ATM चे किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन फेल झाले तर काय करावे?

एटीएम मधून पैसे काढताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना ट्रान्झॅक्शन फेल झाले तर बँकेकडून कशी नुकसान भरपाई मिळवायची

‘एटीएम’ मधून पैसे काढताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना ट्रान्झॅक्शन फेल झाले तर बँकेकडून कशी नुकसान भरपाई मिळवायची ते वाचा या लेखात…

आजकाल, जिथे सगळेच जगणे ऑनलाईन सुरु झाले आहे तिथे बँकिंग सुद्धा मागे राहिले नाही.

‘एटीएम’ मधून पैसे काढणे तर अंगवळणी पडलेच आहे पण आता डिजिटल ट्रान्झॅक्शन सुद्धा सगळे नेहमी करतात.

अगदी भाजी किंवा वाण समान आणण्यापासून ते मोठमोठ्या रकमेची देवाणघेवाण या माध्यमातून चालते.

पैसे बाळगण्यापेक्षा हे सोयीस्कर पडते खरे पण काहीवेळा या ऑनलाईन व्यवहारांचे पण काही तोटे असू शकतात.

अनेकांसह तुम्हाला देखील हा अनुभव असेल की ‘एटीएम’मधून पैसे काढताना किंवा डिजिटल व्यवहार करताना काही वेळा आपली ट्रान्झॅक्शन फेल होतात.

म्हणजे आपल्या खात्यातून पैसे जातात पण एटीएममधून आपल्याला मिळत नाहीत किंवा आपण डिजिटली ते कोणाला ट्रान्स्फर करत असू तर ते आपल्या अकाउंट मधून तर डेबिट होते पण समोरच्या व्यक्तीला मिळत नाही.

अशावेळेला RBI च्या नियमानुसार बँकेकडून ती रक्कम सात दिवसांत परत आपल्या खात्यात जमा होणे अपेक्षित असते.

तुम्ही असे ऑनलाईन व्यवहार नेहमी करत असाल तर तुम्हाला अनुभव असेलच की कधीकधी बँकेकडून ही ट्रान्झॅक्शन फेल झालेली रक्कम तुमच्या खात्यात ताबडतोब जमा होते तर काहीवेळा त्या साठी बरेच दिवस जातात.

कधी कधी तर हे आपलेच पैसे परत मिळवण्यासाठी तक्रारी, त्यांचा पाठ पुरावा हे सोपस्कार सुद्धा करावे लागतात. 

पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर असे ऑनलाईन व्यवहार नेहमी करत असाल तर तुम्हाला RBI च्या या नियमाबद्दल माहिती असायलाच हवी. 

तुमची ट्रान्झॅक्शन फेल होऊन तुम्ही बँकेकडे तक्रार नोंदवली तर तुम्हाला तुमची रक्कम सात दिवसांच्या आतच बँकेकडून परत मिळायला हवी.

तसे झाले नाही तर तक्रार नोंदवल्या नंतरच्या सातव्या दिवसापासून बँक तुम्हाला प्रत्येक दिवशी रुपये १०० इतकी नुकसान भरपाई देणं लागते. 

बँकेकडून ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय काय लागते याबद्दलची विस्तृत माहिती या लेखात दिली आहे. 

या लेखाच्या सुरुवातीलाच ऑनलाईन व्यवहार फेल होण्याची दोन मुख्य कारणे दिली आहेत, एक म्हणजे ‘एटीएम’मध्ये ट्रान्झॅक्शन फेल होणे आणि दुसरे म्हणजे कोणाला पैसे पाठवताना ट्रान्झॅक्शन फेल होणे.

समजा डीजीटली पैशांचे व्यवहार करताना काही अडचण येऊन ट्रान्झॅक्शन फेल झाले, पण तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा झाली असेल तर ते पैसे परत मिळवण्यासाठी, UPI अप्लिकेशनवर तक्रार नोंदवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा- 

१. UPI एप्कलीकेशनवर तक्रार नोंदवण्यासाठी ‘पेमेंट हिस्ट्री’ (Payment history) हा पर्याय निवडा. 

२. ‘Despute’ हा पर्याय निवडून, तिथे तुमच्या तक्रारीची नोंद करा. 

३. तक्रार नोंदवली की बँकेकडून त्याबद्दल शहानीशा केली जाते. 

४. जर तक्रार खरी असेल, तर सात दिवसाच्या आत तुमच्या खात्यातून गेलेले पैसे परत तुमच्या खात्यात जमा होतात. 

ब. ‘एटीएम’ मधून पैसे काढताना ट्रान्झॅक्शन फेल झाले तर काय करायचे?

समजा ‘एटीएम’मधून पैसे काढताना ऐन वेळेला काहीतरी घोळ झाला, कॅश बाहेर आलीच नाही किवा अडकून थोड्याच नोटा बाहेर आल्या पण तुमच्या खात्यातून मात्र पूर्ण रक्कम वजा झाली तर काय करायचे? 

१. असे झाले तर तुमचे ट्रान्झॅक्शन फेल झाल्यापासून ३० दिवसांतच तुमची तक्रार थेट बँकेत जाऊनच नोंदवावी लागते. 

. यासाठी तुम्हाला तुमच्या ट्रान्झॅक्शनची रिसीट आणि बँकेचे स्टेटमेंट लागते. या दोन्ही गोष्टी घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या बँकेत जाऊनच ही तक्रार करावी लागते. 

३. बँकेत तुमची इतर माहिती सुद्धा भरावे लागतात. 

४. तुम्ही तक्रार नोंदवल्या नंतर सात दिवसात तुमच्या खात्यात बँकेकडून पैसे परत जमा होतात. 

RBI कडून या नियमाची अंमलबजावणी सप्टेंबर २०१९ मध्ये झाली आहे. 

जर काही कारणाने तक्रार केल्यापासून सात दिवसात पैसे जमा झाले नाही तर मात्र तुम्हाला अजून एक फॉर्म भरावा लागतो- तो म्हणजे ‘एनेक्झर 5’ जो फेल्ड ट्रान्झॅक्शन साठी वापरला जातो.

हा फॉर्म व्यवस्थित भरून बँकेत सबमिट करावा लागतो.

तुमचे डिजिटल ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर जर दिलेल्या अवधीच्या आत (सात दिवस) तुमच्या खात्यातून गेलेली रक्कम परत जमा झाली नसेल तर हा फॉर्म ज्या दिवशी तुम्ही भरून सबमिट करता त्या दिवसापासून तुमची गेलेली रक्कम परत खात्यात जमा होईपर्यंत बँकेडून तुम्हाला रुपये १०० एवढी नुकसान भरपाई प्रतिदिन दिली जाते! 

ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेयर करायला विसरू नका!  

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!