तुम्हाला आयुष्यात नंबर वन व्हायचे आहे? मग या गोष्टी लक्षात ठेवा

आयुष्यात नुसते यशस्वी नाही तर कुठल्याही गोष्टीत टाॅपला पोहोचायची महत्वाकांक्षा सगळ्यांची असते. पण गरज असते त्यासाठी वाटचाल कशी हवी, काय करायचे, काय करायचे नाही… हो ना?

तुम्हाला सुद्धा असे खूप वाटत असेल की तुमच्या कामात तुम्ही यशस्वी व्हावे,

तुम्हाला बढती लवकर लवकर मिळावी किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर जास्तीत जास्त मार्क पाडून तुमचा पहिला नंबर यावा,

तुम्हाला कॅम्पस इनटरव्ह्यूमध्ये चांगली नोकरी मिळावी… आणि अशा कितीतरी इच्छा असू शकतात.

पण कित्येकदा तुमच्या इच्छा पूर्ण होऊन, यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करूनही तुम्हाला हवे असलेले यश मिळत नाही.

तुम्ही अगदी मन लाऊन काम किंवा अभ्यास करून सुद्धा तुम्हाला अपेक्षित असलेली बढती किंवा मार्क तुम्हाला पडत नाहीत. यामागे काय कारण असू शकेल याचा तुम्ही विचार करूनही उत्तर काही सापडत नाही.

पण मित्रमैत्रिणींनो, याचे उत्तर एकदम सोपे आहे.

ते काय हे जाणून घ्यायला आपण एक सोपे उदाहरण बघूया….

समजा तुम्ही एखाद्या ट्रेकसाठी जाणार आहात, ट्रेक मोठा आहे, चढायला भरपूर आहे तर तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या सॅकमध्ये काय काय भराल?

पाण्याची बाटली, टोपी, खाण्याचे काही पदार्थ, कपड्यांची एखादी जोड, साबण, काही औषधे.

म्हणजे ट्रेक दरम्यान तुम्हाला गरज लागू शकते अशाच गोष्टी तुम्ही जवळ ठेवाल आणि इतर अनावश्यक गोष्टी काढून ठेऊन तुमची सॅक जितकी हलकी करता येईल तितकी कराल.

बरोबर ना? खूप समान भरले तर काय होईल? एकतर चढायला भयंकर त्रास होई, वर शिखरावर पोहोचायला उशीर होईल आणि तुमची उगाचच दमछाक होईल.

हे उदाहरण गंमतीशीर वाटत असले, याचा आपल्या मूळ प्रश्नाशी काय संबंध आहे हे समजत नसले तरी,

तरी याच्या उत्तरात आयुष्याचे सार आहे.

जर चढून, उंचीवर जाऊन वेगवेगळे शिखर सर करताना तुमच्या पाठीवरच्या अनावश्यक ओझ्याने तुम्ही थकून जाणार असाल, तुम्हाला शिखरापर्यंत पोहोचायला उशीर होणार, असेल आणि तुमची विनाकारण दमणूक होणार असेल तर आयुष्यात तुमचे ध्येयरुपी पर्वत चढताना काय होईल?

तुम्ही जर विनाकारण तुमच्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टींचे टेन्शन, त्याची जबाबदारी तुमच्यावर घेतली तर ते सगळे ओझे घेऊन तुम्हाला आयुष्याच्या डोंगर चढून यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी जास्त वेळ लागणारच, त्रास होणारच.

यामुळेच अनेक प्रयत्न करूनही, मनापासून काम किंवा अभ्यास करून ही तुम्हाला अपेक्षित असलेले यश तुमच्या पदरात पडत नाही.

कारण तुमच्या पाठीवर तुमच्या नकळत अनेक ओझी झालेली असतात.

या गोष्टी खरेतर इतक्या किरकोळ असतात की त्यांचा फार विचार करावा इतके पण महत्व त्यांना द्यायची गरज नसते.

यावर उपाय काय? अर्थातच आपल्या पाठीवरची ओझी कमी करणे.. त्यासाठी ही ओझी नेमकी कोणती आहेत आणि ती कशी कमी करायची हे माहीत हवे.

आजचा हा लेख त्यासाठीच आहे. चला तर मग बघूया की जीवनाच्या प्रवासात हे नको असलेले सामान नेमके कोणते आहे आणि ते कसे वगळायचे जेणेकरून प्रवास सोपा आणि सुरळीत होईल.

१. नकारात्मक विचार

खरेतर नकारात्मक विचार करणे म्हणजे विचारशक्तीचा गैरवापर करण्यासारखे आहे.

परमेश्वराने जी विचार करण्याची शक्ती दिली आहे तिचा वापर सकारात्मक विचार करण्यासाठीच करूया कि!!

याचा अर्थ असा नाही की सतत चांगलेच विचार मनात आले पाहिजेत.

माणूस म्हटले की कधीनाकधीतरी वाईट विचार मनात येणारच, नकारात्मक शक्यता कधीतरी डोक्यात येणारच.

पण हे वारंवार होता कामा नये.

त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. नकारात्मक विचारांना जाणीवपूर्वक थोपवले पाहिजे.

तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला नकारात्मक उर्जा देत असतात.

एका नकारात्मक विचारामधून दुसरा विचार निर्माण होतो आणि मग नकारात्मकतेशी एक मोठी साखळीच तयार होते.

मुळातच अस्तित्वात नसलेल्या चिंता, काळज्या, टेन्शन यांचा यातून जन्म होतो आणि त्यामुळे आपल्या पाठीवर गरज नसताना याचे मोठे ओझे तयार होते.

२. भीती

तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर तुम्ही ती गोष्ट करूनच बघत नाही.

किंवा एकदा एखाद्या गोष्टीत अपयश आले तर पुन्हा ती गोष्ट करायला तुम्हाला भीती वाटते.

पण हे बरोबर आहे का? आयुष्यात पुढे जायचे म्हणजे नवनवीन गोष्टी करून बघायला हव्यात.

दर वेळेला भीती वाटली तर ते मात्र शक्य नसते. मग येतो तो पश्चाताप!

‘आपण हे करून बघायला हवे होते.’ हा विचार तुमच्या मनात येत राहतो.

पण त्याचा काहीच उपयोग नसतो कारण गेलेली वेळ काही परत येणार नसते.

पण ही भीती काय आहे? तुमच्या जीवन प्रवासाच्या सामानात असलेले एक ओझे..

ज्याला चिकटून पश्चातापाचे ओझे सुद्धा येते.

त्यामुळे भीती काढून टाकली, की अजून एक ओझे अपोआप कमी होईल.

३. आळस/कंटाळा

तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत आला आहात, तुम्हाला ते समोर दिसत नाहीये, पण ते आहे आणि असे असताना तुम्ही कंटाळून गेलात, हार मानलीत तर काय होईल?

इतके प्रयत्न करून अगदी शेवटी कंटाळून गेलात तर आधी केलेल्या प्रयत्नांचा सुद्धा काहीच उपयोग होणार नाही.

खरेतर कोणतेही शिखर सर करताना अगदी शेवटीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

शेवटच्या चढातच आपल्याला दम लागतो पण त्यानंतरच शिखर सर होणार असते. आयुष्याचे देखील असेच आहे.

त्यामुळे सगळे प्रयत्न करून अगदी शेवटी कंटाळा करून कसा चालेल?

अगदी शेवटी आळशीपणा करून जाऊदे म्हणून सोडून दिले तर आधीचे श्रम सुद्धा वाया जातील.

म्हणूनच आपल्या प्रवासात आपल्या सामानातून पहिली कोणती गोष्ट काढून टाकायची असेल तर ती म्हणजे कंटाळा!

४. लोक काय म्हणतील

सबसे बड़ा रोग, क्या कहेंगे लोग!!!

खरेतर हे सुद्धा एक अत्यंत अनावश्यक असे ओझे. लोकांच्या विचारांचे, त्यांच्या काही म्हणण्याचे ओझे सुद्धा तुम्हीच घेतले तर तुम्हाला पुढे जाणे अशक्यच होईल.

आयुष्यात लोकांना काय वाटते यापेक्षा जास्त महत्वाचे आहे तुम्हाला काय वाटते.

जेव्हा लोकांचा विचार सोडून तुम्ही स्वतःचा विचार कराल तेव्हा तुम्हाला हा प्रवास एकदम सोपा आणि सुखकर वाटायला लागेल.

या गोष्टींचे ओझे आपल्या अंगावरून कमी करणे निश्चितच सोपे नाही. सुरुवातीला अवघड वाटले तर अनेक प्रयत्नानंतर ते नक्की जमू शकेल.

त्यासाठी अंगात चिकाटी हवी. खूप प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाची किंमत जास्त असते असे म्हणतात.

पण एकदा हे जमले तर तुमचा प्रवास सोपा होईल. एकामागोमाग एक अशी यशाची अनेक शिखरे तुम्ही सर करत जाल आणि कोणत्याही गोष्टीत नंबर वन होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय