जगणं सोपं आणि सुंदर करणाऱ्या या दहा सवयी आहेत का तुमच्यात?

माणसाच्या सवयी ह्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असतात.

त्या सवयी त्या माणसासोबत असणाऱ्या आजूबाजूच्या माणसांवर देखील प्रभाव पाडत असतात.

रोजच्या रोज ब्रश करणे, अंघोळ करणे, टापटीप राहणे आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार होणे या माणसाच्या चांगल्या सवयी म्हणून ओळखल्या जातात.

रोजच्या रोज माणसाचा हाच दिनक्रम असल्यास, सवयीने त्याचा मेंदू या गोष्टींची नोंद करून ठेवत असतो.

आणि सकाळी उठल्यापासून त्या व्यक्तीचा कसा दिनक्रम राहील याच्या मनाला सूचना देत असतं.

संकटसमयी कसे निर्णय घ्यावे याची निर्णयक्षमता या वक्तशीरपणाच्या सवयीमुळे आपोआप वाढीस लागते..!

म्हणूनच पूर्वीच्या काळी माणसांचा ठराविक दिनक्रम ठरलेला असायचा, पहाटे पासून ते रात्री झोपेपर्यंत अगदी सगळ्या गोष्टी त्यात काडीमात्र ही बदल न होता जशाच्या तशा होत.

वक्तशीरपणाचा हा उत्तम नमुनाच होय..

माणूस म्हंटल की त्याच्या निरनिराळ्या तऱ्हा तितक्याच वेगवेगळ्या गोष्टी…

त्याच्या सवयींचा पण वेगळाच भाग असतो असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

ठराविक सवयी ते परिस्तिथीजन्य घडण्यात येणाऱ्या सवयी असे काहीसे याचे भाग आपण या लेखात पाहणार आहोत.

काही अशा सवयी असतात ज्या आपल्या रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग असतात.

त्या सवयीचे आपल्या जीवनात महत्वपूर्ण स्थान असते, पण त्या आपण लक्षात घेत नाही.

उदा. रोज ब्रश करणे, बाहेर जाण्यासाठी घरातील कपडे बदलून वेगळे कपडे घालणे, छान तयार होणे.

काहींसाठी ही सवय महत्वाची असते तर काहींसाठी नसते.

“इथंच तर जायचंय.. त्यात कशाला आवरायला हवं?”

असं म्हणून आहे त्या कपड्यांवर स्लीपर थ्री फोर्थ घालून निघणारे महाभाग ही पृथ्वीवर असतात..!

पण इथंच जरी जायचं म्हंटल तरी बाहेर जाण्यासाठी बटन तुटलेला, खिशाजवळ बीळ पडलेला, किंवा रंग उडालेला असे काही प्रकार घडलेला शर्ट न घालता नीट स्वच्छ धुतलेला शर्ट घालून, व्यवस्थित भांग वगैरे पाडून बाहेर निघणारे टापटीप लोग ही याच पृथ्वीवर आहेत.!

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नुसतं दिसणं महत्वाचं नसून त्यासोबतच उत्तम आरोग्य, सकस आहार, फिरणे, पुस्तके वाचणे, या गोष्टी पण महत्वाच्या ठरतात.

काही सवयी माणसासाठी फायदेशीर असतात तशा काही घातक म्हणजेच अपायकारक ही असतात.

जसे की भरपूर राग येणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, इतरांना मनाला लागतील असे टोमणे मारणे, असे सर्व.

यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी या उपयुक्तच ठरतात, याने फार काही फायदा जरी नाही झाला तरी फारसे नुकसान देखील होत नाही हे ही तितकेच खरे..!

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाईट सवयींवर मात करून चांगल्या सवयी अंगी बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. ज्याने तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी पोहोचण्याचा मार्ग जास्त सुकर होतो.

आता आपण अशा १० गोष्टी या लेखात पाहणार आहोत ज्या आपल्याला विकासाच्या दिशेने नेतील.

१. दिवसाची सुरुवात करा चिंतनाने.

धकाधकीच्या या युगात दिवसभर उत्साही जर रहायचं असेल तर पहाटे उठून नक्कीच थोडावेळ चिंतनामध्ये घालवा.

याने आणीबाणीच्या काळात, ऑफिस मध्ये महत्वाचे तात्काळ निर्णय घेण्याचा क्षमतेत नक्कीच मोठा फायदा होतो..!

चिंतनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कितीही मोठं संकट आलं तरी चिंतन करणारी व्यक्ती अतिशय शांत राहून योग्य असा निर्णय घेते.

चिंतनाचा वैयक्तिक आयुष्यात देखील छान फायदा होतो.

चिंतन करताना मनात एकदा का दिवसभराचा दिनक्रम ठरवला तर सगळी कामे ठरल्याप्रमाणे होण्यास मदत होते.

आणि आपला दिवस देखील जास्त दगदग न होता सुरळीत पार पाडतो.!

२. आपल्याकडे जी गोष्ट आहे त्यात समाधानी रहा.

मनुष्य प्राण्याचा स्वभावच असा आहे की त्याकडे जे काही असतं त्यात तो कधीच समाधानी नसतो,

उलट त्याकडे जे नाही ते मिळवायच्या नादात तो नेहमी असतो.

असं वाटणं खरंतर स्वाभाविक आहे.

थोड्याफार फरकाने असं सर्वांनाच वाटत असतं.

आपल्याकडे अजून चांगली सुबत्ता असावी अशी अपेक्षा प्रत्येकाचीच असते. आणि तसं पहायला गेलं तर यात चूक देखील काहीच नाही.

आपण सुखी असावं, आपल्याकडे जास्तीत जास्त संपत्ती असावी असं सगळ्यांनाच वाटतं.

यासाठी फक्त आणि फक्त योग्य नियोजनच तुम्हाला इच्छीत ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू शकते.

नियोजनानेच तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडून झालेल्या चुका टाळून, त्या पुन्हा न होण्यासाठी मदत होईल.

शेवटी अनुभवानेच माणूस शिकत जातो हे ही खरेच..!

३. तुमचे निखळ हास्य.

हसण्याने मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी सोप्या होऊन संकटातून मार्ग निघतो असं म्हणतात.

म्हणूनच सतत हसमुख असणारी व्यक्ती तिचा सहवास सर्वांना प्रसन्न ठेवतो.

या मागे शास्त्रीय आधार देखील आहे. संकट काळात बुद्धी स्थिर ठेऊन हसण्याने देखील सोबत असलेल्या माणसांना धीर येतो.

हसण्याने तणावपूर्ण परिस्थितीत शरीरातील अनुरेणु मनावर आणि मेंदूवर आलेल्या ताणासोबत लढा देतात आणि आपला ताण कमी करतात.

जेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या आनंदी असता तेव्हा तुमच्या मेंदूला, आनंदी वाटेल, त्याला उत्साह येईल अशी चालना मिळते.

समोरच्या व्यक्तीकडे पाहून सकारात्मकतेने हसणे हे चांगले लक्षण आहे.

याचा समोरच्यावर देखील परिणाम होतो. आणि एक वेगळीच पॉजिटिव्ह ऊर्जा निर्माण होते.

म्हणूनच म्हणतात हसण्याने जग जिंकता येते..!

४. दिवसाची सुरुवात करा सकस आहाराने.

सकाळी उठल्यावर आपण ज्या प्रकारचे अन्न खातो त्यावर आपल्या दिवसाची बहुतेक ऊर्जा अवलंबून असते.

योग्य असा आहार केल्याने शरीरात स्फुर्ती टिकून राहण्यास मदत होते.

सकाळचा नाश्ता हा आरोग्य आणि निरामय जीवन यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.

म्हणूनच सकाळी कितीही घाई-गडबड असुद्या पण नाश्त्याला उशीर होतो म्हणून थोडं लवकर उठा, हे करणं काही फारसं अवघड नाही म्हणूनच बाहेर निघताना भरपेट नाश्ता करूनच जा..!

५. दररोज व्यायाम करा.

व्यायाम हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा घटक असायला हवा.

व्यायाम केल्याने शरीर आणि त्यातील स्नायू व्यवस्थित काम करतात.

आणि माणसाला उत्साही ठेवतात.

महागड्या जीम मध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य नसले तरी योगासनं, सूर्यनमस्कार हे आपल्या सवयीचा भाग असले पाहिजे.

घरातल्या घरात देखील तुम्ही स्ट्रेचिंग, अथवा स्क्विझिंग करू शकता.

ज्याने आपल्या शरीरातील रक्ताची लेव्हल आणि शुद्ध रक्त पुरवठ्याचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी मदत होते.

शेवटी निरोगी शरीर हे ही यशस्वी होण्यासाठी मोलाचा हातभार लावते.

Jack Dorsey, The CEO of twitter
हे म्हणतात, व्यायामाने शरीर निरोगी राहते. मी स्वतःला स्वस्थ ठेवण्यासाठी माझ्या सगळ्या कार्यक्रमातुन नेहमी व्यायाम करण्याच्या प्रयत्नात राहतो.

मी दररोज सकाळी 5 ला उठतो, थोडावेळ ध्यानधारणा, मग थोडा वेळ व्यायाम मग कॉफी यासाठी खास वेळ राखून ठेवतो. यामुळे माझा पूर्ण दिवस ताजा आणी जास्त उत्साहवर्धक राहतो.

६. वेळेचे नियोजन करा

माणसाच्या वक्तशीरपणामध्ये वेळेला खुपच महत्व आहे. कोणतेही काम करताना जर वेळेचे सुसंबद्धरित्या नियोजन केले तर कोणतेही काम पूर्णत्वास नेण्यास सहसा अजिबात अडचणी येत नाहीत.

अगदी ठरलेल्या वेळेत काटेकोरपणे करत असलेले काम पूर्ण होते.

७. रोजच्यासाठी निश्चित ध्येय ठरवा.

यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने निश्चित ध्येय ठरवणे गरजेचे असते.

त्याने मोठ्या ध्येयाच्या वाटचालीकडे पोहोचण्याचा मार्ग जास्त सुखकर होतो.

भले ही मग ते ध्येय स्वतःचे वैयक्तिक असो अथवा व्यावसायिक.

छोट्या छोट्या हेतूंमध्ये सफलता मिळाल्यानेच मोठे ध्येय पार होण्यासाठी मनाला उभारी मिळते..!

मोठी ध्येय, स्वप्ने पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी जातो.

क्रमाक्रमाने वेळेचे नियोजन करून, प्रवासात आलेले छोटेमोठे अडथळे पार करून पूर्ण केलेली स्वप्ने पाहण्यात एक वेगळेच समाधान असते.

८. निराश होऊ नका

परिस्थिती कायम बदलत असते, एखाद्याची वेळ जी आज चालू आहे ती उद्यापण तशीच कायम असेल याची काहीच शाश्वती नसते.

स्पर्धेच्या युगात नेहमी यशस्वी होत टिकून राहणे ही अवघड गोष्ट आहे, पण अशक्य नक्कीच नाही.

जगासोबत चालता चालता कित्येकदा तुम्ही हरून नाउमेद होऊ शकता.

जगण्यात एक प्रकारची निराशा निर्माण होऊन तुम्ही लढाई जिंकण्या आधीच हार मानू शकता.

असे होऊ नये म्हणून थोरामोठ्यांची पुस्तके, त्यांचे चरित्र, प्रेरणादायी व्हिडिओ, भाषण ऐकावे.

जेव्हा कधी तुम्हाला निराश वाटेल तेव्हा थोडं थांबून झालेल्या चुकांचा आढावा घ्या, योग्य तिथे चूक सुधारून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील रहा.

लक्षात ठेवा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे खचून न जाता परिस्थितीचा सामना करा..! यश नक्की मिळेल.

९. सारासार विचार करून आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा.

भविष्यासाठी पैशांची बचत करणे, इमर्जन्सी फंड्स तयार ठेवणे ही सवय प्रत्येकाला असलीच पाहिजे.

अडीअडचणीला, आर्थिक संकटात साठवलेला पैसाच कामासाठी उपयोगी पडतो.

१० खर्चांवर लक्ष ठेऊन ठराविक बजेट बनवा.

खूपवेळा असं होतं की हातात पैसे आले की बऱ्याच अनावश्यक गोष्टी ही खरेदी केल्या जातात.

आणि त्यामुळे आपले महिन्याचे बजेट गरजेची वस्तू घेताना कोलमडते.

असे न होण्याकरिता पैश्यांचे योग्य तसे नियोजन करा, ठराविक आर्थिक बजेट बनवा.

आर्थिक नियोजनावर मनाचेTalks वर बरेच लेख लिहिले गेलेले आहेत. त्यातील काही खाली वाचता येतील.

म्हणूनच लवकरात लवकर या चांगल्या सवयी अंगो बाळगायला सुरुवात करा.

थोडा वेळ जाईल पण हळूहळू सवय होईल. आणि याच सवयी तुमचं जगणं सोपं आणि सुंदर करतील… पटतंय ना!!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय