चणा डाळीचे हे अनोखे फायदे माहीत आहेत का तुम्हाला? जाणून घ्या..!

संतुलित आहारासाठी जगभरात चणाडाळीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होतो.

खाण्यासाठी जरी डाळींचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी जेवणामध्ये चणाडाळ ही हवीच.

चणाडाळ हा भारतात बनवला जाणारा मुख्य घटक आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

जे लोक फक्त शाकाहार करतात त्यांना आहारात झिंक, कॅल्शियम, प्रोटीन असे विविध घटक मिळवण्यासाठी चना डाळीचे सेवन हा उत्तम पर्याय आहे..

या सर्व घटकांमध्ये ऊर्जेचे प्रमाण मुबलक असल्याने त्याचा फायदा शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी होतो.

आता आपण या लेखात पाहणार आहोत चणाडाळीचे लाभदायक फायदे कोणते

१. शक्तीचा पुरवठा करते

माणसाला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शक्तीची गरज भासते.

३० ग्राम चणाडाळ ही शरीराला जवळजवळ १०० कॅलरीज, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पुरवते.

एक कप शिजवलेली चणाडाळ आपल्याला ३३% प्रोटीन एका दिवसात पुरवू शकते.

२. हृदयासाठी अत्यंत उपयुक्त

चणाडाळी मुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल वाढवण्याला आळा बसून हृदयाचे आरोग्य राखायला मदत होते.

त्याच बरोबर रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत होते.

चणाडाळी मुळे homocysteine ची शरीरातील पातळी योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत होते.

त्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी होत नाहीत.

तसेच त्यातील लोह शरीरातील रक्तवाहिन्यांना आराम देण्याचे कार्य करते.

३ स्नायू बळकट करण्यास फायदेशीर

चणाडाळीतुन मिळणारे प्रोटीन शरीरातील स्नायूंना मजबुती देतात.

स्नायू बळकट व्हावे असं वाटत असेल तर रात्री भिजवलेले चणे किंवा चणाडाळ सकाळी नाश्त्यात खाण्याची सवय लावून घ्या!!

१०० ग्राम चणाडाळीमध्ये मध्ये प्रत्येकी १३ ग्राम प्रोटीन असते.

शाकाहार खाणाऱ्यांसाठी प्रोटीनचा हा उत्तम स्रोत मानला जातो.

चणाडाळीमध्ये असणारे अमायनो अ‍ॅसिड रक्तपेशींना अतिशय चांगल्या प्रकारे मजबुत करतात.

त्याने हिमोग्लोबीनची पातळी सुधारल्यावर रक्ताची कमतरता भरून निघण्यास उत्तमरीत्या मदत होते.

४. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते

शरीराला निरनिराळ्या घातक रोगांपासून आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाचवत असते.

जेव्हा कोणता ही विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या शरीरात असणाऱ्या चांगल्या सुरक्षा पेशी त्याविरुद्ध लढा देऊ लागतात.

आणि आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतात.

चणाडाळी मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे घटक नैसर्गिकरित्या असतात.

म्हणून नियमितपणे चणाडाळीचे सेवन करणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती मजबूत असते.

५. रोगाला आटोक्यात ठेवते

चणाडाळीचा हा सर्वात उपयुक्त आणि महत्वाचा फायदा आहे असे म्हंटले तरी चालेल.

यात असणारे फॉलिक ऍसिडचे घटक रोगांचा शरीरात प्रसार होण्यापासून बचाव करते.

उन्हाची झळ, मानसोपचार, डिप्रेशन इत्यादी रोगांवर चणाडाळ उपायकारक ठरते.

चणाडाळी मुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, तसेच कावीळ सारख्या गंभीर रोगामध्ये देखील याचा उपाय फलदायी होतो.

६. दातांसाठी आणि हाडांसाठी उपयुक्त

आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम हा घटक खुप महत्वाची भूमिका निभावतो.

कॅल्शियम मुळे आपले दात आणि हाडे मजबूत राहण्यास मदत होते.

कॅल्शियम मिळण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे दूध व दुग्धजन्य पदार्थ.

जर तुम्हाला हे आवडत नसेल किंवा शरीर प्रवृत्ती जर ‘लॅक्टोज इंटोलरन्स’ ची असेल तर कॅल्शियम मिळवण्यासाठी चणाडाळ हा उत्तम पर्याय आहे.

वैज्ञानिक प्रयोगामध्ये हे सिद्ध झालंय की चणाडाळी मुळे शरीरातील हाडे बळकट आणि वजनदार होतात म्हणजेच ‘बोन डेन्सीटी’ वाढते.

मधुमेहा मध्ये देखील चणाडाळीचा उपयोग योग्य प्रकारे होतो.

त्याने रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात आणण्यास मदत होते.

७. रक्तदाब कमी करते

चणाडाळीमध्ये असणारे पोटॅशियमचे योग्य प्रमाण आणि सोडीयम ची कमी मात्रा रक्तदाबासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

शरीरातील इलेक्ट्रोलाईटची मात्रा कमी झाली की रक्तदाब, चक्कर येणे, हाडांची समस्या, हृदय विकार इत्यादी सर्व गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.

चणाडाळीचे सेवन केल्याने रक्तवाहिन्या आकुंचन व प्रसरण पावण्याचे काम सुरळीत होते.

त्याने रक्तदाब योग्य राहतो. व हृदयविकाराचा धोका टळतो.

यात असलेले झिंकचे प्रमाण शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हातभार लावते.

८. फायबरचे प्रमाण जास्त

चणाडाळी मध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. एक वाटी शिजवलेली चणाडाळ सुमारे ५४% फायबर शरीराला पुरवते.

शरीराला पुरेसे प्रथिने मिळाले की आपली पचनसंस्था देखील सुरळीत कार्य करते.

तसेच याचा पदार्थ खाल्ल्याने पूर्ण दिवस उत्साही असल्यासारखे वाटते.

चणाडाळ ही फॅट आणि कोलेस्टेरॉल फ्री आहे. ज्यामुळे वजन वजन कमी करायला उपयुक्त होते.

जेवणात योग्य प्रमाणात याचा वापर केल्याने वजन मेंटेन ठेवता येऊ शकते.

चणाडाळीचा आणखी एक लाभदायक गुणधर्म म्हणजे ही डोळ्यांसाठी खुपच चांगली असते.

यात असणारे झिंक रातांधळेपणा रोखण्यात उपयोगी ठरते.

हे शरीराला व्हिटॅमिन A पुरवते म्हणून रातांधळेपणा मध्ये उपचारासाठी चणाडाळ आहारात वापरण्याचा सल्ला दिला जातो.

चणाडाळीचे इतर काही फायदे

जेव्हा तुम्ही चणाडाळ विकत घ्याल तेव्हा सेंद्रिय प्रकारामध्ये विकत घ्या.

सेंद्रिय चणाडाळ ही विना कीटकनाशकांच्या वापराशिवाय पिकवतात.

चणाडाळीचे आणखी काही फायदे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पाककृती करून त्याचा उपयोग जेवणात करा.

जस की चणाडाळीचे वरण किंवा आमटी, इडली, पॅनकेक, चणा डाळीचे लाडू हा तर दिवाळीत सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतोच. पण तळीव पदार्थांचे सेवन मात्र टाळावे.

चणाडाळ बहुगुणी आहे. याचा समावेश चौरस आहारात ही होऊ शकतो.

तुम्ही याचा उपयोग करून सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण तसेच रात्रीचे जेवण यात ही करू शकता.

जगभरात प्राचीन काळापासून सौंदर्य साधनेला, विविध प्रसाधनांना विशेष महत्व आहे. आपल्या पूर्वजांनी जेव्हा हे सगळे क्रीम, लोशन वगैरे प्रकार अस्तिवात ही नव्हते तेव्हापासून डाळीच्या पीठाचा उपयोग त्वचेसाठी केला आहे.

सौंदर्य खुलवण्यासाठी चणाडाळीचं पीठ म्हणजेच बेसन अत्यंत रामबाण घरगुती उपाय आहे.

हे पीठ पाण्यात कालवून त्यात थोडी आंबे हळद मिसळून त्याने नुकत्याच जन्मलेल्या बाळाला न्हाऊ-माखू घातले तर त्याच्या अंगावर असलेली अतिरिक्त लव (केस) लवकर निघून जाऊन बाळाचा रंग खुलण्यास मोलाची मदत होते.

चणाडाळ मधील घटक गर्भवती स्त्रियांसाठी ऊर्जेचे उत्तम स्रोत ठरू शकतात.

गर्भवती स्त्रियांसाठी चणाडळीचे वरण, हा आई आणि गर्भातल्या बाळासाठी आहाराचा चांगला पर्याय ठरतो.

यातील फॉलिक ऍसिड बाळाचा मेंदू आणि पाठीचा कणा यास जन्मतः होणाऱ्या शारीरिक दोषांपासून वाचवते.

तसेच गर्भवती स्त्रीच्या शरीरातील लाल पेशी वाढण्याचे काम ही करते. यामुळे बाळाची वाढ ही व्यवस्थित होते.

अशी हि बहुगुणी चणाडाळ आपल्या स्वयंपाकघरात असलीच पाहिजे, हे आता तुम्हाला पटलेच असेल.

हरभरा डाळीचा पराठा रेसिपी

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय