संगीत – एक औषध!…

Gallan Goodiyaan

संगीत आणि गाण्यांशिवाय माणसाचं आयुष्य अपुर्ण आहे….. आजकाल एक वेगळं शास्त्र डेव्हलप झालयं, साऊंड थेरपी! यात फक्त वेगवेगळे नाद ऐकवुन फक्त आवाजांच्या सहाय्याने रोग बरे करतात, म्हणे!….

आपण जे ऐकतो, त्या स्वरांमध्ये आपल्या भावना, आपल्या मनात चाललेले विचार बदलण्याची शक्ती नक्कीच असते.

समजा, उद्या अशी साऊंड थेरपी सेंटर सगळीकडे उघडली तर काय गंमत होईल?

एखादा सतत अस्वस्थ, चिडचिड करणारा माणुस जर साऊंड थेरपीला गेला तर डॉक्टर त्याला सांगतील, मन शांत करण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ लतादीदींची ही तीन गाणी नियमितपणे ऐका.

कारण ‘लतादीदी’ गातात तेव्हा डोळ्यांसमोर येतं, निसर्ग रम्य ठिकाणी असलेलं पवित्र मंदीर! त्या जेव्हा दिर्घ आलाप घेतात तेव्हा जणु त्या मंदीरात मंजुळ स्वरात घंटाच निनादते. “लग जा गले”, “ऐ दिले-नादान” पासुन दिल तो पागल है, पर्यंत कोणतही गाणं चालतं.

Kishor_kumarआणि जर एखादा पेशंट आयुष्याला कंटाळुन आत्महत्या करायला निघालेला असेल तर त्याला संपुर्ण एक दिवस एका खोलीत बंद करुन फक्त आणि फक्त किशोरकुमारची गाणी ऐकवावीत.

बघा!….तो नक्की आनंदाने नाचायला लागेल, इतकच नाही, दुःख विसरुन आयुष्यावर प्रेम करायला लागेल.

हा सुरांचा अवलिया जेव्हा यॉडलींग करु लागतो, तेव्हा असं वाटतं की एखादं अवखळ बालक आपल्याच धुंदीत मनमुरादपणे नाचतयं, आणि सारं काही विसरुन आपणही जमेल तसं त्याच्यासोबत मनसोक्त नाचु लागतो…..यॉडलींग म्हणजे….उदा., मेरे सपनों की रानी मध्ये येणारं वूडली वुडली वु वु…..)

जर एखादा गलेलठ्ठ पेशंट वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांकडे गेला तर व्यायाम न करता वजन उतरवायचे असेल तर त्याला रामबाण उपाय म्हणुन मुकेश ची दर्दी गाणी ऐकवली जातील!

ह्याची दुखभरी गाणी वेड लावतात, ह्याची विरहगीते इतकी जबरदस्त असतात की नकळत तो पेशंटही त्या नायकाच्या दुःखात सामील होईल, जणु काही त्याचाच प्रेमभंग झालाय आणि तोही आपल्या अनामिक प्रेमिकेच्या आठवणीत सकाळ-संध्याकाळ हुरहुर करत रस्त्यावर चालु लागेल, त्याने त्याच्या बराचशा फॅट्स आणि कॅलरी बर्न होतील, तसेच अन्नावरची वासना उडुन गेल्याने त्याला नीट जेवणही जाणार नाही आणि आपोआपच त्याचे डायटही होईल. किती हुकुमी उपाय!…

sonu_nigamतसचं डायबेटीसच्या पेशंटला स्वीट मार्टमध्ये जाऊन स्वीट खायची इच्छा झाली की लगेच त्याला मधाळ आवाजात गाणारे गायक जसे की कुमार सानु, उदीत नारायण, अभिजीत आणि सोनु निगम यांची भरपुर गोड गाणी ऐकवली जातील, म्हणजे आपसुकच त्याला मलाई पेढा, बर्फी आणि कलाकंद खाल्ल्याचं समाधान मिळेल आणि तो तृप्त होईल.

सदा उदासवाणं राहायचा आणि उगाच इकडे लई बोअर होतयं असं निदान झाल्यास ए. आर. रहेमान जालीम उपाय आहे.

प्रीतम किंवा शंकर अहसान लॉय यांची गाणी उत्तम काम करतात पण सोबत व्हिट्यामिन म्हणुन एखादी गोड गळ्याची श्रेया घोषालही न चुकता ऐकावी.

उगाचं कंटाळा आलाय, मुड फ्रेश करायचा तर रॉकींग म्युझीक ऐकायला पाहीजे, त्यासाठी तुम्हाला अजय अतुलशिवाय दुसरा पर्याय नाही.

तुम्ही कितीही टेंशनमध्ये असा, कसल्याही मुडमध्ये असा, हे असा काही वाद्यांचा मेळ जमवतात आणि तुम्हाला त्यांच्यासोबत ठेका धरायला भाग पाडतात आणि मुड फ्रेश करतात. आणि मग यांना रुम फ्रेशनर सारखं मुड फ्रेशनर ह्या टोपण नावानेही ओळखलं जाईल.

माझ्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही असं म्हणणाऱ्यांना गुलजारनी लिहलेली अर्थपुर्ण धीरगंभीर गाणी ऐकवावीत, सोबत साईड इफेक्ट होवु नये, म्हणुन पंकज उधासच्या नशील्या गझला ऐकवाव्यात म्हणजे आयुष्याचे वेगवेगळे रंग त्याच्यासमोर उलगडले जातील, आणि जगण्याची आगळीवेगळी उर्जा त्याच्यात नक्कीच निर्माण होईल.

नास्तिक लोकांना अनुप जलोटांचा भजनगीतांचा डोस द्यावा, आपोआप भक्तीत मन लावुन डोलायला लागतील, भान हरपुन, स्व’ ला विसरुन, त्यात रममाण होतील, ह्या भावगीतांची झिंग लाजवाब असते, एकदा अनुभवावीच, बरं का!…

सतत किरकीर, कुरकुर करणाऱ्यांना व व्यायामाचा कंटाळा आहे अशा पेशंटना शिवानी भगवान आणि छायाकुमारीचे पंजाबी फक्कड भांगडा गाणी दिवसातुन पंधरा मिनीटे तीन वेळा जबरदस्ती ऐकावी लागेल अशी थेरपी दिली तर, आपोआपच नाचु-थिरकु लागतील. (बघीतली नसेल तर आवर्जुन यु-टुबवर सर्च करुन बघा!.नाचण्यापासुन स्वतःला रोखुन दाखवा, हजार रुपये मिळवा!… )

Bela Shendeविशाल शेखर, हिमेश रेशमिया आणि हनी सिंग यांच्या गाण्यांवर माफक प्रमाणात वापर करावा, ओव्हर डोस झाल्यास वाईट परीणाम होतील, अशा सुचना दिसतील का मराठी मध्ये अजय-अतुल सोडुन फार कमी ऑप्शन आहेत, इथे अवधुत गुप्ते, बेला शेंडे, वैशाली सामंत अशी एखादेच गुणकारक गायक असतात…..

महेश काळे, राहुल देशपांडे हे आयुर्वेदिक उपचाराप्रमाणे काम करतात, आयुर्वेदिक उपचार कडक असतात, तशे ह्यांचे सुर कडक असतात…. ‘बोल मै हालगी बजाऊ क्या?’ आणि ‘आला बाबुराव’ हा म्हणजे रस्त्यावरच्या जडीबुटीचा उपचार, तो खात्रीशीर आहे का, याची दुकानदारालाही शंकाच असते, पण घेणार्याला त्याची फिकीर नसते.

अन्नु मलिक आणि सलीम सुलेमान यांना चांगल्या पॅकींग मधला बोगस माल असे सांगुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल का?…. असो.

देवानं जर आपले कान, आपली श्रवणशक्ती काढुन घेतली तर जीवन कसं होईल माहीतीये?… एखाद्या फाईव्हस्टार हॉटेल मधलं, चमचमीत प्लेटात वाढलेलं, पंच-पक्वान असलेलं, गार्निशिंग करुन सुंदर सजवलेलं, पण पहीलाच घास घेतला की मोहभंग करणारं, चव नसलेलं, एकदम बेचव, अळणी जेवण असतं तसं होईल!…म्हणुनच म्हणतो!….संगीत आणि गाण्यांशिवाय माणसाचं आयुष्य अपुर्ण आहे.

मग, आज तुम्ही तुमचं फेव्हरेट गाणं ऐकलं की नाही?

वाचण्यासारखे आणखी काही…..

स्वप्नातलं आयुष्य (परिपूर्ण आयुष्य) सत्यात कसं उतरवता येईल?
तीन जीवघेण्या शत्रुंपासुन सावधान!…. Salt, Sugar & फॅट
मेडीटेशन – तेरा ध्यान किधर है?…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Pradeep Naik says:

    संगीत एक औषध :
    छान किस्से आहेत .. लेखात उदाहरणासहीत व गायक – गायिकांच्या वैशिष्टयासकट मस्त मजेशीर मांडणी आहे .
    वाचून आनंद मिळाला व संगीत हे एक हमखास औषध आहे ह्याची तंतोतंत खात्री पटली ..
    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!