नखांचा पिवळसरपणा घालवण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात

नखांचा पिवळसरपणा घालवण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात

आपला आत्मविश्वास अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.

आपले बोलणे, वागणे, चार चौघात वावरण्याची रीत या गोष्टी तर महत्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या दिसण्यापेक्षा सुद्धा आपले राहणीमान, कपड्यांचा व्यवस्थितपणा, केसांची ठेवण, नीटनेटकेपणा या गोष्टी महत्वाच्या असतात.

म्हणूनच आपले व्यक्तिमत्व आकर्षक व्हावे, आपला समोरच्या माणसावर चांगला प्रभाव पडावा यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

आपण जर नीटनेटके, व्यवस्थित राहिलो तर आपोआपच आपल्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास येतो.

यासाठी आपण काही गोष्टी जपल्या पाहिजेत जसे की स्वच्छ, इस्त्रीचे कपडे घालणे, आपल्या त्वचेची, केसांची काळजी घेऊन ते जास्तीजास्त आरोग्यपूर्ण दिसतील यासाठी प्रयत्न करणे.

हे सगळे करायला सोपे जावे म्हणून आम्ही वेळोवेळी उपयुक्त टिप्स तुमच्यासाठी देत असतो.

या सगळ्याबरोबरच अजून एका गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे आपली नखे.

नखे नेहमी व्यवस्थित कापलेली हवीत, वेडीवाकडी वाढलेली नखे अनाकर्षक दिसतात पण त्याचबरोबर कधीकधी काही कारणाने नखे पिवळसर दिसतात.

यामुळे आपल्याला अनेकदा अवघडून गेल्यासारखे होते.

शिवाय अर्धवट वाढलेली, अस्वच्छ नखे असतील तर त्यातून खाताना आपल्या तोंडात जंतू जाण्याची शक्यता असते.

याचसाठी नखांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना स्वच्छ ठेवण्याबरोबरच पंढरेशुभ्र कसे ठेवायचे हे माहीत असणे गरजेचे आहे.

मग हा नखांचा पिवळसरपणा कसा घालवावा?

त्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. या लेखातून आपण याच घरगुती उपयांबद्दल जाणून घेणार आहोत.

१. हायड्रोजन पेरोक्साईड आणि बेकिंग सोडा

हायड्रोजन पेरोक्साईड आणि बेकिंग सोडा हे दोन्ही पदार्थ डाग घालवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

या दोन्ही घटकांचा नखे साफ करण्यासाठी आणि नखांचा पिवळसर रंग घालवण्यासाठी दोन पद्धतीने वापर करता येतो.

मेनिक्युअर, पेडिक्युअर मध्ये सुद्धा याचा वापर होतो.

पद्धत १

एक छोटा चमचा हायड्रोजन पेरोक्साईड आणि एक मोठा चमचा बेकिंग सोडा हे थोड्याशा कोमट पाण्यात व्यवस्थित, दोन्ही पावडरी विरघळेपर्यंत कालवून घ्यायचे.

नंतर त्या पाण्यात साधारण १० मिनिटे हात किंवा पाय बुडवून ठेवायचे.

१० मिनिटांनी साबण वापरून साध्या पाण्याने हात धुवून घ्यायचे.

यामुळे हात किंचित रुक्ष होण्याची शक्यता असते म्हणूनच हा उपाय करून झाल्यावर हाताला खोबरेल तेल किंवा क्रीम लावावे.

पद्धत २

एक चमचा हायड्रोजन पेरोक्साईड घेऊन त्यात मावेल तेवढा बेकिंग सोडा घालून, व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची.

कापसाच्या बोळ्यावर ही पेस्ट घेऊन ती पूर्ण नखांवर लाऊन घ्यावी.

साधारण पाच मिनिटे हे नखांवर राहू द्यावे व नंतर कोमट पाण्याने हात धुवून घ्यावेत.

२. लिंबू आणि साबण

या उपायासाठी आपल्या घरात अगदी सहज मिळणाऱ्या गोष्टींची गरज असते, ती म्हणजे लिंबू आणि साबणाचे पाणी.

लिंबात असणाऱ्या सायट्रिक ऍसिड मुळे नखांवर पडलेले डाग फिकट होतात आणि साबणामुळे त्यावर अडकलेली धूळ निघून जायला मदत होते.

यासाठी एका भांड्यात साबणाचे पाणी करून त्यात अर्धे लिंबू पिळून घ्यावे.

या पाण्यात पाच मिनिटे हात/पाय बुडवून घेऊन मग साध्या पाण्याने धुवून घ्यावेत.

हे नियमितपणे केल्याने हळूहळू नखांवर पडलेले डाग फिके होत जातील.

३. व्हिनेगर

आपल्या घरातील वस्तूंवर पडलेले डाग काढायला ज्या प्रमाणे व्हिनेगरचा वापर केला जातो त्याचप्रमाणे नखांवरचे डाग काढण्यासाठी सुद्धा व्हिनेगर उपयुक्त आहे.

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चमचाभर व्हिनेगर घालून मिक्स करून घ्यायचे.

या मिश्रणात हात/पाय बुडवून ठेवायचे.

पाच ते दहा मिनिटांनंतर हात किंचित कोमट पाण्याने पाण्याने धुवून घ्यायचे.

यामुळे नखांवर पडलेले डाग कमी होतील तसेच नखांचा पिवळसरपणा जाऊन नखे पांढरीशुभ्र दिसायला लागतील.

४. ऍसिटोन

कधीकधी बायकांना हा त्रास जाणवतो की एखादे डार्क कलरचे नेलपॉलिश वापरल्यानंतर त्याचे काही डाग नखांवर शिल्लक राहतात.

यासाठी डार्क कलरचे नेलपॉलिश वापरून झाल्यानंतर, ते जायला आले की नेलपॉलिश रिमूव्हरने नखे साफ करून घ्यावीत.

जर त्यानंतर सुद्धा नखांवरचे डाग जात नसतील तर कापसाच्या बोळ्यावर किंचित ऍसिटोन घेऊन त्याने नखे व्यवस्थित चोळून घ्यावीत.

बायकांनी आपल्या दिसण्याची काळजी घेताना ही गोष्ट आवर्जून पाळली पाहिजे कारण ज्या प्रमाणे अर्धवट कापलेली किंवा वेडीवाकडी वाढलेली नखे दिसायला चांगली दिसत नाहीत त्याप्रमाणेच अर्धवट नेलपेंट निघालेली किंवा नेलपेंटचा डाग राहिलेली नखे सुद्धा दिसायला वाईट दिसतात.

५. लिंबाचा रस

लिंबात अढळणाऱ्या सायट्रिक ऍसिडचा डाग घालवण्यासाठी उपयोग होतो.

लिंबाच्या रसाचा वापर तीन पद्धतीने केला जाऊ शकतो.

पद्धत १

नखांचा पिवळसरपणा घालवण्यासाठी हा अत्यंत सोपा उपाय आहे.

लिंबाच्या रसात कापूस बुडवून तो नखांवर चोळून अर्धा तास ठेवायचा आणि मग हात धुवून घ्यायचे.

वापरलेल्या लिंबाचे साल जरी नखांवर चोळले तरी चालते.

यामुळे हा उपाय अगदी सहज, कसलीच पूर्वतयारी न करता, कसली साधनसामुग्री गोळा न करता केला जाऊ शकतो.

पद्धत २

एक चमचा लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र व्यवस्थित मिक्स करून पेस्ट करून घ्यायची.

हि पेस्ट कापसाचा वापर करून नखांवर व्यवस्थित लाऊन ठेवायची आणि साधारण पंधरा मिनिटांनी साबणाने हात स्वच्छ धुवून घ्यायचे.

पद्धत ३

एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा मीठ घालून हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट%