निद्रानाशावर घरच्या घरी करता येण्यासारखे ७ उपाय

रात्री झोप यायला त्रास का होतो आणि गाढ, शांत झोप येण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

रात्री गादीवर पडल्या पडल्या काही लोकांना झोप लागते तर काहींची अगदी दगड जरी उशी म्हणून दिला तरी शांत झोप होते.

पण हे झोपेचे वरदान सगळ्यांना नसते.

झोप हवी असताना सुद्धा झोप न येणे हे फार त्रासदायक ठरू शकते.

तशी रात्री झोप न येण्यामागे अनेक कारणे आहेत.

झोप न येणे हा त्रास कशामुळे होऊ शकतो? त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि त्यावर साधे सोपे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.

रात्री लवकर झोप न येणे किंवा झोप आली तरी रात्रभर शांत झोप न लागणे याला वैद्यकीय भाषेत इन्सोम्निया असे म्हणतात.

रात्रीच्या शांत झोपेचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात.

रात्रीची किमान आठ तासांसाठीची शांत झोप आपल्याला गरजेची असतेच.

पण इन्सोम्निया असेल तर ही झोप होत नाही आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागतो.

हे परिणाम जाणून घेण्याआधी आपण इन्सोम्निया कशामुळे होतो ते बघूया.

इन्सोम्निया होण्यामागे इतकी वेगवेगळी कारणे आहेत की जर हा त्रास आपल्याला असेल तर त्यामागे नक्की कोणते कारण आहे हे शोधणे अवघड होऊन बसते.

इन्सोम्निया होण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे असतात, एक म्हणजे काही शारीरिक किंवा मानसिक व्याधी (त्यासाठी दिलेल्या औषधांचा परिणाम सुद्धा इन्सोम्नियासाठी कारण ठरू शकते) किंवा सवयी.

१. शारीरिक किंवा मानसिक व्याधी

अनेक मानसिक आजारांमुळे इन्सोम्निया होऊ शकतो.

डिप्रेशन, एन्झायटी यासारख्या आजारांमुळे रात्री झोपच न येणे, झोप आली तरी सलग, शांत झोप न होणे हे त्रास होतात.

मनातले विचार, चिंता किंवा काळजी यामुळे शांत झोप लागायला त्रास होतो.

अशा कितीतरी शारीरिक व्याधी आहेत ज्यामुळे झोप न येण्यासारखे त्रास उत्भवतात.

स्त्रियांना मेनोपॉजच्या दरम्यान इन्सोम्नियाचा त्रास होऊ शकतो.

तसेच प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हा त्रास होऊ शकतो.

खासकरून शेवटच्या तीन महिन्यात हा त्रास जास्त प्रमाणात होतो.

याव्यतिरिक्त दमा, कर्करोग, पाठीचे दुखणे, कोणतेही इतर दीर्घकाळ चालू असलेले दुखणे जसे की अर्थ्रायटिस, ऍसिडिटी यासारखे आजार आपल्या झोपेवर परिणाम करत असतात.

अनेक वेळा या आजारांवर घेत असलेल्या औषधांचा परिणाम म्हणून सुद्धा इन्सोम्निया होतो.

थायरॉईडसाठी घेत असलेल्या गोळ्या, बीपी नियंत्रणात यावे म्हणून घेत असलेल्या गोळ्या किंवा अगदी साध्या सर्दीसाठी घेत असलेल्या गोळ्यांचा सुद्धा आपल्या झोपेवर परिणाम होतो.

२. सवयी

आपल्या कामामुळे काहीवेळा आपल्याला काही सवयी लावून घ्याव्या लागतात.

काही गोष्टींबाबत आपला नाईलाज होतो जसे की वेळेवर न जेवणे, वेळेवर न झोपणे, वेळी अवेळी कॉफी पिणे, झोपायच्या आधी बराच वेळ मोबाईल बघणे किंवा स्क्रीन टाईम वाढवणे अशा सवयींचा परिणाम आपल्या झोपेवर होत असतो.

यातल्या काही सवयी आपल्याला बदलता येणे शक्य असतात तर काही नाही.

ज्या सवयी बदलता येतात त्या बदलायचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.

आपल्या शरीराचे एक स्वतंत्र घड्याळ, ज्याला बायोलॉजिकल क्लाक म्हणतात.

आपल्या शरीरात या घडाळ्यानुसार हार्मोन्स तयार होत असतात ज्यामुळे आपल्याला झोप किंवा जाग येते.

रात्री बराच वेळ काम करत राहणे किंवा उशिरा जेवणे यासारख्या गोष्टींमुळे हे घड्याळ बदलते आणि त्याचा परिणाम हळूहळू आपल्या झोपेवर होऊन इन्सोम्निया होऊ शकतो.

सतत अपूर्ण झोप होण्याचा परिणाम म्हणजे सुद्धा काही मानसिक आणि शारीरिक आजार होणे.

कामात लक्ष न लागणे, झोपेच्या कमतरतेमुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, मायग्रेन यासारखे त्रास होऊ शकतात.

या इन्सोम्नियावर काही सोपे घरगुती उपाय आहेत, जे आपण सहज करून बघू शकतो.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या घरगुती उपायांचा काहीच दुष्परिणाम नाही त्यामुळे तुम्हाला जर झोप येत नसेल तर तुम्ही हे उपाय अगदी बिनधास्त करून बघू शकता.

निद्रानाशावर घरच्या घरी करता येण्यासारखे उपाय

१. मेडिटेशन

दिवसभरातून किमान दहा मिनिटे एका ठिकाणी शांत बसून, मनात कमीतकमी विचार येतील असा प्रयत्न करून, श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करणे, याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे शांत झोप लागणे. बऱ्याचदा आपल्याला झोप लागत नाही त्यामागचे कारण असते- अति विचार!

मेडिटेशनने मन शांत होते आणि मनात येणारे विचार सुद्धा कमी होऊन शांत झोप लागण्यासाठी मदत होते.

२. मंत्रोच्चार

मनातल्या मनात एखादे मंत्र म्हणत राहिल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

हे मंत्र धार्मिक असलेच पाहिजे असे काही नाही आणि धार्मिक असले तरीही काही हरकत नाही.

तुमच्या इच्छेनुसार आणि श्रद्धेनुसार एखादा सकारात्मक विचार सुद्धा तुमचा सकारात्मक मंत्र असू शकतो.

तुमचे विचार शांत करणारा, तुम्हाला आवडलेला असा एखादा मंत्र किंवा एखादे वाक्य तुम्ही निवडू शकता.

रात्री झोपताना शांत चित्ताने हे मंत्र मनात परत परत म्हटल्याने शांत झोप लागते.

३. योगासने

योगासने या व्यायाम प्रकारचा आपल्या शरीराबरोबरच मनावर सुद्धा परिणाम होतो.

योगासनांमुळे मन शांत राहते आणि मनात नकारात्मक विचार येत नाहीत.

काही आसने झोपायच्या आधी केल्याने शांत झोप येते. ही आसने कशी करायची याचे ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन झोपण्याच्या आधी केल्याने फायदा होतो.

४. मसाज

मसाज केल्याने आपल्याला असलेली काही किरकोळ दुखणी कमी होतात.

जर झोप न लागण्याचा संबंध या दुखण्याशी असेल तर मसाज केल्याने लगेच फरक पडू शकतो.

मसाजमुळे अजून एक फायदा होतो तो म्हणजे आपले मन शांत होते.

मनात जर खूप विचार असतील किंवा नैराश्य असेल तर मसाजचा हमखास फायदा होतो.

दरवेळेला बाहेर जाऊन मसाज घेणे शक्य नसते पण तुम्हाला वाचून आनंद होईल की, आपल्या आपण स्वतःला घरच्याघरी मसाज केला तरी त्याचा फायदा होतो.

आपल्या आवडीच्या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी आपले हात, पाय आणि डोके चोळल्यास चांगली झोप लागायला मदत होते.

५. कॉफी आणि चहा टाळणे

कॉफीमधले कॅफिन आणि चहामध्ये टॅनिन नावाचे द्रव्य असते.

या दोन्ही मुळे झोप कमी होते. म्हणूनच चहा, कॉफीचा अतिरेक टाळावा.

इंसोम्नियाचा त्रास असेल तर शक्यतो संध्याकाळी चहा, कॉफी, कोल्डड्रिंक घेऊच नये.

६. व्यायाम

व्यायाम केल्याने निश्चितच झोप चांगली लागते. आठवड्यातून किमान पाच दिवस व्यवस्थित व्यायाम केला तर आपल्याला फायदा होतो.

व्यायाम करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्यायाम हा शक्यतो सकाळी करावा.

संध्याकाळी उशिरा व्यायाम केला तर शरीरात ऊर्जा निर्माण त्यामुळे आलेली झोप जाऊ शकते.

७. गरम पाण्याची आंघोळ

झोपण्यापूर्वी, पण जेवणानंतर साधारण तासाभराने गरम पाण्याची आंघोळ केली तर शरीरातले मसल्स रिलॅक्स होतात आणि गाढ झोप लागते.

आपल्याला सलग दोन दिवस शांत झोप मिळाली नाही तर आपल्याला किती त्रास होतो याचा अनुभव प्रत्येकालाच असेल मग इन्सोम्निया असेल तर झोपेच्या अभावामुळे किती त्रास होत असतील याची कल्पना आपण करू शकतो.

म्हणूनच हे उपाय तुम्ही जास्तीतजास्त शेयर करा जेणेकरून त्याचा जास्तीतजास्त लोकांना फायदा होईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय