जाणून घ्या मानसशास्त्राबद्दल १२ रोचक गोष्टी!

मानसशास्त्राबद्दल १२ रोचक गोष्टी

आपण एखाद्या प्रसंगात असे का वागतो?

असे का होते? काही गाणी ऐकली की आपल्याला काही ठिकाणे आठवतात किंवा काही गाण्यांमुळे काही माणसे आठवतात..

एखाद्या वासामुळे जुन्या आठवणी चाळवल्या जातात..

थोडक्यात आपल्या मनात कधी काय येईल हे आपल्याला सांगता येणे अवघडच.

तसेच कोणत्या गोष्टीचा काय परिणाम होऊन आपले मन कोणत्या दिशेला धावेल त्याचा सुद्धा आपल्याला थांगपत्ता नसतो.

हे सगळे मनाचे खेळ असतात..

पण ते तेवढ्यापुरतंच नाही बरका, या सगळ्यामागे मानसशास्त्र आहे!

आपल्या वागण्याबोलण्याला जसा आपला स्वतःचा स्वभाव जबाबदार असतो तितक्याच या काही गोष्टी सुद्धा जबाबदार असतात.

म्हणूनच दोन भिन्न स्वभावाची माणसे कधीकधी एकसारख्या परिस्थितीमध्ये सापडली तर एकसारखीच वागतात.

या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे जगाच्या दोन टोकांवरची दोन माणसे एकसारखी वागू शकतात?

चला तर मग जाणून घेऊ अशा १२ गोष्टी, ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रुथ म्हणू शकू..

म्हणजे ज्या गोष्टी जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही दोन माणसांच्या बाबतीत, कितीही वेगवेगळ्या स्वभावाचे असले तरी अगदी सेम टू सेम असतात!

१. जे प्रत्यक्ष किंवा फोनवर बोलायला कठीण जाते ते मेसेजवर अगदी सहज बोलता येते

मेसेज करून बोलताना समोरच्याला आपले हावभाव दिसण्याची शक्यता नसते.

त्यामुळे एखादी अवघड गोष्ट बोलायला मेसेज हा उत्तम पर्याय आहे.

काही गोष्टी अशा असतात की ज्या समोरासमोर बोलताना आपल्याला भावनांचा आवेश आवरता येत नाही, मग तो आनंद, दुःख, राग काहीही असुदे.

कधीकधी काही गोष्टींबद्दल चर्चा करणे करताना अवघडल्यासारखे होते, काही गोष्टी मोकळेपणाने बोलता येत नाहीत.

अशा वेळी मेसेजवर सहज बोलता येते आणि बरेच लोक तोच पर्याय स्वीकारतात.

२. स्वतःसाठी खर्च करण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी खर्च केला तर जास्त समाधान मिळते.

समजा तुम्ही कुठे ट्रिपला गेलात आणि तिथल्या लोकल बाजारात फिरण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला तर सगळ्यात आधी तुमच्या मनात काय येते?

कोणासाठी काय काय घ्यायचे! मग ती कितीही साधी वस्तू असुदे किंवा कितीही स्वस्त..

आपल्यासाठी काय घ्यायचे पेक्षा दुसऱ्यांना काय द्यायचे हा विचार आपल्या मनात आधी येतो.

हीच गोष्ट आपला पहिला पगार झाल्यावर सुद्धा होते.

आपल्या जवळच्या माणसांना आपल्या पहिल्या पगारातून भेट देण्याचा आनंद आपल्या स्वतःसाठी काहीतरी घेण्यापेक्षा खूप जास्त असतो.

त्यामागे आपल्या स्वतःच्या मोठेपणा ची भावना असू शकते.

३. झोपताना ज्या व्यक्तीचा सगळ्यात शेवटी विचार मनात येतो ती व्यक्ती एकतर तुम्हाला सर्वात जास्त आनंद देत असते किंवा सगळ्यात जास्त दुःख!! 

आपण दिवसभरात स्वतःशी बोलतच असतो पण आपला आपल्याशी खरा संवाद होतो तो रात्री झोपताना.

अशा वेळी आपल्या मनात फक्त आपल्या खूप जवळच्या लोकांचा, म्हणजेच ज्यांच्यामुळे आपल्याला आनंद किंवा दुःख मिळू शकते अशाच लोकांचा विचार करतो.

४. तुम्ही ऐकत असलेल्या गाण्याचा तुमच्या मूडवर परिणाम होतो

गाडीतून येता जाता, रिकाम्या वेळेत किंवा मुद्दाम वेळ काढून गाणी ऐकली जातात ती फक्त हौसेपोटी.

पण या गाण्यांचा मात्र मूडवर परिणाम होत असतो. सकाळी सकाळी छान गाणे ऐकले की दिवसभर तोच उत्साह टिकून राहतो याचा अनुभव तर सगळ्यांना आलाच असेल.

५. वस्तूंपेक्षा अनुभवावर खर्च केलेले पैसे जास्त आनंद देतात

एखादी नवीन वस्तू घेतली ते तिचे कौतुक किंवा अप्रूप काही दिवसांपुरतेच असते.

ठरविक काळ गेला की ती वस्तू घरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून राहते किंवा अगदी वापरात जरी असली तरी सवयीची होऊन गेलेली असते.

कधीकधी त्यावर खर्च झाला म्हणून पश्याताप सुद्धा होतो याऊलट एखादा अनुभव, जसे की जंगल सफारी, स्कुबा डायव्हिंग, रिव्हर राफ्टिंग हे आपल्या मनावर कोरलेले राहतात.

त्यावर खर्च झालेल्या पैशाबद्दल कधीच वाईट वाटत नाही.

६. मानसिक दुखण्याने आणि शारीरिक दुखण्याने शरीरात सारखेच केमिकल बदल होतात

मनाची दुखणी कोणाला दाखवता येत नाहीत किंवा त्यावर मलमपट्टी करून दुखणे कमी होत नाही.

पण आपल्यामध्ये ही दुखणी दिसत जरी नसली तरी त्यामुळे होणार परिणाम मात्र दिसतो.

मन दुखावले गेले तर शरीरात होणारे केमिकल बदल एखाद्या जखमेमुळे होणाऱ्या केमिकल बदलांसारखेच असतात.

७. दिवसातला ७० टक्के वेळ तुम्ही आठवणीत रमत असता किंवा स्वप्न रंगवत असता

दिवसा स्वप्न बघू नयेत असे म्हणतात. पण आपला आपल्या मेंदूवर ताबा नसतो.

आपल्या मेंदूत ७० टक्के वेळा जुन्या आठवणी एकामागोमाग एक येत असतात किंवा येणाऱ्या दिवसांबद्दल स्वप्न रंजन चालू असते.

म्हणजे फक्त ३० टक्के वेळ हा आपण आपल्या ‘आज’वर विचार करण्यासाठी खर्च करतो.

८. ह्रदय आणि प्रेम याचा संबंध नसतो

‘प्रेमात पडल्यावर डोक्याने नाही तर मनाने विचार करायचा असतो.’

‘ह्रदयात प्रेम असेल तर सगळं जग सुंदर दिसते.’

ओळखीची वाटतात ही वाक्ये? वाटणारच!

ही अशी वाक्ये आपण नेहमी ऐकलेली असतात किंवा बोललेली सुद्धा असतात.

पण खरेतर प्रेम आणि ह्रदय यांचा काहीएक संबंध नसतो.

आपल्या मनात प्रेमाची भावना येते ती आपल्या मेंदूमध्ये होणाऱ्या केमिकल बदलांमुळे!

थोडक्यात काय, तर प्रेमाची भावना म्हणजे आपल्या मेंदूत होणारा केमिकल लोच्या…

९. गाणी आणि आठवणींचा खूप जवळचा संबंध असतो

काही गाणी आपल्याला थेट बालपणात पोहोचवतात तर काही आपल्या कॉलेजच्या सुखद आठवणींच्या दिवसात.

हा अनुभव प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेला असतो.

आपण जेव्हा एखादे गाणे पुन्हा पुन्हा ऐकतो तेव्हा त्यातल्या शब्दांपेक्षा आपण ते गाणे पहिल्यांदा कधी ऐकले, कोणाबरोबर ऐकले याकडे जास्त लक्ष देतो.

म्हणूनच एखाद्या गाण्यासोबत आपल्या खूप खास आठवणी जोडलेल्या असतात आणि दर वेळेला ते गाणे ऐकले की त्या आठवणींना उजाळा मिळतो.

१०. तुमच्याशी बोलायचेय असे कोणी म्हटले तर मनात वाईट विचारच पहिले येतात

समजा सकाळी सकाळी आपाल्याला आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने सांगितले की त्यांना संध्याकाळी आपल्याशी बोलायचे आहे…

तर आपला दिवस एकच विचार करण्यात जातो, आपण काही गडबड तर केली नाही ना? तुम्हाला सुद्धा असेच होते ना.. काळजी करू नका.. तुम्ही एकटे नाही आहात!!

११. सतत हसून विनोद करणारी लोक खरेतर नैराश्याने घेरलेली असतात

एखादी नेहमी विनोद करणारी व्यक्ती बघितली की आपल्याला वाटते की किती आनंदी आहे, किती उत्साह आहे!!

पण ते हसणे, विनोद करणे सहसा वरवरचे असते. एखादे मोठे दुःख लपवण्यासाठी घेतलेला तो एक मुखवटाच असतो.

१२. डोळे बंद केले तर गोष्टी पटकन आठवतात

जगातल्या अनेक लोकांप्रमाणे आपल्यालाही एखादी गोष्ट आठवायचा प्रयत्न करताना डोळे मिटायची सवय असते.

पण ही फक्त सवयच आहे का? नक्कीच नाही, डोळे मिटले की मन एकाग्र होते आणि एखादी गोष्ट आठवायला सोपी जाते.

आहेत ना या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागू? जगातल्या प्रत्येक माणसांमधील आणि तुमच्यामधील हा एक दुवाच आहे!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

1 Response

  1. Satish Banne says:

    बऱ्यापैकी महत्त्वाची आणि योग्य माहिती आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!