‘नकार’ देण्याची कला शिकण्यासाठी वाचा हा लेख

लोकांना नकार द्यायला जड जात असेल तर हा लेख वाचून शिका लोकांना नाही म्हणायचे काही ठोस उपाय!

पाऊलो काऊलो हे प्रसिद्ध लेखक म्हणतात,

When you say yes to others make sure you are not saying no to yourself.

आपल्याही बाबतीत हे अनेकदा होत असते ना?

आपल्या मनात नसताना सुद्धा आपण काही कामे ओढवून घेतो किंवा काही कामांना नाही म्हणायला आपल्याला अवघड जाते.

आपल्याला कोणी मदत मागितली की आपण पटकन हो म्हणून टाकतो, आपल्याला सहज शक्य असेल तर मदत करावीच, प्रश्नच नाही.

पण काही वेळेला शक्य नसताना सुद्धा आपण हो म्हणून बसतो कारण ‘नाही कसे म्हणायचे?’

हे आपल्याला जमत नाही.

एकदा दोनदा असे झाल्यावर, आपल्याला सहज शक्य नसताना सुद्धा हो म्हणून बसल्यावर आपण आपली जवाबदारी पूर्ण करतो पण तिसऱ्यांदा परत विचारपूस झाली की तेच होते..

नाही म्हणायला जीवावर येते!

कोणाकडे कधी जेवायचं आग्रह झाला तरी हीच गत, नकार देता येत नाही.

काहीजणांना मदतीची नितांत गरज असते त्यामुळे आपल्याला शक्य असलेली मदत त्यांना करावीच पण केवळ आपण सगळ्याला हो म्हणतो, किंवा आपल्याला नाही म्हणता येत नाही म्हणून लोक जर आपल्या या स्वभावाचा गैरफायदा घेत असतील तर मात्र आपण खंबीरपणे नाही म्हणायला शिकले पाहिजे.

काहीवेळेला आपलेच व्याप इतके असतात की त्यात अजून वाढलेली कामे कोणालाच नको असतात,

म्हणूनच जे आपल्याला जमणार नाही किंवा जे करायची आपली इच्छा नाही त्यासाठी मन घट्ट करून, कसलीच गिल्ट न बाळगता आपल्याला नाही म्हणताच यायला हवं!

तुम्हाला ही असे अनेक अनुभव आले असतील जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला तुमच्या मनाविरुद्ध हो म्हटले असेल..

नाही म्हणायला अवघड असतेच पण म्हणूनच आज आपण असे काही उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपण आपला नकार चांगल्या प्रकारे, कोणतेही गैरसमज न होऊ देता समोरच्यापर्यँत पोहचवू शकतो..

मग बघूया ना, नाही म्हणायचे सोपे मार्ग?

१. नकार देण्याची पद्धत बदला

एखाद्याला नकार देताना एकदम नाही म्हणणे काहीवेळा जमत नाही, याला कारण काहीही असू शकते.

त्यापेक्षा, “मला हे करायला आवडले असते पण..” अशी सुरुवात केली तर आपण आपला नकार योग्य शब्दात समोरच्यापर्यँत पोहचवू शकतो.

“मला वेळ असता तर नक्की केले असते.”

असेही एक वाक्य आपण नकार देताना म्हणू शकतो

ज्यामुळे समोरच्याला आपला राग येणार नाही आणि आपल्याला त्यांचे काम खरोखरच जमणार नाही याबद्दल त्यांची खात्री पटेल.

2. तुमची कारणे द्या

तुम्हाला समजा एखादे काम करायचे नसेल, तर समोरच्याला नाही म्हणताना त्यासाठी योग्य ती कारणे दिली तर त्यांनाही तुमची अडचण समजेल.

आणि त्यांचा तुमच्याबद्दल गैरसमज होणार नाही.

तुम्ही एखादे काम करू शकणार नाही कारण त्यावेळेला तुम्ही दुसरे एखादे काम हाती घेतले असेल, तुमचे ऑफिसचे काही काम असेल किंवा इतर काहीही कारणे असतील, ती जर तुम्ही समोरच्याला सांगितली तर तुम्हाला सुद्धा नाही म्हणताना अवघडल्यासारखे होणार नाही.

3. थोडक्यात नकार द्या

हे खरे आहे की नकार देताना तुम्ही काही कारणे दिली तर ते तुम्हाला सुद्धा सोयीचे पडते.

आणि समोरच्याचा सुद्धा गैरसमज होत नाही पण त्याचबरोबर एक गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे की, नाही म्हणताना तुम्ही खूप जास्त कारणे सुद्धा दिली नाही पाहिजेत.

असे केल्याने समोरचा माणूस जर धूर्त असेल तर तो तुम्हाला शब्दात पकडू शकतो. म्हणूनच नकार देताना फार इकडचे तिकडचे न बोलता, मोजक्याच शब्दात पण ठामपणे दिला पाहिजे.😃

4. दुसरा पर्याय सुचवा

एखाद्याला नकार देताना फक्त ‘नाही, जमणार नाही..’ इतकेच सांगण्यापेक्षा त्यांना इतर पर्याय सुचवा.

समजा तुम्हाला त्या वेळेला शक्य होणार नसेल, पण काही काम करायला किंवा मदत करायला नंतर वेळ होणार असेल तर तसे आवर्जून सुचवा.

तुमच्या माहितीत इतर पर्याय असतील, इतर कोणी ओळखीची माणसे असतील तर त्यांची नावे आणि माहिती सुद्धा तुम्ही सांगू शकता.

याने तुम्हाला नाही म्हणणे अवघड जाणार नाही आणि समोरच्याला तुमच्या पद्धतीने मदत केल्याचे समाधान सुद्धा मिळेल.

5. एकदम नाही म्हणू नका

जरी एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणायचे तुमचे ठरलेले असले, तरीही कधीकधी ते एकदम म्हणता येत नाही.

त्यातून गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

म्हणून ‘नंतर कळवतो’ किंवा ‘घरच्यांशी बोलून कळवते.’ अशा पर्यायांचा आपण वापर करू शकतो.

मात्र असे सांगितल्यानंतर काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी तरी नकार कळवणे आवश्यक असते.

काहीच न कळवल्याने सुद्धा गैरसमज होऊ शकतात.

6. फोनवरून किंवा मेसेजवरून नकार कळवा

एखाद्याला सरळ तोंडावर एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणताना अवघडल्या सारखे वाटते.

त्यातून जर ज्याला नकार द्यायचा आहे ती व्यक्ती शब्दात पकडणारी असेल तर जास्तच.

अशा वेळेला ‘काही वेळाने कळवते किंवा कळवतो’ असे म्हणून आपल्याला जमत नाहीये हे चांगल्या शब्दात मेसेजमधून कळवणे सोपे जाते.

7. नकार कळवल्यावर सॉरी म्हणा

कोणालाही कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणताना आपल्याला वाईट वाटतेच.

त्यामुळे आपल्याला वाईट वाटले आहे हे जर समोरच्याला कळले, तर त्याच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होत नाहीत.

आणि आपल्याला पण आपण नाही म्हणून उर्मटपणा केला आहे की काय अशी शंका राहत नाही.

आपण आपल्याला न जमणाऱ्या किंवा आपल्याला करायच्या नसलेल्या अनेक गोष्टींना नकळतपणे होकार देऊन बसतो.

नकार देणे सोपे नाहीच पण आपण ठाम राहून वरील गोष्टी लक्षात ठेऊन नकार द्यायची सुरुवात केली तर आपल्याला ते नक्कीच जमू शकते.

आपण सगळ्यात आधी स्वतःसाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

आपण स्वतःसाठी पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आणि मग बाकीचे सगळे.

म्हणूनच, कोणाला नाही म्हणताना मनात अपराधीपणाची भावना अजिबात येता कामा नये. एखादी गोष्ट जमत नसेल किंवा अगदी करायची नसेल तर तसे स्पष्टपणे मांडता आले पाहिजे.

काही गोष्टींसाठी स्वतःची मते बनवणे आणि ती योग्य पण चांगल्या शब्दात समोरच्याला सांगणे गरजेचे असते.

हा लेख वाचल्यानंतर अगदी एकदम नाही पण हळूहळू यातले मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही नाही म्हणायची कला आत्मसाद करालच याची आम्हाला खात्री आहे.

हा पण आता लेख शेअर करायला नाही म्हणायची करणं शोधून चालणार नाही बरं.. चला, पटापट करा शेअर…

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय