लो ब्लड प्रेशरच्या त्रासावरचे घरगुती उपाय या लेखात वाचा

बहुतांश वेळा आपण हाय बिपी, म्हणजेच उच्च रक्तदाब किंवा ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरटेन्शन म्हणतात या बद्दलच ऐकतो.

हाय बिपी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, आहारात कोणते बदल करावेत, कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा याबद्दल माहिती सतत या न त्या माध्यमातून माहिती मिळत राहते.

पण हाय बी. पी. प्रमाणेच ‘लो बिपी’ असणे हे सुद्धा तितकेच धोकादायक ठरू शकते.

बिपी, अर्थात ब्लड प्रेशरचे रीडिंग हे १२० mm Hg आणि ८० mm Hg इतके असले तर ते निरोगीपणाचे लक्षण असते.

यापेक्षा कमी किंवा जास्त रीडिंग असल्यास ते धोकादायक ठरू शकते.

हे रीडिंग कसे घेतात ते तर आपण सगळ्यांनी बघितलेच आहे.

जेव्हा आपल्या ह्रदयाचा ठोका पडतो आणि आपल्या रक्तवाहिन्यामध्ये रक्त भरले जाते तेव्हा रक्ताचे प्रेशर हे १२० mm Hg असले पाहिजे.

याला सिस्टोलिक प्रेशर म्हणतात.

८० mm Hg हे दोन हार्टबीटच्या मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये असणारे प्रेशर असते.

याला डायस्टोलिक प्रेशर असे म्हणतात.

या पेक्षा कमी ब्लड प्रेशर असल्यास त्याला ‘लो बिपी’ किंवा हायपोटेन्शन असे संबोधले जाते.

लो ब्लड प्रेशर असल्यास आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांना जसे की मेंदू, ह्र्दय, किडनी यांना कमी प्रमाणात रक्त पुरवठा केला जातो.

आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांना पुरेसा रक्त पुरवठा झाला नाही तर पक्षाघात, ह्र्दयविकाराचा झटका हे धोके असतात.

लो ब्लड प्रेशरचा त्रास होण्यामागे बरीच कारणे असू शकतात.

खूप उलट्या, जुलाब होत असतील तर डीहायड्रेशन होऊन रक्तदाब कमी होऊ शकतो, कधी काही कारणाने खूप रक्तस्त्राव झाला तरी लो बिपीचा त्रास होऊ शकतो, जास्त प्रमाणात घाम येऊन हा त्रास होऊ शकतो, रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर, मज्जारज्जूशी संबंधित विकारांमध्ये सुद्धा हा त्रास होऊ शकतो.

या व्यतिरिक्त काही आजारांमध्ये सुद्धा हायपोटेंशनचा त्रास होऊ शकतो.

किडनीचे विकार, अशक्तपणा, डेंग्यू, थकवा किंवा मानसिक तणाव (स्ट्रेस) यामुळे सुद्धा हा लो बिपीचा त्रास होऊ शकतो.

कधी कधी खूप वेळ बसून एकदम उठल्यावर सुद्धा आपले बिपी अचानक कमी होऊन आपले डोके हलके वाटून, चक्कर आल्यासारखे वाटू शकते.

खूप घाम येऊन दमल्यासारखे वाटणे, डोके हलके वाटणे, झोप आल्यासारखी वाटणे, ग्लानी येणे, अस्वस्थ वाटणे, क्वचित मळमळणे, चक्कर येणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे ही लो बिपीची काही लक्षणे आहेत.

लो बिपी चा त्रास कमी होण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

यात सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे लो बिपी मुळे गरगरल्यासारखे झाले तर लगेच आडवे होऊन डोळे बंद करून झोपा व थोड्या पाण्यात मीठ व साखर घालून प्या.

हा झाला फर्स्ट एडचा उपाय पण अजून कोणते असे उपाय आहेत ज्यामुळे हा त्रास कमी होतो ते आता आपण बघूया.

१. दोन जेवणांच्या मध्ये थोडे थोडे खात राहा

जर आपल्या दोन जेवणाच्या मध्ये खूप वेळ जात असेल तर या कालावधीमध्ये, जेवणाच्या नंतर बिपी अचानक कमी होते.

म्हणून दोन जेवणाच्या मध्ये जर खूप वेळ जात असेल तर त्यामध्ये थोडे काहीतरी खाल्ले पाहिजे.

पण हे करताना आपल्याकडून फास्ट फूड, जंक फूड खाल्ले जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे कारण त्याचे आपल्या आरोग्यावर अजून वेगळे विपरीत परिणाम होतात.

यावर सोपा पर्याय असा आहे की दिवसाला जर आपण ३ वेळा खात असू तर तेवढेच अन्न ५ वेळा थोडे थोडे अंतर ठेऊन खायचे.

यामुळे दोन जेवणाच्या मध्ये खूप मोठा कालावधी जाणार नाही.

आणि आपण दिवसभरात घेत असलेल्या कॅलरी एकूण तेवढ्याच राहतील जेणेकरून आपले वजन आटोक्यात राहील.

२. आहारात योग्य प्रमाणात मीठ घ्या

आपण नेहमी ऐकतो की जास्त मीठ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

ते बरोबरच आहे पण मीठ पुरेशा प्रमाणात आपल्याला मिळत नसेल तर ते सुद्धा धोकादायक ठरते.

आपल्या शरीराला दिवसभर साधारण एक चमचा मिठाची गरज असते.

आपल्या आहारातून, भाजी, पोळी, आमटी इत्यादी मधून ते आपल्या शरीरात जाते.

पण जर यापेक्षा कमी मीठ आपण खात असू तर आपल्याला लो बीपीचा त्रास व्हायची शक्यता असते.

ज्यांचे शारीरिक कष्ट जास्त आहेत, जे नियमितपणे व्यायाम करतात त्यांनी आपल्या जवळ मिठाची पुडी सतत बाळगली पाहिजे कारण अशा लोकांना लो बिपीचा त्रास व्हायची शक्यता जास्त असते.

मिठाचे प्रमाण खूप जास्त न वाढवता योग्य प्रमाणातून आपण ते घेतले पाहिजे.

३. भरपूर पाणी प्या

दिवसाला आपल्याला ७ ते ८ ग्लास पाण्याची गरज असते.

ही गरज आपण नुसते पाणी पिऊन पुरवू शकतो किंवा खासकरून पाण्याबरोबर नारळपाणी, कोकम सरबत, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे हे पिऊन पुरवू शकतो.

पाण्याबरोबर या इतर पेयांमुळे आपल्या शरीरात मीठ सुद्धा जाते ज्यामुळे लो बीपीचा त्रास टळू शकतो.

डीहायड्रेशन किंवा शरीरात पाण्याची कमतरता हे लो बीपी होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

हे होऊ नये म्हणून दिवसभर आपण भरपूर पाणी प्यायले पाहिजे.

४. कॉफी प्या

इतर अनेक घरगुती उपायांमध्ये आपण बघतो की चहा/कॉफी टाळायचा सल्ला दिला जातो.

पण लो बिपीच्या त्रासासाठी मात्र कॉफी हा एक उपाय आहे.

जर बिपीची पातळी अचानक कमी होत असेल तर कपभर कॉफी किंवा चहा रक्तपुरवठा वाढून ती तात्पुरती सुधारू शकते.

५. तुळस

तुळशीच्या पानांमध्ये पोटॉशीयम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात असतात.

या व्हिटामिन आणि मिनरल्सचा उपयोग आपले बिपी नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो.

म्हणून रोज सकाळी उठल्यावर जर चार ते पाच तुळशीची पाने चावून खाल्ली तर आपले बिपी आटोक्यात ठेवण्यासाठी फायदा होतो.

६. मनुका

रात्री झोपण्यापूर्वी काळ्या मनुका पाण्यात भिजत घालून सकाळी त्या खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त पुरवठा सुधारतो.

रक्त पुरवठा सुधारला तर आपले बिपी अपोआपच नियंत्रणात राहण्यासाठी फायदा होतो.

७. बदाम

रात्रभर भिजलेले बदाम सकाळी खाल्ले तर बिपी कमी होत नाही.

बदामामध्ये कोलेस्टेरॉल नसतात त्यामुळे बदामाच्या नियमित सेवनाने आपल्याला इतर काही धोका नसतो.

लो बिपीचा त्रास टाळण्यासाठी हा सोपा उपाय आहे.

या उपायांपैकी आपल्याला सोयीस्कर वाटणारे उपाय आपण करून बघू शकतो.

हे उपाय आपण अगदी सहज घरच्याघरी करू शकतो आणि यामुळे आपल्या शरीराला कोणताही अपय होण्याची शक्यता नाही.

पण जर तुम्हाला लो बिपी चे निदान झाले असेल आणि या उपायांनी वरील लक्षणे कमी होत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय