत ज्यावर चांगले, त्यांच्या क्रायटेरियात बसणारे फोटो सेल करता येतात.

 2. Kiran says:

  Tuition classes ला चांगला रिस्पॉन्स मिळत नाही

 3. Rohini Kishor Mandale says:

  How to earn to serve links?

 4. Good useful tips thank you….

 5. Gaurav says:

  खूप छान माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!