अंधेरीतल्या विजय नगर हाऊसिंग सोसायटीच्या झिरो गार्बेज कॅम्पेनबद्दल

शहरांमध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढू लागली आहे.

शहरातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही समस्या उत्भवली असली तरी काही लोकांच्या बेशिस्त आणि बेजवाबदार वागणुकीमुळे ती वाढली आहे.

मुंबईसारख्या शहरात तर कचरा निर्माण व्हायचे प्रमाण इतके जास्त आहे की तिथले कचरा डेपो अक्षरश: ओसंडून वाहत आहेत.

काही कचरा डेपो तर चक्क एखाद्या पाच मजली इमारती इतके उंच झाले आहेत.

इतकी बिकट परिस्थिती येईपर्यंत या वाढत्या कचऱ्याबाबत काही उपाय निघाला नाही तरी आता मात्र त्यावर काहीतरी ठोस उपाय काढायला हवा कारण कचऱ्याचे ढीग जर असेच साठत राहिले तर आधीच हाताबाहेर गेलेली परिस्थिती अजूनच वाईट होईल.

मुंबईतल्या बहुतेक सोसायटी तर आपल्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करतातच.

अनेक ठिकाणी ओला कचरा रिचवून त्याचे खत केले जाते पण सुक्या कचऱ्याची समस्या उरतेच.

त्याचा निचरा काही करता येत नसल्याने सुका कचरा शेवटी कचरा डेपोतच जातो.

यामुळे कचरा डेपोतला कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत जातो.

पण याच समस्येवर काहीतरी मार्ग काढायला हवा, तशी आता काळाची गरजच बनलेली आहे.

फक्त मुंबई शहरात जवळजवळ ९,६०० मेट्रिक टन कचरा रोज निघतो.

याचमुळे मुंबईतले सगळे कचरा डेपो पूर्णपणे भरलेले आहेत, यात काही नवल वाटण्यासारखे नाही.

पण याचमुळे मुंबईकर या बाबतीत अधिक जागृत होताना दिसत आहेत.

आधीच वाढलेल्या प्रदूषण, लोकसंख्या या सगळ्यामुळे मुंबई शहरावर प्रचंड तणाव पडतो, त्यामुळे निदान जे आपल्या हातात आहे ते तरी करावे असे मुंबईकरांनी मनावर घ्यायला सुरुवात केली आहे.

आज या लेखात आपण मुंबईमधील अंधेरी भागातील विजय नगर हाऊसिंग सोसायटीने याच दृष्टीने केलेल्या झिरो गार्बेज कॅम्पेनबद्दल जाणून घेणार आहोत.

ही कॅम्पेन या सोसायटीतील सदस्यांनी कशी सुरु केली, कशी राबवली आणि त्यातून त्यांना फायदा झाला हे सगळे जाणून घेण्यासाठी हा लेख पुढे वाचा.

मुंबईतील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर आळा घालण्यासाठी अंधेरीतील विजय नगर हाऊसिंग सोसायटीने ही झिरो गार्बेज कॅम्पेन सुरु केली.

या कॅम्पेनचा मुख्य हेतू एकच – प्रत्येकाने कमीतकमी कचरा निर्माण करण्याचा जमेल तितका प्रयत्न करायचा आणि सोसायटीने कमीतकमी कचरा डेपोला पाठवायचा.

ही कॅम्पेन सुरु व्हायच्या आधी या सोसायटीतून एका महिन्याला ८७०० किलो कचरा डेपोत जायचा पण ही कॅम्पेन यशस्वीपणे राबवल्यानंतर यातला आता फक्त १० टक्केच कचरा डेपोला पाठवला जातो.

हा एवढा मोठा बदल कसा घडला हे सांगताना सुकृता पेफे, या कॅम्पेनच्या स्वयंसेविका सांगतात की त्यांच्या २००० लोकांच्या सोसायटीच्या बाहेर, सोसायटीचा कचरा टाकण्यासाठी बृहनमुंबई म्युनसीपल कॉर्पोरेशनने २०१५ मध्ये दोन मोठे कचऱ्याचे डबे ठेवले होते.

हे डबे फार पटकन भरून जायचे ज्यामुळे सोसायटीच्या परिसरात नेहमी दुर्गंधी यायची.

खरेतर मुंबईसारख्या शहरात सोसायटीच्या बाहेर असा कचरा साठून राहणे हे नेहमीचेच तरीही या सोसायटीमधील लोकांचे असे मत पडले की आपल्या आजूबाजूला स्वच्छता हवी, आपला परिसर साफ हवा.

म्हणूनच या दुर्गंधीला वैतागून सोसायटीच्या सदस्यांनी बीएमसीकडे हे कचऱ्याचे डबे तिथून काढून टाकण्याची विनंती केली.

बीएमसीने सोसायटीला एक अट घातली की जर सोसायटी स्वतः सोसायटीच्या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला तयार असेल तरच ते कचऱ्याचे डबे हलवण्यात येतील.

खरेतर इथपासून या सोसायटीच्या झिरो गार्बेज कॅम्पेनची सुरुवात झाली.

पुढे महिन्याभर सोसायटीच्या सदस्यांसाठी वेगवेगळी शिबिरे भरवण्यात आली.

ज्यामध्ये त्यांना या कचऱ्याच्या समस्येची जाणीव करून देण्यात आली आणि कचऱ्याच्या वर्गीकरणाचे महत्व समजून देण्यात आले.

या दरम्यान सोसायटील्या सगळ्या कुटुंबांना सुका कचरा साठवण्यासाठी कचऱ्याचे डबे देण्यात आले.

ओला कचरा जिरवण्यासाठी सोसायटीच्या आवारात १० कॉपोस्ट पिट्स तयार करण्यात आल्या.

कचऱ्याचा हा प्रॉब्लेम खरेतर मुंबईच काय, इतर सगळ्या शहरांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे पण प्रशासन काही करेल याची वाट न बघता विजय नगर हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी कचरा कमी करण्याची सगळ्यात महत्वाची पहिली पायरी उचलण्याची जवाबदारी घेतली.

ती म्हणजे घरोघरी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण.

कचरा गोळा करताना सुद्धा या सोसायटीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करायला सुरुवात केली गेली.

या सोसायटीने १० कंपोस्ट पिट्स केले होते त्यात सगळ्या कुटुंबांचा ओला कचरा रिचवण्यात आला.

विजय नगर हाऊसिंग सोसायटीमध्ये ६००० किलो ओला कचरा निर्माण होतो ज्या सगळ्याचे कम्पोस्टिंग केले जाते.

तयार होणाऱ्या कंपोस्ट सोसाटीच्या आवारात फुलवलेल्या वेगवेगळ्या झाडांसाठी वापरण्यात येते.

कंपोस्ट तयार होण्याचे प्रमाण मात्र खूप जास्त असल्याने उरलेले कंपोस्ट इतर ठिकाणी विकले जाते.

ओला कचरा जिरवून खत तयार करायचे म्हटले की मनात येणारा सगळ्यात पहिला विचार असतो तो दुर्गंधीचा.

पण या दुर्गंधीच्या समस्येबद्दल बोलताना सुकृताजी सांगतात की सुरुवातीच्या काळात त्यांना सुद्धा कंपोस्ट पिट मधून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास झाला होता.

पण नक्की कंपोस्ट कसे करायचे? हे एक शास्त्र आहे.

ते शिकून घेऊन व्यवस्थित कम्पोस्टिंग केले तर अजिबात दुर्गंधी येत नाही.

त्यांनी सुद्धा हे शास्त्र समजून घेऊन काम सुरु केल्यावर दुर्गंधीची समस्या कायमस्वरूपी मिटली.

ओला कचरा जिरवून खत तयार करण्याचे प्रकल्प अनेक ठिकाणी, अनेक सोसायटीतून राबवले जाते पण विजय नगर हाऊसिंग सोसायटीने झिरो गार्बेज कॅम्पेन अंतर्गत कोरड्या कचऱ्याची सुद्धा विल्हेवाट लावायचा निश्चय केला होता.

सबंध सोसायटीमधून जो कोरडा कचरा येतो त्याचे वर्गीकरण करून त्यातला तो रिसायकल होण्यासारखा कचरा असतो तो रिसायकलिंग साठी पाठवला जातो.

पूर्ण सोसायटीतून ७,५०० किलो कचरा हा रिसायकलिंगला पाठवण्यात येतो.

म्हणजेच या सोसायटीमधून कचरा डेपोला किती कमी कचरा पाठवला जात असेल याची कल्पना केली जाऊ शकते.

एका शहरातील फक्त एका सोसायटीने कचरा कमी करायचे मनावर घेतले, त्यासाठी गरजेचे असलेले प्रशिक्षण घेतले व सोसायटीच्या इतर सदस्यांना पण त्याविषय मार्गदर्शन करून आपल्या कचऱ्याचे वर्गीकरण करायला सुरुवात केली आणि ओल्या कचऱ्याचे खत तर केलेच पण त्या बरोबरच सुक्या कचरा देखील रिसायकलिंग करून पर्यावरणाला फार मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे.

या सोसायटीच्या झिरो गार्बेज कॅम्पेन या प्रकल्पामुळे त्यांच्या संपूर्ण सोसायटीमधून कचरा डेपोला एका वर्षात जाणारा ९०,००० किलो कचरा कमी झाला.

यात काय केले तर फक्त कचऱ्याचे वर्गीकरण आणि कम्पोस्टिंगचा अभ्यास!

एका सोसायटीच्या प्रकल्पामुळे एवढ्या कचऱ्याचे उत्पादन कमी होऊ शकते तर आपल्या देशातील सगळ्या नागरिकांनी जर हा प्रकल्प राबविला तर शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न हा कायमस्वरूपीच संपेल नाही का?

सोसायटीचा आवार स्वच्छ राहावा म्हणून या सोसायटीतील लोकांनी मनावर घेऊन हा बदल घडवून आणला आणि त्यांच्यापरीने पर्यावरणाला त्यांनी हातभार लावला.

मित्रांनो, ‘Charity begins at home’ असे आपण म्हणतो..

मग त्याचप्रमाणे आपण कचरा कमी करायचा वसा हा आपल्यापुरता घेऊ शकतोच ना?

सुरुवातीला अगदी आपल्या घरापासून आपण याची सुरुवात करू शकतो आणि मग आपले काम बघून आपल्याला लोकांची साथ मिळेलच.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय