रात्रीची शांत झोप हवी आहे? मग झोपण्यापूर्वी हे नक्की करून बघा 

रात्रीची शांत झोप हवी आहे? मग झोपण्यापूर्वी हे नक्की करून बघा 

मित्रमैत्रिणींनो, गाढ, शांत झोप आणि दिवसभर भरपूर पाणी या दोन गोष्टी केल्याने आपले अर्धेअधिक प्रॉब्लेम्स दूर होतील.

आपल्या आरोग्याच्या दृष्टीने रात्रीची गाढ झोप अतिशय महत्वाची आहे. पण बऱ्याच जणांना अशी शांत, गाढ झोप लागत नाही.

कामाचा व्याप, स्ट्रेस, इतर टेन्शन या सगळ्याचा परिणाम झोपेवर होतो.

निद्रानाशाचा त्रास तर हल्ली अगदी लहान वयापासून सुरु होतो. 

शांत व गाढ झोप न लागण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.

त्यातील टेंशन हे सगळ्यात महत्वाचे कारण आहे. टेन्शन कमी करण्याचे मार्ग आहेतच.

त्यासाठी व्यायाम, प्राणायाम हे अतिशय गरजेचे आहेत.

त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी आवर्जून करायची गोष्ट म्हणजे टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न. 

पण शांत झोप हवी असेल तर अजून एका गोष्टीचे महत्व आहे, ते म्हणजे तुमचा आहार.

चौरस, सात्विक आहार तब्येतीच्या दृष्टीने एकूणच चांगला पण जर शांत झोप हवी असेल तर असे काही पदार्थ आहेत जे रात्रीच्या जेवणात, किंवा झोपण्यापूर्वी घेतल्याने तुमच्या झोपेवर सकारात्मक परिणाम होतो. 

हे असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे रात्रीच्या वेळी घेऊ शकता.

यामुळे तुमच्या एरवीच्या जेवणाच्या पद्धतीत काही बदल करायची सुद्धा गरज नाही.

हे पदार्थ खाल्ल्या-खाल्ल्या झोप लागेल असेही नाही, फक्त या पदार्थांमुळे झोप लवकर यायला मात्र नक्की मदत होईल. 

शांत, गाढ झोप हवी असल्याच या लेखात दिलेल्या पदार्थांची यादी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल. 

१. कोमट दुध 

खरेतर गाढ, शांत झोप लागावी म्हणून झोपण्यापूर्वी कपभर कोमट दुध घेणे हा पूर्वापार चालत आलेला उपाय आहे.

पण जेव्हा तुम्ही एखादा उपाय स्वीकारता तेव्हा त्यामुळे नक्की काय होते, त्याचा फायदा कसा होतो हे तुम्हाला माहीत हवे.

दुधामध्ये शांत झोप लागण्यासाठी गरजेची असणारी काही द्रव्ये असतात.

ट्रीपटोफॅन, कॅल्शियम, व्हिटामिन ‘डी’, मेलॅटोनिन ही शांत झोप लागण्यासाठी महत्वाची असणारी द्रवे एक कप दुधात भरपूर प्रमाणात असतात.

म्हणून झोप येण्यासाठी व गाढ झोप लागण्यासाठी झोपायच्या आधी एक कप कोमट दुध घ्यावे. 

२. बदाम 

आपल्या शरीरात मेलॅटोनिन नावाचे एक हार्मोन असते.

आपली झोप नियंत्रित करण्याचे काम हे हार्मोन करत असते.

हे हार्मोन स्त्रवले गेले की शांत झोप लागते, व याची पातळी कमी झाली की जाग येते.

म्हणजेच या हार्मोनमुळे आपली झोपेची सायकल सेट होते.

बदामामध्ये हे हार्मोन जास्त प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर मॅग्नेशीयम हे खनिज सुद्धा बदामामध्ये जास्त प्रमाणात असते.

तुम्हाला निद्रनाशाचा त्रास असेल तर मॅग्नेशीयममुळे तुम्हाला व्यवस्थित झोप लागण्यासाठी फायदा होतो. 

या दोन गोष्टींमुळे गाढ व शांत झोप लागण्यासाठी बदाम फायदेशीर आहेत.

रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन बदाम खाल्ल्याने फायदा होतो.

गरम दुधारोबर बदाम घेतले तर दुहेरी फायदा होतो, त्यामुळे तो सुद्धा एक चांगला पर्याय आहे. 

३. आक्रोड 

अक्रोडमध्ये मेलॅटोनिन, मॅग्नेशीयम आणि सीरोटोनिन हे जास्त प्रमाणात आढळतात.

त्यामुळे झोप येण्यासाठी आक्रोड हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.

रात्रीच्या जेवणानंतर, झोपण्यापूर्वी हे ड्रायफ्रुट खाल्ले जाऊ शकतात. 

४. कॅमोमाईल चहा 

ग्रीन टी प्रमाणेच हा सुद्धा एक हर्बल चहा आहे.

याच्या सेवनाने स्ट्रेस, टेन्शन दूर होतात. झोप न लागण्यामागचे एक महत्वाचे कारण हे आहे, चिंता.

त्यामुळे हा चहा घेतल्याने, टेन्शन कमी होऊन शांत व गाढ झोप लागायला मदत होते.

या व्यतिरिक्त या चहामध्ये एपीजेनीन नावाचे द्रव्य असते. यामुळे झोप येण्यासाठी मदत होते. 

झोप येण्यासाठी, तसेच रात्रभर शांत झोप हवी असल्यास हा एक चांगला पर्याय आहे.

रात्री झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाईल चहा घेतल्याने तुम्हाला झोप तर येईलच पण त्याचबरोबर तुमच्या झोपेचा दर्जा सुद्धा सुधारेल. 

५. मासे 

ज्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटचे प्रमाण जास्त असते असे मासे झोप येण्यासाठी उपयुक्त असतात.

तुम्ही जर मत्सहार करत असाल साल्मन, बांगडा हे मासे रात्रीच्या जेवणात खाल्ल्याने तुमच्या शरीराला ओमेगा ३ फॅट आणि व्हिटामिन ‘डी’ जास्त प्रमाणात मिळतात.

या दोन्ही गोष्टी गाढ, शांत झोप लागण्यासाठी अतिशय गरजेच्या असतात. 

६. भोपळ्याच्या बिया 

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशीयम आणि ट्रीपटोफॅन दोन्हीही जास्त प्रमाणात आढळतात.

मॅग्नेशीयममुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते.

ट्रीपटोफॅनचे शरीरात गेल्यावर मेलॅटोनीन व सिरोटोनीन या हार्मोनमध्ये रुपांतर होते.

झोप येण्यासाठी या दोन हार्मोनची शरीराला गरज असते.

झोण्यापुर्वी भोपळ्याच्या बिया तोंडात टाकणे किंवा जेवणातच कोणत्यातरी पदार्थात त्यांच्या समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे. 

७. किवीचे फळ 

झोपण्यापूर्वी किवी खाल्ल्याने झोप लवकर येते व रात्रभर गाढ, शांत झोप लागते.

किवीमध्ये मेलॅटोनीन, मॅग्नेशीयम हे दोन्ही जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे झोप लागण्यास मदत होते.

या व्यतिरिक्त किवीमध्ये अनथोसायनीन, फ्लावेनॉइड्स, पोटॅशीयम हे देखील जास्त प्रमाणात असतात.

यामुळे सुद्धा झोप लग्नासाठी मदत होते. आपल्या आरोग्यासाठी असेही चांगल्या असणाऱ्या या फळामध्ये हे झोप येण्यासाठी गरजेची असणारी द्रवे जास्त प्रमाणात असल्याने त्याचा फायदा होतो.

झोप येण्यास त्रास होत असल्यास रात्रीच्या जेवणानंतर किवी खाल्ल्ये फायदा होतो. 

८. भात 

रात्रीच्या जेवणात भात खावा की नाही याबद्दल अनेक वेगवेगळी मते असतात.

कारण भातामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात. पण रात्रीच्या जेवणात थोड्या प्रमाणात जरी भात घेतला तरी शांत झोप लागण्यासाठी ते फायदेशीर ठरते. 

मित्रांनो, झोप येणे, रात्रभर झोप लागणे हे तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असते.

योग्य आहार, व्यायाम, स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न या सुद्धा अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत.

तुम्हाला झोप येत नसेल, निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुमची जीवनशैली सुधारणे सुद्धा गरजेचे आहे.

या पदार्थांचा समावेश तुमच्या रात्रीच्या जेवणात केलात, किंवा यातल्या तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी जेवणानंतर खाल्ल्याने फायदा होईल.

तुम्हाला झोप येण्यासाठी मदत होईल व झोप सुद्धा गाढ लागेल.

पण याचबरोबर झोपेची वेळ निश्चित करणे, झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करणे अशा गोष्टींचा सुद्धा तुम्हाला उपयोग होईल.

रात्रीची कमीतकमी ८ तासांची झोप गरजेची असते. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

 1. Rajan गोऱ्हे says:

  Very good information.

  • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

   मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

   मनाचेTalks फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalks/

   मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!