बीट खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

जगभर आपल्या भडक लाल रंगासाठी प्रसिद्ध असणारे बीट खाल्ले जाते.

पदार्थामध्ये नैसर्गिक लाल रंगासाठी तर बीट वापरतातच पण त्याचबरोबर बीटाची विशिष्ट चव सुद्धा अनेकांना आवडते.

बीटचा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे कटलेट.

बीट मीठ लाऊन, उकडून नुसते खाल्ले जाते, कधी त्याची कोशिंबीर करता येते तर कधी सूप.

अलीकडे ‘आरोग्यासाठी चांगले’ म्हणून खूप जण अगदी नेहमीच्या, रोजच्या जेवणात बीटाचा समावेश करत आहेत.

ही खरेतर अतिशय चांगली गोष्ट आहे कारण बीट हे खरच आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते.

बीटामध्ये अशी कोणती पोषकद्रवे असतात ज्यामुळे ती तब्येतीला इतकी लाभदायक असतात, त्याचे काय फायदे होतात हे तुम्हाला आज या लेखात वाचायला मिळणार आहे.

१. अनेक पोषकद्रव्यांनी परिपूर्ण

बीटामध्ये व्हिटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात असतात.

यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते.

बीटामध्ये अनेक antioxidants सुद्धा आढळतात.

बीटामध्ये तुमच्या आरोग्यासाठी महत्वाची अशी खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात असतात.

शरीर निरोगी राहावे यासाठी या पोषकद्रव्यांची गरज असते.

बीटात असणाऱ्या या महत्वाच्या पोषकद्रव्यांमुळे बीट ही अतिशय पौष्टिक भाजी मानली जाते.

शरीराला आवश्यक असलेले सगळे घटक बीटामधून मिळतात.

लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत बीटाचे फायदेच फायदे आहेत.

हे फायदे कोणते ते पुढील मुद्यांमध्ये एकेक करून आपण बघूच.

२. कमी कॅलरी असतात

बीट हे अनेक पोषकद्रव्याने परिपूर्ण असले तरी त्यात असणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते.

बीटामध्ये जवळपास ८७ टक्के पाणी असते.

एका मध्यम आकाराच्या बीटात केवळ ४३ कॅलरीज असतात.

कॅलरी कमी असल्याने डायट करून वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी बीट हा एक उत्तम पर्याय आहे.

३. जास्त प्रमाणात खनिजे आढळतात

बीटामध्ये खनिजे जास्त प्रमाणात आढळतात.

तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांसाठी खनिजांची गरज असते.

ताज्या भाज्या आणि फळे यातून ही खनिजे मिळत असतात.

तब्येत चांगले राहावी यासाठी शरीराला या खनिजांची गरज असते आणि ताज्या भाज्या खाऊन ती गरज पुरवली जाते.

बीटामध्ये फोलेट, पोटॅशीयम, मॅग्नेशीयम आणि फॉस्फरस ही खनिजे जास्त प्रमाणात असतात.

फोलेटमुळे रक्तातील तांबड्या पेशींचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढायला मदत होते.

यामुळे ऍनेमिया सारखे विकार बरे व्हायला मदत होते.

पोटॅशीयम हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. फॉस्फरसमुळे हाडे मजबूत व्हायला मदत होते.

४. रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त

बीटामध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या नायट्रेटमुळे त्याचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी होतो.

जर तुम्हाला उच्चरक्तदाबाचा (हाय बिपी, हायपरटेन्शन) त्रास असेल तर रोज बीटचा रस प्यायलाने तो कमी व्हायला मदत होते.

उच्चरक्तदाबाचा परिणाम ह्रदयाच्या आरोग्यावर होतो.

उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना ह्र्द्विकाराचा धोका जास्त असतो.

त्यामुळे बीटाच्या नियमित सेवनाने ह्रदय सुद्धा निरोगी राहायला मदत होते.

५. खेळाडूंसाठी गरजेचे

बीट हे पौष्टिक असल्याने ते खेळाडूंसाठी सुद्धा चांगले असतेच, पण बीटामध्ये असणाऱ्या अजून एका पोषक द्रव्यामुळे ते कोणतेही खेळ खेळणाऱ्या व्यक्तींसाठी जास्तच फायदेशीर असतात.

हे खेळाडूंसाठी गरजेचे पोषक द्रव्य म्हणजे ‘नायट्रेट’.

नायट्रेट हे खेळांडूंसाठी फायदेशीर असते. यामुळे ते अधिक तंदुरुस्त होतात.

खेळ सुरु व्हायच्या आधी तीन तास जर बीट ज्यूस प्यायला तर खेळाडूंची कार्यक्षमता वाढायला मदत होते.

६. Antioxidants जास्त प्रमाणात आढळतात

बीटामध्ये बीटालीन्स नावाचे Antioxidant आढळते.

Antioxidant हे शरीरातील पेशींवर फ्री रॅडीकल्समुळे येणारा ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात.

म्हणजेच यामुळे शरीरातील पेशी जास्तीतजास्त आरोग्यपूर्ण राहतात.

त्यांच्यामध्ये वयानुसार होत जाणारे बदल होण्याचे प्रमाण कमी होते.

७. फायबर जास्त प्रमाणात आढळतात

बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतात.

फायबर हे सकस आहारातील अत्यंत महत्वाचा घटक आहे.

फायबरमुळे पचनशक्ती सुधारते. कॉन्स्टीपेशन सारख्या पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात.

फायबर हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर असते.

आहारात फायबरचे प्रमाण जास्त घेतल्याने पोट लवकर

भरल्याची भावना निर्माण होते व लवकर भूक सुद्धा लागत नाही.

डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा फायबरयुक्त आहार चांगला असतो कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी व्हायला मदत होते

८. मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले

मेंदूची कार्यक्षमता वयानुसार कमी होत जाते.

म्हणजेच जसेजसे वय वाढते तशी स्मरणशक्ती कमी होते, काही गोष्टी विसरल्या जातात.

वय वाढत जाते तसे हे अत्यंत नैसर्गिक आहे कारण वाढत्या वयाबरोबर मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होत जातो.

आहारात जर अशा पदार्थांचा समावेश केला ज्यांच्यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार होते तर त्यामुळे मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात वाढ होते.

बीट खाल्ल्याने शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार होते त्यामुळे बीट जर नियमितपणे खाल्ले तर त्याचा फायदा मेंदूच्या आरोग्याला होतो.

यामुळे वय वाढले तरी स्मरणशक्ती शाबूत राहते.

९. ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले

बिटाच्या नियमित सेवनाने बिपी कमी व्हायला मदत होते.

त्यामुळे त ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते हे आपण वर बघितलेच.

पण याचबरोबर बीटामध्ये जास्त प्रमाणात आढळणारे पोटॅशियम हे खनिज सुद्धा ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

यामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका कमी होतो.

बीटामध्ये सोडियम या खनिजाचे प्रमाण कमी असते. सोडियम हे ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी कारणीभूत असते.

या दोन्ही गोष्टींचा परिणाम होऊन बीट हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

मित्रमैत्रिणींनो, निरोगी राहण्यासाठी आपण सगळेच सदैव प्रयत्न करत असतो.

यासाठी उत्तम, चौरस आहार, नियमित व्यायाम, झोप या सगळ्याची गरज असते.

आहारात कोणते पदार्थ खायचे नाहीत याची मोठी यादी करण्यापेक्षा कोणते पदार्थ खावेत याची यादी केली तर ते सोपे जाईल नाही का?

म्हणूनच आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असणाऱ्या या भाजीचे काही फायदे वाचून तुम्ही सुद्धा तुमच्या आहारात योग्य तो बदल करायला तयार झाला असाल ना?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय