रोजचं कंटाळवाणं, एकसुरी आयुष्य Happening बनवायचंय! मग हे वाचा

रोजचं कंटाळवाणं एकसुरी आयुष्य Happening बनवायचंय मराठी प्रेरणादायी विचार

तुम्हाला असे वाटते का की तुमचे आयुष्य एकसुरी झाले आहे?

जॉब, घर या दोन्ही आघाड्या सांभाळून तुम्ही थकून गेला आहात?

सोमवार ते शुक्रवार हे तुमच्यासाठी फार कठीण दिवस असतात, जे सरता सरत नाहीत आणि शनिवार-रविवारची तुम्ही एकदम आतुरतेने वाट बघत असता पण हे दोन दिवस मात्र कधी येतात आणि कधी जातात याचा पत्ता सुद्धा लागत नाही.

सोमवार सकाळ म्हटले की तुमच्या जीवावर येते!

आयुष्यात बदल तर हवा असतो पण त्यासाठी काय करायचे हे समजत नसते.

यामुळे सतत चेहऱ्यावर वैताग, कपाळावर आठ्या असतात.

मित्रांनो, याचाच अर्थ तुमचे आयुष्य एकसुरी झाले आहे आणि याचे कारण म्हणजे तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध करत असलेले काम किंवा नोकरी आणखी इतर काही…

मित्रांनो, खरेतर तुम्हाला जेव्हा तुमचे आयुष्य एकसुरी झाले आहे असे जाणवायला लागते तेव्हाच तुम्हाला या गोष्टीची कल्पना आलेली असते पण यावर उपाय काय ते तुम्हाला माहीत नसते.

नोकरीचा कंटाळा आला तरी, नोकरी ही करावीच लागते कारण त्यावर आपले, आपल्या कुटुंबाचे पोट असते.

शिवाय जगातील बहुतांश लोक आपल्या मनाविरुद्धच नोकरी करत असतात.

अशी समजूत तुम्ही देखील स्वतःची कधीतरी काढली असेलच.

पण आयुष्यात आपले ध्येय काय आहे, तर खुश होणे. मग या नावडत्या कामात राहून तुम्ही खुश व्हाल का?

असे एकसुरी आयुष्य जगून तुम्हाला कमावत असलेल्या पैशांचा उपभोग घेता येईल का?

अशा आयुष्याची तुलना खरेतर एखाद्या जेलशी केली जाऊ शकते. ऐकायला विचित्र वाटेल, पण थोडं थांबा, आणि पुढे वाचा तुम्हाला पटेल आणि एक मार्ग सुद्धा सापडेल.

तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला आयुष्य जगावे लागत आहे, ऑफिस-घर-जबाबदाऱ्या याच्यामध्ये तुम्ही पार अडकून गेला आहात..

मग हे तुमच्या आयुष्यासाठी जेल नाहीतर अजून काय आहे?

मग या जेलमधून बाहेर कसे पडायचे?

उत्तर सोपे आहे! जेलमधून बाहेर पडण्यासाठी गुन्हेगार काय करतात? सुरुंग लाऊन जेल तोडतात.. हो न?

मग तुम्हाला सुद्धा तुमच्या एकसुरी आयुष्याच्या जेलमधून बाहेर पडायचे असेल तर सुरुंग लावावा लागेल.

फक्त हा सुरुंग असेल तो इच्छाशक्तीचा, उत्साहाचा आणि नवीन सुरुवात करायच्या उम्मेदीचा!

तुमच्या अशा एकसुरी आयुष्यामागे काहीही कारण असुदे, असे आयुष्य काही तुम्ही तुमच्या इच्छेने जगत नसाल.

पण यातून बाहेर पडायला मात्र तुम्हाला तुमची इच्छाशक्तीच मदत करणार आहे.

हा सुरुंग नेमका कसा बनवायचा, त्यासाठी काय लागणार आहे हे तुम्हाला सांगण्यासाठीच आजचा हा लेख आहे.

१. स्वीकार

परिस्थितीचा स्वीकार करणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.

तुम्ही तुमच्या मनासारखे आयुष्य जगत नसाल तर त्याची कबुली निदान स्वतःकडे तरी देणे आवश्यक आहे.

तुम्ही तुमच्या जॉबमध्ये नाखूष असाल किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खुश नसाल तर ते मान्य करायला हवे.

मित्रांनो, त्यासाठी कुढत मात्र बसायचं नाही…

यामुळे तुमच्या आयुष्यात जे चालू आहे ते बदलायचे आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल.

या गोष्टींचा स्वीकार केल्या क्षणापासून तुम्ही आहे ती परिस्थिती बदलायला सुरुवात कराल.

या स्वीकारानंतर परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.

२. इच्छा

आपल्याला अमुक काम करायचे नाही हे कळणे, त्याचा स्वीकार करणे जितके महत्वाचे आहे तितकेच आपल्याला काय आवडते, काय काम करायचे आहे याचा विचार करणे.

तुम्हाला कोणते काम आवडते, कोणत्या कामामुळे तुम्हाला आनंद मिळतो हे प्रश्न इथे महत्वाचे आहेत.

मुख्य म्हणजे कोणते काम तुम्ही अगदी आवडीने, कोणीही बळजबरी न करता करू शकाल हे तुम्ही शोधले पाहिजे.

जर तुम्हाला तुमच्या आवडी-निवडीबद्दल खात्री नसेल, तुम्हाला नक्की काय करायचे आहे याबद्दल साशंकता असेल, तर तुम्ही सुरुंग जरी यशस्वीपणे लावला तरी एका जेलमधून बाहेर पडून तुम्ही दुसऱ्या जेलमध्ये जाल.

म्हणून हे होऊ नये यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे.

आपल्याला काय आवडते, कशात आपल्याला गती आहे, कोणती कामे आपण व्यवस्थित करू शकतो हे माहीत हवे.

यासाठी योग्य तो विचार करणे, नवीन क्षेत्रात नवीन जोमाने काम करायची इच्छा आणि तयारी हवी.

मित्रांनो, या दोन गोष्टी तुम्ही केल्या म्हणजे तुमची तुमच्या या एकसुरी आयुष्यातून बाहेर पडायची अर्धी तयारी झाली आहे.

आता तुम्ही सहज त्यातू बाहेर पडू शकाल पण यानंतर तुम्हाला जे करायचे आहे ते जास्त महत्वाचे आहे.

कारण ते जर तुम्ही केले नाही, तर या एकसुरी आयुष्यातून बाहेर पडण्याचा काहीच फायदा होणार नाही.

तुम्ही केवळ एका गर्तेतून बाहेर येऊन दुसऱ्या गर्तेत फेकले जाल.

मग तुमच्या या जेलमधून एकदा मुक्ती मिळाली, की परत त्यात अडकू नये यासाठी काय करायचे?

१. प्रेरणा

तुमच्या मागे एक प्रेरक शक्ती असणे, हीआयुष्यात इच्छे इतकीच ही महत्वाची गोष्ट आहे.

आपल्याला काय आवडते हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे.

कोणत्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो, कोणते काम करण्याच्या इच्छेबरोबरच तुम्हाला कोणत्या गोष्टींमधून प्रेरणा मिळते हे महत्वाचे आहे.

एकसुरी आयुष्य नको असेल, तर तुम्हाला अशा कामाची निवड करणे गरजेचे आहे.

२. योग्य कामाचा शोध

असे होऊ शकते की तुम्हाला नक्की माहीत नाही, की तुम्ही कोणते काम करून आनंदी व्हाल.

कशामुळे तुम्हाला परत एकसुरी आयुष्य जगायला लागणार नाही. काही हरकत नाही.

आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असली पाहिजेत असे नाही.

तुम्हाला जर तुमच्या एकसुरी जगण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला अशा कामाचा शोध घेणे मात्र गरजेचे आहे.

कदाचित यासाठी तुम्हाला वेगवेगळी कामे करून बघावी लागतील.

अशी सुद्धा शक्यता आहे की यामध्ये तुम्हाला लगेच यश येणार नाही.

वेगवेगळी कामे केल्यावर तुम्हाला नक्की काय प्रेरित करते, कशातून आनंद मिळतो याचा शोध लागेल.

पण ही पायरी सगळ्यात महत्वाची आहे आणि हा शोध घेताना, नवनवीन कामे करून बघतानाच तुमच्या आयुष्याचा एकसुरीपणा जाणार आहे.

३. ऍक्शन

ऍक्शन! कृती.. तुम्ही कितीही नियोजन करा पण ते जर तुम्ही कृतीत उतरवले नाही, तर त्याचा काही उपयोग नाही.

तुम्ही एकसुरी आयुष्यातून आहेर पडला आहात, योग्य कामाचा शोध तुम्हाला लागलेला आहे आता काय करायची गरज आहे?

तर तुमचे सगळे नियोजन सत्यात उतरवायचे.

यासाठी तुमच्याकडे असलेले ज्ञान, काम करायची तुमची पद्धत, मेहनत घ्यायची तयारी हे सगळे पणाला लावावे लागेल.

आयुष्यात प्रगती करायची असेल तर कष्ट करायची तयारी हवी.

वेगेवगळे प्रयोग केले, कष्ट घेतले तर आयुष्यात एकसुरीपणा नक्कीच येणार नाही.

४. त्याग

काहीतरी नवीन करायचे म्हणजे त्यासाठी कोणत्यातरी गोष्टीचा त्याग करणे गरजेचे असतेच.

आता आयुष्यात एकसुरीपणा जर आला असेल तर काय त्याग करायचे?

तुमचा कम्फर्ट झोन!

जेव्हा तुम्ही आहे त्यात समाधान मानायला लागता, आहे तेच आयुष्य जगत राहायला बघता तेव्हा एकसुरीपणा येतो पण याच तुमच्या कम्फर्ट झोनचा त्याग केलात तर तुम्हाला नवनवीन गोष्टी करून बघता येतील, निदान तशी तयारी तरी तुम्ही कराल.

मित्रानो, आयुष्य एकसुरी होऊ नये यासाठी सतत चालत राहिले पाहिजे.

जिथे तुम्ही थांबाल तिथे तूमची प्रगती सुद्धा थांबेल हे लक्षात ठेवा आणि आयुष्यात जास्तीजास्त कल सतत कार्यरत राहण्याकडे ठेवा मग बघा आयुष्य सतत ‘happening’च असेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

You may also like...

5 Responses

 1. Very good जगण्याची उमेद मनांत निर्माण झालीं… धन्यवाद।

 2. Mule Yogesh says:

  खूप छान

 3. Neelam Shailendra Chauhan says:

  Khoop chaan

 4. Rupesh jadhav says:

  Khup chan mala khup chan vatal vachun.

  • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

   मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

   मनाचेTalks फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalks/

   मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!