चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय

‘डबल चिन’, ‘चब्बी चिक्स’ एखाद्याच्या शाररिक रूपात आणि आत्मविश्वासावर विपरीत परिणाम करतात.
एका सर्वेक्षणानुसार सत्तर टक्के चेहऱ्यावरील चरबी ही लठ्ठपणातून येते.
काही शाररिक व्यायाम आणि धावणे (सीट अप, पुश अप्स) हे व्यायाम प्रकार शरीरातील चरबी बाहेर काढण्यासाठी महत्वाचे ठरतात.
ते चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी लाभदायी आहेत.
निरोगी व पौष्टिक आहाराव्यतिरिक्त चेहऱ्याचे खास व्यायाम केल्यास ही चरबी कमी होते.
आज आपण अशा काही व्यायाम प्रकारांची माहिती घेऊ:
१) हनुवटी उचला :
दुहेरी हनुवटी येत असल्यास हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त ठरेल.
हनुवटी वर उचलून, म्हणजे मानेपासून ते जबड्यापर्यंत घशाजवळील स्नायू व्यवस्थित ताणले जातील अशा प्रकारे काळजी घ्या.
बसून किंवा उभे असताना व्यायाम करणे सहज शक्य आहे.
हनुवटी वरच्या बाजूला वर ओढताना नजर देखील वरती (छताकडे) ठेवा.
ओठ घट्ट वरती ओढून घ्या आणि सेल्फीच्या भाषेत पाऊट करा आणि या स्थितीत १० पर्यंत आकडे मोजा.
असा व्यायाम दिवसभरात किमान नऊ ते दहा वेळा करावा.
यामध्ये ओठां खेरीज इतर कोणतेही स्नायू वापरले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
२) जबडा मोकळा करा :
तुमच्या हनुवटीला जर आकर्षक आकारात आणायचे असेल तर जबडा मोकळा करण्याचा व्यायाम लाभदायी ठरतो.
दुसरी क्रिया म्हणजे तोंड पूर्ण उघडा आणि जीभ दाताच्या खाली पाच सेकंद दाबून धरा.
या पाच सेकंदात आतील श्वास आता बाहेर करावा. ही क्रिया दिवसभरातून किमान दहा वेळा करावी.
1) चेहऱ्यावरील स्नायू ताणावेत : नावा प्रमाणेच सर्व व्यायाम हे चेहर्यावरील स्नायूंचे असून ते ताणण्यासाठी हातांचा वापर करावा.
हनुवटी कमी करण्यासाठी छातीला स्पर्श करणे आवश्यक आहे.
चेहऱ्यावरील त्वचा अशा प्रकारे खाली उतरावा म्हणजे गळ्याचे एक टोक हातात धरून खाली ओढा.
या स्थितीत “आह” हा शब्द तोंडातून निघतोच. ही स्थिती थोडावेळ स्थिर ठेवा. असे दिवसभरात किमान दहा वेळा करावे.
2) डोळे घट्ट मिटा : हा व्यायाम त्रासमुक्त असून गालाच्या स्नायूंनी डोळे घट्ट बंद करावे.
हा व्यायाम प्रकार करताना चेहऱ्यावरील स्नायूंचे आकुंचन होईल याची काळजी घ्या.
ही क्रिया दहा सेकंदासाठी करा. आता हळूहळू स्नायू मोकळे करा. ही क्रिया दिवसभरातून पाचवेळा करावी.
3) फिश फेस : एक साधी गोष्ट आहे जेव्हा मासे एखादे खाद्य खातात तेव्हा ते जसे दिसतात तसा चेहरा करून जबड्याच्या आतील त्वचा कमी होते.
या व्यायामाची खासियत म्हणजे आपण कुठेही आणि कोणत्याही वेळी व्यायाम करू शकता.
फिश फेसमुळे गाळाचे स्नायू टोन होण्यास मदत होते. या व्यायामामुळे चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावते.
फिश फेस करताना गाल आणि ओठ जास्तीतजास्त आतल्या बाजूला ओढा आणि स्मित हास्य करण्याचा प्रयत्न करा. असे केवळ पाच सेकंदासाठी करावे.
यामुळे चेहऱ्यावरील चरबी लवकर कमी होते. हा व्यायाम प्रकार सुद्धा दिवसातून दहा वेळा करावा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा