केस सॉफ्ट आणि सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय

रोज रोज गुड हेयर डे हवाय? मग त्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स!

एखाद्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली, छान कपडे, त्यावर साजेसे दागिने, हलका मेकअप..

सगळे अगदी मनासारखे तरी कधीतरी काय, अगदी हमखास दगा देणारी एक गोष्ट असतेच! ती म्हणजे केस!

कधी शॅम्पू करून सुद्धा तेलकट, कधी एकदम राठ, कधी वळलेले तर कधी झाडू सारखे सरळ!

आपल्याला हवे असतील तेव्हा आपले केस कधीच छान दिसत नाहीत अशी बहुतेक स्त्रियांची तक्रार असते.

आणि हो स्त्रियाच नाही पुरुषांना सुद्धा चांगली ठेवण बसेल असे केस हवेच असतात.

अवचित कधीतरी एखादा ‘गुड हेयर डे’ येतो जेव्हा केस सॉफ्ट आणि सिल्की झालेले असतात पण अशा दिवशी नेमका कुठलाच कार्यक्रम नसतो.

मग तेवढ्यापुरते फोटोंवर समाधान मानायचे!

तुमच्याही बाबतीत हे अनेक वेळा झाले असेल. वेगवेगळे शॅम्पू, कंडीशनर, स्पा सगळे करून सुद्धा केसांकडून आयत्या वेळी दगा मिळालाच असेल.

अशा वेळेस मग चिडचिड झाल्यावाचून राहत नाही आणि सगळी तयारी छान असतानाही फक्त केसांमुळे मूड जातो.

हे फक्त दिसण्यापुरतेच मर्यादित नाही बरं का..

सॉफ्ट आणि सिल्की केस दिसायला जरी छान असले तरी ते केस निरोगी असण्याचे एक महत्वाचे कारण आहे.

म्हणजेच जेव्हा तुमचे केस राठ, रुक्ष दिसतात तेव्हा ते हेल्दी नसतात.

अशा वेळी नक्की काय उपाय करायचे या विचाराने गोंधळून जायला होतं,

केसांच्या आरोग्याचे टेन्शन यायला लागते.

पण, तुम्हाला माहीत आहे का? टेंशन घेऊन केसांचे आरोग्य अजूनच बिघडणार असते.

केस सॉफ्ट आणि सिल्की ठेवण्यासाठी हे उपाय बघा :

१. कोरफड

कोरफडीच्या एका पानातील गर चमच्याने अलगद काढून घ्यायचा आणि मिक्सरला लावून एकसारखा करून घ्यायचा.

नंतर त्यात दोन ते तीन चमचे पाणी घालून तो एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचा.

केस धुतल्यानंतर ओलसर असतानाच त्यावर स्प्रे बॉटलमधून हे पाणी स्प्रे करून तसेच ठेऊन द्यायचे.

एखाद्या लिव्ह-ऑन हेयर कण्डिशनर सारखाच याचा परिणाम होतो.

कोरफडीच्या गरात असलेल्या ओलाव्या मुळे केस रुक्ष होत नाहीत आणि मऊ राहिल्यामुळे गुंतत सुद्धा नाहीत.

एवढं मात्र लक्षात ठेवा की हे मिश्रण मोठ्या प्रमाणात करून ठेवायचं नाही.

२. खोबरेल तेल

आठवड्यातून दोनदा आपल्या केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल किंचित कोमट करून घ्यायचे आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटे बोटांनी अलगद केसांच्या मुळांना मसाज करायचा.

यानंतर एक टॉवेल गरम पाण्यात बुडवून व्यवस्थित पिळून घ्यायचा आणि तेल लावलेल्या केसांवर गुंडाळून ठेवायचा.

अर्धा तासाने आवडीच्या शॅम्पूने केस धुवून टाकायचे.
हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्याने तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचते आणि केसांना आवश्यक ती पोषणद्रवे मिळतात.

खोबरेल तेलाने केसांना चकाकी येते आणि ते मऊसूत सुद्धा होतात. यामुळे केसांमधील कोंडा सुद्धा नाहीसा होतो.

३. दही आणि आवळा पावडर

एक वाटी दह्यात दोन चमचे आवळा पावडर घालून व्यवस्थित फेटून घ्यायचे.

नंतर हे मिश्रण सगळ्या केसांना लावून घ्यायचे आणि अर्धा तासाने आवडीच्या शॅम्पूने धुवून टाकायचे.

या घरगुती हेयर मास्कमध्ये असलेले दोन्ही पदार्थ केसांसाठी अतिशय लाभदायक आहेत.

दह्यात असलेले व्हिटॅमिन ‘डी’ आणि व्हिटॅमिन बी-5, केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

आवळा पावडरमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ जास्त प्रमाणात आढळतात.

व्हिटॅमिन ‘सी’ मुळे केसांची वाढ चांगली होते.

आरोग्यपूर्ण केस नेहमीच दिसायला सुद्धा तजेलदार दिसतात आणि स्पर्शाला सुद्धा मऊ लागतात.

४. अंडी

एक अंडे, एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि एक चमचा मध हे सगळे एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्यायचे.

हे मिश्रण केसांना सगळीकडे लावून अर्धा तास केसांवर शॉवर कॅप घालून ठेवायची.

अर्धा तासाने थंड पाणी वापरून, नेहमीच्या शॅम्पूने केस धुवून घ्यायचे.

अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात.

केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी प्रोटीन गरजेचे असतात.

यामुळे केसांना नैसर्गिक चकाकी येते.

तसेच जर केस खूपच रुक्ष झाले असतील तर या मास्कमुळे ते मुलायम होतात.

आठवड्यातून एक दोन वेळा हा उपाय केला तर नक्कीच लवकर सुधारणा दिसून येते.

५. मेथी दाणे

पाव वाटी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवत ठेऊन सकाळी मिक्सरमधून बारीक वाटून त्याची पेस्ट करून घ्यायची.

वाटताना पाणी घालायची गरज लागली तर ज्या पाण्यात मेथी दाणे भिजवले होते त्यातीलच थोडे पाणी घालायचे.

ही पेस्ट मग आठवड्यातून एकदा सगळ्या केसांना अर्ध्या तासासाठी लावून ठेवायची आणि नेहमीच्या शॅम्पूने धुवून टाकायची.

मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिन ‘सी’ जास्त प्रमाणात आढळतात.

यामुळे केसांना ग्लो येतो तसेच केस गळण्याच्या काही तक्रारी असतील तर त्या सुद्धा दूर होतात.

या उपायामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस पांढरे व्हायचे प्रमाण सुद्धा कमी होते.

६. कांद्याचा रस

कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण खूप जास्त असते.

सल्फरमुळे केसांची वाढ होते आणि नवीन केस येण्यासाठी सुद्धा ते फायदेशीर असते.

कांद्यात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या व्हिटॅमिन ‘सी’, फॉसफरस, फॉलीक ऍसिड मुळे केसांना छान चकाकी येते.

एका कांद्याचा रस काढून घेऊन त्याने केसांच्या मुळांना पंधरा ते वीस मिनिटे मसाज करून मग नेहमीच्या शॅम्पूने धुवून घ्यायचे.

आठवड्यातून एकदा केल्यास या उपायाचे फायदे दिसून येतात.

हे उपाय सोपे आहेत याची तुम्हाला खात्री पटलीच असेल पण यात नियमितपणा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे बरं का?

आठवड्यातून एकदा एखादा उपाय केला आणि नंतर मग वेळ मिळाला नाही म्हणून सोडून दिला आणि परत काही दिवसांनी केला तर साहजिकच त्याचे हवे तसे परिणाम दिसणार नाहीत.

म्हणूनच आपल्यासाठी आपल्याला खास असा वेळ काढता यायला हवा ज्यामध्ये स्वतःच्या त्वचेची, केसांची आणि आरोग्याची काळजी घेता येईल. तुमच्या केसांच्या तक्रारीनुसार यातले उपाय निवडून तुम्ही जादू बघू शकता..

याचबरोबर अजून काही लहान टिप्स आहेत ज्यामुळे केस निरोगी राहण्यासाठी मदत होते.

१. संतुलित आहार आणि दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आपल्या एकूण आरोग्यासाठीच चांगले असते तसेच ते आपल्या केसांच्या दृष्टीने सुद्धा चांगले असते.

२. केसांसाठी शॅम्पू किंवा कण्डिशनर घेताना तो चांगल्या ब्रँडचा हवा, शक्यतो नैसर्गिक, केमिकल फ्री उत्पादनांवर जास्त भर द्यावा.

३. केस वाळवताना टॉवेलने खसाखस न पुसता, हलकेच टिपून घ्यावे. हेयर ड्रायरचा वापर सुद्धा कमीतकमी करावा.

४. केसांवर स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग वारंवार करणे टाळावे. उष्णतेमुळे केस खराब होऊ शकतात.

५. केसांना खोबरेल तेल नियमितपणे लावावे.

६. तीन महिन्यातून एकदा केस ट्रिम केल्याने ते जास्त आरोग्यपूर्ण दिसतात.

या घरगुती उपायांचा आणि नंतरच्या टिप्सचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला नक्की कळवा आणि ही महत्वाची माहिती तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्की शेयर करा!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय