तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्याचे घरगुती उपाय या लेखात वाचा.

आकर्षक व्यक्तिमत्वाची जसा आत्मविश्वास गरजेचा असतो तसेच टापटीप राहणे, स्वच्छ राहणे सुद्धा महत्वाचे असते.

खरेतर आपल्या राहणीमानाचाच आपल्या आत्मविश्वासावर आणि पर्यायाने आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो.

व्यवस्थित कापलेले, विंचरलेले केस, पुरुषांची व्यवस्थित कापलेली दाढी, मिशी, इस्त्री केलेले कपडे, पॉलिश केलेले बूट हे जितके महत्वाचे आहेत तितकेच घामाची दुर्गंधी न येणे, तोंडाची दुर्गंधी न येणे महत्वाचे आहे.

घामाची दुर्गंधी घालवण्याचे घरगुती उपाय आपण मागच्या एका लेखात बघितले.

https://www.manachetalks.com/12879/home-remedies-to-stop-sweat-marathi/

या लेखात आज आपण तोंडाला दुर्गंधी कशामुळे येते आणि ती घालवण्याचे काही सोपे घरगुती उपाय बघणार आहोत.

तोंडाला दुर्गंधी का येते?

जेवणातल्या काही पदार्थांमुळे, जसे की कांदा, लसूण तोंडाला तात्पुरती दुर्गंधी येते.

म्हणून सहसा कामाला जाताना किंवा दिवसा जेव्हा आपण जास्त लोकांच्या संपर्कात येणार असतो तेव्हा या पदार्थांपासून शक्यतो दूर राहावं.

पण तोंडाला दुर्गंधी सतत येत असेल तर? त्यामागे काय कारणे असतात?

1) जिंजीवायटीस

दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये कीड आणि प्लाक खूप दिवस साठून राहिल्याने इन्फेक्शन होते.

यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे याबरोबरच तोंडाला खूप घाण वास सुद्धा येतो.

यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे असते.

2) कीड

खूप गोड खाल्ल्याने तसेच रोज व्यवस्थित दात घासून, तोंड न धुतल्याने दातांना कीड लागते.

हे सुद्धा तोंडाच्या दुर्गंधीचे महत्वाचे कारण आहे.

3) तोंड कोरडे पडणे

सकाळी उठल्यावर तोंडाला दुर्गंधी जास्त प्रमाणात असते त्याचे हेच कारण आहे.

तोंड उघडे राहिल्याने कोरडे पडणे. रात्री घोरताना किंवा झोपेत तोंड उघडे राहिल्यामुळे कोरडे पडते ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी घरगुती उपाय

1. भरपूर पाणी प्या

तोंड कोरडे पडण्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते हे आपण वर बघितलेच.

त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढवले तर फायदा होतो.

तोंडाला दुर्गंधी येते आहे, असे जाणवले की एक ग्लासभर पाणी प्यायचे.

नुसते पाणी जात नसेल तर त्यात लिंबू पिळून घातले तरी फायदा होतो.

दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही.

एकाच वेळेला खूप पाणी पिणे टाळून दिवसभरात एकेक दोन दोन घोट पाणी पीत राहिल्याने फायदा होतो.

2. जीभ स्वच्छ ठेवा

जिभेवर अन्नाचे कण, बॅक्टेरीया आणि डेड स्किन सेल्स साचून पांढरा थर तयार होतो.

यामुळे तोंडाला खूप प्रमाणात दुर्गंधी येते. दातांच्या स्वच्छतेबरोबरच जिभेची स्वच्छता करणे महत्वाचे आहे.

म्हणूनच रोज जीभ सुद्धा साफ केली पाहिजे.

यासाठी एक कापड कोमट लिंबू पाण्यात बुडवून जिभेवरून फिरवून घेऊन जीभ स्वच्छ करता येते.

किंवा आपल्या टूथब्रशच्या मागच्या बाजूला असलेल्या टंग क्लिनरचा सुद्धा वापर करता येतो.

3. आहारात प्रोटीनचे प्रमाण कमी करा

प्रोटीनचे पचन होण्यासाठी अमोनिया गरजेचा असतो. आपल्या आहारात जितके प्रोटिन्स जास्त असतील

तितके जास्त अमोनिया आपल्या शरीराला तयार करावे लागतात.

म्हणूनच तुमच्या आहारात जर प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतील तर शरीराने अमोनिया जास्त तयार केल्यामुळे तुमच्या तोंडाला एक वैशिष्ट्य, अमोनिया चा सारखा वास येतो.

या प्रकारच्या दुर्गंधीवर उपाय म्हणजे आहारात नॉनव्हेजचे प्रमाण कमी करा आणि ताजी फळं, भाज्या याचे प्रमाण वाढवा. असे केल्याने लगेच फरक जाणवतो.

मात्र पौष्टिक अन्न घेणे टाळावे, हा याचा अर्थ अजिबात नाही!!

4. बेकिंग सोडा

आपण वर बघितले की तोंडाच्या दुर्गंधीचे एक कारण म्हणजे दातांना लागलेली कीड.

दातांची कीड म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तिकडे अडकलेल्या अन्नाच्या कणांमुळे झालेली बॅक्टेरीयाची वाढ.

या बॅक्टेरीयामुळेच तोंडात ऍसिड जास्त प्रमाणात तयार होतात आणि त्यामुळेच तोंडाला दुर्गंधी येते.

ऍसिड आणि अल्कली दोन्हीमुळे तोंडाला वास येतो.

पण बेकिंग सोड्यामधील बायकार्बोनेट हा घटक तोंडातल्या ऍसिड बरोबर मिसळला गेला की तोंडाचा pH ना ऍसिडिक होतो ना अल्कली.

यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.

एका कोमट पाण्याच्या ग्लासमध्ये दोन छोटे चमचे बेकिंग सोडा घालून दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित चूळ भरल्याने दातांची दुर्गंधी नाहीशी होते.

या उपायाचा अजून एक फायदा म्हणजे बेकिंग सोड्या मुळे दातांचा पिवळेपणा सुद्धा जातो.

5. मसाले

अनेक घरगुती उपाय आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असतात.

आपल्या मसाल्यातल्या पदार्थांना सुंदर वास येतो, म्हणूनच त्याचा वापर आपण जेवण अधिक रुचकर बनवण्यासाठी करतो.

पण या मसाल्यांचा वापर तोंडातल्या दुर्गंधीवर मात करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो!

दालचिनीमध्ये असलेले सिनॅमोनिक आल्डिहाइडमुळे तोंडातील बॅक्टेरीया नष्ट होतात.

तोंडाला वास येत असल्यास दालचिनीचा तुकडा घेऊन चघळला तर फायदा होतो.

बडीशेपेमुळे सुद्धा तोंडातले बॅक्टेरिया नष्ट होतातच, शिवाय बडीशेपेचा स्वतःचा एक चांगला वास असतो जो इतर वासांना, दुर्गंधीला नाहीसं करतो.

म्हणूनच जेवणानंतर थोडी बडीशेप खावी.

लवंगीचा वापर सुद्धा तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी केला जाऊ शकतो.

तोंडाचा वास घालवण्यासाठी लवंग चघळावी. लवंगीमुळे तोंडातले बॅक्टेरीया नाहीसे होऊन दात किडण्यापासून सुद्धा बचाव होतो.

जेवणात जर नॉनव्हेज, कांदा- लसूण अधिक प्रमाणात असेल.. तर जेवणानंतर या उपायांपैकी एक केल्याने फायदा होतो.

6. स्ट्रेस कमी करा

स्ट्रेसमुळे तोंडाची दुर्गंधी? आश्चर्य वाटले ना? पण स्ट्रेसचे आपल्या आरोग्यावर कितीतरी परिणाम होत असतात, त्यातलाच हा एक.

स्ट्रेस असताना आपण कमी खातो, पाणी कमी पितो आणि स्ट्रेसचा परिणाम हिरड्यांच्या आरोग्यावर सुद्धा होतो.

ज्यामुळे तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्या उत्भवू शकतात. म्हणून मेडिटेशन, प्राणायाम या गोष्टींचा उपयोग करून स्ट्रेस कमीत कमी करायचा प्रयत्न करावा.

7. माऊथ फ्रेशनर

पुदिना किंवा तुळशीची पाने चावून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.

हे नैसर्गिक माऊथ फ्रेशनर्स आहेत. पुदिना आणि तुळशीच्या वासामुळे तोंडाला येणारे इतर वास नाहीसे होतात.

म्हणून जेव्हा आपल्याला वाटते की आपल्या तोंडाला वास येत आहे तेव्हा पटकन चार तुळशीची किंवा पुदिन्याची पाने खाल्ली तर लगेच फरक पडतो.

बडीशेपेचा सुद्धा याप्रकारे वापर केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त बाजारात मिळणाऱ्या मिंट आणि मेंथॉल युक्त माऊथ फ्रेशनर्सचा सुद्धा आपण वापर करू शकतो.

8. दातांची आणि हिरड्यांची स्वच्छता ठेवा

या सगळ्याचे मूळ मात्र दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य आहे. त्यामुळे दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

त्यासाठी रोज दोन वेळा दात घासणे, त्याबरोबर जीभ स्वच्छ करणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे आणि बोटांनी हिरड्यांना मसाज करणे यासारख्या गोष्टी करून आपण ओरल हायजिन ठेवले पाहिजे.

हे उपाय नियमितपणे केले तर तोंडाच्या दुर्गंधी चा त्रास, कमी होऊ नक्कीच पूर्णपणे संपेल.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय