मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत? मग आधी स्वतःमध्ये हे बदल करा.

एकदा का मूल झाले की आईबाबांचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते असे म्हणतात. आणि हे खरेच आहे.

मुले झाली की आईबाबांचे जग त्यांच्याभोवतीच फिरत असते.

त्यांना मुलांसाठी आपल्या कितीतरी गोष्टी सोडून द्यावा लागतात.

“तुमचा मुलगा/मुलगी किती शहाण्यासारखे वागतात.” ही कॉम्प्लिमेंट आईवडिलांना मिळाली की त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.

एखादे मूल चांगले निघाले की लोक आधी त्या मुलाचे कौतुक करतात आणि एखादे मूल वाईट निघाले की आधी आईबाबांना दोष देतात.

खरेतर मुलांना चांगले आणि वाईट करण्यामागे हात आईवडिलांचाच असतो.

मुलांना आईबाबा घडवतील तसे ते घडतात.

याबद्दल बरेच लोकांचं दुमत असेल. तर एक साधं उदाहरण आहे, की ज्या घरात अर्वाच्य शिव्या दिल्या जात नाहीत. तिथली मुलं अशा शिव्या देण्याचा विचारही करत नाहीत.

आईबाबा म्हणून आपली पहिली जबाबदारी म्हणजे मुलांना उत्तम आरोग्य, शिक्षण, सुखसुविधा आणि त्याचबरोबर उत्तम संस्कार देऊन चांगल्या सवयी लावणे हेच आहे, हो ना?

मुलांसाठी आई बाबा हे पहिले गुरु असतात.

आई बाबांच्या वागण्या-बोलण्याकडे त्यांचे बारीक लक्ष असते.

आणि ते आईबाबांचेच अनुकरण करत असतात.

थोडक्यात, आईबाबा मुलांसाठी आदर्श असतात आणि म्हणूनच मुलांना चांगल्या सवयी लागून हव्या असतील, तर आईबाबांना सुद्धा काही जुन्या वाईट सवयी सोडाव्या लागतात आणि काही नवीन चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात.

अशा नेमक्या कोणत्या सवयी आहेत ज्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो, त्याबद्दल खरेतर प्रत्येक पालक हा जागरूक असतोच.

आईबाबा झाल्यावर कोणत्या गोष्टी मुलांसमोर करायच्या याची समज सगळ्या पालकांना असते आणि तसे बदल ते करत असतातच.

काही गोष्टी मात्र नकळतपणे राहून जातात.

याच बरोबर, याच्याच अजून एक महत्वाची गोष्ट आहे.

ती म्हणजे अशा कोणत्या गोष्टी मुलांसमोर आवर्जून केल्या पाहिजेत ज्या बघून त्यांच्यावर चांगले संस्कार होतील.

आणि त्यांना चांगल्या सवयी लागतील.

आज या लेखातून आम्ही नेमक्या याच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात असे वाटते ना?

मग त्याआधी तुम्ही कोणत्या सवयी स्वतःला लावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते वाचा.

१) आपल्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवा

रोज संध्याकाळी मुलांना देवासमोर बसून प्रार्थना कर असे सांगण्यापेक्षा आपणच देवासमोर बसून हात जोडले तर मुलांना काहीही न शिकवता आपोआप ही सवय लागते.

या प्रार्थनेबरोबरच जर आपण दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवून एकमेकांना सांगितल्या तर ती सुद्धा सवय मुलांना लागते.

संध्याकाळी एकत्र बसून याबद्दल बोलले जाणारच आहे हे त्यांना माहीत असते म्हणून दिवसभरात त्यांचे लक्ष चांगल्या गोष्टींकडेच जाते.

जर काही वाईट घडले किंवा त्यांच्या मनाविरुद्ध घडले तर त्याकडे दुर्लक्ष करायला ते आपोआप शिकतात.

यामुळे आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यात अगदी लहानपणीच निर्माण होतो.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना त्यांच्याकडे काय नाहीये यापेक्षा काय आहे याची जाणीव होणे.

यासाठी जेवायच्या आधी पानात असलेल्या अन्नासाठी मनोमन आभार मानणे असुदे किंवा रात्री झोपताना आपल्यावर असलेल्या छपराबद्दल कृतद्न्यता व्यक्त करणे असुदे.

आता या गोष्टी अगदी शब्दशः रोज केल्या, बोलल्या पाहीजेत असा याचा अर्थ नाही, पण कृतिज्ञतेची भावना, आधी आई-बाबांमध्ये असली पाहिजे.

आपल्याकडे या गोष्टी आहेत याची मुलांना जाणीव मुलांना राहील यासाठी हे बदल आधी स्वतः मध्ये केले पाहिजेत.

2. मुलांना समानता शिकवा

मुलांची वेगळी कामे, मुलींची वेगळी कामे असे काही नसते हे मुलांना योग्य वेळी समजावले पाहिजे.

हे समजवायला काही त्यांना आपल्या समोर बसून, बोलून त्यांना काही सांगून उपयोग नसतो तर त्यांना ते आपल्या कृतीतून समजले पाहिजे.

सगळी कामे मुलांना आणि मुलींना आलीच पाहिजेत आणि येत नसतील तर त्यांनी ती शिकून घ्यायला हवीत.

व न लाजता करायला हवीत हे मुलांना शिकवण्याचा एक सोपा मार्ग आहे. कोणता?

तर घरात आईने करायची अमुक कामे आणि बाबांनी करायची अमुक कामे असे वर्गीकरण न ठेवणे.

मुलांनी जर लहानपणापासून आईबाबांना आलटून पालटून कधी घरातली तर कधी बाहेरची कामे करताना बघितले तर त्यांना स्वतःला कोणतेच काम करायला लाज वाटणार नाही.

याहीपेक्षा पुढे जाऊन, आईबाबांनी मुलं लहान असतानाच त्यांना त्यांच्या वयानुसार घरच्या आणि बाहेरच्या कामांची त्यांना झेपेल इतकी जबाबदारी दिली पाहिजे.

मात्र एकदा जबाबदारी दिली की ते काम पूर्णपणे त्यांच्यावर सोपवायला हवे. त्यात त्यांना सूचना, सल्ले देऊन ढवळाढवळ करू नये.

कदाचित त्यांच्याकडून ते काम आपल्याला हवे तसे होणार नाही, काही चुका होतील.. पण त्या होऊ द्याव्यात कारण आपण सांगून शिकवण्यापेक्षा स्वतः केलेल्या चुकांमधून मुलं जास्त चांगल्या पद्धतीने शिकतात.

3. सगळ्यांना आदर द्या

आपल्या नकळत सुद्धा मुले आपल्याला बघत असतात, आपण कसे वागतो, कसे बोलतो हे टिपत असतात.

म्हणूनच आपण प्रत्येक माणसाला आदर दिला पाहिजे.

म्हणजे मुलांना ती सवय आपोआप लागेल. आपण भाजीवाले, हॉटेलचे वेटर यांच्याशी बोलताना आवर्जून थँक यु आणि प्लिजचा वापर केला पाहिजे.

आपण भांडताना किंवा रागावल्यावर ज्या पद्धतीने बोलतो, जे शब्द वापरतो त्यावर सुद्धा मुलांचे लक्ष असते म्हणून, त्यांच्यासमोर शक्यतो छोट्या कारणासाठी भांडू नयेच.

पण जर कधी तशी वेळ आलीच तर तिला तोंड देणं सुद्धा आपल्या कृतीतून दाखवून देणं गरजेचं, कारण संस्कार शकवताना दुनियादारी शिकवायची राहून गेली असं होता कामा नये…

आईवडिलांनीही एकमेकांशी आदराने बोलले पाहिजे, वादावादी झाली तरी बोलण्यात शब्द इकडचे तिकडे व्हायला नकोत.

यामुळे आपण दुसऱ्यांना आदर दिला तर आपल्यालाही मिळतो ही शिकवण मुलांना अगदी लहान वयातच मिळते.

4. दुसऱ्यांना नेहमी मदत करा

आपण स्वतःहून इतरांसाठी काय करतोय?

आपल्या रोजच्या जगण्यात आपण दुसऱ्यासाठी किती करतोय याची नोंद सुद्धा मुले ठेवत असतात.

सगळ्यांना काय हवे नको ते बघणाऱ्या, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणाऱ्या पालकांच्या मुलांचा स्वभाव सुद्धा तसाच होतो.

मदत ही काही कोणी मागितल्यावरच करायची गोष्ट नाही, आपण आपल्या मनाने सुद्धा दुसऱ्याची गरज ओळखून मदतीचा हात पुढे करू शकतो.

अशी जाणीव आपल्या वागण्यातूनच मुलांना दिली पाहिजे.

दुसऱ्यांना मदत करण्यासाठी मुलांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांना सुद्धा तुम्ही करत असलेल्या मदतीमध्ये सहभागी करून घेतले तर फायदा होतो.

मुलांच्या वाढदिवसाला किंवा दिवाळीला त्यांना घेऊन वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात घेऊन जाऊन तिथे काही पैशांची मदत करण्यापेक्षा तिथल्या मुलांबरोबर खेळून, आजीआजोबांबरोबर वेळ घालवून आपण त्यांच्या मनात मदतीची वेगळी व्याख्या रुजवू शकतो.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आहेत ना या चार सोप्या गोष्टी ज्या आपण सहज करू शकतो?

आपली मुले शिक्षणाच्या जोरावर, स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जातीलच त्यासाठी त्यांना लागेल ती मदत आपण त्यांना करूच,

पण त्यांची जी सुरुवातीची काही वर्षे असतात, त्यात त्यांना ही मूल्ये समजवावी लागतात..

आणि ही अशी मूल्ये आहेत जी सांगून किंवा शिकवून फायदा नसतो.

यासाठी मुलांसमोर तसे वागले पाहिजे म्हणजे त्यांना काही शिकवण्याची गरजच पडणार नाही..

आपल्याकडे बघून ती आपोआप शिकतील..

मुले आयुष्यात यशस्वी झाल्यावर आनंद होतोच, पण आपली मुले जर आयुष्यात एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखली जाणार असतील तर त्याहून दुसरी आनंदाची गोष्ट काय असेल, हो ना?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत? मग आधी स्वतःमध्ये हे बदल करा.”

  1. आपण दिलेली माहिती आयुष्य जगण्यासाठी खूप काही सांगून जाते मी माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा खूप उपयोग करून घेणार आहे तसेच

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय