ऑस्टिओपोरोसिसवरचे १० घरगुती उपाय वाचा या लेखात

जसेजसे वय वाढत जाते तशी शरीरातली हाडे कमकुवत होत जातात.

ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडे इतकी कमकुवत होतात की अगदी लहानातल्या लहान धक्याने सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतात.

खरेतर यासाठी वय हे काही एकमेव कारण नाही.

ऑस्टिओपोरोसिस नक्की कशामुळे होऊ शकते आणि कसे होते, कोणाला त्याचा धोका अधिक असतो आणि त्यावर घरगुती उपाय काय करता येतात हेच या लेखातून आज आम्ही सविस्तर सांगणार आहोत.

हाडे म्हणजे खरेतर आपल्या शरीरातील एक महत्वाचा टिश्यू.

यातल्या अनेक पेशी सतत रिप्लेनिश होत असतात, म्हणजे जुन्या पेशी जाऊन नवीन पेशी तयार होत असतात.

तरुण वयात जुन्या पेशी जायचे आणि नवीन पेशी तयार होण्याचे प्रमाण सारखेच असते.

म्हणजे थोडक्यात ज्या वेगाने जुन्या पेशी जातात त्याच वेगाने नवीन पेशी तयार होतात.

पण वाढत्या वयानुसार किंवा काही आजारांचा, जीवनशैलीचा परिणाम होऊन आपल्या शरीराची या हाडाच्या नवीन पेशी तयार करण्याची क्षमता खालावत जाते.

आणि हळूहळू ज्या प्रमाणात जुन्या पेशी जातात त्या प्रमाणात नवीन तयार होत नाहीत.

याचा परिणाम हाडाच्या आरोग्यावर होतो आणि पुरेशा निरोगी पेशी (बोन सेल्स) नसल्याने हाडे कमकुवत होत, ठिसूळ होऊन जातात.

याच स्थितीला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात.

ऑस्टिओपोरोसिसचा सुरुवातीच्या काळात फारसा त्रास होत नाही, पण दिवसेंदिवस हाडे जास्त ठिसूळ होत जातात त्यामुळे पाठ, पाय दुखणे, सतत फ्रॅक्चर होत राहणे यासारखे त्रास उत्भवतात.

आपण वर बघितलेच की वाढत्या वयाबरोबर ऑस्टिओपोरोसिसचा धोका जास्त असतो पण याव्यतिरिक्त सुद्धा काही लोकांना याचा धोका असतो.

जसे की मेनोपॉज नंतर स्त्रियांना, ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे अशांना, ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे (शरीरात थायरॉईडचे प्रमाण जास्त आहे), कॅन्सर आणि अर्थ्राइटिसच्या पेशंट्सना, ज्यांचे वजन खूप कमी आहे किंवा ज्यांना कॅल्शिअमची कमतरता आहे अशांना.

ऑस्टिओपोरोसिस काही औषधांच्या साईड इफेक्टने सुद्धा होऊ शकतो, जसे की स्टिरॉइड.

व्यायाम न करणे, एका जागी बसून काम करणे, दारू आणि तंबाखूचा अतिरेक ही सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होण्यामागची कारणे आहेत.

मित्रांनो, ऑस्टिओपोरोसिसवर वेळीच उपचार न घेतल्याने फार गुंतागुंतीची समस्या उभवू शकते.

कमरेच्या हाडाची किंवा मज्जारज्जूचे फ्रॅक्चरचा धोका सगळ्यात जास्त असतो.

त्यामुळे याच्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

एकदा ऑस्टिओपोरोसिसचा त्रास सुरु झाला की तो पूर्णपणे बरा होत नाही.

पण आपण औषधांनी आणि काही घरगुती उपायांनी त्याला आटोक्यात मात्र ठेऊ शकतो.

वैद्यकीय उपचारांबरोबरच ऑस्टिओपोरोसिसवर उपयुक्त अनेक घरगुती उपाय सुद्धा आहेत, ते कोणते ते आपण बघूया.

१. कॅल्शिअम

कॅल्शिअम हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले महत्वाचे खनिज आहे.

आहारात कॅल्शिअमचे प्रमाण वाढवले तर हाडांचे आरोग्य सुधारते.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून कॅल्शिअम खूप जास्त प्रमाणात मिळते.

म्हणूनच आहारात लो फॅट दुधाचा समावेश केला पाहिजे.

फुलकोबी, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या यामध्ये सुद्धा कॅल्शिअम जास्त प्रमाणात आढळतात.

२. व्हिटॅमिन ‘डी’

आहारात घेतलेले कॅल्शिअम रक्तात मिसळले जाण्यासाठी व्हिटॅमिन ‘डी’ची गरज असते.

त्यामुळे नुसते आहारातले कॅल्शिअमचे प्रमाण वाढवून फारसा उपयोग नसतो, त्या बरोबर व्हिटॅमिन ‘डी’चे प्रमाण सुद्धा वाढवावे लागते.

कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन ‘डी’ जास्त प्रमाणात मिळतात, पण केवळ त्याच माध्यमावर अवलंबुन न राहता आपल्या डॉक्टरांशी बोलून व्हिटॅमिन ‘डी’ सप्लिमेंट सुरु करणे हा उत्तम पर्याय आहे.

३. वजनावर लक्ष ठेवा

उंचीच्या मानाने वजन कमी असल्यास शरीरातील बोनमास म्हणजेच हाडांचे वजन कमी असते. यामुळे हाडे ठिसूळ होत जातात आणि ऑस्टिओपोरोसिसचा त्रास वाढतो.

म्हणूनच कमी वजन असेल तर आहारात बदल करून ते उंचीप्रमाणे जितके हवे तितके केले पाहिजे.

४. व्यायाम

नियमितपणे व्यायामाचे अनेक फायदे असतात. व्यायामामुळे हाडांचे एकंदरीत आरोग्य सुधारते आणि हाडांच्या पेशी नष्ट होण्याचे प्रमाण कमी होते.

तरुणपणीच व्यायामाची सुरुवात करणे श्रेयस्कर आहे पण ऑस्टिओपोरोसिसचा त्रास कमी करण्याच्या हेतूने कुठल्याही वयात व्यायामाचा फायदाच होतो.

चालणे, धावणे, ऐरोबिक्स या व्यायाम प्रकारांचा हाडे मजबूत करण्यासाठी फायदा होतो

५. योगासने

ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडे ठिसूळ होतात, पण त्याचा सगळ्यात जास्त धोका कधी असतो?

या स्थितीत जर पेशन्ट पडला, तर हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते.

बॅलन्सिंग सुधारण्यासाठी काही आसने असतात.

या प्रकारची योगासने केली तर आपली तोल सांभाळायची क्षमता वाढते आणि तोल जाऊन खाली पडण्याचा धोका कमी होतो.

६. सिगारेट, तंबाखू टाळणे

तंबाखू न खाणाऱ्या लोकांची बोन-मिनरल डेन्सिटी तंबाखू खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते. म्हणजेच तंबाखूच्या अतिसेवनाने हाडे ठिसूळ होतात आणि म्हणून फ्रॅक्चर व्हायचा धोका जास्त असतो.

७. फॉसफरस रीच डायट टाळावे

व्हिटॅमिन ‘डी’ प्रमाणेच रक्तात कॅल्शिअम मिसळण्यासाठी फॉसफरसची गरज असते पण आपल्या शरीरात कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी आणि फॉसफरसचा समतोल असणे गरजेचे आहे.

या पैकी फॉसफरस जर वाढले तर त्याचा उलट परिणाम होऊन हाडांमधून कॅल्शिअम बाहेर काढले जाते आणि हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते.

त्यासाठी फॉसफरसचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळायला हवेत.

बिअर, कोल्डड्रिंक्स, मटण (रेड मीट) यामध्ये फॉसफरस जास्त प्रमाणात आढळतात.

८. व्हिटॅमिन ‘सी’

अन्नातून घेतलेले कॅल्शिअम रक्तात मिसळण्यासाठी व्हिटॅमिन ‘सी’ सुद्धा गरजेचे असते.

लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा या सारख्या फळांमधे सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात आढळतात. म्हणून ही फळं नियमितपणे खाल्ली पाहिजेत.

९. कॅफिनचे प्रमाण कमी करावे

ज्याप्रमाणे काही पदार्थ अन्नातून घेतलेले कॅल्शिअम रक्तात मिसळण्यासाठी उपयुक्त असतात त्याच प्रमाणे काही पदार्थांमुळे हे कॅल्शिअम ऍबसॉर्पशन कमी होते.

कॅफिन हा असा एक पदार्थ आहे. ओस्टिओपोरोसिसच्या पेशन्ट्सनी जास्त प्रमाणात कॅफिन घेणे टाळावे.

कॉफी, सोडा, कोल्डड्रिंक, एनर्जी ड्रिंक यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते.

१०. अल्कोहोल टाळावे

दारूच्या अति प्रमाणात सेवनाने हाडांची झीज लवकर होते. म्हणून हाडांचे आरोग्य सुधारायचे असेल तर दारू शक्यतो टाळलेलीच चांगली.

मित्रांनो, हे उपाय वाचून तुमच्या लक्षात आलेच असेल की हे आचरणात आणायला अतिशय सोपे आहेत आणि याचा काही अपाय सुद्धा नाही.

आहारात आणि जीवनशैलीत हे बदल केले तर ऑस्टिओपोरोसिसचा त्रास नक्की कमी होईल.

तुमच्या माहितीत आहे का असे कोणी ज्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे?

मग हा लेख लवकर त्यांच्याबरोबर शेयर करा म्हणजे त्यांना सुद्धा हे सोपे घरगुती उपाय करून बघता येतील.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “ऑस्टिओपोरोसिसवरचे १० घरगुती उपाय वाचा या लेखात”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय