कोव्हीडच्या आजारातून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यावी ते वाचा या लेखात

सध्या भारतात कोव्हीडचे सावट हळूहळू दूर होत आहे.

न्यू नॉर्मलचा स्वीकार करत आपण शक्य ती सगळी खबरदारी बाळगत आपले आयुष्य पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

कोव्हीडचा भारतातील रिकव्हरी रेट, म्हणजे कोव्हीड बरा होण्याचा दर ९० टक्क्यांपेक्षा सुद्धा जास्त आहे.

म्हणूनच या आजारातून बाहेर पडलेली लोकं सुद्धा आता त्यांच्या कामात आणि इतर व्यवधानात व्यस्त झालेली आपल्याला आढळत आहेत.

सर्व साधारणपणे कोव्हीडमधून पूर्णपणे बाहेर पडायला दोन आठवडे ते एक महिना इतका कालावधी जातो.

पण हा अवधी गेल्यानंतर सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टींची खबरदारी बाळगणे महत्वाचे आहे.

या आजारातून पूर्णपणे बाहेर पडलेल्या लोकांच्या शरीरात अर्थातच कोरोन हा विषाणू शिल्लक राहत नाही पण तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या कटाक्षाने पाळल्या गेल्या पाहिजेत.

कारण कोरोना विषाणू हा शरीराला बऱ्याच प्रमाणात नुकसान पोहोचवू शकतो.

ज्यांना अगदी सौम्य आजार झाला असेल त्यांना सुद्धा या आजारातून बाहेर पडल्यावर प्रचंड थकवा जाणवतो.

या विषाणूचे श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होतात.

इतके दिवस या विषाणूशी लढा देऊन शरीर थकून गेल्यामुळे हा थकवा जाणवणे सहाजिकच आहे.

म्हणूनच आपल्या शरीराला, ज्याने इतके दिवस या विषाणूला मारण्यात घालवले, आरामाची गरज असते.

यामुळे आजारातून बरे झाल्यावर सुद्धा शरीराला आपले काम पुर्वव्रत सुरु करण्यासाठी लागणारा वेळ आणि आराम मिळेल.

तर मित्रमैत्रीणींनो, कोव्हीडमधून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या जेणेकरून आपली तब्येत लवकर सुधारेल आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या ज्यामुळे शरीराला नुकसान पोहोचू शकते हेच आज आपण या लेखात बघणार आहोत.

१. भरपूर आराम करा

आजारातून बाहेर पडल्यावर सुद्धा एक आठवडा जास्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टर देतातच.

या आजारात विलगीकरण पाळणे गरजेचे असते जेणेकरून संसर्ग टाळता यावा.

विलगीकरणात राहून कंटाळा येऊ शकतो त्यामुळे एकदा टेस्ट निगेटिव्ह आली की साहजिकच खोलीच्या बाहेर पडण्याची इच्छा होते.

पण आजारातून पूर्ण बरे झाल्यावर सुद्धा जर शरीराला पूर्ण आराम मिळाला तर तो केव्हाही चांगलाच.

शरीराला जेवढा आराम जास्त तेवढे शरीर पूर्वपदावर लवकर येते.

पुरेशी झोप झाल्याने शरीर रोगातून बाहेर लवकर पडते आणि यामुळे एका आजारातून बाहेर पडतानाच दुसरा आजार होण्याची शक्यता कमी होते.

इतके दिवस रोगाशी चार हात करून शरीराला थकवा आलेला असतो. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुद्धा कमकुवत झालेली असते त्यामुळे कोव्हीड आजारातून बाहेर पडल्यावर जर पूर्वीच्या सगळ्या कामांना लगेच सुरुवात केली तर तो पेशंट परत आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

म्हणूनच कोव्हीड बरा झाल्यावर सुद्धा जास्त विश्रांती घेऊन आपल्या सगळ्या कामांना एकदम सुरुवात करता हळूहळू जीवन पूर्वपदावर आणणे हेच हिताचे आहे.

२. सकस व समतोल आहार घ्या

आजारातून आहेर पडल्यावर अशक्तपणा जाणवतो.

कोव्हीडमध्ये, आजारी असताना तोंडाला चव नसल्याने अन्न जात नाही पण शरीराला आपले पूर्वीचे सगळे काम परत सुरु करायचे म्हणजे शक्ती हवीच आणि ती मिळणार कुठून?

सकस आणि समतोल आहारातून. त्यामुळे कोव्हीड बरा झाल्यावर सुद्धा आहाराकडे विशेष लक्ष द्यायची गरज आहे.

एका वेळेला जास्त न खाता, दिवसभर थोडे थोडे खात राहिले पाहिजे म्हणजे पचनसंस्थेवर ताण येणार नाही.

आणि आपली कॅलरीची गरज सुद्धा पूर्ण होईल.

आहारात भरपूर प्रथिने, जी शरीराची आजारपणात झालेली झीज भरून काढतात, घ्यावीत.

यासाठी मोड आलेली कडधान्य, ड्रायफ्रुट, उकडलेली अंडी याचा आहारात समावेश करावा.

याचबरोबर दिवसभर भरपूर पाणी प्यावे. पाण्याचे प्रमाण वाढावे यासाठी सूप घेणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.

दिवसातून एकदा तर ताजी फळे खावीत.

आजार बरा झाल्यावर आहारात इतकी पथ्ये पाळायची काय गरज असा विचार न करता, ही सगळी पथ्ये पाळणे गरजेचे आहे.

कारण आजारातून बाहेर पडताना शरीराला झालेला त्रास, शरीराची झालेली झीज भरून येणे गरजेचे आहे.

३. दररोज व्यायाम करा

कोव्हीड बरा झाला तरी अशक्तपणा पुढचे काही दिवस जाणवू शकतो त्यामुळे हा व्यायामाचा सल्ला ऐकून घाबरून जायला होईल.

पण आजारपणातून व्यवस्थित बाहेर पडून रिकव्हरी चांगली होण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे.

व्यायामामुळे शरीरातील रक्तपुरवठा सुधारतो आणि यामुळे शरीरातील सगळ्या पेशींना प्राणवायू पोहोचवला जातो.

व्यायामामुळे आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स तयार केली जातात, ज्यामुळे आपला मूड चांगला होतो आणि आपल्याला उत्साही वाटते.

कोव्हीड या आजारात विलगीकरणात राहून मनावर ताण असतो, मरगळ असते. त्यामुळे व्यायामाचे महत्व जास्त आहे.

पण व्यायाम करताना जेवढा व्यायाम शरीराला झेपेल तेवढाच करावा, दिवसातून अगदी दहा ते पंधरा मिनिटे व्यायाम केला तरी पुरेसा आहे.

जास्त दमणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. कदाचित आधी सारखा व्यायाम जमणार नाही, लवकर थकवा येईल पण ते साहजिकच आहे.

४. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा

कोरोना विषाणूचा परिणाम हा मेंदूच्या पेशींवर होतो ज्यामुळे भविष्यात स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

यासाठी कोव्हीड मधून बाहेर पडल्यावर, आराम करत असताना सुडोकू, शब्दकोडी, मेमरी गेम, ऑनलाइन चेस या सारखी कोडी सोडवून स्मरणशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यामुळे घरी बसून आराम करताना, कंटाळा न येता, वेळ देखील चांगल्या पद्धतीने घालवता येईल.

५. रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजत राहा

कोव्हीडमधून बरे आल्यावर सुद्धा ऑक्सिमिटर वापरून रक्तातील ऑक्सिजनची पातळी सतत मोजत राहिली पाहिजे.

कोरोना विषाणूचा फुफ्फुसावर परिणाम दीर्घ काळासाठी राहण्याची शक्यता असते त्यामुळे हे करणे गरजेचे आहे.

दिवसातून दोनदा, तीनदा ही पातळी तपासून काही संशयास्पद वाटले तर लगेच डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

६. एकूण आरोग्याकडे लक्ष द्या

कोरोना विषाणूमुळे एकूण आरोग्यावर परिणाम झालेला असतो.

यामुळे आपले फुफ्फुस, ह्र्दय कमकुवत झालेले असते. त्यामुळे आपल्या आरोग्याबद्दल सतर्क राहणे गरजेचे असते.

आजार बरा झाल्यावर सुद्धा काही त्रास होतोय का याकडे लक्ष पाहिजे. काही वेगळे जाणवल्यास ते अंगावर न काढता, त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय मदत आणि उपचार घेतले पाहिजेत.

मुख्य म्हणजे बरे वाटल्यावर सुद्धा जर पुढील काही महिन्यांसाठी डॉक्टरांनी दिलेल्या काही गोळ्या, औषधे असतील तर ते नियमितपणे घेतले पाहिजे.

कोव्हीडमधून बाहेर पडल्यावर शरीराची जास्त काळजी घेतली तर त्यातून इतर गुतागुंतीच्या समस्या उत्भवणार नाहीत.

आरामाचा कंटाळा येऊन चालणार नाही कारण एखादा आठवडा जास्त आराम केला तर जीवन लवकरात लवकर पूर्व पदावर येईल.

आणि आपण सगळी कामे आधीसारखी करणे शक्य होईल. या आजारात शरीराचे हाल होतात, त्यामुळे यातून बाहेर पडल्यावर शरीराचे काही लाड पुरवायलाच हवेत, नाही का?

Image Credit : dnaindia.com

https://www.manachetalks.com/11963/reasons-why-you-become-sick-marathi/

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय