शेंगदाण्यांचं आहारातील महत्त्व समजून घ्या, या लेखात

आपल्या आहारात आपण बऱ्याच गोष्टी अगदी कमी प्रमाणात का होईना रोजच्यारोज खात असतो.

शेंगदाणा हा त्यातलाच एक.

शेंगदाण्याचं कूट घालून भाज्या, कोशिंबिरी आपण खातो.

भेळेत, चिवड्यात आणि पोह्यात सुद्धा शेंगदाणे आपल्याला आवडतात.

कधीकधी नुसते खारवलेले शेंगदाणे आपण खातो.

या आपल्या लाडक्या शेंगदाण्याचा आपल्याला काय फायदा होतो, त्यातून आपल्याला कोणती पोषकद्रव्ये मिळतात.

आणि त्याचा आपण आहारात का समावेश केला पाहिजे, हे सांगण्यासाठीच आज हा लेख आहे.

1. अमेरिकन हार्ट असोसिएशनने शेंगदाणा हा ‘हार्ट हेल्दी फूड’ असल्याचं घोषित केलं आहे.

म्हणजेच ह्रदयाच्या आरोग्यासाठी शेंगदाणा चांगला असतो. कारण त्यात प्रोटीन, फायबर, चांगलं फॅट (जे कोलेस्टेरॉल कमी करतं) हे घटक चांगल्या प्रमाणात असतात.

2. शेंगदाण्यात इतर कोणत्याही नट्स पेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणा हे प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत.

3. शेंगदाण्यात खालील महत्वाची आणि आपल्या शरीराला गरजेची व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.

या घटकांची नावं आणि त्याचा आपल्याला होणार उपयोग एकेक करून आपण बघू.

व्हिटॅमिन इ – व्हिटॅमिन ‘इ’ एक उत्तम अँटिऑक्सिडंट आहे.

हे आपल्या शरीरातल्या पेशींचा ऑक्सिडेशन या प्रक्रियेपासून बचाव करते.

ऑक्सिडेशनमध्ये शरीरातल्या चांगल्या पेशी निकामी होत जातात.

मॅग्नेशिअम – शरीरातल्या मसल्सची तसेच हृद्यातल्या मसल्सची सुद्धा, कार्यक्षमता वाढवण्यासाठी मॅग्नेशिअम अतिशय उपयुक्त आहे.

फोलेट (folate) – हे एक व्हिटॅमिन ‘बी’ आहे. याचा उपयोग शरीरात नवीन पेशी, खासकरून तांबड्या रक्तपेशी तयार करण्यासाठी होतो.

गरोदर बायकांना, वाढत्या मुलांना या फोलेटची जास्त गरज असते.

कॉपर – कॉपरचा सुद्धा उपयोग आपल्या रक्तातल्या तांबड्या पेशी वाढवण्यासाठी होतो.

याशिवाय कॉपरमुळे आपल्या रक्त वाहिन्या निरोगी राहतात. आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा कॉपरचा उपयोग होतो.

फॉस्फोरस – दातांच्या आणि हाडांच्या पेशींच्या वाढीसाठी आणि त्यांच्या एकंदरीत आरोग्यासाठी फॉसफरस उपयुक्त असतं.

फायबर – फायबर हा आपल्या आहारातील महत्वाचा घटक आहे.

याचा उपयोग आपल्या पचनासाठी होतो. आहारात फायबरचं प्रमाण जास्त असेल तर आपलं पोट जास्त काळ भरलेलं राहतं, पोट भरल्याची भावना लवकर येते ज्यामुळे वजन कमी होतं.

नियासिन – नियासिन हे एक व्हिटॅमिन ‘बी’ आहे जे आपल्या पचनसंस्थेसाठी आणि मज्जासंस्थेसाठी चांगलं असतं.

निरोगी त्वचेसाठी सुद्धा हे व्हिटॅमिन फायदेशीर असतं.

मँगनीज – शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मँगनीज फायदेशीर असतं.

थायमिन – थायमिन हे एक व्हिटॅमिन ‘बी’ आहे ज्याच्या मदतीने आपल्या आहारातल्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं.

म्हणजेच थायमिन आपल्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतं.

बायोटिन – बायोटिन हे व्हिटॅमिन ‘बी’ गर्भधारणेसाठी फार महत्वाचं असतं.

शेंगदाणा हा बायोटिनचा सगळ्यात उत्तम स्रोत आहे.

4. शेंगदाणा ही एक तेल बी आहे त्यामुळे त्याच्यात फॅटचं प्रमाण जास्त असतं.

हे फॅट मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड या प्रकारात मोडतं.

म्हणजेच शेंगदाण्यात ‘गुड फॅट्स’ असतात.

मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हे शरीरातली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं आणि ह्रदयविकारापासून आपला बचाव करतं तर पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्मुळे डायबेटीसचा धोका कमी होतो.

आहे की नाही गंम्मत….

5. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि फॅट्स हे जास्त प्रमाणात असतात.

पण कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात.

शेंगदाण्याच्या अर्थातच यामुळे कॅलरी जास्त असतात आणि त्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते.

पण त्याचबरोबर कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असल्याने, ते मधुमेह असलेल्या लोकांसाठी चांगले असतात.

6. शंगदाण्याच्या सालीत भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स आढळतात.

अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचं असतं.

शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून, अँटिऑक्सिडेंट्स आपला बचाव करतात. हे फ्री रॅडीकल्स शरीरात तयार होणाऱ्या इतर पेशींसाठी धोकादायक असतात.

7. शेंगदाण्यात फॅट आणि कॅलरीजचं प्रमाण जास्त असलं तरी त्यामुळे वजनात वाढ होत नाही कारण त्यात कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात व फायबर जास्त प्रमाणात आढळतं.

म्हणून वरचे सगळे फायदे लक्षात घेता आपल्या आहारात शेंगदाण्याचा समावेश हा असलाच पाहिजे.

8. शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने पित्ताशयात खडे व्हायचा धोका कमी होतो.

9. शेंगदाण्यातल्या गुड फॅट्समुळे ह्रदयविकाराचा सुद्धा धोका कमी होतो.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शेंगदाणे खाऊन होणारे फायदे तर आपण बघितलेच. आपल्या आहारात असलेल्या या रोजच्या पदार्थामुळे आपल्याला किती फायदा होतो हे आपल्याला समजलं,

याचबरोबर जर शेंगदाणे खावेत का? त्यामुळे वजन वाढतं का? ह्रदविकार होतात का? अशा आपल्या मनातल्या शंकांची सुद्धा उत्तरं मिळाली.

आपल्या आहारात योग्य प्रमाणात शेंगदाण्याचा समावेश केला तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलंच आहे ही खात्री पटली असेलच.

पण याबरोबरच हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेंगदाण्याची ऍलर्जी सुद्धा काही लोकांना असते.

शेंगदाण्यातले अ‍ॅराचिन आणि कॉनराचिन काही लोकांना एलर्जीनिक असू शकतात. लहान मुलांमध्ये हि ऍलर्जी ५० मुलांमध्ये १ तर वयस्कांमध्ये २०० जणांमध्ये एक इतकी कमी प्रमाणात जाते.

एकूण काय तर पुढे जाऊन गोळ्या-औषध घेण्यात भरमसाठ पैसा घालण्यापेक्षा, हे नैसर्गिक औषध आपल्या स्वयंपाक घरात असताना त्याचा पुरेपूर वापर आपण केलाच पाहिजे.

आणि म्हणूनच लेख आपल्या मित्र-परिवारात सुद्धा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय