कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, ते वाचा या लेखात

त्वचा कोरडी पडणे म्हणजेच ज्याला वैद्यकीय भाषेत झेरोसीस म्हणतात हे अनेक कारणांमुळे होऊ शकते.

वातावरणातला बदल हे त्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

त्वचा जास्त काळासाठी कोरडीच राहिली, आणि त्यावर काही उपाय केला गेला नाही तर, त्वचेचा निस्तेज पणा वाढत जातो.

वातावरणात थंडी वाढली, आर्द्रता कमी झाली की काहींची त्वचा कोरडी पडायला लागते तर काहींना एखाद्या साबणाची, क्रीमची एलेर्जी येऊन कोरड्या त्वचेचा त्रास होऊ शकतो.

त्वचेला योग्य प्रमाणात मॉइश्चर न मिळाल्याने हा त्रास होतो.

हळूहळू त्वचेतील ओलावा कमी होत जातो आणि मग कोरडी पडायला लागलेली त्वचा दुखायला लागते, तिथे पांढरे डेड स्कीन सेल्स जमा होतात.

ड्राय स्कीन ही हेल्दी नाही हे जितके खरे आहे तितकेच अशी कोरडी पडलेली त्वचा दिसायला सुद्धा निस्तेज दिसते.

आपल्या दिसण्याचा, वागण्याचा आणि बोलण्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर फार प्रभाव असतो.

म्हणूनच या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे.

थंडी सुरु झाल्यावर या ड्राय स्कीनचा त्रास अनेकांना होतो.

बाजारात यावर काही क्रीम्स उपलब्ध असतीलही पण ती सगळ्यांनाच सूट होतील असे नाही.

पण या ड्राय स्कीनच्या त्रासावर आपल्याच घरात असलेल्या काही गोष्टी वापरून घरगुती उपाय करता येतात.

हे घरगुती उपाय करायला सुद्धा सोपे असतात, त्याला फार खर्च येत नाही, त्याचे काही विपरीत परिणाम नसतात पण उपयोग मात्र अगदी हमखास होतो.

त्वचेचा कोरडेपणा घालवून त्वचा टवटवीत करायचे काही सोपे, घरगुती उपाय :

१. खोबरेल तेल

आपल्या त्वचेच्या ज्या स्कीन सेल्स असतात त्यामध्ये मोकळी जागा असते.

खोबरेल तेल हे ईमोलिएन्ट आहे, म्हणजे ते या मोकळ्या जागेत जाऊन तिथला कोरडेपणा कमी करून तो भाग स्मूथ करते.

खोबरेल तेलामध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्समुळे त्वचेला पोषण मिळून तिचा रुक्षपणा जातो.

खोबरेल तेल हे उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
खोबरेल तेलाचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे ते कशातही न मिसळता सुद्धा वापरता येते.

बाहेरून घरी आल्यावर शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला आणि हातापायाला, जिथे कोरडी त्वचा असते तिथे, किंचित खोबरेल तेल लावले तर त्वचेचा कोरडेपणा हळूहळू कमी होतो.

बाहेर जाताना त्वचेला तेल लावणे टाळावे कारण त्यामुळे त्वचेवर धूळ बसायची शक्यता जास्त असते.

२. पेट्रोलीअम जेली

बाजारात सहज उपलब्ध असलेली पेट्रोलीअम जेली किंवा मिनरल ओईल कोरड्या त्वचेला ओलावा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

ही पेट्रोलीअम जेली आपल्या त्वचेवर एक थर तयार करते, जो एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे असतो.

या थरामुळे त्वचा ओलसर राहते, यामुळे आपल्या त्वचेला सतत मॉइश्चर मिळत राहते.

कधीकधी संपूर्ण त्वचेवर काही ठराविक भागातच कोरडेपणा येतो ज्यामुळे त्या भागाला खाज येते.

अशा ठराविक भागांना जरी ही जेली लाऊन ठेवली तरी तिथला कोरडेपणा जाऊन खाज कमी व्हायला मदत होते.

३. आहारात बदल

त्वचा कोरडी पडते म्हणजे आपल्या त्वचेच्या पेशींना काही कारणाने इजा पोहोचून त्या खराब होत असतात.

म्हणूनच त्वचेच्या पेशींना निरोगी ठेवण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न केले पाहिजेत.

यासाठी आपल्या आहारात बदल करून आपण अशा काही पदार्थांचा समावेश करू शकतो ज्यामुळे आपल्या शरीरातून टॉक्झिन्स बाहेर पडून शरीरातल्या पेशी निरोगी होण्यासाठी मदत होईल.

यासाठी ज्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात अशा भाज्या आणि फळे आहारात जास्त प्रमाणात असू द्यावी.

त्वचा टवटवीत होण्यासाठी फायदेशीर असलेली भाज्या/फळे म्हणजे टोमॅटो, गाजर, मोड आलेली कडधान्ये.
याशिवाय ज्या खाद्यपदार्थांमध्ये ओमेगा- 3 फॅटी ऍसिडस् असतात, जसे की मासे, असे पदार्थ आहारात जास्त प्रमाणात घेतल्याने त्वचेला फायदा होतो.

४. हातांना जपा

कधीकधी चेहऱ्यापेक्षा सुद्धा तळहाताची त्वचा सतत कोरडी पडते.

कारण आपण वारंवार हात वेगवेगळ्या साबणाने धुतो.

तसेच भांडी घासताना किंवा कपडे धुताना सुद्धा आपल्याला डिटर्जेंटचा वापर करावा लागतो जे की त्वचेसाठी चांगले नसतेच.

त्यात जर त्वचा आधीच ड्राय असेल तर अशाप्रकारच्या केमिकल्सच्या संपर्कात आल्यावर अजूनच ड्राय होते.

म्हणून भांडी घासताना, कपडे धुताना किंवा इतर साफसफाईची कामे करताना हातात रबर ग्लोव्ह्स घालून काम करणेच फायद्याचे आहे. तसेच पाण्यात किंवा साबणात जास्त वेळ हात राहिला तर हाताला खोबरेल तेल लावून ठेवल्याने तिथली त्वचा लवकर कोरडी पडत नाही.

थंडीच्या दिवसात सुद्धा तापमान खूप खाली गेले तर तळहाताच्या नाजूक त्वचेवर लगेच परिणाम होऊन ती त्वचा कोरडी पडायला लागते.

अशावेळेला लोकरीचे हातमोजे वापराने हा एक चांगला पर्याय आहे.

५. कोमट पाण्याने अंघोळ करा

वातावरणात बदल होऊन थंडी जास्त पडायला लागली की आपण अंघोळीला जास्त गरम पाणी वापरायला सुरुवात करतो.

या गरम पाण्याने आपल्याला बरे जरी वाटत असले तरी आपल्या त्वचेसाठी मात्र ते धोकादायक असते.

जास्त गरम पाणी वापरल्याने त्वचा जास्त रुक्ष होऊ शकते.

म्हणून बाहेरच्या तापमानात बदल झाला तरी जास्त गरम पाणी अंघोळीसाठी न घेता कोमट पाण्याने अंघोळ करावी.

६. केमिकलयुक्त साबण आणि सौन्दर्य प्रसाधने टाळा

काही साबण, परफ्युम यामुळे सुद्धा त्वचेवरचे मॉइश्चर जाऊन त्वचा रुक्ष पडू शकते.

म्हणून अशा सौन्दर्यप्रसाधनांची निवड करताना काळजीपूर्वक करा.

तसेच पोहायला जात असाल तर क्लोरीन युक्त पाण्याचा त्रास होऊन सुद्धा त्वचा कोरडी पडू शकते.

त्यामुळे आपल्याला काय चालते, कशामुळे त्रास होतो याचा आढावा घेऊन ज्या गोष्टींमुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता आहे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.

केमिकल साबण किंवा इतर सौन्दर्यप्रसाधने वापरण्यापेक्षा घरगुती केमिकल विरहित उटणे किंवा खोबरेल सारखे मॉइश्चरायसिंग तेल वापरण्यावर जास्त भर दिला पाहिजे.

७. कोरफड

जर थंडीमुळे किंवा अजून कशामुळे तळहात आणि तळपाय कोरडे पडत असतील तर कोरफड अतिशय चांगला उपाय आहे.

असे होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर तळहाताला आणि तळपायाला चोळून, तो पुसला जाऊ नये म्हणून हातमोजे आणि पायमोजे घालून झोपावे. हा उपाय नियमियपणे केल्याने हातापायाच्या त्वचेचा कोरडेपणा जाण्यासाठी मदत होते.

त्वचा काही कारणाने कोरडी पडत असेल तर काय घरगुती उपाय करायचे हे आपण बघितले.

पण काही लोकांची त्वचा मुळातच ड्राय असते. अशा लोकांनी त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करायचे?

त्वचा तेलकट असो किंवा ड्राय, सतत पाण्याने चेहरा धुवत राहणे हे अत्यंत गरजेचे आहे.

१. त्वचेला कुठेही खाज आल्यास नखाचा वापर करून जोरजोरात खाजवू नये. ड्राय स्कीन असेल आणि असे केले तर तिथे जखमा होण्याची शक्यता असते.

२. कामाच्या निमितान्ने खूप वेळ एसीमध्ये बसावे लागत असेल तर चेहऱ्याला थोड्या थोड्या वेळाने मॉइश्चराझर लावायला हवा.

३. अंघोळीनंतर त्वचा कोरडी करताना कॉटनच्या पातळ कपड्याने पाणी अलगद टिपून घ्यावे. टॉवेलने घासून अंग कोरडे करणे टाळावे.

४. खूप केमिकल असलेली सौंदर्यप्रसाधने वापरू नयेत.

५. खूप घट्ट कपडे, जे अंगावर घासले जातात, घालणे टाळावे.

तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय