अक्कलदाढ येण्याची लक्षणे आणि त्रास कमी होण्यासाठी उपाय वाचा या लेखात.

अक्कल दाढा, या चार दाढा वयाच्या १८ व्या वर्षानंतर यायला सुरुवात होतात.

यावरूनच याचे हे नाव पडले असावे, म्हणजे अक्कल येणाच्या वयात ज्या दाढा येतात त्या!!

या दाढेचा जसा अकलेशी संबंध नाही तसाच आपल्या अन्न चावण्याच्या क्रियेत सुद्धा त्याचा सहभाग नसतो.😅

थोडक्यात, या अक्कल दाढा आल्या नाहीत तरी काही फरक पडत नाही आणि आल्या तरी नाही!

अशा या एकदा तोंडात आल्यावर त्रास न देणाऱ्या, चुपचाप आतमध्ये बसून राहणाऱ्या अक्कल दाढा, येताना मात्र खूप त्रास देऊ शकतात.

जर तुमच्या तोंडात नवीन चार दाढा यायला जागा शिल्लक नसेल, तर या दाढा वाकड्या तिकड्या यायला बघतात, असे करताना बाजूच्या दाढेला धक्का देऊन त्यांना सुद्धा नुकसान पोहोचवू शकतात.

काही वेळा तर त्यांना वर यायला जागा नसली तर त्या आतल्या आत सुद्धा वाकड्या होऊ शकतात.

असे झाले तर त्या वर येण्याआधीच त्यांना काढून टाकावे लागते.

काहीवेळा या दाढा वर आल्यावर वाकड्या होतात आणि त्यामुळे गाल चावला जाणे, दाढेचे टोक गालाला टोचणे यासारखे त्रास होऊन त्यांना उपटायची वेळ येते.

अक्कल दाढ येताना तोंड, म्हणजे कानापासून ते हनुवटीपर्यंत दुखू शकते.

बऱ्याच वेळा तर लक्षात सुद्धा येत नाही की हे दुखणे नेमके कशामुळे आहे ते.

पण अक्कल दाढ येत असेल तर काही ठराविक लक्षणे असतात.

ती लक्षणे जर आढळली तर समजावे की हे दुखणे अक्कल दाढेचेच आहे.

अक्कल दाढ येत असेल तर कसे ओळखायचे?

अक्कल दाढ येत असेल हे ओळखण्याचा हमखास मार्ग म्हणजे जबड्याचा एक्स-रे.

एक्स-रे मध्ये दाढ येत आहे का, येत असली तर ती बरोबर जागी येत आहे का?

वाकडी येत आहे का हे समजते.

पण एक्स-रे काढायच्या आधी अशी कोणती लक्षणे आहेत ज्याकडे लक्ष ठेवावे आणि ती दिसून आल्यावर एक्स-रे काढायला जावे?

१. हिरड्यांना सूज, विशेषतः तोंडात आधीपासून असणाऱ्या दाढेच्या मागच्या बाजूला.

२. जबड्याचे दुखणे

३. हिरडीतून रक्त येणे

४. तोंड उघडण्यास त्रास होणे

५. तोंडात वाईट चव व वास रेंगाळणे

अक्कल दाढ येताना सतत दुखत राहते, किंचित ताप येण्याची सुद्धा शक्यता असते.

ज्या ठिकाणी दाढ वर येत असते तिथे हिरडीचा एक भाग वर उचलल्या सारखा वाटतो.

पण जर अक्कल दाढ यायला तोंडात जागाच नसेल, जबडा लहान असेल किंवा इतर दाढा वेड्यावाकड्या असतील तर दुखत असताना मधूनच एखादी तीव्र कळ येते.

अक्कल दाढ येताना तोंड उघड-बंद करताना त्रास होतो तसेच ज्या बाजूला नवीन दाढ येत असते त्या बाजूने चावताना सुद्धा वेदना होतात.

पण खरेतर अक्कल दाढ येताना नेहमीच दुखते. काहीवेळा ते दुखणे नॉर्मल आहे का? का काही त्रास आहेत हे ओळखायला अवघड जाते. पण ते कसे ओळखायचे? केव्हा डेन्टीस्टकडे जायचे?

१. हिरड्यांमधून जर रक्त येत असेल तर नेहमी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

२. जबड्याचे दुखणे असेल, विशेषतः तोंड उघड-बंद करताना तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. हिरड्यांना किंवा गालाला सूज आली असेल तर.

सहसा अक्कल दाढ येताना हे त्रास सोडले तर काही विशेष त्रास होत नाहीत.

दात येताना हिरड्यांना जखमा होऊन जेवढे दुखायचे तेवढे दुखतेच.

पण एकदा दाढा आल्यावर काही इतर त्रास होत नाहीत.

पण या लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काही वेळेला यामधून गुंतागुंतीच्या समस्या होऊ शकतात.

यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे अक्कल दाढ जेव्हा येतात तेव्हा वय १८ किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त असते.

या वयापर्यंत शरीराची वाढ पूर्ण झालेली असते. त्यामुळे जर काही लोकांचा जबडा लहान असेल तर त्यामध्ये अजून चार नवीन दाढा येऊ शकतील इतकी जागा नसते.

त्यामुळे अक्कल दाढेला बाहेर येताना धडपड करावी लागते.

या बाहेर यायच्या धडपडीत ते इतर आधीच्या, शेजारच्या दाढेला धक्का देतात आणि वेड्या-वाकड्या बाहेर येतात.

खरेतर बाहेर येण्याच्या आधी, आत मध्ये सुद्धा या दाढा वाकड्या होऊन अडकून बसू शकतात. यामुळे तोंडातील इतर दात सुद्धा वाकडे होण्याची शक्यता असते.

त्यामुळे जर अक्कल दाढ येताना वर सांगितलेली लक्षणे असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यायला उशीर करू नये कारण अशा अक्कल दाढा आल्यावर किंवा यायच्या आधी सुद्धा काढून टाकाव्या लागतात.

हे जर वेळीच लक्षात आले, तर अक्कल दाढ बाहेर यायच्या आधीच एका लहानशा सर्जरीद्वारे ती काढून टाकता येते.

यामुळे अक्कल दाढ बाहेर येताना होणारे त्रास होत नाहीत आणि जर ती वेडीवाकडी बाहेर येणार असेल (जे एक्स-रे मध्ये समजते) तर त्यामुळे इतर दातांना सुद्धा त्रास होत नाहीत.

पण जर अक्कल दाढ बाहेर यायची प्रक्रिया सुरु झाली असेल आणि तोंडात जागा नसल्यामुळे जर ती अर्धवट येऊन अडकून बसली तर काय करायचे?

खरेतर ही सगळ्यात मोठी समस्या होते कारण त्या अर्धवट आलेल्या दाढेत, तिच्या खालच्या बाजूला हिरड्यांमध्ये अन्नाचे कण अडकून राहून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

याशिवाय दात वर येताना जो हिरडीचा भाग वर आला असतो त्याला सूज येऊन वेदना होऊ शकतात.

यामुळे अर्धवट आलेली दाढ कालांतराने किडू शकते.

या सगळ्यामुळे हिरड्यांना सुद्धा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

हे कसे टाळायचे?

अक्कल दाढ येत असो व नसो सहा महिन्यातून एकदा दातांची तपासणी केली पाहिजे.

यामध्ये दाढ यायची शक्यता आहे का नाही ते समजते आणि मग त्यानुसार डॉक्टरांना काहीतरी निर्णय घेता येतो.

जर या तपासणीमध्ये काही आढळले नाही आणि अचानक दाढेचे दुखणे सुरु होऊन, वर सांगितलेली लक्षणे दिसत असतील तर दुखणे अंगावर न काढता लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा जेणेकरून दाढ काढून टाकायची असेल तर तो निर्णय वेळेत घेता येतो आणि पुढची दुखणी टाळता येतात.

या लेखाचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नसून वेळीच सावध करणे हा आहे.

फक्त डॉक्टरांचा सल्ला घ्या या मुद्द्याला अधोरेखित न करता तो का घ्यावा?

यामागची कारणे सुद्धा दिली आहेत. तसेच वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यायचा,

कोणत्या लक्षणांकडे लक्ष ठेवायचे हे सुद्धा सांगितले आहे म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की अक्कल दाढ बाहेर येताना जर काही समस्या येणार असतील तर ते दुखणे नेहमीच्या दुखण्यापेक्षा कसे वेगळे असते.

दर वेळेला अक्कल दाढ येताना हे त्रास होतील असे नाही.

बऱ्याचदा, बऱ्याच जणांना अगदी किरकोळ दुखून चारही अक्कल दाढा व्यवस्थित येतात आणि दातांची नीट काळजी घेतली, ओरल हायजीनबद्दल सतर्कता दाखवली तर त्यांची काही दुखणी सुद्धा होत नाहीत.

जरी चावायला अक्कल दाढेचा काही विशेष उपयोग होत नसला तरी त्यांच्या तोंडात असण्याने बहुतेक वेळा काही अपाय सुद्धा होत नाही.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “अक्कलदाढ येण्याची लक्षणे आणि त्रास कमी होण्यासाठी उपाय वाचा या लेखात.”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय