रक्तातील पेशींना ऑक्सिजन पुरवणारी हि भाजी, तुम्ही खाल्लीच पाहिजे

बऱ्याच जणांना पालेभाज्या आवडत नाहीत. पण आपण सगळीकडे वाचतो, ऐकतो की हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

लहानपणी घरी सुद्धा आईने आपल्याला या भाज्या खाण्याची बळजबरी केली असेलच.

अशीच एक हिरवी पालेभाजी- पालक जिच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.

आपल्या एकंदरीत आरोग्यासाठीच भाज्या महत्वाच्या असतात, त्यातून आपल्याला फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतात.

पण काही भाज्या आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात.

पालक ही अशीच एक महत्वाची भाजी ज्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत.

निरोगी आयुष्यासाठी आहारात पालक या पालेभाजीचा नियमितपणे वापर करणे फार महत्वाचे आहे.

आपल्या स्वयंपाक घरात नियमितपणे वापरलं पाहिजे अशा आणखी एका औषधाची ओळख आज या लेखात आपण करून घेणार आहोत.

पालकात नेमकी कोणती पोषणद्रवे आहेत आणि त्या पोषणद्रवांचा आपल्या कोणत्या अवयवाला फायदा आहे, किंवा ती पोषणद्रवे आपले कोणत्या आजारापासून रक्षण करतात हे आज आपण बघणार आहोत.

१. हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

पालक मध्ये व्हिटॅमिन ‘के’ भरपूर प्रमाणात आढळतात.

व्हिटॅमिन ‘के’ हे ऑस्टिओकॅल्क नावाच्या प्रोटीनचे उत्पादन करण्यासाठी उपयुक्त असते.

हे प्रोटीन आपल्या हाडातल्या कॅल्शिअमसाठी फायदेशीर असते.

पालक मध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन ‘डी’, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन ‘सी’ सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्याचा हाडांच्या आरोग्यासाठी फायदा होतो.

२. डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

पालकाच्या भाजीत बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात आढळतात.

बीटा-कॅरोटीनचे शरीरात गेल्यावर व्हिटॅमिन ‘ए’ मध्ये रूपांतर होते.

व्हिटॅमिन ‘ए’ हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

यामुळे रातांधळेपणाचा धोका सुद्धा कमी होतो.

पालक भाजीत जास्त प्रमाणात आढळणाऱ्या व्हिटॅमिन ‘सी’ मुळे डोळ्यांचे विकार कमी होतात.

३. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक

पालेभाज्या खाल्ल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि केसांच्या तक्रारी सुद्धा दूर होतात.

पालकाचा हा सुद्धा, एक महत्वाचा फायदा आहे.

यामागे कारण आहे ते त्यात असलेलं व्हिटॅमिन ‘ए’.

व्हिटॅमिन ‘ए’ मुळे आपल्या त्वचेवर एक थर तयार ज्यामुळे बॅक्टरीया आणि व्हायरसेसना त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करणे जमत नाही.

व्हिटॅमिन ‘ए’ मुळे आपल्या शरीरात ‘सिबम’ या पदार्थाचं उत्पादन होतं.

या सिबममुळे त्वचेला आणि केसांना नैसर्गिक मॉइसचरायझर मिळते आणि इन्फेक्शन्सना दूर करते.

पालक मध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या व्हिटॅमिन ‘सी’ मुळे त्वचेला वयोमानानुसार पडणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते.

४. ह्रदयविकारांना दूर ठेवण्यास उपयुक्त

रक्त वाहिन्या वयोमाना परत्वे कडक आणि जाडसर होतात.

त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी होते.

हे ह्रदविकार होण्यामागचे फार महत्वाचे कारण आहे.

पालक भाजीत असणारे ‘ल्युटीन’ हे द्रव रक्तवाहिन्यांची लवचिकता शाबूत ठेवण्यास फायदेशीर असते.

म्हणूनच पालकाच्या नियमित सेवनाने ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

पालक च्या भाजीत जास्त प्रमाणात आढळणाऱ्या नायट्राइटमुळे सुद्धा ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

५. ऊर्जेचा चांगला स्रोत

पालक च्या भाजीत मॅग्नेशियम हे खनिज जास्त प्रमाणात आढळते.

मॅग्नेशियम हे आपल्या शरीरात अन्नाचे पचन होऊन ऊर्जा तयार होण्याच्या क्रियेत मदत करते.

पालक मध्ये फोलेट सुद्धा जास्त प्रमाणात असते ज्याचा ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयोग होतो.

म्हणूनच थकवा जाणवत असेल किंवा जास्त शारीरिक काम असेल तर पालक नियमितपणे खाल्ल्याने फायदा होतो.

६. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त

आपल्या तांबड्या रक्त पेशी हिमोग्लोबिन द्वारा शरीरातील सगळ्या पेशींना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवण्याचे काम करत असतात.

हिमोग्लोबिनच्या कमरतेमुळे ऍनेमिया सारखे आजार होतात.

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आयर्न या खनिजाचा आणि फॉलीक ऍसिड या व्हिटॅमिनचा उपयोग होतो.

पालक च्या भाजीत हे दोन्ही भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालक अतिशय उपयुक्त आहे.

खासकरून लहान, वाढत्या वयातील मुले व गर्भवती महिला यांना फॉलीक ऍसिड जास्त प्रमाणात लागते त्यामुळे त्यांना पालक ची भाजी नियमितपणे खाल्ल्याने फायदा होतो.

७. कॅन्सरपासून बचाव

शरीरातल्या पेशींची प्रमाणाबाहेर वाढ झाली की कॅन्सर होतो.

पालक भाजीमध्ये असलेल्या SQDG आणि MGDG या कम्पाऊंड्समुळे कॅन्सरची वाढ कमी होते.

ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ओव्हरीअन कॅन्सर या कॅन्सरची वाढ कमी करण्यासाठी पालक फायदेशीर असतो.

८. वजन कमी करण्यासाठी उपयोग

पालक च्या भाजी मध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त.

फायबरमुळे आपली भूक लवकर भागते आणि पोट भरल्याची भावना सुद्धा जास्त वेळ राहते.

फायबरचा आणखी एक फायदा म्हणजे त्यामुळे आपल्या आतड्यातल्या गुड बॅक्टरीयाची, म्हणजेच लॅक्टोबॅसिलस जे की पचनक्रियेत साहाय्य करतात, संख्या वाढते.

यामुळे आपली पचनशक्ती सुधारते.

हा लेख वाचल्यावर पालक च्या भाजीचे महत्व तुम्हाला नक्कीच पटले असेल.

आपल्या आहारात पालक वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो, भाजी, पराठे, सूप, पकोडे हे त्यातले काही प्रकार.

हे तुम्ही नक्की करत असलाच आणि हा लेख वाचून तर आवर्जून कराल पण कधीकधी हे करूनही घरातील लहान मुले या भाज्या खायला तयार नसतात..

त्यांच्यासाठी नवनवीन रेसिपी तर शोधून काढाव्याच लागतात पण डोके चालून काही युक्त्या सुद्धा शोधून काढाव्या लागतात..

आज अशीच एक युक्ती म्हणजे ९०च्या दशकातील अतिशय लाडके कार्टून, Popeye the sailor man!

हे कार्टून मुलांना दाखवले तर ती अगदी आवडीने पालकाचे सगळे पदार्थ खातील!

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय