बहुगुणी ओट्सचे आरोग्यासाठी फायदे

ओट हे अतिशय पौष्टिक धान्य आहे. अलीकडे आपण ओट्स विषयी बऱ्याच ठिकाणी वाचतो.

ओट्स खाल्ले पाहिजेत, त्याने वजन कमी होते, डायबेटीस नियंत्रणात राहतो.. आणि असे काय काय..

ओट हे खरेतर होल ग्रेन, म्हणजेच धान्यच आहे.

हे धान्य शिजायला खूप वेळ लागतो.

म्हणून इन्स्टंट ओट्स हे त्याचे processed version सगळ्यात लोकप्रिय झाले.

हे इन्स्टंट ओट्स जास्त करून नाश्त्याला खाल्ले जातात. अनेक लोक ओट्स खाण्याबाबत प्रचंड आग्रही असतात.

बऱ्याच डायट प्लॅन्समध्ये पण ओट्सचा समावेश असतो.

इतकेच नाही तर काही घरांमध्ये गव्हाच्या पिठात ओट्सचं पीठ मिसळून वापरतात.

पाश्चात्य देशांमध्ये ओटमील कूकीज, केक्स लोकप्रिय आहेत.

या ओट्सबद्दल सगळे इतके आग्रही का असतात? असे नेमके काय मिळते ओट्स मधून जे इतर धान्यातून मिळत नाही?

ओट्स खाण्याचे ९ फायदे

१.अत्यंत पौष्टिक

ओट्स मध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर दोन्ही जास्त प्रमाणात आढळतात.

इतर कोणत्याही धान्यापेक्षा ओट्समध्ये प्रोटीन आणि फॅट जास्त प्रमाणात आढळतात.

ओट्स मध्ये मँगनीज, फॉसफरस, आयर्न, कॉपर, झिंक ही खनिजे जास्त प्रमाणात आढळतात.

फॉसफरस हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते तर झिंकमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.

आयर्न हे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास उपयुक्त आहे तर बाकी खनिजे ही आपल्या लिव्हर, किडनी या अवयवांसाठी गरजेची आहेत.

तसेच ओट्स मध्ये व्हिटॅमिन बी १, बी ५ आणि फोलेट सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात.

ओट्स मध्ये व्हिटॅमिन बी ६, बी ३, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम हे जरा कमी प्रमाणात असतात.

२. महत्वाचे असे बीपी नियंत्रणात ठेवणारे अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असते

Avananthramide हे अँटिऑक्सिडंट फक्त ओट्समधेच जास्त प्रमाणात आढळते. हे अँटिऑक्सिडंट आपले बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

या अँटिऑक्सिडंटमुळे आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साईड या गॅसचे उत्पादन अधिक प्रमाणात होते.

या गॅसमुळे रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढते आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होते.

ओट्समधे फेल्युरिक ऍसिड हे अँटिऑक्सिडंट सुद्धा जास्त प्रमाणात आढळते.

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी हे अँटिऑक्सिडंट फार महत्वाचे आहे.

३. फायबर जास्त प्रमाणात आढळतात

ओट्स मध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळतातच, पण त्यात सुद्धा बीटा-ग्लुकन हे फायबर जास्त प्रमाणात असते.

या फायबरमुळे आपल्या आतड्यातल्या लॅक्टोबॅसिलसची वाढ होते.

ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आणि अपचनाच्या तक्रारी दूर होतात.

फायबरमुळे पोट सुद्धा लवकर भरते ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

म्हणून वजन कमी करायला ओट्स उपयुक्त आहेत.

बीटा-ग्लुकन या फायबरचे काही अधिक फायदे असे आहेत की त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होते आणि त्याचबरोबर ते मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

४. हृदयविकाराचा धोका कमी करते

ओट्स मधले बीटा-ग्लुकन फायबर हे आपल्या शरीरातील LDL कोलेस्टेरॉल कमी करते.

कोलेस्टेरॉल आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठून ह्रदयाचा रक्त प्रवाह खंडित करते ज्यामुळे वाढलेले बीपी आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्या उत्भवतात.

कोलेस्टेरॉल कमी झाल्यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

५. मधुमेह नियंत्रणात ठेवते

ओट्समधील बीटा-ग्लुकन या फायबरचे पोटात गेल्यावर चिकट जेलसारख्या पदार्थामध्ये रूपांतर होते.

या जेलमुळे पोट लवकर भरते आणि ते भरल्याची भावना जास्त काळ टिकून राहते.

यामुळे वजन कमी करायला सुद्धा फायदा होतो आणि रक्तातली साखर सुद्धा कमी होते.

६. बाळदमा कमी करते

बाळदमा, हा लहान मुलांचा किंवा बाळांना होणार एक आजार आहे.

यामध्ये बाळांच्या वायूनलिकेला सूज येते आणि श्वसनाचे त्रास होतात.

खोकला, घोगरा आवाज, श्वास घ्यायला त्रास यासारखी लक्षणे यात आढळतात.

बाळांना बाहेरचे अन्न द्यायला सुरुवात करताना जर ओट्स दिले तर त्याचा त्यांना फायदा होतो आणि बाळदमा व्हायची शक्यता खूप पटीने कमी होते.

७. कॉन्स्टिपेशन कमी करते

ओटच्या बाहेरच्या टरफलामध्ये जे ओट ब्रॅन असते ते पचनक्रिया सुधारते.

यामुळे कॉन्स्टिपेशनची तक्रार असेल तर ती दूर होते. खासकरून ज्या वयस्कर लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यांना ओट्सचा फायदा होऊ शकतो.

८. ग्लूटेन फ्री

कणिक किंवा मैदा मळताना जो चिकट पदार्थ तयार होतो त्याला ग्लूटेन म्हणतात.

या ग्लुटेनची काही लोकांना ऍलर्जी असते आणि यामुळे त्यांना अपचनासारखे त्रास होतात.

नैसर्गिक ओट्स हे ग्लूटेन फ्री असतात पण काही वेळा त्यात ग्लूटेन वरून घातले जाते. म्हणून ओट्स विकत घेताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

९. कॅन्सरचा धोका कमी करते

लिगनन या ओट्समध्ये असलेल्या द्रव्यामुळे ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि ओव्हरीच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

म्हणूनच स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा ओट्स खाणे फायदेशीर असते.

१०. रोगप्रतिकार शक्ती वाढवते

रक्तातल्या पांढऱ्या पेशी आपले बॅक्टरीयापासून संरक्षण करून रोग होण्यापासून आपला बचाव करत असतात.

ओट्स मध्ये असलेल्या बीटा ग्लुकनमुळे या पांढऱ्या पेशींची कार्यक्षमता वाढवते जेणेकरून ते इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी वेगाने पोहोचते आणि इन्फेक्शन करण्याची क्षमता असलेल्या बॅक्टरीयाला मारून टाकते.

म्हणूनच ओट्समुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि आपण वारंवार आजारी पडत नाही.

मित्रांनो, या बहुगुणी ओट्सचे आपण फायदे बघितले. वजन कमी करण्यापासून ते बाळदमा कमी करण्यापर्यंत याचे फायदे आहेत.

म्हणजेच याचा अजून एक मोठा फायदा असा आहे की हे अगदी लहान बाळापासून ते घरातल्या सगळ्यात जेष्ठ व्यक्तीपर्यंत, सगळ्यांना खाल्लेले चांगले असते.

म्हणजे घरी ओट्स केले की तो सगळ्यांसाठीच एक पौष्टिक आहार होतो.

सकाळी नाश्त्याला करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे कारण यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स (खनिजे) सगळेच योग्य प्रमाणात आढळते.

म्हणूनच स्वयंपाकात ओट्सचा नियमित वापर जेणेकरून घरातल्या सगळ्यांचेच आरोग्य सुधारायला मदत होईल.

ओट्स तयार करायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ते पाण्यात किंवा दुधात शिजवून खायचे.

पण बऱ्याचदा हे खायला काहीसं कंटाळवाणं होते. विशेषतः मुले ओट्स खायला कंटाळा करतात.

पण त्यांच्या पोटात हे धान्य जावे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे म्हणूनच ओट्सचा पौष्टिक उपमा, खिचडी असे अनेक पर्याय निघाले.

तुम्ही ओट्स वापरत नसाल तर हा लेख वाचून नक्की वापरायला लागाल आणि आधीच वापरत असाल तर तो कुठल्या पद्धतीने वापरता, त्याचे कोणते पदार्थ करता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.

हा लेख मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर शेयर करून झाला की आम्हाला कॉमेंटमध्ये तुमची खास रेसिपी नक्की कळवा!

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय