केस गळती रोखण्यास फायदेशीर ठरणारे सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

केस गळती रोखण्यास फायदेशीर ठरणारे सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

स्त्रीच्या सौंदर्यात चार चांद लावणारा, तिचे सौंदर्य खुलवणारा असा विलोभनीय केशसंभार…

कोणतीही स्त्री समोरून आली की तिचे केस जर घनदाट काळेभोर आणि लांब असतील तर कोणाचेही पटकन लक्ष तिच्याकडे जाते.

घनदाट आणि मुलायम केस ही तिच्या व्यक्तिमत्वाची दुसरी ओळखच बनते जणू..

पण हे लांब केस व्यवस्थित वाढवणं.. त्यांचं पोषण.. त्यांची निगा ठेवणं हे एवढं सोपं अजिबात नसतं.. केस लांब असो की छोटे, ते व्यवस्थित निगा राखलेले, आरोग्यपूर्ण असावेत.

आणि हो घनदाट आणि आरोग्यपूर्ण केस हा फकीर स्त्रीचाच प्रांत नसून दाट केस हे पुरुषांक्सच्या व्यक्तिमत्त्वात सुद्धा मोलाची भर घालतात.

या लेखामध्ये आपण हेच पाहणार आहोत की केसांची निगा कशी राखायची जेणेकरून केस गळती कमी होऊन घनदाट केस तुमचं सौंदर्य खुलवतील.

आयुर्वेदामध्ये असे काही महत्वाचे घटक आहेत जे केसांची निगा राखण्यासाठी बहुगुणी आणि फायदेशीर आहेत.

केस गळण्याची समस्या ही स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये ही समान असते.

त्याची काही कारणे असू शकतात ज्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवते.

जसं की असंतुलित आहार, जीवनपद्धती, केसांची निगा वेळच्या वेळी न राखणे, अशी अजून खूप काही केसगळतीची कारणे असू शकतात.

आयुर्वेदाकडे या सर्वांसाठी नैसर्गिक उपाय आहेत.

त्यामध्ये अशा काही औषधी वनस्पती आहेत ज्या केसांच्या मुळांना मजबूत बनवून केसगळती रोखू शकतात.

बाजारामध्ये बरेच प्रॉडक्ट्स आहेत जे केस गळती थांबवण्याचा दावा करतात पण अपेक्षित रिजल्ट मात्र देऊ शकत नाहीत.

यात जास्तीचे पैसे वाया घालवण्यापेक्षा कमी पैशात चांगला रिजल्ट देणारे नैसर्गिक उपाय करता येऊ शकतात. हे सोपे उपाय तुम्ही घरच्या घरी पण करू शकता.

१. आवळा, रिठा आणि शिकेकाई

आवळा, रिठा, शिकेकाई चे एकत्रित रित्त्या कॉम्बिनेशन हे केसगळती थांबवण्यासाठी प्रभावी असे नैसर्गिक औषध आहे.

आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटीऑक्सिडंन्ट्स केसगळती होण्यापासून रोखतात. आणि नवीन मजबूत केस उगवण्यास मदत करतात.

रिठ्यामध्ये मुबलक प्रमाणात लोह तत्व असल्याने केस वाढीसाठी मुळांशी ज्या पेशी लागतात त्या वाढीसाठी नैसर्गिकरित्या मदत करतात.

आणि शिकेकाई हे ह्या दोन घटकांचे गुणधर्म केसांच्या मुळांशी शोषून घ्यायला मदत करते. जेणेकरून केस गळती रोखता येईल.

२. कोरफड

आयुर्वेदामध्ये कोरफड बहुगुणी मानली जाते.
त्वचा आणि केस या दोन्हींच्या समस्यांवर कोरफड हमखास फायदेशीर आहे.

कोरफड केसगळती देखील रोखते.

कोरफडचे जेल काढुन ते तुम्ही केसांना लावू शकता.

केसांची मुळे जी कमकुवत बनली असतात ती कोरफडीच्या वापराने मजबूत होतात आणि केसांचं आरोग्य सुधारून नवीन केस येण्यासाठी मदत होते.

ताज्या कोरफडीचा अर्क घेऊन त्याने केसांच्या मुळांना अगदी शेवटच्या टोकापर्यंत मसाज केला तरी तुम्हाला याचा परिणाम चांगला मिळू शकतो.

यामुळे तुम्हाला मऊ, चमकदार आणि फाटे न फुटलेले (स्प्लिटेंडस) असे सुंदर केस मध्ये नक्की मिळतात.

कोरफडीच्या गराने केसांच्या मुळांना थंडावा मिळतो.

३. भृंगराज

आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की भृंगराजाच्या वापराने केसांची वाढ होण्यास फायदा होतो.

तसेच पांढरे केस ही नाहीसे होतात. केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.

तुम्ही भृंगराज तेलाचा वापर ही करू शकता. ज्याने केसांची वाढ हमखास होते.

यातसुद्धा व्हिटॅमिन ‘E’ असते जे केस वाढीसाठी सर्वोत्तम मानले जाते.

आयुर्वेदा मध्ये भरपूर गुणकारी घटक आहे त्याची माहिती आपल्याला नसल्याने आपण घरगुती समस्यांवर त्याचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतो.

चला मग वाट कसली पाहात आहात? तुम्हालाही जर वाटत असेल की कोणी तुमच्याकडे बघून

तुझी चाल तुरुतुरु..
उडती केस भुरूभुरू….

असे गाणे म्हणावे तर गळणाऱ्या केसांवर उपाययोजना करून भुरभुरणारे निरोगी केस मिळवा आणि त्यांची व्यवस्थित निगा देखील राखा..!

Image Credit: livescience

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.