सौंदर्य आणि आरोग्यासाठी कोरफडीचे चमत्कारिक फायदे

सौंदर्य प्रसाधनांमधील, हेल्द ड्रिंक्स, टॉनिकमधील एक अतिशय महत्वाचा घटक, ‘कोरफड‘ म्हणजेच ‘एलो व्हेरा‘.

या झाडाचे महत्व इतके आहे की हे झाड किंवा त्याचे उपयोग माहीत नसलेला विरळाच म्हणावा लागेल.

आपण वापरतो ते शाम्पू, क्रीम्स, फेस वॉश सगळ्यातच कोरफडीचा गर असतो.

आपण सुद्धा कोरफडयुक्त प्रसाधने अगदी आवर्जून घेतो कारण ती त्वचेसाठी चांगली असतात.

कोरफड त्वचेसाठी चांगली असते यात काही शंका नाहीच पण बऱ्याचदा कोरफडीची प्रसाधने बऱ्याच जास्त किंमतीला विकली जातात.

कोरफडीचे झाड हे कॅकटससारखे असते आणि ते कुंडीत किंवा जमिनीत अगदी सहज वाढवता येते.

खरेतर हे झुडूपच असते. याच्या काटेरी पानांमध्ये असणारा गर बहुगुणी असतो.

या गरात ९६ टक्के पाणी आणि ४ टक्के प्रोटीन्स, व्हिटामिन ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ खूप भरपूर प्रमाणात असतात.

यामुळेच या गराचे औषधी मूल्य जास्त असते.

कोरफडीच्या या औषधी गरापासून जेल घरच्याघरी तयार करता येते.

हे घरी तयार केलेले कोरफडीचे जेल आपण त्वचेसाठी तर वापरू शकतोच पण त्याच बरोबर आपल्या इतर अनेक तक्रारींवर उपाय म्हणून वापरू शकतो.

आजकाल ज्या प्रमाणे प्रत्येक सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत कोरफडीचे महत्व सांगितले जाते त्याचप्रमाणे आयुर्वेदात सुद्धा कोरफडीचे अनेक उपयोग सांगितले जातात.

आपण या लेखात कोरफडीचे गुणधर्म आणि उपयोग तर बघणार आहोतच पण त्याचबरोबर कोरफडीच्या ताज्या पानांचा वापर करून त्यातून जेल आणि ज्युस कसे तयार करायचे हे सुद्धा आम्ही या लेखाच्या शेवटी सांगणार आहोत.

कोरफडीचे उपयोग

त्वचेसाठी

कोरडी त्वचा असो किंवा तेलकट, उन्हाळा असो वा हिवाळा..

कोरफड त्वचेसाठी वापरली जाऊ शकते.

कशी? ते बघूया.

कोरफडीमध्ये व्हिटामिन ‘सी’ आणि ‘ई’ जास्त प्रमाणात असतात.

यामुळे वाढत्या वयाबरोबर चेहऱ्याला पडणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते.

कोरफडीचा गर पोटातून घेतल्याने पोटातले विकार दूर होतात.

बऱ्याचदा त्वचेच्या खूपशा तक्रारी या पोट साफ नसल्याने होतात.

त्यामुळे कोरफड ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा जेणेकरून पोट साफ होऊन त्वचा क्लिअर होईल.

कोरफडीचा गर त्वचेवर लावल्याने सर्न बर्न, उन्हात फिरल्यामुळे काळी पडलेली त्वचा (tan) तसेच स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी उपयुक्त असतो.

१. कोरड्या त्वचेसाठी – थोडा कोरफडीचा गर, अर्धा चमचा हळद, एक चमचा मध, एक चमचा दुध आणि गुलाब पाण्याचे काही थेंब मिसळून फेसपॅक तयार करता येतो.

हा फेसपॅक चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनिटे लाऊन मग थंड पाण्याने धुवून टाकावा.

२. टॅन कमी करण्यासाठी – अर्धी वाटी ताजे कोरफडीचे जेल, एक कप मसूर डाळीचे जाडसर पीठ आणि दोन चमचे लिंबाचा रस एकत्र करून घरच्याघरी कोरफडीचा स्क्रब तयार करता येतो.

हा स्क्रब उन्हामुळे आलेला काळपटपणा घालवण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

जाडसर मसूर डाळीच्या पिठामुळे त्वचेवरच्या डेड स्कीन सेल्स निघून जायला मदत होते, कोरफडीच्या गरामुळे त्वचा स्वच्छ होते आणि लिंबाच्या रसामुळे त्वचेवरचे डाग आणि व्रण नाहीसे होतात.

३. एक्ने (पिप्म्पल्स) कमी करण्यासाठी – कोरफडीचे जेल आणि दोन अक्रोड याची मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करून घ्यायची.

त्यात चमचाभर मध घालून मिक्स करून घ्यायचे आणि चेहऱ्याला लाऊन सुकेपर्यंत ठेवायचे.

४. सेन्सिटीव्ह त्वचेसाठी – कोरफडीचे जेल, त्यात दोन तीन चमचे काकडीचा गर घालून पेस्ट तयार करून घ्यायची.

चेहऱ्याला साधारण वीस मिनिटे लाऊन मग धुवून टाकायची.

सेन्सिटिव्ह त्वचेला सहसा इतर कोणतीच प्रसाधने चालत नाहीत पण हा उपाय मात्र हमखास लागू पडतो.

५. सुरकुत्या कमी करण्यासाठी – रात्री झोपताना कोरफडीचा गर चेहऱ्याला, मानेला लाऊन झोपायचे.

६. भाजल्यावर – भाजलेल्या त्वचेवर तातडीने करण्याचा उपाय म्हणजे भाजलेल्या जखमेवर कोरफड जेल लावायचा.

यामुळे थंड वाटते. भाजलेल्याचे डाग, व्रण जाण्यासाठी सुद्धा नियमितपणे त्यावर जेल लावल्याने फायदा होतो.

७. डोळ्यांसाठी – कोरफडीचा जेल फ्रीजरमध्ये बर्फाच्या साच्यात घालून घट्ट करून घायचा आणि मग रुमालात घालून डोळ्यांवर अलगद ठेवायचा.

यामुळे डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे कमी होतात आणि डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी

सौंदर्य प्रसाधनांइतकेच हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कोरफडीचे महत्व आहे.

खूप प्रमाणात आढळणाऱ्या व्हिटामिन आणि मिनरल्समुळे कोरफडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

त्यातील वजन कमी करणे हा एक महत्वाचा फायदा आहे.

१. कोरफडीचा ज्यूस – कोरफडीमध्ये जास्त प्रमाणात अढळणाऱ्या antioxidants मुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढतेच पण त्याचबरोबर त्याच्यातील जास्त प्रोटीनच्या प्रमाणामुळे शरीरातील फॅट कमी होऊन मसल्स वाढायला उपयोग होतो.

खरेतर कोरफडीची चव अत्यंत कडू असते त्यामुळे कोरफडीच्या ताज्या पानातून गर काढून त्यात थोडे पाणी मिसळून मिक्सरमधून त्याचा ज्यूस काढताना त्यात एखादे फळ घातल्याने कडवटपणा कमी होतो.

कडवटपणा कमी करण्यासाठी कोरफडीच्या ताज्या रसात चमचाभर मध आणि अर्धे लिंबू सुद्धा पिळू शकतो पण साखरेचा वापर टाळावा कारण साखरेमुळे वजन वाढते.

रोज नियमितपणे हा रस घेतल्याने वजन कमी होते.

केसांसाठी

कोरफड केसांच्या एकूण आरोग्यासाठीच अतिशय लाभदायक आहे.

कोरफडीच्या नियमित वापराने डोक्यातला कोंडा, खाज जाते, केसांची वाढ होते आणि केस मुलायम होतात.

तसेच केसांना एक नैसर्गिक चकाकी येते. कोरफड ही केसांसाठी एक उत्तम कंडीशनर आहे.

१. कोरफडीचा हेयर पॅक – चार चमचे कोरफडीचा रस, चार चमचे खोबरेल तेल याचे मिश्रण करून केसांना रात्रभर लाऊन ठेवायचे आणि सकाळी नेहमीसारखे केस धुवून घ्यायचे.

दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसातून एकदा जरी हा उपाय केला तरी केस जास्त मुलायम होतात आणि केसांची वाढ सुद्धा चांगली होते.

कोरफडीचे इतके फायदे आहेत म्हणून तर त्वचेच्या आणि केसांच्या जवळजवळ सगळ्या उत्पादनात ती वापरली जाते.

पण घरच्याघरी कोरफड कुंडीत किंवा बागेत लाऊन त्याचा ताजा जेल तयार करून वापरणे हे स्वस्त सुद्धा असते.

आणि यामुळे आपण इतर केमिकल्सचा केलेला वापर टाळू सुद्धा शकतो.

म्हणूनच या लेखाच्या पुढच्या भागात आपण बघू की कोरफडीचा जेल आणि ज्यूस कसा तयार करायचा.

१. दोन तीन वर्ष चांगले वाढलेले कोरफडीचे झुडूप असलेले बरे.

२. एका वेळेला तीन चार चांगला गर भरलेली कोरफडीची पाने खालच्या बाजूने कात्रीने व्यवस्थित कापून घ्यावी.

३. पानांवरची धूळ जाण्यासाठी ती व्यवस्थित धुवून, पुसून घ्यावीत.

४. पानांच्या कडेला असलेले काटे सुरीने काढून घ्यावेत आणि पान कडेने कापून उघडे करावे.

आता आतमध्ये जो गर असेल त्याचा वापर जेल व ज्युस तयार करण्यासाठी वापरावा.

५. पान उघडल्यावर त्यातून पिवळ्या रंगाचा रस बाहेर पडेल तो पूर्णपणे जाऊ द्यावा.

६. आता आतील गर चमच्याने किंवा सुरीने काढून घेऊन त्याचे सुरीने बारीक तुकडे करून घ्यावेत.

जेल तयार करयला हा गर मिक्सरमधून बारीक करून गाळण्याने गाळून घ्यावा.

हे जेल एखाद्या डबीत भरून ठेऊ शकतो. याचा वापर थेट त्वचेवर लावण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो

किंवा वर सांगितल्या प्रमाणे घरगुती फेस किंवा हेयर पॅक सुद्धा करता येतात. हे जेल फ्रीजरमध्ये ठेवता येते.

ज्युस तयार करायला २ चमचे जेल, २ कप पाणी हे एकत्र मिक्सरमधून बारीक करून आणि त्यात आवडीप्रमाणे एखादे गोडसर चवीचे फळ, खजूर किंवा मध घालावा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय