आपल्यातल्या आळशीपणावर विजय मिळवण्यासाठी ५ उपाय

कामाचा ढीग समोर असताना सुद्धा कधीकधी आपले कामात लक्ष लागत नाही.

कितीही ठरवले तरी कामे अजिबात पूर्ण होत नाहीत. आपण आपल्या परीने शक्य तितके प्रयत्न करत असतो, वेळेचे नियोजन करत असतो पण तरीही आपल्याकडून म्हणावी अशा तर्हेने किंवा गतीने कामे पूर्णच होत नाहीत.

याला अनेक कारणे असू शकतात. कामाचा कंटाळा, अति कामामुळे आलेला शीण किंवा आपलाच आळशीपणा.

या सगळ्या कारणांमध्ये बहुतेक वेळा आळशीपणाच वरचढ ठरतो.

पण खरेतर यापैकी कारण काहीही असुदे जेव्हा आपल्याला दिलेली कामे आपल्याकडून पूर्ण होत नाहीत तेव्हा समोरच्याचे मत आपल्याबद्दल फारसे चांगले होत नाही.

आपल्याकडून कामे वेळेत पूर्ण होत नसतील तर आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा यामुळे आपण कुप्रसिद्ध होतो.

अशाने आपली प्रगती खुंटते. आपल्या आळशीपणामुळे आपण निर्धास्त राहतो, आपण काम केले नाही तर दुसरे कोणीतरी करेल असे आपल्याला वाटत राहते.

आपल्या याच आळशीपणाचा फायदा आपण इतर लोकांना घेऊ देतो.

बहुतेक वेळा आपल्याला हे कळत असते पण वळत मात्र नसते. आपला आळशीपणा घालवून आपल्याला कामे झटपट मार्गी लावायची असतात पण नेमकी कशी ते आपल्याला समजत नसते.

पण यावर काही सोपे उपाय आहेत.

हे असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपण आपल्या आळशीपणावर मात करून आपली कार्यक्षमता, म्हणजेच प्रोडक्टीव्हीटी वाढवू शकतो?

हे जाणून घेण्यासाठी हा लेख आवर्जून वाचा.

१. आत्मपरीक्षण करा

तुमची कामे पूर्ण होत नसतील, किंवा आपण असे म्हणूया की प्रयत्न करून सुद्धा तुमच्याकडून काही कामे अपूर्णच राहत असतील तर ते तुमच्या लगेच लक्षात येते.

आपण इतरांशी खोटे बोललो तरी स्वतःशी खोटे बोलता येत नाही.

जरी आपल्या लक्षात यायला उशीर झाला तरी अशा गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्या जातात.

असे झाल्यावर तुमच्या या समस्येकडे कानाडोळा करून किंवा ही समस्या मान्यच न करून काहीच उपयोग नसतो.

मुळात एखाद्या समस्येचे अस्तित्व मान्य केले तरच त्याच्यावर आपल्याला उपाय शोधता येतो.

म्हणून तुमच्या लक्षात ही गोष्ट आली की लगेच आत्मपरीक्षण करा.

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्याकडून हा आळशीपणा केला जातोय?

यामागे अनेक संभाव्य कारणे असू शकतात, जसे की कामाच्या तोचतोचपणा आणि त्यामुळे आलेला कंटाळा, एखाद्या मित्राची संगत, काम करायची चुकीची पद्धत, काम करण्यासाठी लागणाऱ्या प्रेरणेचा अभाव…

अशी अनेक कारणे असू शकतात. आपण शांतपणे बसून, आत्मपरीक्षण केले तर आपल्या आळशीपणामागचे कारण आपण नक्की शोधून काढू शकतो.

२. समस्येवर तोडगा शोधा

आत्मपरीक्षण करून, शांतपणे विचार करून, गरज पडल्यास एखाद्या जवळच्या मित्राशी बोलून आपण आपल्या आळशीपणामागचे कारण शोधून काढले तर त्यावर उपाय शोधणे ही साहजिकच पुढची पायरी असते.

असे अनेकदा होऊ शकते की कामाचा कंटाळा आल्याने आपल्याकडून कामाच्या बाबतीत आळशीपणा होतो.

असे असेल तर एखादी सुट्टी घेणे, आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, फिरायला जाणे हा सोपा उपाय करता येतो.

कामातून थोडा ब्रेक घेतला की आपण ताजेतवाने होतो आणि पुन्हा नव्या जोमाने काम करायला तयार होतो.

म्हणजेच आपला आळशीपणा हा तात्पुरता असतो. कामाचा जास्त ताण असेल तर कामे विभागून कशी करता येतील?

कामाचे आणि वेळेचे नियोजन कसे करता येईल यावर उपाय शोधला पाहिजे.

आपल्याला काम करायला हवी ती प्रेरणा मिळत नसेल तर त्यासाठी प्रयत्न करणे.

प्रेरणादायी लेख वाचून आपले प्रेरणा स्त्रोत निर्माण करणे असे प्रयत्न करता येतात.

कधीतरी आपल्याला कसलीतरी भीती सुद्धा वाटत असते ज्यामुळे आपली कामे हातावेगळी होत नसतात.

अशावेळेला आपल्या मनात नेमके काय चालू आहे? आपल्याला कसली भीती वाटत आहे याचा आढावा घेतला आणि त्यावर तोडगा शोधला तर आपल्याला कामाबद्दल उत्साह वाटायला लागतो.

थोडक्यात, आपल्या आळशीपणाचे कारण एकदा उमगले, ते आपण स्वतः मान्य केले आणि त्यावर उपाय शोधायची तयारी दाखवली की हे काम एकदम सोपे होऊन जाते.

३. व्यवस्थितपणाची सवय लाऊन घ्या

पसारा घालणे, घेतलेली वस्तू जागेवर न ठेवणे या काही अशा सवयी आहेत ज्यामुळे नकळतपणे आपल्या अंगात आळशीपणा भिनायला लागतो.

आपल्या कामाचे टेबल जर पसरलेले असेल, हवी असलेली वस्तू कधीच जागेवर मिळत नसेल तर ऐन कामात असताना आपली चिडचिड होते.

अशामुळे कामात लक्ष लागत नाही आणि हळूहळू आपला उत्साह मावळतो आणि आपण कामाचा कंटाळा करायला लागतो.

यामुळे एकूणच कामाबद्दल आपण आळशीपणा करायला लागतो.

पण हेच जर संध्याकाळी आपण व्यवस्थित आवराआवर करून ठेवली, दिवसभराचा पसारा आवरला, उद्याच्या कामाची तयारी करून ठेवली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी नक्कीच उत्साह वाटतो आणि आपल्या कामाचा वेग वाढतो.

एकदा ही व्यवस्थितपणाची, टापटीपीची सवय लागली की अपोआप आपण आपल्या कामात जास्त लक्ष घालायला लागतो.

४. सकारात्मक विचार करा

आळशी लोकांच्या बाबतीत असे नेहमीच होते की त्यांना इतर आजूबाजूची लोक आळशी म्हणून हिणवत असतात.

अशामुळे आळशी लोक आपल्या मनाची अशी एक समजूतच घालून घेतात की आपण आळशी आहोत.

हे फार सोयीस्कर होऊन जाते. काम करण्यासाठी किंवा कामे टाळण्यासाठी एक बहाणाच मिळतो.

त्यामुळे पहिले हा विचार आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे.

आपल्याला जरी कोणी आळशी म्हणत असले तरी आपण स्वतःला सांगितले पाहिजे की आपण तसे नाही आणि मनापासून बदलायचा प्रयत्न केला पाहिजे.

हीच सकारात्मकता एका वेगळ्या दृष्टीने सुद्धा बाळगता येऊ शकते.

समजा आपल्याला काम सुरु करायला उशीर झाला तर आपण आपल्या मनाची समजूत घालतो की आज काम पूर्ण होणार नाही कारण मुळात सुरुवातच उशिराने झाली आहे.

पण असे न करता आपण या बाबतीत सुद्धा सकारात्मकता बाळगू शकतो आणि असे म्हणू शकतो की काम सुरु करायला जरी उशीर झाला असला तरी प्रयत्न करून ते वेळेत संपवता येईल.

आहे का नाही विचार करण्यासारखा मुद्दा?

५. लवकर उठा

सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात केली की आपली कार्यक्षमता वाढते.

बऱ्याचदा आपला असा एक गैरसमज असतो की सकाळी दहा मिनिटे जास्तीची झोप घेतली तर दिवसभर आपण फ्रेश राहू शकतो पण प्रत्यक्षात या दहा मिनिटाच्या झोपेमुळे दिवसभर आपल्याला आळशीपणा जाणवतो.

म्हणून वेळेचे नीट नियोजन करून ठरलेल्या वेळीच उठायला हवे.

कितीही दमणूक झाली असेल किंवा रात्री झोपायला कितीही उशीर झाला असेल तरी आपण नेहमी आपल्या ठरलेल्या वेळीच उठले पाहिजे.

असे केल्याने अंगात आळशीपणा भिनत नाही आणि आपल्याला उत्साह जाणवतो.

सकाळी उठण्याची नियमितपणे सवय लावण्यासाठी काय करावे त्याबद्दल चा एक लेख लवकरच वाचायला मिळेल.

मित्रमैत्रिणींनो, आपण लहानपणापासून ऐकत आलोय की आळस हा आपला शत्रू आहे, आपल्या आणि आपल्या प्रगतीच्या आड फक्त आळस असतो.

त्यामुळे आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात आधी आपल्याला या आळसावर मात करता यायला हवी. यासाठी स्वतःला ताजेतवाने ठेवले पाहिजे.

त्यासाठी कामाचे नियोजन, व्यायाम, संतुलित आहार हे तर अत्यंत गरजेचे आहेच.

या सगळ्याबरोबरच आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे.

आपल्याकडून अमुक एक काम होणार आहे, आपली दिवसभराची कामे होणार आहेत ही खात्री आपण स्वतःला दिली पाहिजे.

आपल्या मनाप्रमाणे झाल्यावर आपण स्वतःला शाबासकी सुद्धा दिली पाहिजे.

मोठी कामे असतील तर ती विभागून लहान केली पाहिजेत जेणेकरून आपल्याला ती संपवणे सोपे जाईल.

वर दिलेल्या पाच मुद्यांचा विचार केला आणि ते आचरणात आणले तर आपला आळशीपणा दूर सारण्याचे उपाय आपल्याला नक्की सापडतील आणि या लेखात दिलेल्या ट्रिक्सचा वापर करून ते सहज शक्य होईल..

मग आपल्या आळशीपणावर मात करण्याची सुरुवात आजपासून नव्हे तर आत्तापासूनच करताय ना?

https://www.manachetalks.com/12950/how-to-deal-with-lazyness-of-kids-parenting-tips-marathi-palakattva/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आपल्यातल्या आळशीपणावर विजय मिळवण्यासाठी ५ उपाय”

  1. आळशी पणावर मात करण्यासाठी खुप छान माहिती या लेखात दिली आहे. अत्यंत प्रामाणिकपणे त्याचा विचार करून हळू हळू त्या प्रमाणे वागण्यात रोज थोडा थोडा बदल करत गेलो तर नक्कीच आपल्याला फायदा होईल असे मला वाटते.
    मनाचे Talks टीम चे मनापासून आभार.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय